Sunday, 23 July 2023

तांदुळजा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचा आहारामधे उपयोग करणे आवश्यक आहे.*

 *तांदुळजा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचा आहारामधे उपयोग करणे आवश्यक आहे.*

शरीरात सी जीवनसत्व साठी तांदुळजा ची भाजी खावी ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शितविर्य आहे उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर कांजण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे विष विकारी, नेत्र विकारी, पित्त विकारी, मूळव्याध, यकृत व पथरी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणुन जरूर वापरावी, महारोग, त्वचेचे समस्त विकार या मध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे.


नाजूक प्रकृतीच्या व्यक्ती करिता, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी वरदान आहे डोळ्याच्या विकारांत आग होणे, पाणी येणे, डोळे चिकटने या तक्रारी करिता फार उपयुक्त आहे. डोळे तेजस्वी होतात जुनाट मलावरोध विकारात आतड्यात चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदुळजा भाजी उपयुक्त आहे. तांदुळजा पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्यासाठी जास्त उपयुक्त आहे बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी असते. आजच्या काळात बरेच आरोग्याची काळजी करणारे लोक सूप खाणे पसंद करतात. विशेष रुपात जेव्हा थंडीचा व पावसाचा ऋतू असतो. तेव्हा सूप ह्यावेळी आणखीच चवदार लागतो.

तांदुळजा सूप

हे सूप आरोग्यासाठी फारच लाभदायक मानले जाते. तरीही बरेच जन सूप नापसंत करतात. लहान मुलांना सूप फार आरोग्यदायी असते. हे लवकर पचते आणि त्यातील पोषके पटकन मिळविले जातात. तांदुळजा पासून बरेच डिशेस बनविले जातात. त्यापैकी तांदुळजाचे सूप एक सुंदर पदार्थ मानले जाते.

प्रमोद पाठक.



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi