सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 23 July 2023
तांदुळजा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचा आहारामधे उपयोग करणे आवश्यक आहे.*
*तांदुळजा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचा आहारामधे उपयोग करणे आवश्यक आहे.*
शरीरात सी जीवनसत्व साठी तांदुळजा ची भाजी खावी ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शितविर्य आहे उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर कांजण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे विष विकारी, नेत्र विकारी, पित्त विकारी, मूळव्याध, यकृत व पथरी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणुन जरूर वापरावी, महारोग, त्वचेचे समस्त विकार या मध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे.
नाजूक प्रकृतीच्या व्यक्ती करिता, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी वरदान आहे डोळ्याच्या विकारांत आग होणे, पाणी येणे, डोळे चिकटने या तक्रारी करिता फार उपयुक्त आहे. डोळे तेजस्वी होतात जुनाट मलावरोध विकारात आतड्यात चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदुळजा भाजी उपयुक्त आहे. तांदुळजा पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्यासाठी जास्त उपयुक्त आहे बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी असते. आजच्या काळात बरेच आरोग्याची काळजी करणारे लोक सूप खाणे पसंद करतात. विशेष रुपात जेव्हा थंडीचा व पावसाचा ऋतू असतो. तेव्हा सूप ह्यावेळी आणखीच चवदार लागतो.
तांदुळजा सूप
हे सूप आरोग्यासाठी फारच लाभदायक मानले जाते. तरीही बरेच जन सूप नापसंत करतात. लहान मुलांना सूप फार आरोग्यदायी असते. हे लवकर पचते आणि त्यातील पोषके पटकन मिळविले जातात. तांदुळजा पासून बरेच डिशेस बनविले जातात. त्यापैकी तांदुळजाचे सूप एक सुंदर पदार्थ मानले जाते.
प्रमोद पाठक.
डोळ्याच्या समस्या.*
*डोळ्याच्या समस्या.*
10 मिली गुळवेलीच्या रसमध्ये 1-1 ग्रॅम प्रत्येकी मध आणि सैधव चांगले बारीक करा मिक्स करा, डोळ्यांना काजळाप्रमाणे लावा. हे डोळ्यासमोर अंधेरी येणे, पाणी येणे, दुखणे, डोळे झोंबणे, मोतीबिंदू बरा करते, स्ट्रेस दूर होतो.
*गुळवेलीच्या रसात त्रिफळा मिसळून काढा बनवा. 10-20 मिलीच्या रसामध्ये एक ग्रॅम पिंपळी चूर्ण आणि मध मिसळून सकाळ-संध्याकाळ सेवन केल्याने दृष्टी सुधारते,दृष्टी दोष दूर होऊन नजर साफ होते चष्मा जातो,नंबर कमी होतो
वैद्य गजानन
जखम भरण्यासाठी किंवा अल्सरच्या जखमा.*
*जखम भरण्यासाठी किंवा अल्सरच्या जखमा.*
जखम झाल्यावर किंवा अल्सरच्या दुखण्यापासून लवकर आराम मिळण्यासाठी जेष्ठमध पावडर तुपात मिसळून ते थोडे गरम करून जखमेवर किंवा व्रणावर लावल्यास वेदना पासून लवकर आराम मिळतो.तसेच चमचाभर पावडर चमचाभर तूपात घालून रोज सकाळी व संध्याकाळी खा जखमा लवकर भरतात त्याचप्रमाणे फोडांवर ज्येष्ठमध पेस्ट लावल्याने ते लवकर पिकतात आणि फुटतात.
भारत पुढील काही महिन्यांत कॅन्सरची लस लाँच करणार आहे, ती सुद्धा ₹200-400/- च्या
फार मोठी व चांगली बातमी... भारत पुढील काही महिन्यांत कॅन्सरची लस लाँच करणार आहे, ती सुद्धा ₹200-400/- च्या अत्यंत किफायतशीर किमतीत! *मेरा
भारत महान*🚩🙏
Saturday, 22 July 2023
आरोग्याबाबत सांगायचे झाले तर
आरोग्याबाबत सांगायचे झाले तर पोटाशी संबंधित समस्या उद्भवल्यानंतर नैसर्गिक उपाय म्हणून काळे मीठ, जिरे पावडर आणि लिंबू रस मिक्स करून चाटण तयार करून दिलं जातं. आरोग्यासाठी पोषक असणाऱ्या घटकांचा लिंबूमध्ये समावेश आहे. लिंबूच्या सेवनामुळे आपल्या शरीराला कोणते लाभ मिळू शकतात.
लिंबू पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू पाण्याचे बरेच फायदे आपल्या आरोग्याला होतात. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून दररोज पिले पाहिजे. कोमट लिंबू पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे शरीरास बर्याच रोगांशी लढायला मदत करते. सकाळी लिंबाचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी नेमके कोणते फायदे होतात हे आपण बघणार आहोत.
वजन कमी होते – झटपट वजन कमी करण्यासाठी आपण कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्या. हे पेय सकाळी आपल्या पाचन तंत्राचे निराकरण करून पचन प्रक्रिया सुधारते. लिंबू शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकते. हे तुमची पाचक प्रणाली निरोगी ठेवते.
सकाळी लिंबाचे पाणी पिणे हा स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. गरम पाण्यात लिंबू घालून पिल्याने त्याची चव वाढते. जर आपण त्यात एक चमचा मध घातला तर ते केवळ चवच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
त्वचेसाठी फायदेशीर – लिंबाच्या पाण्यात असलेले व्हिटॅमिन सी तुमची त्वचा आंतरिकरित्या निरोगी ठेवते. हे सुरकुत्या होण्यापासून प्रतिबंधित करते. एका अभ्यासानुसार, जे लोक व्हिटॅमिन सी समृध्द अन्न खातात. त्यांना सुरकुत्या होण्याची शक्यता कमी असते. आहारात लिंबू पाण्याचा समावेश केल्याने त्वचा नेहमीच हायड्रेट राहते. लिंबाचे पाणी पिल्याने यकृताचे कार्य सुधारते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. हे यकृत पेशींना मूलभूत नुकसानीपासून प्रतिबंधित करते. यासाठी एक कप पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये मध मिक्स करून प्या.
हे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवते. हे आपल्या शरीरास सर्दी आणि संसर्गापासून वाचविण्यात मदत करते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. नियमितपणे कोमट लिंबू पाणी प्यायल्याने हृदयरोग, मूत्रपिंडातील दगड आणि त्वचा संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. हे आपल्या पाचन तंत्रास देखील दुरुस्त करते. निरोगी ठेवते.
उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि घरगुती उपाय –*
*उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि घरगुती उपाय –*
*©️ डॉ. सतीश उपळकर*
आपली उंची ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. प्रामुख्याने उंची ठरवण्यासाठी 60 ते 80 टक्के जेनेटिक फॅक्टर आणि अनुवांशिक घटक जबाबदार असतात. तर उंचीसाठी आहार पोषण, व्यायाम यासारखे घटक 40 ते 20 टक्के घटक जबाबदार असतात.
साधारणपणे वयाच्या पहिल्या वर्षांपासून ते पौगंडावस्था सुरू होण्यापूर्वी आपली उंची वर्षाला 2 इंच प्रमाणे वाढत असते. तर पौगंडावस्था (puberty) सुरू झाल्यानंतर तेच प्रमाण वर्षाला 4 इंच इतके होते. पौगंडावस्था झाल्यानंतर म्हणजे वयाच्या 18 ते 20 वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबली जाते.
*उंची वाढवण्याचे हे आहेत उपाय :*
आपली उंची कशी वाढवावी असा अनेकांचा प्रश्न असतो. उंची वाढवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम यांचे नियोजन ठेवणे आवश्यक असते. यासाठी येथे उंची वाढीसाठी कोणता काय खावे, काय खाऊ नये व कोणता व्यायाम करावा याविषयी माहिती खाली दिली आहे.
*उंची वाढीसाठी योग्य आहार घ्या –*
वाढत्या वयामध्ये शरीराला अनेक पोषकघटकांची गरज असते. यासाठी प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम व खनजतत्वे युक्त असा योग्य आहार घेणे गरजेचे असते. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, धान्ये, कडधान्ये, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश असावा.
कॅल्शियम व व्हिटॅमिन D –
उंची वाढण्यासाठी कॅल्शियम व व्हिटॅमिन-D चे महत्वही जास्त असते. हाडांमधील density कमी झाल्याचा परिणाम उंची कमी होण्यावर होत असतो. यासाठी आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ असावेत. यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी यांचा आहारात समावेश असावा. तसेच आहारातून घेतलेले कॅल्शियम हाडांमध्ये जाण्यासाठी व्हिटॅमिन-D ची गरज असते. व्हिटॅमिन-D साठी सकाळच्या कोवळ्या उन्हात दहा ते 15 मिनिटे बसावे.
*उंची वाढण्यासाठी असा करा व्यायाम –*
नियमित व्यायामाचे फायदे अनेक आहेत. वाढत्या वयामध्ये नियमित व्यायाम केल्यामुळे वजन आटोक्यात राहते आणि ग्रोथ हार्मोनची (HGH) निर्मितीही होण्यास मदत होते. वाढत्या वयाच्या मुलांनी व्यायामासाठी किमान एक तास दिला पाहिजे. यामध्ये विविध मैदानी खेळांचा अंतर्भाव करता येईल. उंची वाढवण्यासाठी दोरीउड्या, स्ट्रेचिंग व्यायाम, पुलअप्स, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग, सूर्यनमस्कार, योगासने. हे व्यायाम प्रकार करणे गरजेचे असते. रोज सकाळी धावण्याचा व्यायाम केल्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.
*योग्य स्थितीची सवय लावून घ्यावी –*
चुकीच्या पद्धतीने खूप वेळ बसणे, वाकून चालणे यामुळे पाठीला बाक किंवा कुबड येण्याची समस्या अनेकांना होत असते. पाठीला बाक आल्यामुळे त्याचा परिणाम उंचीवर होत असतो. यासाठी पाठीला बाक येऊ नये म्हणून लहानपणापासूनच योग्य स्थितीत बसण्याची, ताट समोर बघत चालण्याची सवय (Practice good posture) लावून घ्यावी. चालताना पाठीचा कणा ताट व मान सरळ समोर असावी. यासाठी स्ट्रेचिंग, योगासने यासारखे व्यायाम करावेत यामुळेही पाठीच्या कण्याची लवचिकता वाढण्यास मदत होते.
*पुरेशी झोप घ्यावी –*
उंची वाढण्यासाठी पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे असते. पुरेशी झोप घेण्यामुळे human growth hormone (HGH) ची योग्य प्रकारे निर्मिती होण्यास मदत होते.
*वयानुसार झोप पुढीलप्रमाणे असावी –*
▪️ 3 ते 5 वर्षे वयाच्या मुलांसाठी – 10 ते 13 तास झोप आवश्यक
▪️6 ते 13 वर्षे वयाच्या मुलांसाठी – 9 ते 11 तास झोप आवश्यक
▪️14 ते 17 वर्षाच्या पौगंडावस्थेतील मुलांसाठी – 8 ते 10 तास झोप आवश्यक
▪️18 वर्षांपासून पुढे – 7 ते 8 तास झोप आवश्यक असते.
*उंची वाढवणारे सप्लिमेंट्स उपयोगी पडतात का..?*
उंची वाढवणाऱ्या height growth supplement मध्ये उपयुक्त पोषकघटक प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम, खनिजे दिली जातात. या Horlicks, Bournvita अशा supplements चा मुलांना उपयोग होऊ शकतो. मात्र अशी supplements सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
*योग्य उंची वाढीसाठी अशी घ्यावी काळजी :*
▪️ मुलांना सतत अभ्यासाला बसवणे टाळावे. कारण मुलांचा बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकास होणे गरजेचे असते.
▪️ शाळकरी मुलांच्या पाठीवर दफ्तराचे वजन जास्त प्रमाणात असू नये.
▪️ चुकीच्या पद्धतीने खूप वेळ बसणे, वाकून चालणे टाळावे.
▪️ स्मार्टफोन, टीव्हीचा अतिरेक टाळावा.
▪️मुलांना मैदानी खेळ खेळण्यास आणि व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यावे.
▪️वारंवार फास्टफूड, जंकफूड, स्नॅक्स, चिप्स, कोल्ड्रिंक्स यासारखे unhealthy foods खाणे टाळावे. मुलांना योग्य पोषकघटकांनी युक्त असणारा संतुलित आहार द्यावा.आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये, विविध फळे, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस-मासे यांचा समावेश असावा.
*उंची वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय :*
▪️योग्य आहार, नियमित व्यायाम या बरोबरच खालील काही उपाय उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
▪️देशी गाईचे दूध उंची वाढविण्यासाठी फायदेशीर असते. रोज रात्री ग्लासभर देशी गाईचे दूध प्यावे.
▪️रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे अश्वगंधा चूर्ण ग्लासभर दुधातून पिणे उंची वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. उंची वाढीसाठी हा उपयुक्त आयुर्वेदिक उपाय आहे.
▪️ दररोज दोन काळी मिरी थोड्याशा लोण्यासोबत खाणेसुद्धा उंची वाढवण्यासाठी उपयोगी ठरते.
*उंची आणि वजन कमी असण्याची समस्या :*
अनेकदा वजन कमी असणे ही उंची कमी असण्याचे कारण असू शकते. यासाठी वजनसुद्धा योग्य प्रमाणात असले पाहिजे. अनेकांचे वजन फारचं कमी असते.
*
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ ; मुंबईच्या वाहतुकी स मोठा दिलासा मिळणार ...
