Wednesday, 19 July 2023

तीळ, तीला तीला चा गोडवा

 *तीळ :-* 


तीळ मजबुत हाडांसाठी. तीळात कॅल्शियम आहे, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तीळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. तीळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही. दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचाभर तीळ खाल्लेत, तर तुमचे दातही मजबूत होतील. तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते. हिवाळा स्वास्थासाठी चांगला मानला जातो. थंडीच्या दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक गुणकारी घटक असतात. दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तीळाचे मोठे फायदे आहेत. थंडीत तीळाचं सेवन शरीरासाठी उत्तम मानलं जातं. तीळामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. तर आपल्या शरीराची हाडंदेखील मजबूत करते. वैज्ञानिकदृष्ट्या तीळाच्या तेलामध्ये केसांसाठी पोषक घटक असल्याचं सांगण्यात आलं आहे. तीळाच्या तेलात व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनही मूबलक प्रमाणात आढळतं.


◼️तीळात सेसमीन नावाचे एन्टीऑक्सिडेन्ट आढळतात जे कॅन्सर पेशी वाढण्यापासून बचाव करतात. 


◼️तीळाच्या सेवनामुळे भूक वाढते. तीळ वात, पित्त आणि कफची समस्या कमी करण्यास मदत करते. 


◼️तीळाच्या तेलाने सतत मालिश केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. 


◼️थंडीच्या दिवसांत तीळाचं तेल त्वचेवर लावल्याने त्वचेवरील रखरखीतपणा दूर होतो. तीळाच्या सेवनाने चेहरा चमकदार होण्यास मदत होते. 


◼️पोटात दुखत असल्यास काळे तीळ गरम पाण्यासोबत खाल्ल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो. 


◼️तीळामध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे तणाव, डिप्रेशनच्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळू शकते.


◼️तीळ आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने सुक्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो. 


◼️कान दुखत असल्यास तीळाच्या तेलात लसून एकत्र करुन, तेल हलकं गरम करुन लावल्यास कानदुखी कमी होऊ शकते.


◼️तीळाचं सेवन दातांसाठीही गुणकारी ठरतं. सकाळी ब्रश केल्यानंतर तीळ चावून खाल्ल्याने दात मजबूत होण्यास फायदा होतो.


◼️सतत तोंड येत असल्यास तीळाच्या तेलात सेंधव मीठ मिसळून लावल्यास आराम पडू शकतो.


डॉ. प्रमोद ढेरे,


_*(

प्रिय सखी.. आयुष्य जगून घे....*🌸

 महीला मंडळ आवश्य वाचा                                 


🌸 *प्रिय सखी.. आयुष्य जगून घे....*🌸


मी म्हणते बिनधास्त जग 

चिंता नको करू 

कुणा बद्दल मना मध्ये 

राग नको धरू ll


 जे काय वाईट घडलं 

त्याला लाव काडी 

वर्तमानात जग जरा 

मजा घे थोडी ll


संकट येत राहतील 

घाबरून नको जाऊ 

कोणत्याच गोष्टीचा 

करू नको बाऊ ll


भिऊ भिऊ रोजच जगतेस 

जरा मोकळा श्वास घे 

मित्र-मैत्रिणी जवळ कर 

आणि थोडी मजा घे ll


चौकटीत राहून राहून 

कंटाळा येणारच 

चार चौघात बसल्यावर 

दुःख पळून जाणारच ll


स्त्री झाली म्हणून काय 

तिला मन नसतं का ?

गुलाबी , लाल रंगाचं 

तिचं वाकडं असतं का ?

शेजारणींनी , मैत्रिणींनी 

एकत्र आलं पाहिजे 

रंग खेळून मन कसं 

चिंब झालं पाहिजे ll


मोठं झाल्या नंतर सुद्धा 

लहान होता येतं

मुखवटा न घालता 

आयुष्य जगता येतं ll


गप्पा मार , जोक सांग 

खळखळून हास 

अर्धी भाकरी जास्त घे 

म्हणू नको बास ll 


मन मोकळं जगल्यानं

ब्लडप्रेशर होतं कमी 

अटॅक बिटॅक येणार नाही 

याची अगदी नक्की हमी ll


गप्पातल्या lnsulin ने 

Sugar कमी होते 

हृदयाच्या ठोक्यांची 

गती धीमी होते 

धुळवड साजरी करणं म्हणजे 

वाया जाणं नसतं 

गडगडाटी हंसणं म्हणजे 

खरं Tonic असतं 

एक दिवस पत्ते खेळल्यानं 

जुगारी थोडंच होतं 

टेन्शन कमी झालं की 

जगणं सोपं होतं ll


कितीही चांगलं वागलं तरी 

जग वाईटच म्हणणार आहे 

तुझा कोण भव्य - दिव्य 

पुतळा वगैरे उभारणार आहे ? ll


म्हणून म्हणते आता तरी

मनावरचं ओझं झुगारून दे

मोकळेपणाने श्वास घेऊन बघ

आणि.....थोडं जगून घे ।।


🙏Dedicated to all my beautiful......... आई, सासु, भावजयी, नणंदा, मावशी,बहिणी,मुलगी,भाच्या, पुतण्या,सुना,विहीनी या सर्वांसाठी..आणि माझ्या जिवलग मैत्रीणींसाठी🙏

💝💝💝💝💝💝💝💝

गाढव

 


भारतीय कमांडो जय हो



भावपूर्ण श्रद्धांजली मंगला नारळीकर

 🌹भावपूर्ण श्रद्धांजली 🌹

मंगला जयंत नारळीकर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी अल्पशा आजाराने पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात आज पहाटे दि.17/7/2023 रोजी दुःखद निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो 🙏🏻


त्यांच्यावर एक सुंदर लेख 


*तिचं मंगलपण...*


गणितज्ञ डॉ. मंगल नारळीकर! विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचीक पत्नी. माझी आत्ते नणंद. माझ्यापेखा पंधरा वर्षांनी मोठी, परंतु तिच्याशी गप्पा मारताना, ना कधी तिच्या बुध्दिमत्तेचं आणि प्रसिद्धीचं वलय आड येतं, ना वयातील अंतर. गप्पांच्या ओघात आपण मैत्रीच्या पातळीवर कधी उतरतो हे कळत नाही. हा माझ्या एकटीचा नाही, तर तिच्या सहवासात येणाऱ्या अनेकांचा अनुभव. नुकतीच १७ मे रोजी वयाची ८० वर्षे तिनं पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने तिच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची एक झलक.

गणित म्हणलं की भल्याभल्या हुशार लोकांना धडकी भरते, परंतु गणिताविषयी जन्मजात प्रेम असणाऱ्या मंगलताईसारख्या व्यक्तींच्या दृष्टीनं गणित म्हणजे नुसती आकडेमोड नसते तर पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी वहिवाट असते. या संबंधीची तिच्या लहानपणची एक आठवण. एकदा हौसेनं ती पुऱ्या तळायला बसली होती. तिला कुणीतरी काही विचारलं असता ती पटकन म्हणाली, “मध्ये बोलू नकोस, माझे आकडे चुकतात. पुरी तेलात टाकल्यावर सहा आकडे मोजून झाले की मी उलटते आणि बारा आकडे मोजून झाले की तेलातून काढते. त्यामुळे सगळ्या पुऱ्या टम्म फुगतात आणि पाहिजे तेवढ्या खमंग होतात.” आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी अंकगणितामध्ये बसवायची आणि अचूक पद्धतीनं करायची तिला अशी लहानपणापासून आवड होती. 

मंगलताई ही पूर्वाश्रमीची मंगल राजवाडे. शालेय जिवनापासून अनेक बक्षिसे मिळवत ती एम.ए. झाली. मुंबई विद्यापिठात सर्वप्रथम आली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) या संस्थेमध्ये तिनं संशोधनाला सुरवात केली, परंतु तिच्या करिअरला यू टर्न मिळाला तो १९६६ साली जयंतरावांशी झालेल्या विवाहामुळे. जयंतरावांनी तरुण वयात फ्रेड हॉईल यांच्याबरोबर केलेल्या संशोधनामुळे जगप्रसिध्द शास्त्रज्ञ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत होते. लग्नानंतर केंब्रिजमध्ये तिनं संसाराचे प्राथमिक धडे गिरवताना गणित विषयातील अध्ययन चालू ठेवले. तिची हुशारी बघून चर्चिल कॉलेजमध्ये टीचिंग फेलोशिपसाठी तिचं नाव सुचवलं गेलं, परंतु जयंतरावांना विविध देशांमध्ये व्याख्याते म्हणून निमंत्रित केलं जात असल्याने हा प्रस्ताव तिनं नाकारला. पुढे १९७२ साली भारतात परत येण्याचा निर्णय दोघांनी मिळून एकमताने घेतला. त्यामागे आपल्या मातृभूमीविषयी वाटणारं प्रेम तर होतंच शिवाय आपल्या वृध्द आईवडलांची जबाबदारी घ्यायला हवी ही जाणीव होती आणि आपल्या मुलींवर भारतीय संस्कार व्हावेत अशी इच्छाही. भारतात आल्यावर जयंतरावांनी टीआयएफआरमध्ये संशोधन आणि अध्यापनाचे काम सुरु केले. मंगलताईनं तिचं पीएच. डी. चे काम हाती घेतलं. १९८१ साली संश्लेषात्मक अंक सिध्दांत या विषयात पीएच. डी. मिळवली आणि पदव्युत्तर आणि एम. फिल.च्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे काम सुरू केलं. अनेक संशोधनात्मक लेख लिहिले. शालेय विद्यार्थ्यांसाठी गणितगप्पा, गणिताच्या सोप्या वाटा यासारखी पुस्तकं लिहिली. ही झाली तिची औपचारिक ओळख. कुणाही कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या व्यक्तीची असते अशी; परंतु मंगलताईचं वैशिष्ट्य असं की गणितामुळे आत्मसात केलेलं तर्कशास्त्र आणि जयंतरावांच्या सानिध्यात वृध्दिंगत झालेला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तिनं जपला. 

स्वयंपाकघर नव्हे प्रयोगशाळा

अनेकदा वेगवेगळ्या देशांत राहायची संधी मिळाल्यामुळे तेथील पाककृती तिनं शिकून घेतल्या. त्या जशाच्या तशा बनविण्यात ती वाकबगार आहे. चाळीस वर्षांपूर्वी तिच्या विदेशी पाककृतीसाठी लागणारे मालमसाले सहजगत्या उपलब्ध व्हायचे नाहीत. तेव्हा त्यांच्या योग्य देशी पर्याय तिनं निवडले. मॅपल सिरप ऐवजी वेगवेगळ्या स्वादाची काकवी. ओरॅगॅनोऐवजी ओव्याची ताजी पानं तर चीजकेकसाठी पनीर. ‘हर्बल टी’ बनविण्यासाठी बागेतील फुलापानांचा वापर ती करते, तेव्हा ते खाण्यायोग्य आहेत यांची शहानिशा केल्यावरच. घरच्या कुंडीत वाढलेली मोहरीची कोवळी रोपं सँण्डविच आणि सॅलेडमध्ये घातल्यावर स्वाद वाढविणारी कशी ठरतात याचा अनुभव मी तिच्याकडे घेतला आहे. बटाटेवड्याचं सारण हरबरा डाळीच्या पिठात बुडवून तळण्याऐवजी उडदाची डाळ भिजवून, वाटून त्याच्या पिठात बुडवून तिनं तळले तेव्हा वड्यांची चव अफलातून लागत होती. कुठेतरी वाचलेले किंवा कुणाकडे तरी खाल्लेले पदार्थ लक्षात ठेवून त्यात यथायोग्य बदल करण्याची प्रयोगशीलता तिच्याकडे आहे. रोजचा स्वयंपाक करताना किंवा पाहुण्यांसाठी बनवतानाही त्यामध्ये पिष्ठ, प्रथिन, स्निग्ध पदार्थांचा समतोल साधण्याचा तिचा प्रयत्न असतो. ठरावीक मोसमात मिळणारी फळं वर्षभर खायला मिळावीत यासाठी त्यावर शास्त्रीय पद्धतीनं प्रक्रिया करण्यात ती पटाईत आहे. एकदा तिच्या नेहमीच्या फळवाल्यानं ती मोठ्या प्रमाणात संत्री कशासाठी नेते म्हणून कुतूहलानं विचारलं. तेव्हा संत्र्यापासून बनवलेल्या मार्मालेडची बाटली तिनं त्याच्या मुलांसाठी भेट दिली. एवढंच नाही तर बियांमधील पेप्टीनचं महत्त्व त्याला सांगायला ती विसरली नसणार. कच्च्या पालेभाज्यांचा वापर करताना त्या पूर्णपणे निर्जंतुक करण्यासाठी पोटॅशियम परमँगनेटचा वापर ती करते. पोटॅशियम पाण्यात टाकलं की पाण्यातील प्राणवायू शोषून घेते. त्यामुळे त्या पाण्यात भाज्या बुडवून ठेवल्या की कीड मरून जाते, शिवाय पोषण मूल्य अबाधित राहते हे त्यामागचं शास्त्र! करोना काळात घराघरातून सॅनिटायझरने भाज्या, फळे धुतली गेली नि करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तशी ही कृती विस्मृतीत गेली. मंगलताई मात्र कटाक्षाने स्वयंपाकघरातील विज्ञान कायम आचरणात आणत आहे. 

प्रत्येक गोष्टीचा वापर... पुनर्वापर 

  होता होई तो, एकही गोष्ट वाया घालवायची नाही आणि पर्यावरणाला हानी पोचेल असं काही करायचं नाही याचा वसा तिनं घेतला आहे. त्यासाठी तिच्यातील कलागुणांना तिनं कल्पकतेची जोड दिली आहे. सभासमारंभात मिळणाऱ्या शालींचे मुलांसाठी गरम कोट स्वत: शिवून अनेकांना भेट दिले आहेत. लहान मुलांसाठी कपडे शिवताना कपड्यांना ती अस्तर अशा खुबीने लावते की त्याची शिवण अजिबात टोचू नये. साडीबरोबर येणाऱ्या डिझाईन्सच्या ब्लाउज पिसमधून नातींसाठी झबली, परकर पोलकी शिवली आहेत. नुकतंच तिनं मला मायक्रोव्हेवमध्ये ठेवून गरम करता येईल असं हिटिंग पॅड भेट दिलं. आयताकृती कापडाला कप्पे करून त्यामध्ये धान्य भरल्यानंतर ते शिवून टाकले होते. मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्यावर हे पॅड त्यातील धान्यासह गरम होते आणि बाहेर काढून मस्त शेक घेता येतो. हे पॅड कुणाकडे तरी पाहून तिनं बनवलं असलं तरी ते बनवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि सुबकता वाखाणण्याजोगी आहे. लॉक डाऊनच्या सुरवातीला जुन्या मऊ साड्या वापरून, तिनं तीन पदरी मास्क बनवले. अगदी एन ९५ मास्क इतकेच सुरक्षित ठरावेत असे. दरवर्षी राख्या ती स्वत: बनवते. एकदा तिच्या राहत्या इमारतीच्या वरती मधमाशांनी पोळी केली. माणूस बोलवून तिनं पोळी तर उतरवलीच पण त्यांनतर स्वच्छ कपडानं मध गाळून घरोघर वाटण्याचा उपद्व्याप केला. घरात नवा फ्रिज घेतल्यावर त्याचं भलं मोठं खोकं टाकून न देता नातींना खेळायला दिलं. नातींनी त्यामध्ये दारखिडक्या कापून एक झोपडी बनवली. उरलेल्या कचऱ्यातून मंगलताईनं झोपडीच्या दारांसाठी कड्या – नातींच्या शब्दात ‘क्लेव्हर बोल्ट.’ बनवले. आजीनातींचा खेळ अजूनही रंगला असता, परंतु दिवाणखान्यात ती झोपडी इतकी मध्येमध्ये यायला लागली की तिला आपल्या घरी घेऊन जाण्याचा वटहुकुम जयंतरावांना काढावा लागला. अलीकडे ते थकल्यामुळे पायी फिरायला बाहेर पडलं की त्यांना मध्येमध्ये बसावं लागे. वाटेत बाक असत, पण त्यांची उंची कमी असल्याने ते सोयीचे ठरत नसत. मंगलताईनं लगेच यावर तोडगा काढला. घरच्या उशीला पट्टा शिवला. पर्सप्रमाणे ती उशी स्वत:च्या खांद्याला लटकवून फिरायला जाण्यात खंड पडू दिला नाही.   

लेखन... वाचन... सामाजिक बांधिलकीचं भान...

जयंतराव आणि मंगलताई दोघांनाही अभिजात साहित्याची विलक्षण जाण आहे आणि आवडही. त्यांच्या दिवाणखान्यातील कपाटं पुस्तकांनी खचाखच भरलेली असतात आणि टीपॉयवर पुस्तकं नि मासिकं ढिगानं रचलेली असतात. दोघांनी विपुल लेखन केलं आहे. मंगलताईनं तिच्या लेखनातून आपल्या समाजातील चुकीच्या प्रथापरंपरांवर अनेकदा टीका केली आहे तर कधी अनेक गोष्टींमागचं विज्ञान उलगडून दाखवलं आहे. जयंतरावांनी लिहिलेल्या ‘आकाशशी जडले नाते’ या ग्रंथांचे तिनं इंग्रजीत भाषांतर केले आहे. दोन्ही भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे ही गोष्ट शक्य झाली, हे निश्चित! तिला आवडलेली पुस्तकं अनेकांपर्यंत पोचावी, या उद्देशानं, ती पुस्तकांच्या प्रती विकत घेऊन ग्रंथालयांना भेटीदाखल देते. लेखनवाचनाइतकाच शिक्षकी पेशा तिच्या रोमारोमात भिनला आहे. तिचं वैशिष्ट्य असं की पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवताना तिला जेवढा आनंद मिळतो तेवढाच आनंद पहिलीदुसरीतल्या मुलांना शिकवताना मिळतो. काय शिकवतो यापेक्षा आपण जे शिकवतो ते समोरच्यापर्यंत पोचणं तिला महत्वाचं वाटतं. आत्तापर्यंत आर्थिक कमकुवत गटातील असंख्य शाळकरी मुलांना तिनं तन्मयतेनं शिकवलं आहे. अनेकांना शिक्षण, आजारपण यासाठी मदत केली आहे, परंतु लग्नखर्चासाठी म्हणून कुणी पैशाची मागणी केली तर ती नाकारण्याइतका सडेतोडपणा तिच्यापाशी आहे.

आजाराशी दोन हात

विविध आघाड्यांवर कार्यरत असताना १९८६ साली वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी कॅन्सरशी सामना करायची वेळ तिच्यावर आली. शरीरमनाची ताकद खच्ची करणाऱ्या आजाराला तिनं खंबीरपणे तोंड दिलं. त्यानंतर १९८८ साली आणि अलीकडे २०२१ आणि २०२२ साली त्यानं परत डोकं वर काढलं. प्रत्येक वेळी आपली सारी व्यवधानं सांभाळत अपराजित वृत्तीनं ती लढली आहे. आजही लढत आहे. तिच्या तिन्ही मुली आणि जगभर विखुरलेले असंख्य सुहृदजन तिची काळजी घेत आहेत. तिची हिंमत पाहून स्तिमित होत आहेत. 

मंगलताईच्या व्यक्तिमत्वाचं एका शब्दात वर्णन करायचं ठरवलं तर ओठावर शब्द येतो, ‘सहजता’. सहजता हाच तिच्या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव आहे. एकाच वेळी ती करत असलेल्या असंख्य गोष्टी पाहून बघणाऱ्याला वाटतं हे सगळं सहजसोपं असतं म्हणून. कारण हे सगळं करताना आपण खूप काही करतोय असा तिचा भाव नसतो नि अभिनिवेशही. असते ती तिची गणिती बुद्धी आणि कलावंताची मनस्वी वृत्ती. त्यामुळे काळ, काम वेगाचं व्यस्त गणित ती बिनचूक रीतीनं सोडवू शकली आहे. तिच्या वाट्याला आलेली प्रश्नपत्रिका नक्कीच सोपी नव्हती. कठीण प्रसंग... अवघड माणसं तिच्याही आयुष्यात आली. परंतु रडतकुढत न बसता सगळ्यांना तिनं व्यवस्थित कोष्टकात बसवलं. तिच्या बोलण्यात स्पष्टपणा असतो, तेवढाच मायेचा ओलावाही. शिस्त असते, पण शिस्तीची धास्ती वाटावी इतकी कठोर ती कधीच नसते. यातच तिच्या व्यक्तिमत्वातील ‘मंगलपण’ सामावलेलं आहे. 

मृणालिनी चितळे

मोबाईल ९८२२३०१७५०

रानभाजी - सुरण 🍀*

 🪗🪗🪗🪗🪗🪗🪗🪗🪗

      *🍀 रानभाजी - सुरण 🍀*

🪗🪗🪗🪗🪗🪗🪗🪗🪗


*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*


*शास्त्रीय नाव* : Amorphophallus paeoniifolius 

*कुळ* : Araceae

*इंग्रजी* : Elephant foot yam

*स्थानिक नावे* - रानसुरण, जंगली सुरण, अरण्य सुरण.


सुरण ही आशिया खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशा मध्ये उगवणारी कंदमूळ प्रकारातील अळूच्या कुलातील वनस्पती आहे. या वनस्पतीच्या कंदाचा प्रामुख्याने भाजी म्हणून वापर होतो. अर्श म्हणजे मूळव्याध. सुरण मूळव्याधीचा नायनाट करते म्हणून त्यास अर्शोघन म्हणतात. कण्दू म्हणजे खाज. सुरण प्रक्रिया न करता खाल्ले असता घशास खाज सुटते, म्हणून त्यास कण्डूल म्हणतात. तसेच त्याच्या पानाच्या हिरव्या देठावर पांढरे चट्टे असल्यामुळे त्यास चित्रदण्डकही म्हणतात. सुरण हे औषधी गुणांनी युक्त आहे म्हणून त्याची ‘कन्दनायक’ अशी ओळख आहे. ही वनस्पती विदर्भ, कोकण आणि पश्चिम घाटातील जंगलांत आढळते. काही ठिकाणी तिची लागवड सुद्धा करतात. 


सुरणाचा कंद ओबडधोबड, अर्धगोलाकृती, चपटा आणि गर्द तपकिरी रंगाचा असतो. हा कंद म्हणजे सुरणाचे रूपांतरीत खोड असते. ही वनस्पती वर्षातील सुमारे आठ महिने सुप्तावस्थेत असते. पावसाळा आला की तिच्या कंदाला कोंब येतो आणि तिची झपाट्याने वाढ सुरू होते. या वनस्पतीचे वैशिष्ट्य असे की तिला एका वर्षी केवळ एक पान आणि त्याच्या पुढील वर्षी फुले येतात. जमिनीबाहेर सरळ उंच खोडासारखा वाढणारा, पांढरे चट्टे असणारा अवयव म्हणजे सुरणाच्या पानाचा देठ. या देठाच्या वरच्या टोकाला छत्राकार संयुक्त पान असते. पानांद्वारे प्रकाशसंश्लेषण करून सुरण त्याच्या कंदामध्ये स्टार्चच्या रूपात अन्न साठविते आणि पुढील वर्षी याच ऊर्जेचा वापर करून फुलोरा किंवा पुष्पविन्यास तयार करते. मोठ्या कंदावर छोटे छोटे कंद तयार होतात, ज्याचा उपयोग शाकीय अभिवृद्धीसाठी होतो.


सुरणामध्ये पुष्पविन्यास हा स्थूलकणिश प्रकार पाहावयास मिळतो. त्याच्या तळाशी १०.१ - १२.७  इंचाची दोन ते तीन तपकिरी रंगाची शल्कपर्णे असतात. या प्रकारात सहपत्रीचे रूपांतर स्थूलकणिशाला संरक्षण देण्यासाठी चॉकलेटी गुलाबी रंगाच्या मोठ्या पानासारख्या जाड अवयवात अर्थात महाछदामध्ये झालेले असते. यात मध्यभागी सुमारे १ मीटर उंचीचा जाड दंडगोलीय भरीव दांडा असतो. या दांड्याच्या टोकाला कीटकांना आकर्षित करण्यासाठी गडद चॉकलेटी किंवा गुलाबी रंगाचे उपांग असते. त्याखाली पिवळ्या रंगाचा ४-५ इंच लांबीचा नर पुष्पविन्यास आणि थोड्या अंतरावर मादी पुष्पविन्यास असतो. या स्थूलकणिशाला एक मंद प्रकारचा घाण वास असल्याने माश्या आकर्षित होऊन त्या परागीभवनाचे काम करतात.


फुलांमध्ये दल किंवा निदल नसून ती सूक्ष्म आणि जवळ जवळ एकवटलेली असतात. नर फुलांमध्ये २-४ अवृंत पुंकेसर असतात. तर मादी फुलामध्ये १-४ कप्पी स्त्रीकेसर असते. कुक्षीपुंज आखूड असून कुक्षी साधी किंवा खंडित असते. परागीभवनानंतर मादी पुष्पविन्यासामध्ये फलधारणा अर्थात कणीस तयार होते. फळ लाल रंगाचे अनष्ठिल प्रकारचे असून त्यात दोन ते तीन बिया असतात. बिया अभ्रूणपोषी असून बृहत अधोबीजपत्री असतात. सुरणाच्या कंदाची आणि पानांची भाजी तसेच काप कटलेटस सुद्धा करतात. सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचा आहारात वापर करतात. त्याच्या कंदात कॅल्शियम ऑक्झॅलेट असल्याने खाज येते. हा खाजरेपणा घालविण्यासाठी त्याचे तुकडे चिंच किंवा आमसुलाच्या पाण्यात भिजत ठेवतात किंवा उकडतात.


*औषधी उपयोग व गुणधर्म*

* सुरण रूक्ष, तुरट, तिखट गुणधर्मांचे आहे. भूक व चव वाढविते. दमा, श्वासनलिकेचा दाह, वांती, पोटदुखी, मूळव्याध, रक्तविकार, हत्तीरोग यांवर उपयुक्त आहे.

* सुरणाचा ताजा कंद क्रियाशील व उद्दीपक, कफोत्सारक असून पुनः बलस्थापित करण्याची क्षमता त्यात आहे.

* सुरणात अ, ब तसेच क ही जीवनसत्त्वे आहेत.

* सुरणाचा कंद लोणच्याच्या स्वरूपात वायुनाशी समजला जातो.

* सुरण अरुची, अग्निमांद्य, दमा, खोकला, जंत, यकृताचे व प्लीहेचे विकार यांवर गुणकारी आहे.

* संधिवातात कंद व बियांचा लेप लावल्यास सूज कमी होते.

* सुरणाच्या कंदाची भाजी मूळव्याधीवर गुणकारी आहे. अर्शातील रक्तवाहिन्याचे संकोचन होते, म्हणून रक्त वाहणाऱ्या अर्श रोगांत सुरण हितावह आहे.

* सुरणाच्या कंदाची भाजी खाल्ल्याने यकृताची क्रिया सुधारते आणि शौचास साफ होते तसेच बद्धकोष्ठता कमी होते.

* आतड्यांच्या तक्रारींवर सुरणाची भाजी खाणे हितकारक असते. तो कृमींचा नायनाट करतो, म्हणून तो कृमिघ्नही आहे.

* आयुर्वेद औषधांमध्ये सुरणाच्या कंदाची पावडर मोठ्या प्रमाणात वापरतात. सुरणापासून बृहतसुरणकबाय आणि सुरानादिवटक हे कल्प तयार केले जातात.


*समीक्षक – बाळ फोंडके*


*पाककृती - सुरण फ्राय*

* साहित्य - अर्धा किलो सुरण, अर्धी वाटी तांदूळ पीठ, पाव वाटी रवा, ५-६ कोकम, पाव कप तेल, १ टिस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, चवी पुरते मीठ.

* कृती - सुरणाचे त्रिकोणी तुकडे करून घेणे. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद व कोकम टाकून दहा मिनिटे शिजवून घेणे. रवा तांदूळ पीठ मसाले एकत्र मिक्स करून घ्या. सुरणाचा प्रत्येक काप वरील मिश्रणामध्ये घोळवून घ्या. तव्यावर तेल टाकून ते चांगले गरम होऊ द्या. त्यात घोळवलेले सुरणाचे काप फ्राय करून घ्या. गरमा गरम काप चपाती सोबत किंवा असेच खाऊ शकता.

*पाककृती - सुरण मसाला*

* साहित्य - अर्धा किलो सुरण, २ कांदे, २ टोमॅटो, ८ लसणाच्या पाकळ्या, १ इंच आलं, पाव वाटी कोथिंबीर, २ टीस्पून संडे स्पेशल मसाला, पाव चमचा हळद, १ चमचा तिखट, २ टीस्पून धणे जीरे पावडर, १० कढीपत्त्याची पाने, टेबलस्पून तेल, चवी नुसार मीठ, सुपारी एवढा गुळाचा खडा, अर्धा चमचा मोहरी, चिमुटभर हिंग.

* कृती - प्रथम सुरणाची सालं काढून त्याच्या बारीक फोडी कराव्या. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. आलं लसूण बारीक ठेचून घ्यावं. कोथिंबीर बारीक कापून घ्यावी. भाजीचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावं. तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग व मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आलं व लसूण ठेचलेलं घालून छान परतावं. त्यामध्ये हळद, तिखट, मसाला, गूळ मीठ, धने, जीरे पावडर सगळं घालून छान परतावं. झाकण ठेवून त्याला तेल सुटू द्यावं. मग त्यामध्ये थोडे पाणी घालून झाकण ठेवावं व मसाला छान परतून घ्यावा. मग सुरणाच्या फोडी धूउन त्यामध्ये घालाव्या व एकजीव करावे. थोडे पाणी घालावे व झाकण लावून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या कराव्या. कुकर थंड झाला कि कोथंबीर घालून भाजी चपाती भाकरी भाताबरोबर खाऊ शकतो. 


*संदर्भ : मराठी विश्वकोश*

अलिबाग जिल्हा रुग्णालयासाठीनवीन अद्ययावत इमारत उभारणार

 अलिबाग जिल्हा रुग्णालयासाठीनवीन अद्ययावत इमारत उभारणार


- रवींद्र चव्हाण


 


            मुंबई, दि. १८ : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९८०-८१ मध्ये करण्यात आले आहे. या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले असून त्याची दुरूस्ती आणि पुनर्बांधणी आवश्यक आहे. यामुळे रूग्णालयाची सहा मजल्यांची नवीन इमारत उभारण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.


            मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, जिल्हा रुग्णालयाच्या जागेतच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. महाविद्यालय प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयात झालेल्या करारानुसार तीन वर्षापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाला रुग्णालयातील रुग्णसेवा, पायाभूत सुविधा उपयोगात आणता येणार आहेत. कराराच्या तीन वर्षानंतर वैद्यकीय महाविद्यालय उसर येथे होईल. तोपर्यंत रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


            संरचनात्मक परीक्षणानुसार इमारतीचे डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. इमारतीच्या 58 खांबांपैकी 17 खांब काढून पूर्णपणे नवीन करण्यात आले आहेत. इतर खांबांचे काम पुढील काळात करण्यात येणार आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सहा मजल्यांची इमारत बांधण्यात येईल, अशी माहितीही मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.


            या चर्चेत सदस्य जयंत पाटील, प्रवीण दरेकर, डॉ.मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi