Sunday, 16 July 2023

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ‘इंडस्ट्री मिट’मध्ये २९० उद्योजकांसमवेत सामंजस्य करार

 कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ‘इंडस्ट्री मिट’मध्ये २९० उद्योजकांसमवेत सामंजस्य क

उद्योगांनी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यासराज्य शासन सर्वतोपरी मदत करणार


- मंगल प्रभात लोढा

            ठाणे, दि. 15 (जिमाका) : देशातील अनेक समस्यांचे मूळ हे बेरोजगारी असून ती दूर करण्यासाठी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योगांनी त्यांच्या कारखान्यात, बांधकामाच्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारावे. त्यासाठी राज्य शासन सर्व परवाने देऊन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. 


            जागतिक कौशल्य दिनानिमित्त ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या संकल्पनेतून मुंबई विभागातील नामांकित उद्योग, उद्योजक, उद्योजकांच्या संस्था, नोकरी देणाऱ्या संस्था व मोठे लेबर कंत्राटदार इ. समवेत सामंजस्य करार करण्याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आज ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विभागीय इंडस्ट्री मिटचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाले.


            त्यावेळी मंत्री श्री लोढा बोलत होते. विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. रामस्वामी एन. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, कोकण विभागीय अपर आयुक्त किसन जावळे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे प्रादेशिक प्रमुख मोहम्मद कलाम, एल अँड टी स्किल ट्रेनर्स अकादमीचे प्रमुख बी.ए. दमाहे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र इनोव्हेशन चॅलेंजचे अनावरण मंत्री महोदयांच्या हस्ते झाले. तसेच उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना पारितोषिके देण्यात आली. नाविन्यता सोसायटी, ठाणे जिल्हा परिषद व निओमोशन कंपनीच्या वतीने १५ दिव्यांगाना नाविन्यपूर्ण व्हीलचेअरचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. निओमोशन या स्टार्टअपने दिव्यांगासाठी हे विशेष नाविन्यपूर्ण व्हीलचेअर बनविले आहेत. 


            श्री. लोढा म्हणाले की, कौशल्य विभागाच्या वतीने आयोजित इंडस्ट्री मीट ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नवी सुरूवात आहे. तरुणांमध्ये कौशल्य असल्यास त्याचे जीवन सुखकर होईल. त्यामुळे देशातील सर्व तरुणांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन ‘स्किल इंडिया’ उभारण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्योजक व उद्योगांनी शासनाबरोबर एकत्र येण्याची गरज आहे. हे सरकार आपल्यासोबत मिळून काम करेल. उद्योगांनी, नोकरी देणाऱ्या संस्थांनी त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आपल्या संस्थेत, बांधकाम क्षेत्रात, कारखान्यात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारावे. त्यासाठी आवश्यक लागणारे तरुण स्वतः निवडावेत अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून हे तरुण पुरविण्यात येतील. या प्रशिक्षणासाठी लागणारा निधी शासनाकडून देण्यात येईल. 


            बेरोजगारी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र, शासन व उद्योग एकत्र आल्याशिवाय ही समस्या दूर होणार नाही. त्यासाठी राज्य शासनाने इंडस्ट्री मिट सारखा कार्यक्रम सुरू केला आहे. पहिल्या इंडस्ट्री मिटमध्ये 1 लाख 27 हजार रोजगारासाठीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यामध्ये एक लाख 9 हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे. तरुणांना नोकरीची आवश्यकता असून उद्योगांनाही कुशल मनुष्यबळ आवश्यक असते. त्यामुळे उद्योजक व नोकरी इच्छुक तरुणांना एकत्र आणणारा दुवा म्हणून हा विभाग काम करत आहे. नोकरी देणाऱ्या संस्था, उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असेही श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले. 


            श्री. सिंह म्हणाले की, इंडस्ट्री मिटच्या कार्यक्रमामुळे दोन लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. प्रत्येक गावात कौशल्य आपल्या दारी कार्यक्रम राबविण्यात येणार असुन याअंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक असे 500 कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यातून उद्योगांमध्ये नाविन्यता आणून उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे कुशल मनुष्यबळ तयार केले जाणार असून त्यातून जगातील कुठल्याही ठिकाणी आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरविता येईल. याबरोबरच या विभागाच्या उपक्रमांचे संनियंत्रण व मूल्यांकन करणार आहे. यामाध्यमातून महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेमध्ये हातभार लावण्यात येणार आहे. 


            जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, विभागीय इंडस्ट्री मिटच्या आयोजनाचा मान मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे. कौशल्य, रोजगार विभागाच्या वतीने पुढील काळात सहाशे रोजगार मेळावे घेण्यात येणार आहे. यातील बहुसंख्य मेळावे हे ठाणे व परिसरात भरविण्यात यावे. यासाठी आवश्यक ते सहकार्य जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी स्थानिकांमधून मिळाले तर उद्योगांची भरभराट होईल. औषध निर्माण व रासायनिक कंपन्या हे ठाणे जिल्ह्याचे बलस्थान आहे. या उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग व पर्यावरण या दोन्हीचा सांगड घालण्याची गरज आहे. उद्योगांना सहकार्यासाठी जिल्हा प्रशासनात एक विशेष अधिकारी नियुक्त करण्यात येईल. 


            प्रास्ताविकात आयुक्त रामास्वामी एन. यांनी कौशल्य विकास विभागाच्या वतीने आयोजित उपक्रमाविषयी माहिती दिली. श्री. रामास्वामी म्हणाले की, उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याअंतर्गत गेल्या वर्षी सव्वा लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले. विभागाच्या वतीने दरवर्षी 200 रोजगार मेळावे घेण्यात येत होते. आता ही संख्या 600 इतकी केली आहे. राज्यातील ग्रामीण भागात कौशल्य केंद्रे निर्माण करण्यात येणार असून 500 ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी, सोलर, इलेक्ट्रिक वाहने, रोबोटिक या विषयीचे प्रशिक्षण देण्यात येईल. 


इंडस्ट्री मिटमध्ये 290 कंपन्यांबरोबर सामंजस्य करार


            आज विविध इंडस्ट्री, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट, एजन्सीज यांचे समवेत इंडस्ट्री मिट कार्यक्रम होत आहे. या आज इंडस्ट्री मिट कार्यक्रमामध्ये २९० उद्योजकांसमवेत सामंजस्य करारनामे करण्यात आले असून याद्वारे २ लाख ३ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.


महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे अनावरण


            महाराष्ट्र राज्यातील औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण" जाहीर केले. या धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करणे व त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाची सुरुवात आज करण्यात आली. 


            महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज हे संस्था स्तर आणि तंत्रज्ञान सक्षम तपासणी, जिल्हास्तरीय तपासणी आणि इन्क्युबेशन आणि अनुदान सहाय्य या तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहेत. यात प्रत्येक जिल्ह्यात निवडक १०० विद्यार्थ्यांना सादरीकरणाची संधी दिली जाणार असून प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोत्तम १० विजेत्यांना प्रत्येकी रुपये १ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. राज्यभरातून विजेत्या ३६० विद्यार्थी नवउद्योजकांना १ वर्ष इन्क्युबेशन सहाय्य आणि मेंटॉरशिपचा लाभ मिळणार आहे ज्यानंतर सर्वोत्तम १० नवउद्योजकांना प्रत्येकी रुपये ५ लाखांचे पारितोषिक त्यांच्या नवसंकल्पनेवर काम करण्यासाठी दिले जाणार आहे.


 


०००

मेडिटेशन आणि विचार.....*

 *मेडिटेशन आणि विचार.....* 


आजकाल जो उठतो, तो मेडिटेशन करण्याचा सल्ला देतो. मन शांत राहावं, म्हणून आपण तसा प्रयत्न करून पाहतोही, पण ते कुठे एका जागी थांबते? डोळे बंद करून ध्यानधारणेचा प्रयत्न केला असता, असंख्य विषय मनात थैमान घालत असतात. अशाने मन शांत होण्याऐवजी जास्तच अशांत होतं. 


मेडिटेशन करणाऱ्या प्रत्येकाला हा प्राथमिक अनुभव येतोच. कारण, मेडिटेशन ही काही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्नपूर्वक सराव करावा लागतो. तो कसा करायचा, ते जाणून घेऊया.


मन शांत करणे, ही सर्वात अवघड गोष्ट आहे. अशातच, आजच्या मल्टी टास्किंग युगात आपलं मन इतक्या कामात, गोष्टींत अडकलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे शिवधनुष्यच! मात्र, सरावाने आणि सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते.


*सकाळची वेळ निवडा...* 

वरील गोष्टी आत्मसात झाल्या, की ध्यानधारणेच्या सरावाला सुरुवात करता येईल. त्यासाठी सकाळची वेळ निवडा. उठल्यावर, मोबाईल न पाहता शांत चित्ताने, डोळे मिटून स्वतःचे अवलोकन करा. सकाळी डोक्यात विचारांचे ट्रॅफिक नसते. त्यामुळे मन एकाग्र होण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा असतो. तरीदेखील विचार येत असतील, तर येऊ द्या. काहीवेळाने तेही निघून जातील. हळू हळू एखाद्या नदीच्या शांत डोहाप्रमाणे मनातील तरंग थांबतील आणि मन ध्यानधारणेसाठी तयार होईल.


*ध्यानधारनेच्या वेळी संगीत लावू नका...* 

मुळातच सगळ्या गोष्टीतून मन अलिप्त करण्यासाठी ध्यान धारणा केली जाते. कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकत ध्यानधारणा केली असता, मन गाणे ऐकण्यात रमेल आणि गाण्याशी संबंधित विचार मनात डोकावू लागतील. अशा वेळी कोणतेही संगीत न ऐकता आपल्याला श्वासाचे संगीत ऐकायचे आहे, हे लक्षात ठेवा


डॉ. प्रमोद ढेरे,



Saturday, 15 July 2023

अधिवेशन काळातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करा

 अधिवेशन काळातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करा


                                                           : सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि .१५: राज्यातील जनतेच्या प्रश्नांविषयी मुद्देसूद चर्चा करुन त्यांना न्याय देण्यासाठी तसेच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने विधिमंडळ अधिवेशन महत्वाचे असून मागील अधिवेशनात सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.


            राज्याचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै पासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वने, सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय या तीनही विभागातील कामांसंदर्भात आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती, सर्व तारांकित प्रश्न, लक्षवेधी, पुढील संकल्प यासंदर्भात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे अधिकाऱ्यांसह सविस्तर बैठक घेतली. तीनही विभागांचे सचिव व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी तीनही विभागाचे सादरीकरण बघून विषयनिहाय मुद्देसुद चर्चा केली. सांस्कृतिक कार्य विभागाने वर्षभरात राबविलेल्या कार्यक्रमांची माहीती घेऊन विभागाने यासंदर्भात माहिती पुस्तिका प्रकाशित करण्याची सूचना त्यांनी केली. प्रधान सचिव श्री विकास खारगे यांनी सादरीकरण केले.


            वन विभागाच्या विविध योजना, नुकसान भरपाई, वन्यजीव संवर्धन आणि सामाजिक वनीकरण याबाबत प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी यांनी सादरीकरण केले. 


मत्स्य व्यवसाय विभागाच्या बैठकीत प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सविस्तर सादरीकरण केले. मच्छीमार बांधवांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या योजना, जाहीर करण्यात आलेले अनुदान, डिझेल परतावा, गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन, केंद्रातील योजनांची अंमलबजावणी, ससून डॉक विकास इत्यादी विषयांवर बैठकीत चर्चा करुन आवश्यक सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केल्या

.


0000


प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याबद्दल

 प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याबद्दल


मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे आभार


            मुंबई, दि. 15 : मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआरमध्ये आर्थिक दुर्बल घटकांकरीता (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. उत्पन्नाची मर्यादा आता तीन लाखांवरुन सहा लाख रुपये करण्यात आली असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री हरदिप सिंह पुरी यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला असून सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे.


            प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी उत्पन्नाचे निकष तीन लाखांवरून सहा लाख रुपये करण्याची विनंती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्राकडे 21 जून 2023 रोजी पत्राद्वारे केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा पाठपुरावा केला. या विनंतीला केंद्राने सकारात्मक प्रतिसाद देऊन उत्पन्नाच्या निकषात वाढ केली असल्याचे राज्य शासनाला कळविले आहे.



0000


वंचित, उपेक्षितांना एकाच छताखाली मिळाला योजनांचा लाभ;राज्यात 75 लाख लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

 वंचित, उपेक्षितांना एकाच छताखाली मिळाला योजनांचा लाभ;राज्यात 75 लाख लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य


                                                                       : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू


                                                                                              : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


जिल्ह्यातील प्रकल्पांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार


                                                                                               : उपमुख्यमंत्री अजित पवार


नाशिक, दि. 15 जुलै, (जिमाका वृत्तसेवा) :


            विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची कास धरण्यासाठी टॅब, जिल्ह्यात प्रथमच तृतीय पंथीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच बचतगटांच्या महिलांना उद्योगांसाठी अनुदान, बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे किट, आदिवासी बचतगटांना विटभट्टीसाठी अनुदान, महिला सक्षमीकरण, शेतकरी लाभाच्या विविध योजना, होतकरू तरुणांना रोजगार, घरकुल आवास योजना अशा सर्वसमावेशक विकास योजनांचा लाभ आज नाशिक जिल्हावासियांना एकाच छताखाली मिळाला. निमित्त होते ‘शासन आपल्या दारी’ जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे.....


            शासन आपल्या दारी अभियान हा शासकीय कार्यक्रम राहिला नसून लोकचळवळ बनली आहे. या अभियानामुळे लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला आहे. राज्यातील 75 लाख लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर या अभियानाच्या माध्यमातून हास्य फुलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कष्टकरी बांधकाम कामगार, बचतगटाच्या महिला, तृतीयपंथीय, विद्यार्थी, सरपंच अशा समाजातील सर्व घटकांच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करून व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. हे या कार्यक्रमाचे आगळं-वेगळं वैशिष्ट्ये होते.


            डोंगरे वसतिगृह मैदान येथे 'शासन आपल्या दारी' या अभियानाचा नाशिक जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,‌ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री‌ छगन भुजबळ, ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री गिरीष महाजन,‌‌ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे, ॲड माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, डॉ.राहूल आहेर, सिमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बोरसे, नितीन पवार, मौलाना मुफ्ती मोहम्मद, राहूल ढिकले, हिरामण खोसकर, सुहास कांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत यांच्यासह जिल्ह्यातील लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       'शासन आपल्या दारी' अभियानात नाशिक जिल्ह्यात 10 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लाभ दिल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली योजनांचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने एका वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सर्व निर्णय सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, विद्यार्थी तरूणांच्या हिताचे आहेत. 35 सिंचन प्रकल्पांना शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मुंबई मेट्रो, समृध्दी महामार्ग व जलयुक्त शिवार यासारख्या प्रकल्पांना चालना देण्याचे काम शासन करत आहे.


            महिला सक्षमीकरणासाठी बचतगटांना अधिक भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध लोकाभिमुख योजना राबवित आहे. एकाच वेळेस 75 हजार पदांची भरती केली जाणार आहे. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमाच्या माध्यमातून तरूणांना सक्षम करण्याचे काम शासन करत आहे. शासकीय योजनांपासून कोणीही वंचित राहणार नाही, सर्वांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.


उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            उत्तर महाराष्ट्र पर्यायाने नाशिक जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी गोदावरी व तापी खोऱ्यातून वाहून जाणारे पश्च‍िमेचे पाणी अडविण्यासाठी नार-पार प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येईल. त्‍यासाठी आवश्यक प्रमाणात ननिधी उपलब्ध करून देऊन खान्देशसह नाशिक, अहमदनगर ही जिल्हे कायमची दुष्काळमुक्त करण्यात येतील. पुढील तीन वर्षात नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसाला 12 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.


            शासनाने मागील वर्षभरात राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्र गुंतवणूकीत भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक बॅंक राज्यातील 10 हजार गावांमध्ये ॲग्री सोसायटी स्थापन करण्यास शासनाला मदत करणार आहे. निओ मेट्रोच्या कामाला ही लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल. शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. नाशिक येथे आयोजित शासन आपल्या दारी योजनेत शासकीय योजनांच्या लाभाचा कुंभमेळा भरला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


जिल्ह्यातील प्रकल्पांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार


                                                        : उपमुख्यमंत्री अजित पवार


            जिल्ह्यातील नार - पार प्रकल्प, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करणे, जिल्हा झोपडपट्टी मुक्त करणे, मुंबई - नाशिक समृध्दी मार्गाचे काम, ओझर विमानतळाचे काम, नाशिक - पुणे हाय स्पीड रेल्वे अशा विविध जिल्हा विकासाच्या पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्याच प्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


            महाराष्ट्राचा विकास हे शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. मिनी महाराष्ट्र म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. तसेच शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही नैसर्ग‍िक संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी नागरिकांना आश्वस्त केले.


 


शासन आपल्या दारी कौतुकास्पद कार्यक्रम : केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार


            केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभा शासन आपल्या दारी या उपक्रमातून गावोगावी पोहच‍व‍िण्यात येत आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ त्यांना या उपक्रमातून मिळत असल्याने नागरिकांचा शासनावरील विश्वास दृढ होत आहे. सेवा, सुशासन व गरीब कल्याण संकल्पनेतून शासन कौतुकास्पद काम करत आहे. असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.  


            यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाची माहिती डॉ.अमोल शिंदे यांनी दिली. 25 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाचे ई- भूमिपूजन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात अनुकंपा भरतीतून 490 अनुकंपा धारकांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शासनाच्या विविध योजनांच्या 17 लाभार्थी व 6 सरपंचांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. स्मार्ट ग्राम कार्यकारी सरपंच गोरख जाधव, सचिन दरेकर, सुनिता पगारे, अश्विनी पवार, भाऊराव गवळी व शितल पवार या 6 सरपंचांचा समावेश होता. या सर्व लाभार्थ्यांचा व सरपंचांना लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.


       यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किट, ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात एका छताखाली 40 शासकीय विभागाच्या विविध योजनावरील माहितीचे स्टॉल उभारण्यात आले. तसेच रोजगार मेळााव्यात 50 आस्थापनाचा 4500 रि

क्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.


००००


 


महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र चेंबरची मागणी

 महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र चेंबरची मागणी


लवकरच निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे ललित गांधी यांना आश्वासन

नाशिक : राज्यातील व्यापारी उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणी प्रकरणी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.


            शिष्टमंडळात वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन संजय सोनवणे व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. या वेळी ललित गांधी म्हणाले, केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेऊन नुकतीच नॅशनल ट्रेडर्स बोर्डची स्थापना केली आहे. या रचनेमध्ये राज्यांनी राज्यस्तरावर अशा बोर्डची स्थापना करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सध्या एक कोटीहून अधिक संख्येने असलेल्या व्यापाऱ्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करणे अत्यावश्यक आहे.


            राज्यातील व्यापार उद्योग क्षेत्राचे प्रश्न, नवीन उद्योगांना सवलती, वीज दरवाढ, व्यापार क्षेत्राचे प्रश्न, फूड सेफ्टी ऍक्ट, बाजार समिती कायदा, महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील दुकान गाळ्याच्या भाड्याचे प्रश्न अशा विविध विषयावर संबंधित प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असल्याचेही चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. या वेळी कार्यकारणी सदस्य राजाराम सांगळे, सचिन शहा, व्हिनस वाणी, दत्ता भालेराव, रणजितसिंग आनंद, अजय शहा, ओमप्रकाश गगराणी, नेहा खरे, भावेश मानेक, मनीष रावल, संजय राठी, रवींद्र झोपे, कैलास पाटील, रतन पडवळ आदी उपस्थि

त होते.


 


टोमॅटो शिवाय काही अडलंय का ?*

 *टोमॅटो शिवाय काही अडलंय का ?* वाढलेल्या टोमॅटोच्या दराने मला तर आनंद झाला. कारण प्रत्येक वेळी पेशंटला बहुतेक सर्व आजारांत टोमॅटो खाऊ नका असा सांगण्याचा त्रास वाचला.


*कोणत्या अजारांत टोमॅटो खाऊ नये ?*

* सर्दी खोकला

* सांधेदुखी

* सूज

* डोकेदुखी 

* अम्लपित्त (acidity )

* वाढलेलं uric acid

* वाढलेलं creatinine

* मूत्रपिंडाचे आजार ( kidney stones , CKD etc)

* Allergies

* त्वचाविकार


मग खायचाच कशाला रोज रोज टोमॅटो ? बिया काढून नको , साॕस नको , टाॕपिंग नको


*टोमॅटोला पर्याय आहे ?*

आहेच की. १५ - २० वर्षांपूर्वी टोमॅटोचा इतका वापर नव्हता. पंजाबी पदार्थांमुळे टोमॅटोची ग्रेव्ही हा प्रकार आला.नाहीतर कोकम, चिंच , लिंबू क्वचित् आमचूर यावर आमचे पदार्थ छान बनत होतेच की ! 


*या घटकांचे फायदे*

*चिंच*- 

यामध्ये vit C भरपूर आहे. 

पोट साफ ठेवते 

पचन सुधारते.

मोठ्या आतड्यांचे आरोग्य सुधारते व त्यांची हालचाल ( peristalsis ) नियमित करते


*सांधेदुखी असणार्यांनी चिंचेची चटणी खाऊ नये. पण स्वयंपाकातील चिंच चालते*


*कोकम*

वजन व cholesterol कमी करते

हृदयाचे कार्य सुधारते

पचनक्रिया सुधारते

अम्लपित्तावर वरदान

अंगावर पित्त उठणे कमी होते

त्वचेची कांति सुधारते


*लिंबू*

Vit C चा पुरवठा

पाचक

वजन कमी करण्यात उपयोगी 

त्वचेचे आरोग्य सुधारते


*आमचूर*

कफ कमी करते

वारंवार होणाऱ्या मूत्रप्रवृत्तिला थांबवते

सांध्यांना मजबूती देते.


या चारांशिवाय ऋतुनुसार उपलब्ध कैरी व आवळ्याचा वापरही आपण स्वयंपाकात आवर्जून करा.


*कैरी*

पाचक

यकृताचे कार्य सुधारते


*आवळा*

Vit C चा उत्तम पुरवठा

पाचक

अम्मपित्त नाशक

शरीरातील नवीन पेशी ( cells ) बनवण्यात मदत करतो.



एवढा मुबलक आरोग्यपूर्ण साठा असताना टोमॅटोची गरज काय ? 

कधीतरी पावभाजी , छोले बनवाताना वापरा.पण रोज रोज नको रे बाबा ! 


वैद्या चंदाराणी बिराजदार 

MD आयुर्वेद


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

Featured post

Lakshvedhi