Friday, 21 July 2023

पित्ताशयात खडे का होतात ?【गालब्लेडर स्टोन】*

 *पित्ताशयात खडे का होतात ?【गालब्लेडर स्टोन】*


शरीरामध्ये उजव्या बाजूला यकृत असते. यकृताच्या खाली पित्ताची पिशवी असते. तिला पित्ताशय असे म्हणतात.


यकृतात तयार होणारे पित्त या पिशवीतून लहान आतड्यात येते. स्निग्ध पदार्थाचे पचन होण्यासाठी पित्त आवश्यक असते.


पित्ताशयात जंतूंमुळे दाह झाल्यावर बऱ्याचवेळा नंतर खडे तयार होतात. या खड्यांचे दोन प्रकार आहेत. कोलेस्टेरॉल ७० टक्क्यांच्या वर असलेले कोलेस्टरॉल खडे, हा पहिला व कोलेस्टेरॉल १० टक्क्यांहून कमी असलेले रंगद्रव्य खडे हा दुसरा प्रकार.


जंतूसंसर्गामुळे पित्ताशयात प्रथिनयुक्त पदार्थ तयार होतात (पेशी नष्ट झाल्यामुळे). या प्रथिनयुक्त पदार्थांच्या सहाय्याने मग इतर क्षार तेथे गोळा होतात व मग खडे तयार होतात.


विषमज्वर झालेल्या रुग्णामध्येही कालांतराने पित्ताशयात खडे तयार होतात. चाळीशी ओलांडलेल्या दोन-तीन मुले झालेल्या, लठ्ठ स्त्रीमध्ये पित्ताशयातील खडे होण्याचे प्रमाण जास्त असते.


पित्ताशयात खडे झाले, तरी कित्येक वेळा कोणतेही लक्षण निर्माण होत नाही. मात्र काही वेळा ताप, खूप जीवघेणी वेदना, हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसून येतात. वेदना खूपच तीव्र व असह्य अशी असते. त्यामुळे ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दवाखान्यात कळ थांबण्यासाठी मॉर्फीन किंवा पेंटोझोकेनचे इंजेक्शन देतात.


डॉ. प्रमोद ढेरे,



फक्त एक छान सखी हवी 💓

 फक्त एक छान सखी हवी 💓


४०/५०चीच स्त्री आता सर्वात तरुण असते.

अनुभवांच्या शिदोरी सकट बोल्डसुद्धा असते


कुरकुरणाऱ्या गुडघ्यांना ती 

सहज adjust करते.

मुलांबरोबर लहान होते,

मुलीचीही मैत्रीण होते.


संसारात राहूनही स्वतःची स्पेस जपते.

गाणी, गोष्टी, मूव्ही, नाटक हवे तेव्हा बघते.


४०/५०ची स्त्री सर्वात स्मार्ट म्हणणे काही वावगं ठरणार नाही.


बाहेर जाण्यासाठी आता परवानगी लागत नाही.

लोक काय म्हणतील याची काळजी करत नाही.


साडी आणि सासू आता discussion उरले नाही.


विमानाचे पंख लावून तिला जग फिरायचे असते.


अंगभर दागिन्यांना केव्हाच सुट्टी देते.

डायमंडचं मंगळसूत्र तेवढं दिमाखात मिरवते.


जगायचच राहून गेलेलं ती आता जगत असते.

४०/५०चीच स्त्री आता सर्वात तरुण असते. 


देवाला मी आज निवांत पाहीलं आणि लगेच एक फूल वाहिलं  


देवाने हसून म्हटलं "मागा, काय जे मनात साठलं."


"देवा मला नको काही, कोऱ्या कागदावर सही घे "


"एक मिनिट, एक मिनिट ... विचारलेच आहेस म्हणून मागतेय.


एक छानशी मैत्रीण दे.

हवे तर अजुन एखादे फुल घे.


दिसायला छान नसली तरी चालेल.

पण बोलायला छान असायला हवी.


डोळे सुंदर नसले तरी चालेल,

पण नजरेतून बोलणारी हवी,


केस लांब नसले तरी चालेल,

पण सोबत लांब चालणारी हवी


माझ्या प्रत्येक दुःखात रडली नाही तरी चालेल,

फक्त माझ्या सुखात थोडे हसणारी हवी.


यातलेही काही कमी असेल तरी चालेल,

फक्त एक छान मैत्रीण हवी.


.. मैत्रीण ..

 


किती गोड असते हो आपल्या आयुष्यात एक मैत्रीण असणे,

कारण ती मैत्रीण नाही तर आपल्या प्रत्येक सुख दुःखामध्ये आपल्या सोबत असणारी आणि देवाने आपल्याला आधाररुपी दिलेली एक मागणी असते.

ती मैत्रीण नसते तर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी एक व्यक्ती असते.


४०/५०च्या स्त्रियाचें अगदी नेटकं वर्णन, खरेच पन्नाशी नंतर स्त्रियांना पंख फुटल्याचे जाणवते आहे,

मैत्रिणीबद्दल खुपच छान लिहीले. वाचून अगदी मन भरुन आले.

मैत्रिणीची पण आपल्या आयुष्यात एक वेगळीच भूमिका असते. तिच्या सोबतीने कुठल्याही वयात आयुष्याचा स्वच्छंदपणे आस्वाद घेता येतो.


आपापल्या छान मित्र - मैत्रीणीं साठी पाठवा.😊🙏🌹🌹🌹🌹

वेरिकोज व्हेन्स*

 *वेरिकोज व्हेन्स*


 हा पायांचा अशुद्ध रक्तवाहिन्यांचा( नीलांचा) आजार आहे. अत्यंत वेदनादायि, गुंतागुंतिंचा गंभिर आजार आहे. या नीलांचा व फुफ्फूसांचा जवळचा संबंध आहे. फुफ्फूसाकडे रक्तशुद्धि करता नेण्याचि भूमिका या व्हेंस करतात. त्यामुळे पायातिल रक्तवाहिन्या मधलि गुठळि वरच्या बाजुला सरकलि तर, त्यामूळे रक्तवाहिन्या ब्लाँक होउन ही क्रिया शुद्धिकरणाचि बंद पडते.( पल्मोनरि एम्बोलिसम)...


** कारणे***. अत्यंत चुकिचि जीवनशैलिचा आजकाल अवलंब केल्या जातो आहे.. बैठे काम, एका ठिकाणि बसून राहण्याचि सवय, हार्मोनल इम्बँलन्स, सततचा लांबचाप्रवास, रक्त पातळ करणार्या घटकाचि अनियमित पातळी, वाढते वय, .. यामूळे हा आजार बळावतो.


**उपचार योजना**..(१) सेब साईडर व्हिनेगार एक अद्भूत औषध आहे. त्या जागेवर मालिश करा, काहि दिवसातच वेरिकोज व्हेंसचा आकार कमि होतो.


(२) आँलिव्ह आँईल आणि vit. E. आँईल एकत्रित करून हलका मसाज करावा. एक ते दोन महिने.


(३)5,6, लसूण पाकळ्या घेऊन एका जारमद्धे टाकून 3 संत्र्यांचा रस टाकून जार वरखालि ढवळावा, नंतर आँलिव्ह आँईल टाका एक चमचा, 12 तास तसेच ठेवा आणि नंतर 15 मिनिटे जिथे सूज आहे तिथे मालिश करा. काहि महिन्यातच चांगले परिणाम दिसतात.


(४) अक्रोडचे तेल एका सूति कपड्यावर घेउन १,, 2 महिने हळूवार मसाज करा...


(५)झेंडूंच्या फुलांचा रस काढून नसांवर लाउन मसाज करा.(६) एक मूठभर ओवा घेउन एक कप पाण्यां उकळवा, मग थंड झाल्यावर रोज आँईलचे काहि थेंब टाकून कापसाने नसांवर लावा.


(७) अर्जुन व्रुक्षाचि साल गायिच्या दुधात उकळवून प्यावे

  (८) नियमितपणे अर्धा तास भरभर चालावे, जेणेकरून नसातले रक्त पातळ होईल.


(९) झोपतांना पाय उंच करून ठेवा काहि वेळ.. हळूहळू व्हेंसमधले रक्त कमि होते. आहारात धनेमिश्रित पाणी, शहाळ्याचे पाणी, पानकोबि, पालक, हिरव्या भाज्या ठेवा,


(१०) एका बादलित सोसेल ईतके गरम पाणि घेउन पाय बुडवून ठेवावे पंधरा मिनिटे... फळे, व अंकुरित कडधान्ये खावित...


 वरिल उपायांनि हा आजार नक्किच बरा होतो..*******...


 आयुर्वेद अभ्यासक..... सुनिता सहस्रबुद्धे......


_*(

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतफूड पॅकेटस, ब्लॅंकेटस्, कंटेनरसह मदत साहित्याचा ओघ

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतफूड पॅकेटस, ब्लॅंकेटस्, कंटेनरसह मदत साहित्याचा ओघ


जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुविधांसाठी साहित्य इरशाळगड वाडी घटनास्थळाकडे रवाना


            अलिबाग, दि.20 (जिमाका) :- इरशाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्यासाठी शासन यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील असून येथे मदत कामासाठी कार्यरत प्रत्यक्ष मनुष्यबळासाठी व दुर्घटनेतील वाचलेल्या नागरिकांसाठी घटना स्थळावर तात्पुरते निवारे, अन्न, मदत साहित्य यांची तातडीने उपलब्धता केली जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रायगड जिल्ह्यातील उद्योग व संस्था पुढे आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुविधा निर्माण करण्यासाठी साहित्य घटनास्थळाकडे पाठविले जात आहेत.


            यामध्ये मदत साहित्य व निवाऱ्यासाठी घटनास्थळाच्या बेसकॅम्पकडे २० X १० आकाराचे ४ कंटेनर, ४० X १० चे २ व इतर दोन कंटेनर पाठविण्यात येत आहेत. सदर कंटेनर उरण, जेएनपीटी, रत्नागिरी एमआयडीसी, जेएसडब्लू समूह येथून रवाना झाले आहे. चौक , खालापूर येथील तात्पुरती निवाराव्यवस्था केली जात आहे.


            घटनास्थळ हे उंचावर असून मशिनरी साहित्य पोहचत नसल्याने दरड कोसळल्याने निर्माण झालेले मातीचे ढिगारे दूर करण्यासाठी पनवेल येथून ८० अनुभवी कारागिरांचे पथक अवजारांसह दुपारनंतर घटना स्थळी पोहोचले असून सकाळ पासून मदत कार्यात असलेल्यांना त्यामुळे विश्रांती मिळणार आहे.


            दुर्घटनाग्रस्त भागात विद्युत पुरवठा होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत अभियंता, महावितरण यांचे पथक पाठविण्यात आले आहे. यासह यंत्रणेसाठी तात्पुरती निवारा व्यवस्था, अन्न व पिण्याच्या पाण्‍याचा पुरवठा यादृष्टीने महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता व त्यांची यंत्रणा काम करत आहे. तेथे साहित्य सामुग्री व अति महत्वाच्या व्यक्तींच्या समन्वयन, हेलिपॅड आदी सुविधा तयार केल्या जात आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक अलिबाग यांचे कडून जखमींवर उपचारासाठी सुविधा देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. स्वत: विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. म्हसे दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर रात्री दीड वाजता घटना स्थळी प्रत्यक्षात पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, खालापूर तहसिलदार अयुब तांबोळी यांनी रात्री परिस्थितीचा अंदाज घेत, बचावकार्यासाठी आवश्यक साधन सामग्री, मनुष्यबळ करावयाच्या उपाययोजना यांची तयारी केली.  


            महसूल, जिल्हा परिषद व पोलिस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरी संरक्षण दल मुंबई येथून दोन पथके, एनडीआरएफची चार पथके १५० मनुष्यबळासह घटनास्थळी असून इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य युवा मंडळे, ट्रेकर्स् ग्रुपचे प्रतिनिधी असे दुपारनंतर जवळपास ७०० जण मदत कार्यात सहभागी होते. पुणे येथून एनडीआरएफचे पथक पहाटे ४ वाजता घटनास्थळी पोहाचले होते. नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाचे पथक, पनवेल नगरपालिका येथून 44 अधिकारी कर्मचारी, 2 जेसीबी पाठविण्यात आले तसेच 8 ॲम्बुलन्स, कर्जत येथून कळम, आंबिवली, मोहिल आदी प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय पथके घटनास्थळी पहाटेच पोहोचले होते. त्यानंतर देखील आरोग्य विभागाचे इतर ठिकाणचे वैद्यकिय अधिकारी कर्मचारी यांना पाठविण्यात आले आहे.


            आज भर पावसात मदत कार्य सुरु असून काल सर्वाधिक 198 मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात झाली. यावेळी कोकण विभागाच्या सरासरी 136.7 मि.मी. पाऊस झाला आहे. अशावेळी दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे.


            मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर ३००० फूड पॅकेटस उपलब्ध करण्यात आले आहेत. यासह घटनास्थळावर पाणी बॉटल्स, ब्लॅंकेट्स, टॉर्च, मदत साहित्य, चादरी, बिस्कीट तसेच इतर प्रथम उपचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.


            जिल्ह्याच्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्यात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. मदतीसाठी शासकीय विभागांची, संघटना व स्वयंसेवी संस्थांची मदत पथके रवाना झाली. यामध्ये पुणे, अलिबाग, खोपोली, कर्जत, लोणावळा, पनवेल, वाशी, मुंबई व येथील सहभाग आहे.


            विविध शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा, एनडीआरएफ टीम, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यांच्याकडून मदत कार्य करण्यात येत आहे .


००००



 

इरशाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार


 इरशाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यास प्राधान्य


 


            अलिबाग, (जिमाका) दि. 20 :- बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यास प्राधान्य दिले जात असून नियोजन झाले आहे. कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भात देखील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इरशाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याला मार्गदर्शन व गती देण्याचे काम त्यांनी केले.


            बचाव कार्यात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सतत पाऊस होत असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. अवजड यंत्रसामुग्री व अवजारे पोहोचण्यात अडचणी येत आहेत. दोन हेलिकॉप्टर तैनात केले होते, परंतु ते खराब हवामानामुळे येथे पोहोचू शकलेले नाहीत, असे यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले


            ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित असून अधिकारी, रेस्क्यू टीम ही यांच्या संपर्कात रात्रीपासून होती, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले .


            ते म्हणाले, बचाव कार्य करताना स्वतःचे जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करत आहेत. इथे मदत आणि बचावकार्य अवघड आहे, यात सहभागी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तरीसुद्धा पाऊस असताना जे लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत त्यांना बाहेर सुरक्षित काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सां

गितले.


00000

Thursday, 20 July 2023

सुयोग्य आहारात धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल, तूप या सर्व गोष्टी दर २४ तासाला घ्यायला हव्या.*

 *सुयोग्य आहारात धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल, तूप या सर्व गोष्टी दर २४ तासाला घ्यायला हव्या.*


 दिवसभरातून त्या विभागून घ्याव्यात. दुपारी व रात्री चौरस आहार तर सकाळी, संध्याकाळी हलका नाश्ता, दूध असणे महत्त्वाचे. हे सर्व घेऊनही अन्नघटकांची कमतरता होतेच.संतुलित आहार हे सर्व पुरवतो: तुम्हाला दिवसभर सक्रिय राहण्यासाठी ऊर्जा आवश्यक आहे. तुम्हाला वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले पोषक, तुम्हाला मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत करतातसंतुलित आहार म्हणजे सकस आहार, शरिराला पोषक आहार. यामध्ये प्रोटिन्स, व्हिटामिन्स तसेच शरिराला गरजेचे 

शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे.कारखान्यात यंत्रांनी तयार केलेला नसावा.


जो आहार आपल्याला शारीरिक मानसिक, बौद्धिक व रोगप्रतिकारक शक्ती; चपलता, स्मरणशक्ती, सौंदर्य, व्यक्तिमत्त्व, दीर्घायुष्य देतो, तोच सकस आणि योग्य आहार होय. आजचा आपला आहार या गोष्टी द्यायला असमर्थ आहे. कारण रोग्यांची आणि रोगांचीही संख्या वाढताना दिसत आहे.

प्रमोद पाठक.



अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीची चौकशी करणार

 

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीची चौकशी करणार

- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील


            मुंबई, दि. 20 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत अकोला जिल्ह्यातील आलेल्या तक्रारीबाबत चौकशी करण्यात येईल. राज्यभरात असे काही प्रकार घडले असल्यास त्याचीही चौकशी करण्यात येईल, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.


       अकोला जिल्ह्यातील 2 हजार 337 शेतकऱ्यांचे 112 सहकार सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांचे संमती पत्र न घेता परस्पर पीक कर्जांचे पुनर्गठन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही. याबाबतीत सहकारी सोसायटी बरखास्त करून त्यावर प्रशासकीय मंडळ स्थापन करावे याबाबत लक्षवेधी विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी मांडली. त्याला उत्तर देताना मंत्री दिलीप वळसे- पाटील बोलत होते.


          मंत्री श्री. वळसे -पाटील म्हणाले, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जबाबतची वस्तुस्थिती पडताळून पाहण्यात येईल. त्याचबरोबर राज्यात अशाप्रकारे काही घटना घडल्या असल्यास त्याची देखील चौकशी करण्यात येईल. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व मान्यता घेऊन या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री श्री. वळसे -पाटील यांनी दिली.


0000





 


Featured post

Lakshvedhi