Thursday, 13 July 2023

सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहायआवश्यक जमिनींची निश्चिती त्वरित करावी

 सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहायआवश्यक जमिनींची निश्चिती त्वरित करावी


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आढावा बैठक


           


            मुंबई, दि. 13 :- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय


आवश्यक सुयोग्य जमिनींची निश्चिती योग्यता तपासून त्वरित करावी. या जमिनी नोडल एजन्सीला हस्तांतरित करण्यासाठी अभियान स्तरावर काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्याची महत्वाकांक्षी योजना आहे. वातावरण बदलाचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे आपण सर्वजण पाहत आहोत. या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर वाढला पाहिजे. यातून उद्योगांना कमी दराने वीज मिळण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठीही मदत होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याने या कामांना वेग देण्यात यावा. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. महाराष्ट्र राज्याची ही महत्वाकांक्षी योजना आता केंद्र सरकारनेही स्वीकारली आहे. या योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या 5 जिल्ह्यांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            या योजनेअंतर्गत कृषीभार असलेले 2731 सबस्टेशन निश्चित करण्यात आले असून या सबस्टेशनची क्षमता 17 हजार 868 मेगावॅट आहे. यासाठी 88 हजार 432 एकर जागेची आवश्यकता असून 35 हजार एकर जमीन निश्चित झाली आहे. 53 हजार एकर जमीन अजून निश्चित करणे अपेक्षित आहे.


            यासाठी महाराष्ट्र राज्य सोलर अॅग्रो कंपनी स्थापन करण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर, अहमदनगर, नागपूर, धुळे-नंदुरबार ही 5 क्लस्टर पहिल्या टप्प्यात निवडण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटमहाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य

 ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटमहाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. १३: ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात पर्यावरण, कृषी, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचे सांगत थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            वर्षा निवासस्थानी श्री. कांग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये जॉन निकेल, सचिन निकारगे यांचा समावेश होता.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र आणि ब्रिटनमध्ये वाणिज्यीक संबंध आहेत. ब्रिटन हा भारतातील मोठा गुंत ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटमहाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य


वणूकदार असून त्यातील अनेक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य आहे. पर्यावरण, उत्पादन, शेती, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, अक्षय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यटन, औषधनिर्माण आणि शिक्षण या क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            ब्रिटनकडे या सर्व क्षेत्रांत जागतिक दर्जाचे प्रगत तंत्रज्ञान आहे. महाराष्ट्रात रस्ते, उत्तम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचे सर्वात मोठे योगदान असून थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिनाचा ३५० वा वर्षसोहळा साजरा करण्यात येत आहे. ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयात असणारी जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभाग पाठपुरावा करीत आहे. त्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी अधिकारी उपस्थित यावेळी

 होते.


००००


Government recruitment


 

झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासमंजुरी देण्यासाठी समिती गठित

 झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासमंजुरी देण्यासाठी समिती गठित


            मुंबई, दि. 12 : रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी नामिका सूचीतील विकासकांमार्फत प्राप्त निविदांची छाननी करुन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, तसेच अभय योजनेअंतर्गत वित्तीय संस्था/ त्यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम संस्थेस ही योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.


            झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य असून गृहनिर्माण विभागाचे उप सचिव (झोपसु-१) हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.


            रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी नामिका सूचीतील विकासकांमार्फत प्राप्त निविदांची छाननी करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, तसेच अभय योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून प्राप्त प्रस्तावावर वित्तीय संस्था / त्यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम संस्थेस रखडलेली योजना पूर्ण करण्यास मंजुरी देणे ही या समितीची कार्यकक्षा असेल. या समितीने घेतलेले निर्णय शासन मान्यतेने अंतिम करण्यात येतील, असे याबाबतच्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.


0000




 

रोग प्रतिकारशक्ती*

 *रोग प्रतिकारशक्ती*


रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मुख्यत्वे पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. ती भरपूर फळे, सर्व भाज्या ताक, मध, साबूत धान्य डाळींतून पूर्ण होऊ शकतेसिस्टीमच्या पेशींसाठी पण आवश्यक आहे. हे कॅल्शियम, दूध आणि तत्सम पदार्थात, नाचणी, खसखस, तीळ यातून प्राप्त होते. तसेच खाणाच्या चुन्यातूनही मिळते. हा मऊ चुना भातात शिजताना इडली वाफवताना ताकात कणिक भिजवताना घालावा.जीवनसत्व 'अ'- हे इम्यून सिस्टीमच्या पेशींना उद्दीपीत करून अँटीबॉडीजद्वारा किटाणूंना निष्प्रभ करते. याशिवाया प्रोटिन्स शरीरात कार्य करू शकत नाहीत. हे लाल भोपळा गाजर पपई, आंबा, फळे, रताळे, हिरव्या, पालेभाज्यात असते.फाॉलिक अॅसिड- हे एक 'ब' जीवनसत्व आहे. ते इम्यून सिस्टीमच्या पांढऱ्या रक्तकणातील मॅक्रोफेजेस बनायला आवश्यक असते. हे मॅक्रोफेजेस हल्ला करणाऱ्या जीवजंतूंना नष्ट करतात. हे जीवनसत्व सर्व हिरव्या पालेभाज्या, हरभरा, अंडी यात भरपूर असते.

जीवनसत्व ब-६- सफेद रक्तकणांना या ब-६ जीवनसत्वाची गरज असते. त्याच्या सहाय्यानेच अँटीबॉडीज तयार होतात. सफेद रक्तकणही अधिक बनायला मदत होते. राजमा, केळी, संपूर्ण धान्यात हे भरपूर असतेजीवनसत्व 'क'- याच्या भरपूर सेवनाने सर्दी खोकला कमी होऊ शकतो. यामुळे शरीरात इंटरफेरॉन बनायला मदत होते. हे इंटरफेरॉन व्हायरसच्या वाढीवर रोक आणते तसेच इतर अना‌वश्यक पेशींची वाढही थांबविते. भाज्या, सलाद, आवळा, लिंबू, लिंब वर्गांची फळे, देशी गुलाबाच्या पाकळ्यात भरपूर असतेजीवनसत्व इ -वयोवर्धनाबरोबर आपल्या रोगप्रतिकारशक्ती यंत्रणेला जे हार्मोन नष्ट करते त्याला हे जीवनसत्व नेस्तनाबूत करते. गव्हांकुरात हे सर्वात अधिक असते. तेलबिया, घाणीचे तेल, हिरव्या पालेभाज्या अंकुरित कडधान्यात, विड्याच्या पानात हे भरपूर असते.

लोह- लाल तसेच सफेद रक्तकण बनायला लोह मदत करते. याच्या कमतरतेमुळे विषाणू व जंतूंचा उपसर्ग होऊ शकतो. हे हिरव्या पालेभाज्या नाचणी, अळीव, खजूर, मनुका, बीट, जोडीला लिंबू, लोखंडी कढई, तवे, वळ्यांचा वापर यातून हे जीवनसत्व मिळतेझिंक-हे क्षार शयरस आणि अँटीजेनला प्रतिकार करते. हे लाल भोपळा, खरबूज, टरबुजाच्या बियात, सर्व साबूत धान्य, कडधान्यात भरपूर असते. हे सर्व नऊ घटक आणि इतरही घटक मिळून दररोज ४० अन्नघटक पोटात जायलाच हवेत, तरच रोगांना दूर ठेवून दीर्घायुषी राहता येईल.

प्रमोद पाठक.


कौशल्याची मागणी’ सर्वेक्षण मोहिम 31 जुलैपर्यंत

 कौशल्याची मागणी’ सर्वेक्षण मोहिम 31 जुलैपर्यंत


            मुंबई, दि. 12 : राज्यातील युवक युवतींना मागणीवर आधारित (Demand Driver ) कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी ‘कौशल्याची मागणी’ सर्वेक्षण मोहिमेचे दिनांक 1 ते 31 जुलै, 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, मुंबई शहरचे सहायक आयुक्त र.प्र. सुरवसे यांनी ही माहिती एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.


           सद्यस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत तयार करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास आराखड्याच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता ‍विकास अभियान व किमान कौशल्य ‍विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, याकरिता राज्यातील युवक युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणादरम्यान स्वारस्यामध्ये वृध्दी होउन अनुपस्थितीचे प्रमाणा कमी होईल आणि प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार स्वयंरोजगाराच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होतील.


             या मोहिमेंतर्गत सर्वेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून त्या गुगल फॉर्म लिंक खालील प्रमाणे आहेत. https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8 इच्छुक उमेदवारांनी या लिंकवर भेट देऊन सदरील फॉर्म भरावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.


             तसेच राज्यातील उद्योजकांच्या मागणीवर आधारित (Demand Driver) उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी मोहिम (Mapping of Skill Requirement in manpower of Industries) या मोहिमेचे ही दिनांक 1 ते 31 जुलै, 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.


             मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये उत्पादन व सेवाक्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मोठे उदयोग कार्यान्वित आहेत .सदर उद्योगांमध्ये कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा विविध प्रकारच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्याची गरज नोंदविल्यास त्या कौशल्यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश कौशल्य प्रशिक्षणामध्ये करणे शक्य होईल. तसेच, प्रशिक्षणामध्ये यशस्वी उमेदवारांना रोजगार स्वयंरोजगारच्या संधी उपलब्ध होण्याच्या प्रमाणामध्ये वृध्दी होईल.


         तरी सर्व उद्योजकांनी (All Industries- Manufacturer, Service sectors- Hospitality, Health etc.) https://forms.gle/3LQGQTayTnk2gZWk9 या लिंकवर त्यांना आवश्यक क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी नोंदवावी, जेणेकरून त्यांच्या सहकार्याने जिल्हयास आवश्यक असणारी क्षेत्रनिहाय मनुष्यबळाची गरज लक्षात येईल. तसेच जिल्ह्यातील कौशल्य कमतरतेचा (Skill Gap) अभ्यास करणे सोयीचे होईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


           कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS),राज्यामध्ये कौशल्य विकास उपक्रमांची अंमलबजावणी व संनियंत्रण करणारी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. (MSSDS) मार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.


000





विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्यविषयक टोल फ्री हेल्पलाईन सुरु

 

           विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्यविषयक टोल फ्री हेल्पलाईन सुरु

            मुंबई दि. 12 : सध्याची बदलती जीवनशैली, शिक्षण आणि अभ्यासक्रमाची भीती, पालकांचा दबाव तसेच वाढती स्पर्धा यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण- तणाव वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. राज्यातील सर्व शासकिय व अभिमत वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने 14499 ही विनामूल्य मानसिक आरोग्य विषयक “संवाद” हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.


            या हेल्पलाईनचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुंबई दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थी तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. बदलती अभ्यास पद्धती, वाढता ताण- तणाव या सर्व गोष्टींचा खेळीमेळीच्या वातावरणात सामना केला पाहिजे. तसेच कोणत्याही बदलांना सहजपणे सामोरे जायला हवे, असे श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले. तसेच, सदर हेल्पलाईनबाबत सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्याच्या व हेल्पलाईन क्रमांक वैद्यकीय महाविद्यालयांच्या दर्शनी भागावर लावण्याच्या सूचना राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व खाजगी महाविद्यालये यांच्या अधिष्ठाता यांना मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.


            सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य निर्माण होत आहे. यासाठी टोल फ्री हेल्पलाईन सारखा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरेल असा विश्वासही या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला.


            यावेळी विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक अजय चंदनवाले तसेच विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथून सुरु करण्यात आलेल्या या हेल्पलाईनमध्ये तज्ञ मनुष्यबळामार्फत मानसिक आरोग्यविषयी विद्यार्थ्यांचे समुपदेशन तसेच उपचार करण्यात येणार आहेत. 


००००

Featured post

Lakshvedhi