महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र चेंबरची मागणी
लवकरच निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे ललित गांधी यांना आश्वासन
नाशिक : राज्यातील व्यापारी उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणी प्रकरणी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.
शिष्टमंडळात वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन संजय सोनवणे व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. या वेळी ललित गांधी म्हणाले, केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेऊन नुकतीच नॅशनल ट्रेडर्स बोर्डची स्थापना केली आहे. या रचनेमध्ये राज्यांनी राज्यस्तरावर अशा बोर्डची स्थापना करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सध्या एक कोटीहून अधिक संख्येने असलेल्या व्यापाऱ्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करणे अत्यावश्यक आहे.
राज्यातील व्यापार उद्योग क्षेत्राचे प्रश्न, नवीन उद्योगांना सवलती, वीज दरवाढ, व्यापार क्षेत्राचे प्रश्न, फूड सेफ्टी ऍक्ट, बाजार समिती कायदा, महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील दुकान गाळ्याच्या भाड्याचे प्रश्न अशा विविध विषयावर संबंधित प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असल्याचेही चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. या वेळी कार्यकारणी सदस्य राजाराम सांगळे, सचिन शहा, व्हिनस वाणी, दत्ता भालेराव, रणजितसिंग आनंद, अजय शहा, ओमप्रकाश गगराणी, नेहा खरे, भावेश मानेक, मनीष रावल, संजय राठी, रवींद्र झोपे, कैलास पाटील, रतन पडवळ आदी उपस्थि
त होते.
No comments:
Post a Comment