Friday, 14 July 2023

दिव्यांग बालकांना मिरज येथीलशासकीय संस्थेमध्ये मोफत प्रवेश

 दिव्यांग बालकांना मिरज येथीलशासकीय संस्थेमध्ये मोफत प्रवेश


 


            मुंबई, दि. 13 : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय निवासी संस्थेत दिव्यांग (अस्थिव्यंग) बालकांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून मोफत प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन अधिक्षक, शासकीय दिव्यांग बालगृह व शाळा, मिरज यांनी केले आहे.


             मोफत शिक्षण सुविधेमध्ये संस्थेच्या परिसरात पहिली ते चौथीपर्यंतचे मोफत प्राथमिक शिक्षण, इयत्ता 5 वी पासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत, माध्यमिक शाळेत जाण्यायेण्याकरिता मोफत वाहतुकीची सुविधा, पाठ्यपुस्तके वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत देण्यात येणार आहे. मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक आहेत.


            वसतिगृह सुविधेमध्ये दिव्यांग मुला- मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था व मोफत जेवण, प्रत्येक विद्यार्थ्यांस कॉट, गादी, बिछाना व इतर साहित्याचा मोफत पुरवठा, दररोज आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय, शुद्ध व थंडगार पाण्याची सुविधा पुरविण्यात येणार आहे.


            शस्त्रक्रिया भौतिकोपचार सुविधेमध्ये अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा, गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकल वाटप,वयोगट शून्य ते सहाकरिता मोफत भौतिकोपचार करण्यात येतील.


            प्रवेशाबाबतच्या अटींनुसार प्रवेशित अस्थिव्यंग असला पाहिजे, वयोगट 6 ते 17 वर्षे, प्रवेश अर्जासोबत सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या दिव्यांगाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, तीन फोटो आवश्यक आहेत. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाव्दारे मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय दिव्यांग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बीएसएनएल ऑफिस शेजारी मिरज – 416410 जि. सांगली या पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 9325555981, 9552234586, 9422216459 यावर संपर्क साधता येणार आहेत.


****

हृदयाची दुर्बलता*

 *हृदयाची दुर्बलता*


तुळशीच्या बियांचे अर्धा ते एक ग्रॅम चूर्ण तेवढ्याच खडीसाखरेबरोबर घेतल्याने किंवा मेथीच्या २० ते ५० मि.ली. काढ्यात (२ ते १० ग्रॅम मेथी १०० ते ३०० ग्रॅम पाण्यात उकळावी) मध घालून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो.


अर्जुनसालीचे १ चमचा चूर्ण व दोन चमचे धने पूड १ ग्लास पाणीत उकळून घ्यावे. प्यायल्याने खूप लाभ होतो. याशिवाय लसूण, आवळा, मध, आले,बेदाणा, द्राक्षे, ओवा, डाळींब इ. पदार्थांचे सेवन हृदयासाठी लाभदायक आहे.


लिंबाच्या सव्वा तोळा (सुमारे १५ ग्रॅम) रसात आवश्यकतेनुसार खडीसाखर घालून प्यायल्याने हृदयाचे स्पंदन सामान्य होते तसेच स्त्रियांमध्ये हिस्टेरियामुळे वाढलेली हृदयाची धडधडदेखील दोन लिंबांचा रस पाण्यात घालून प्यायल्याने शांत होते.


गुळवेलीचे चूर्ण मधाबरोबर घेतल्याने किंवा आल्याचा रस व पाणी समप्रमणात एकत्र करून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो.


उगवत्या सूर्याच्या शेंदरी किरणांमध्ये (सुमारे दहा मिनिटेपर्यंतच्या) हृदयरोग दूर करण्याची अपरिमीत शक्ती असते. म्हणून रुग्णाने प्रातःकाळी सूर्योदयाची वाट पहावी आणि सूर्याचा पहिला किरण त्याच्यावर पडेल असा प्रयत्न करावा.


मोठ्या गाठीच्या हळकुंडाची वस्त्रगाळ पूड करून आठ महिने ठेवून द्यावी. नंतर दररोज देशी गाईच्या दूधतून किंवा तुपातून एक चमचा घालून प्यावी. हळदीत हा खास गुण आहे की ती रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले रक्ताचे थर विरघळविते आणि रक्तवाहिन्या साफ करते. जेव्हा रक्तवाहिन्या साफ होतात तेव्हा तो कचरा म्हणजेच विजातीय द्रव्ये पोटात गोळा होतात व नंतर मलावाटे बाहेर टाकली जातात.


रोहिणी हिरड्याचे वस्त्रगाळ चूर्ण करून ठेवून द्यावे. रोहिणी हिरडा न मिळाल्यास बेहड्याच्या आकाराचा कोणताही हिरडा घ्यावा. या हिरड्याचे सुमारे १ चमचा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी देशी गाईच्या दुधातून किंवा तूपाबरोबर घ्यावे. यामुळे विजातीय द्रव्ये मल, मूत्र व घाम इ. रूपात शरीरातून बाहेर टाकली जातात.


संकलन-

डॉ. प्रमोद ढेरे,

*

प्रत्येक महिलेकडे , मुलींकडे असायलाच हवेत हे नंबर

 


Thursday, 13 July 2023

ब्रिटेन के उप उच्चायुक्त ने की मुख्यमंत्री से मुलाकातनिवेश के लिए महाराष्ट्र सबसे प्राथमिकता वाला राज्य

 ब्रिटेन के उप उच्चायुक्त ने की मुख्यमंत्री से मुलाकातनिवेश के लिए महाराष्ट्र सबसे प्राथमिकता वाला राज्य


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. १३ : ब्रिटन के उप उच्चायुक्त हरजिंदर कांग ने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से सदिच्छा मुलाकात की। महाराष्ट्र में पर्यावरण, कृषि, मूलभूत सुविधा, स्वास्थ्य, पर्यटन, शिक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आदि क्षेत्र में निवेश के लिए बड़ा अवसर है। सीधे विदेशी निवेश में महाराष्ट्र देश का पहले क्रमांक का राज्य है, ऐसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस अवसर बताया।


            श्री कांग के नेतृत्व में एक शिष्टमंडल ने मुख्यमंत्री से मुलाकात की। इस शिष्टमंडल में जॉन निकेल, सचिन निकारगे का समावेश था।


            मुख्यमंत्री श्री शिंदे ने इस मौके पर कहा कि पिछले कई दशकों से महाराष्ट्र और ब्रिटेन का वाणिज्यीक संबंध है। ब्रिटन भारत का बड़ा निवेशक है और उसकी कई कंपनियां महाराष्ट्र में हैं। निवेश के लिए महाराष्ट्र सर्वाधिक पसंदीदा राज्य है। पर्यावरण, उत्पादन, कृषि, मूलभूत सुविधा, स्वास्थ्य सेवा, अक्षय ऊर्जा, जैव प्रौद्योगिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यटन, औषधि निर्माण और शिक्षा इन क्षेत्रों में अवसर होने की बात मुख्यमंत्री ने कही। 


            इन सभी क्षेत्रों के लिए ब्रिटेन के पास वैश्विक स्तर की प्रगतिशील तकनीकी है। महाराष्ट्र में सड़क, बेहतर मूलभूत सुविधा और कुशल मनुष्य बल है। सकल राष्ट्रीय आय में राज्य का सबसे बड़ा योगदान है और सीधे विदेशी निवेश में महाराष्ट्र की बड़ी हिस्सेदारी है, ऐसा मुख्यमंत्री ने कहा।


            महाराष्ट्र में शिवराज्याभिषेक दिन का 350वां वर्षमहोत्सव मनाया जा रहा है। ब्रिटेन के वस्तुसंग्रहालय में रखी गई जगदंबा तलवार और बाघनखे महाराष्ट्र में वापस लाने के लिए सांस्कृतिक कार्य विभाग प्रयास कर रहा है। इस संबंध में सहयोग करने का आवाहन इस अवसर पर किया गया। इस अवसर पर उद्योग विभाग के प्रधान सचिव हर्षदीप कांबले, विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदि अधिकारी उपस्थित थे।


००००


 




 


British Deputy high commissioner calls on Chief minister


Maharashtra is the State of highest priority for investment


– Chief minister Eknath Shinde


 


            Mumbai, July 13 – Deputy High Commissioner of Britain Harjinder Kang today called on Chief Minister Eknath Shinde as a part of courtesy visit. Stating that Maharashtra is number one state when it comes to foreign direct investment in India, Chief Minister Shinde said that there is a lot of scope for investment in sectors like environment, agriculture, infrastructure, health, tourism, education, artificial intelligence.  


            A delegation led by Mr. Kang called on Chief Minister Shinde at Varsha Bungalow. The delegation included John Nikel, Sachin Nakarage.


             Pointing out that Maharashtra has trade ties with Britain for the last many decades, Chief Minister Shinde said that Britain is the big investor in Maharashtra with many of its companies investing in the State. Stating that Maharashtra was the State of highest priority when it comes to investment, he said that there are opportunities for investment in the fields like environment, manufacturing, agriculture, infrastructure, health services, bio-technology, artificial intelligence, tourism, pharmacy and education.


            Chief Minister Shinde said that Britain has world class latest technology in all the fields and Maharashtra has best infrastructure and skilled manpower. Stating that Maharashtra has a big contribution in GDP of the country he said that the State has a lion share in foreign Direct Investment.


            Maharashtra is celebrating the 350th year of coronation of Chhatrapati Shivaji Maharaj and an appeal is made to the British delegation to cooperate for bringing back Jagdamba Sword and Tiger Nails which are at a museum in Britain. Principal Secretary to the Department of Industries Harshadeep Kamble, Development Commissioner Deepender Singh Kushwah 

and other officials were present.


0000


काविळ

 *काविळ*


केळ अर्ध त्यात एक गव्हाच्या दाण्या एवढा चुना टाकून चांगले मिक्स करायचे सकाळी उपाशीपोटी पाच दिवस खायला द्या कावीळ कमी होईलच


चूना टाकल्यावर थोडे केळे कडू लागेल सांगून ठेवा * गव्हाच्या दाण्याएवढा पांढरा चुना उसाच्या


रसात मिसळून प्यायलातरी कावीळ लवकरात लवकर दूर होते. *गुळवेलीचा रस मधात मिसळून सकाळी


लवकर सेवन केल्याने कावीळ बरी होतो. * तव्यावर तुरटीचा चुरा भाजून लाह्या फुलवा. फुलल्यावर बारीक चूर्ण करून घ्या. अर्धा चमचा एक ग्लासमध्ये टाकून रोज सकाळी प्या. याचे दोन-तीन दिवस सेवन केल्यास फायदा होतो.


* एक चमचा एरंडेल तेलात दोन तीन चिमूटभर


सूंठ घालून प्यावे सकाळी व रात्री उपाशीपोटी सात दिवस *पाढर्या कांद्याचा रस दोन चमचे त्यात एक


चमचा गुळाची पावडर पाव चमचा हळद घालून


सात दिवस या प्रमाणे घ्या. * पुदीनाची चार पाच पान विड्याच्या पानात


घालून खायला द्या उपाय शंभर टक्के रिझल्ट देणारे आहेत वैद्य.


गजानन


देहव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठीसमिती गठित करून प्रस्ताव सादर करावा

 देहव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठीसमिती गठित करून प्रस्ताव सादर करावा


- मंत्री मंगल प्रभात लोढा


 


          मुंबई, दि. 13 : देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांना सुद्धा शिक्षणाचा समान अधिकार आहे. या महिलांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्यांवर उपाययोजनांसाठी समिती गठित करण्यात येईल. या समितीने प्रस्ताव सादर करावा, असे महिला व बालविकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.


            वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने देहविक्री करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांसाठी ‘कायदा, आरोग्य, व्यवसाय आणि शैक्षणिक आव्हाने’ याविषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांचे शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. या क्षेत्रात सामाजिक कार्य करणे कठीण आहे. या घटकाची परिस्थिती बदलणे आवश्यक असून सामाजिक संस्था करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.


            उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, भारतीय संविधानाने सर्वांना समानतेचा आणि शिक्षणाचा अधिकार दिला आहे. देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांनाही शिक्षणाचा अधिकार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी शासन, पोलीस यंत्रणा यांच्यासमवेत नागरिकांनीही सहभागी होणे आवश्यक आहे. याविषयावर राष्ट्रीय, राज्य महिला आयोग आणि पोलिसांनी सामंजस्याने काम केल्यास या महिलांना जलद न्याय मिळू शकेल. हे आपले सामाजिक उत्तरदायीत्व असल्याचेही त्यांनी सांगितले.


            या महिलांच्या आरोग्याच्या समस्यांवर काम करणे आवश्यक असून राज्य शासनाने या महिलांसह त्यांच्या मुलांसाठी वसतिगृहे सुरू करावीत, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शर्मा यांनी सांगितले.


            दरम्यान देह व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांनाही सन्मानाने जगण्याचा समान अधिकार आहे. असे प्रतिपादन आज महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.


            राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. नारनवरे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य मीनाक्षी नेगी, डॉ. रमण गंगाखेडकर, विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पांडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड (ठाणे), जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संग्राम संस्थेच्या ॲड. ओड्रे डिमेलो, प्रा. डॉ. श्रीकला आचार्य, पत्रकार दृष्टी शर्मा यांनीही आपले विचार व्यक्त केले.


०००००

महाप्रित उपकंपनी स्थापनेस शासन मान्यता

 महाप्रित उपकंपनी स्थापनेस शासन मान्यता


 


             मुंबई, दि. 13 : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या "महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिक मर्यादित" (महाप्रित) या उपकंपनीच्या स्थापनेस शासन मान्यता देण्यात आली आहे.


                 या कंपनीच्या उत्पन्नातून सुमारे 80 टक्के निधी हा राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्प व कामांच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध विभागांची कामेदेखील शासन ते शासन या कंपनीच्या माध्यामातून करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


               महाप्रित उपकंपनीकडून प्रामुख्याने अक्षय ऊर्जा आणि इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्र व वाहने, कृषी प्रक्रिया मूल्य साखळी आणि जैवइंधन, पायाभूत सुविधा प्रकल्प, एसटीपी आणि डेटा सेंटर, ऊर्जा कार्यक्षमता, ऑडिट आणि ESCO प्रकल्प, परवडणारी घरे आणि शहरी नियोजन, महिला उद्योजकता आणि अभिसरण, पर्यावरण आणि हवामान बदल, आरोग्य, उद्योन्मुख जीवन, जैव विज्ञान आणि निरोगीपणाचा प्रचार करणे (मदत), उद्योन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रे आणि भविष्यवादी ऊर्जा एकत्रीकरण, कॉर्पोरेट समुदाय विकास आणि सीएसआर असे विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.


                  सध्या प्रचलित असलेले नवीन तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान व सोशल मिडीयामुळे जीवनमानामधील बदल, मागासवर्गीय लोकांच्या वाढत्या अपेक्षा तसेच कार्यरत योजनांसह नवीन योजना राबविणे, या सर्व बाबींचा विचार करुन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अधिसंघ संस्थापन समयलेख्यातील तरतुदींच्या आधारे, "महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित (महाप्रित)” या नावाची सहयोगी कंपनी, कंपनी कायदा २०१३ अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे.


               महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि महाप्रितला त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे तसेच भारत सरकारचे अंगीकृत उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका यांच्या सोबत उपकंपन्या स्थापन करणे, संयुक्त उपक्रम स्थापन करणे, कौशल्य केंद्रे इत्यादीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि महाप्रितला त्यांच्या अधिसंघ संस्थापन समयलेख व संस्थापन नियमावलीमधील तरतुदीनुसार, शासनावर दायित्व न ठेवता महाप्रितला आवश्यकतेनुसार स्वबळावर निधी उभारता येणार आहे. त्यामुळे या उपकंपनीस शासनाच्या निधीची आवश्यकता भासणार नाही व त्याबाबत कोणताही आर्थिक बोजा शासनाच्या तिजोरीवर पडणार नाही. महाप्रित उपकंपनीच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या व्यापक हितासाठी विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.


               महाप्रित उपकंपनीच्या स्थापनेस मान्यता देणे याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


**


 


Featured post

Lakshvedhi