Thursday, 13 July 2023

ऑयली त्वचा (Oily Skin) साठी उपाय कसा करावा :*

 *👉ऑयली त्वचा (Oily Skin) साठी उपाय कसा करावा :*


1) बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो.


2) मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.


3) हळद, मुलतानी माती आणि चंदन यांचा लेप चेहऱ्यातील मॉश्चराइज ओढून घेतो आणि स्कीन ऑईल फ्री होते. या घरगुती उपाया मुळे स्कीन टाईट होते. यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश दिसाल. हा लेप लावल्यावर 30 मिनिटांनी चेहरा धुवावा.


4) चेहऱ्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी चोळल्यामुळे देखील फायदा होतो.


👉चेहरा गोरा आणि सुंदर कसे बनवायचे :


1) एलो वीरा ज्यूस, एप्पल साइडर विनिगर आणि हळद, या तीन वस्तू मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सावळे पण दूर होतो.


2) गोरा रंग मिळवण्यासाठी हळद आणि लिंबूरस वापरणे उत्तम आहे. हा उपाय तेलकट त्वचेच्या लोकांसाठी उत्तम आहे.


3) दुधा ची मलाई, बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा. हा लेप चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. ऑईल स्कीन वाल्यांनी हा उपाय करू नये. ड्राय स्कीन वाले करू शकतात.


4) मध, गुलाबाच्या पाकळ्या आणि दुध यांचा लेप रंग उजळण्या साठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी वापरा.


5)बाहेरून आल्यावर त्वरित चेहरा स्वच्छ धुवावा कारण त्वचेच्या रोम छिद्रात मळ जमा होऊ शकतो.


6) पपई चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी फायदेशीर आहे. कच्ची पपई dead skin cells दूर करण्यासाठी उपयोगी आहे.


 👉तुळशीची पाने बारीक वाटून याचा लेप चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा टवटवीत होतो.


👉अननस आणि पिकलेले टोमाटो चेहऱ्यावर face pack बनवून लावल्याने हळूहळू गोरे पण येईल.


👉वाफ घेतल्याने छिद्रात साठलेले तेल, माती आणि डेड स्कीन सेल्स सहज निघून जातात. हा skin care चा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे.


👉दही, आवळा पावडर, हळद आणि बेसन मिक्स करून एलोवीरा ज्यूस आणि थोडा लिंबूरस मिक्स करून फेशियल पैक तयार करा. यास चेहऱ्यावर लावा. या उपायाने काळे दाग दूर होतील आणि skin moisturize होईल.


☝️शरीराची बाहेरील सुंदरता वाढवण्यासाठी आवश्यक आहे कि तुम्ही शरीराच्या आतून देखील निरोगी असले पाहिजे. वर सांगितलेले ब्युटी चे घरगुती उपाय करण्या सोबतच आवश्यक आहे तुम्ही हे उपाय देखील केले पाहिजेत.


👉पौष्टिक भोजन खावे ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील आणि त्वचा निरोगी राहील. यासाठी तळलेले, मसालेदार, फास्ट फूड खाण्याच्या एवजी विटामिन आणि मिनरल्स असलेले पदार्थ आहारात घ्यावेत.


👉पोटाच्या आजारा पासून स्वताला वाचवा. सकाळी पोट सोफ्ट करण्यासाठी गरम पाण्यात थोडासा लिंबूरस, मध आणि अद्रक रस मिक्स करून प्यावे.


👉रोज 3 ते 4 लीटर पाणी प्यावे ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातील.


👉वेळेवर भोजन करावे.


👉रोज व्यायाम करावा.

तणाव मुक्त राहावे आणि चांगली झोप घ्यावी.


👉खाण्यापिण्याच्या वाईट सवयी पासून वाचावे.


👉जर तुम्ही पिंपल्स ने हैराण आहे तर कांदा आणि लसून यांची पेस्ट बनवून यामध्ये कडूलिंबाची पाने मिक्स करून पेस्ट बनवा. आता हे मिश्रण थोडी हळद मिक्स करून फेस वर लावा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाफ घेऊ शकता ज्यामुळे pimples दूर होतील.




महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरुड झेप घेईल

 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरुड झेप घेईल


– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल सादर


शिफारशींवर काम करण्यासाठी 'मित्रा' संस्थेसह ‘फास्ट-ट्रॅक’ समिती कृती आराखडा करणार


            मुंबई, दि. 12:- ‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल राज्याच्या प्रगतीची गुरुकिल्ली ठरेल. यातून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरूड झेप घेईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सल्लागार परिषदेच्या शिफारशींचा अहवाल अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आज मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सादर केला. या अहवालातील शिफारशींवर अंमलबजावणीकरिता कृती आराखडा (अॅक्शन प्लॅन) तयार करण्यासाठी 'मित्रा' संस्थेसह ‘फास्ट-ट्रॅक’ समिती काम करेल असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले.


            उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री श्री. फडणवीस यांनी या अहवालाचे स्वागत केले. या अहवालातील शिफारशीमुळे महाराष्ट्र आता निःसंदिग्धपणे वन ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने मार्गक्रमण करेल, असे त्यांनी नमूद केले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. तसेच हा अहवाल मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, परिषदेचे सदस्य संजीव मेहता, विक्रम लिमये, श्रीकांत बडवे, अजित रानडे, दिलीप संघवी, श्रीमती काकू नखाते, अनिष शाह, बी. के. गोयंका, विलास शिंदे, श्रीमती झिया मोदी, प्रसन्न देशपांडे, संजीव कृष्णन, एस.एन.सुब्रह्मण्यम, 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते. परिषदेचे सदस्य अमित चंद्रा, विशाल महादेविया दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ‘फाईव्ह ट्रीलियन डॉलर्स’ अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहिले आहे. याकरिता महाराष्ट्राने आपले योगदान देण्यासाठी या आर्थिक परिषदेची स्थापना केली. परिषदेने कमीत कमीत वेळेत अहवाल सादर केल्याबद्दल या तत्परतेची मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रशंसा केली.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, परिषदेने अत्यंत महत्वाच्या अशा शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न राहील. हा एक सर्वसमावेशक असा अहवाल आहे. ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, आयटी सारखे सेवा क्षेत्र, रिअल इस्टेट, पर्यटन, आरोग्य सुविधा, कृषि आणि कौशल्य विकास या क्षेत्रांबाबतच्या शिफारशींचा समावेश आहे.


            मुख्यमंत्री म्हणाले की, सल्लागार परिषदेने राज्यातील उद्योगासाठीच्या जमीन उपलब्धतेबाबतही चांगले निरीक्षण नोंदवले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग किंवा सोलर पार्क या सारखे प्रकल्प विकासाचा प्रादेशिक समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या आणि कृषि क्षेत्राच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना, पीक विमा योजना हे त्यापैकीच काही आहेत. परिषदेची अॅग्रो इन्नोव्हेशन हबच्या शिफारशीला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. या क्षेत्रातील मूल्य संवर्धन (व्हॅल्यु अँडिशन) करिताही देखील प्रयत्न केले जातील. परिषदेने सूचविलेली ‘महाराष्ट्र एआय हब’ ची संकल्पना देखील चांगली आहे. त्याकरिताच आम्ही आयटी पॉलिसी देखील अद्ययावत केली आहे. या क्षेत्रातील संशोधनात्मक क्षेत्रालाही जमीन उपलब्ध करून देण्याचाही आमचा प्रयत्न राहील. महाराष्ट्राकडे पर्यटन क्षेत्रातील अमर्याद संधी आहेत. परिषदेनेही देखील ही क्षमता ओळखली आहे, याचे समाधान आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राची तिपटीने वाढ होईल यासाठी करता येतील, ते प्रयत्न आम्ही करू. परिषदेने ‘इझ-ऑफ-डुईंग’बाबत केलेली सूचनाही देखील महत्वाची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


            गत वर्षभरात इंधनावरील जीएसटी कर कपात, रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवणे, बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल असे धोरण राबवणे, जुने गैरलागू असे कायदे रद्द करणे, राज्यातील नागरिकांना आरोग्य विमा उपलब्ध करून देणे अशी महत्वपूर्ण पावले उचलल्याची माहितीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. अलिकडेच प्रधानमंत्री कार्यालयाचे आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्ष बिबेक डेबरॉय यांच्याशी चर्चा झाली होती. तीमध्ये केंद्र आणि राज्याच्या दोन्ही सल्लागार परिषदांच्या दरम्यान समन्वय राखण्यावर भर दिला जाईल अशी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी "क्लिअर रोड मॅप" - उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना आणि तिच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. मंत्रालयाच्या बाहेर आपल्या जीडीपी ग्रोथची माहिती देणारे घड्याळ (जीडीपी व्हॅल्यू क्लॉक) बसवण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.


            श्री. फडणवीस म्हणाले की, भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होईल असा अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थांनी निर्वाळा दिला आहे. यामुळे सगळ्या जगाचे भारताकडे लक्ष लागून राहिले आहे. जग भारताकडे आकर्षित होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. त्यादृष्टीने आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल आणि त्यातील शिफारशी उपयुक्त ठरतील. यातून आपण निःसंदिग्धपणे ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या दिशेने पावले टाकणार आहोत. त्यासाठी हा एक "क्लिअर रोड मॅप" ठरेल असा विश्वास आहे. परिषेदेच्या शिफारशीनुसार विविध क्षेत्राची धोरणे राहतील असे प्रयत्न केले जातील. विशेषतः उद्योग, सेवा आणि कृषि क्षेत्रातील घटकांच्या शाश्वत विकासाचा विचार केला जाईल. ई-व्हेईकल्स, ग्रीन हायड्रोजन यांसह एआय, ब्लॉकचेन, फिनटेक या क्षेत्रांतील संधी उपलब्ध होतील, हे प्रयत्न केला जातील. महाराष्ट्राकडे विविध क्षेत्रातील अमर्याद संधी आहेत. पर्यटन या क्षेत्राचाहीही प्राधान्याने विचार केला जाईल. शेतकऱ्यांचा शाश्वत विकास आणि आपल्या मृद आरोग्याचे रक्षण याकडे लक्ष दिले जाईल. परिषदेने केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी ‘मित्रा’ ही आपली संस्था महत्वाची भूमिका पार पाडेल.


महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत ट्रिलियन डॉलर्स : एन. चंद्रशेखरन


            महाराष्ट्राच्या सर्वांगीण, संतुलित विकासाचा ध्येय साध्य करणारा हा अहवाल आणि त्यातील शिफारशी असल्याचे परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी सांगितले. यातून महाराष्ट्र आपल्या ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य २०२८ पर्यंत साध्य करेल असा विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.


            चंद्रशेखरन यांनी आपल्या सादरीकरणात राज्याच्या विविध क्षेत्रातील संधीचा सर्वंकष आढावा सादर केला. उद्योग क्षेत्राशी निगडीत ५ आणि या सर्व क्षेत्रांना समांतरपणे जोडणाऱ्या ३ अशा एकूण ८ क्षेत्रांचा प्रामुख्याने विचार केला आहे. अहवाल आणि त्यातील शिफारशीपर्यंत पोहचण्यासाठी शेतकरी, उद्योजक, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. यातही शेतकरी, महिला तसेच कुशल, अकुशल मजूर, सर्व जिल्हे, काही वैशिष्ट्यपूर्ण एसएमई उद्योग, म्यॅन्यूफक्चरींग- कृषि क्षेत्रांचाही प्राधान्याने विचार केला आहे. सर्वसमावेशक आणि सर्व स्तरातील घटकांना सामावून घेणारा विकास होईल अशा पद्धतीने अभ्यास केला गेला आहे. यात 'गरुड झेप' म्हणून काही विशिष्ट क्षेत्रातील संधीबाबत शिफारशी केल्या आहेत. शाश्वत विकास आणि जगभरातील आधुनिक प्रवाहाशी अनुरूप संधी , विशेषतः फिनटेक आणि "एआय' या क्षेत्रांचाही आम्ही विचार केला आहे. यातून रोजगाराच्या कोट्यवधी संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्राची कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा क्षेत्र, आरोग्य सेवा आणि पर्यटन या क्षेत्रांवरील आर्थिक तरतूदही दूरदृष्टीची आणि चांगली असल्याचे निरीक्षणही श्री. चंद्रशेखरन यांनी नोंदविले. आर्थिक सल्लागार परिषदेची संकल्पना आणि त्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे ही बाब उल्लेखनीय असल्याचेही ते म्हणाले.


            राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी (ट्रिलियन) डॉलर पर्यंत पोहचावी यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी डिसेंबर 2022 मध्ये नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली या 21 सदस्यीय सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेची पहिली बैठक 13 फेब्रुवारी 2023 रोजी झाली होती. या बैठकीत निश्चित केल्यानुसार परिषदेने राज्याच्या आर्थिक विकासाबाबत विविध क्षेत्रनिहाय आणि घटकांचा अभ्यास करू

न हा अहवाल तयार केला आहे.


०००००


वात होणे - चमका निघणे.

 घरगुती उपचार 


वात होणे - चमका निघणे. 


वात हा पोटात, पाठीत, पुर्ण छातीत, एका बाजुस, पायात, गुडघ्यात, मणक्यात, तळपायांत, हाताच्या किंवा पायांच्या बोटात कुठेही येतो, वेदना फार होतात औषधांचा गुण येत नाही, लहान मुलांपासून थोर व्यक्तींपर्यंत कोणालाही होऊ शकतो, सगळे रिपोर्ट नॅार्मल असतात पण गुण येत नाही, अश्यावेळी काही घरगुती वीनाखर्चाचे पण उपयुक्त असे उपाय आपणांस नक्कीच रामबाण औषध ठरू शकतात, वाताचा त्रास लहान वयात जास्त दिवस राहिल्यास त्याचा दुरगामी परिणाम हा त्याच्या वैवाहिक जीवनावर देखील होऊ शकतो, परंतु योग्य वेळी त्याचा उपचार घेतल्यास हा त्रास नक्कीच नाहिसा होतो. पूर्वीचे वडीलधारी लोकांचे असे मनोगत होते कि वाताचे एकुण ५० प्रकार आहेत, ते सर्व सांगणे किंवा लिहिणे शक्य नाही, परंतु काही उपाय सुचवत आहे त्याने आत्तापर्यंत बर्याच लोकांना चांगला गुण आला आहे. यांस दुसरे नाव चमका निघणे असेही म्हणतात. 


# रोज दिवसातुन एक वेळेस जीथे वेदना होतात तीथे हिंगाचा लेप करून तो सुके पर्यंत ठेवावा. नंतर स्वच्छ कपड्याने पुसुन घ्यावे. १३ दिवस नियमित.


# रोज एकदा तुप + हिंग एकत्र करून बेबीमध्ये लावणे व नंतर किमान १० ते १५ मि. शांत झोपावे, त्रास लगेच कमी होतो. २ ते ३ दिवस.


# कपभर पाण्यात थोडेसे मीठ व तुप टाकुन गरम करून प्यावे. 


# खाण्याच्या काथाचा लेप लावावा. १५ दिवस नियमित. ( पानात टाकतात तो काथ ) 


# गरम पाण्यात काळेमिरी ती पावडर व सेंधवा मीठ टाकुन अर्धाग्लास एकदा ते पाणि प्यावे. ५ दिवस.


# रक्तचंदन व काथ एकत्र करून त्याचा लेप लावावा.


# गाईच्या शेणाच्या गवर्याचा धुर उपयोगी.


# कापुर + असमान तारा + निलगिरीचे तेल एकत्र करून लावल्यास गुण येतो. 


# निलगिरीचे तेल + तुप एकत्र करून बेंबीत लावावे.


# निलगिरीचे तेल + तेजपान + लवंग + असमान तारा एकत्र करून २/३ तास ठेवावे नंतर ते वेदनेच्या जागी लावल्यास आराम मिळतो. 


# नियमित रोज सकाळी ऊन्हात २० मि बसुन शक्य तितक्या जास्त प्रमाणात त्वचेवर ऊन घ्यावे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यात कापुर टाकुन किंवा निलगिरी तेलाचे १ किंवा २ थेंब टाकुन आंघोळ केल्यास चांगला गुण येतो. 


वरील उपाय सहज - सोपे असुन गुणकारी आहेत. 


निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार !

 एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार !


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील


            मुंबई, दि. 12 : राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. आता या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी होत आहे. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये म्हणजेच प्रति टन 133 रुपये दराने वाळू मिळणार आहे. वाळू मिळण्यासाठी ग्राहकांना महाखनिज या वेबपोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.


            गेल्या काही वर्षांत वाळूचे लिलाव वेळेवर होत नसल्याने वाळूचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी सर्वसामान्यांना प्रति ब्रास वाळूसाठी जास्त पैसे मोजावे लागत होते. वाळूचा तुटवडा, वाळूसाठी अधिकचे पैसे, अवैध वाळू उपसा याला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. या धोरणानुसार ज्या ग्राहकांना वाळू हवी आहे, त्यांनी महाखनिज या वेबपोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. ज्यांना हे शक्य नाही, त्यांना सेतू केंद्रामार्फत ही मागणी नोंद करावी लागणार असून यासाठी लागणारे शुल्क जिल्हाधिकारी ठरविणार आहेत.


            येणाऱ्या काळात मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाळूची मागणी नोंदविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार आहे. अधिक वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर पुन्हा वाळूची मागणी करता येईल. वाळूची मागणी नोंदवल्यानंतर 15 दिवसांच्या आत वाळू डेपोमधून ग्राहकांना नेता येणार असून यासाठीचा खर्च ग्राहकास करावा लागेल. वाळू डेपोतून वाळू नेताना ग्राहकांना आधार क्रमांक देणे आवश्यक असेल.


            आता वाळू 600 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे वाळूचे लिलाव बंद होणार असून डेपोतूनच वाळू विक्री करण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किमती आवाक्यात येण्यास मदत होईल, असेही मंत्री श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.


०००

व्हिडिओ पालकांनी मुलांना जवळ बसून दाखवावा 👍



हा व्हिडिओ पाल मुलांना जवळबसून दाखवावा 👍

Wednesday, 12 July 2023

प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान

 प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान




            मुंबई, दि. 12: केंद्र सरकारच्या वतीने सन 2023 साठी जाहीर झालेला पद्मविभूषण पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना आज त्यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. ‘माझ्या कलेच्या माध्यमातून केलेल्या सेवेची दाखल घेतली, मी कृतज्ञ आहे ' अशी भावना यावेळी उस्ताद झाकीर हुसेन यांनी व्यक्त केली. मानपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप असून केंद्र सरकारच्यावतीने राज्याच्या अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक यांनी हा पुरस्कार प्रदान केला.


            पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. देशाच्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पद्म पुररस्कारांचे वितरण होते. मात्र, परदेशी असल्यामुळे उस्ताद झाकीर हुसेन त्या समारंभास उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे आज अपर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी मुंबईतील उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री सचिवालयाचे सहसचिव कैलास बिलोणीकर आणि व्यंकटेश भट, अवर सचिव सुधीर शास्त्री तसेच उस्ताद झाकीर हुसेन यांचे कुटुंबिय उपस्थित होते.


            अतिशय सविनय आणि कृतज्ञतापूर्वक या पुरस्काराचा स्वीकार करत असल्याची भावना उस्ताद झाकीर हुसेन यांनी यावेळी व्यक्त केली. ‘महाराष्ट्र आणि देशासाठी कलेच्या माध्यमातून काही करु शकलो. त्याची सर्वांनी दखल घेतली. त्यासाठी मी कृतज्ञ आहे’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


            “आपल्यासारख्या जागतिक कीर्तीच्या कलावंतांचा सन्मान करण्याचा हा क्षण आमच्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे”, अशी भावना अपर मुख्य सचिव (गृह) श्रीमती सौनिक यांनी यावेळी व्यक्त केली.


            सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने बांबूची कलाकृती आणि त्यावर फडकणारा तिरंगा उस्ताद झाकीर हुसेन यांना सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी भेट दिला.                                      


000

*दही.*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
     *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
                             *दही.*

*दही हा आयुर्वेदाचा फार मोठा शत्रू आहे असं अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात मात्र तसं मुळीच नाही. नीट विराजलेले सायीचे दही हे शरीराला स्निग्धता देते, जिभेची चव वाढवते, वात कमी करते आणि शुक्रधातू वाढवते असे आयुर्वेद सांगतो.*

*तरीही दही हा ‘नियमितपणे’ आणि रात्री खाण्याचा पदार्थ नाही हा झाला मूलभूत नियम. अदमुरे दही कित्येकजण आवडीने खातात. ते गोड असल्याने चांगलं असा त्यांचा समज असतो. मात्र प्रत्यक्षात जी गोष्ट धड दूधही नाही आणि दहीदेखील नाही अशी त्रिशंकू गोष्ट आरोग्याला चांगली कशी असेल बरं? गोड दही अनुभवायचं असेल तर सिंहगडवर मातीच्या कुल्हडमध्ये मिळणारं दही खाऊन बघा. ते व्यवस्थित लागलेलं घट्ट दही असतं. असं अर्धवट नाही. थोड्क्यात; अदमुरं दही नको. ते शरीरातले तिन्ही दोष वाढवतं.*

*दही घेताना छान फेटून घ्या. याला दह्याचं Structure demolition असं म्हटलं जातं. तसं केल्याने ते पचायला सोपं जातं. त्यात साखर, मीठ, मिरपूड किंवा आवळा पूड घालून घेतलं तर हे दही बाधत नाही. दही गरम गोष्टींत मिसळायचं मात्र नाही. दुधासारखंच तेदेखील फाटतं. त्यामुळे ‘दही + गरम’ हे समीकरण नकोच.*

*सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे; पचायला जड असलेलं दही हे थंड नसून उष्ण आहे. मग ते सर्दीसारखे त्रास कसं करतं बरं? सोपं आहे. दही आंबट असेल तरच कफाचे त्रास घडवून आणते; अन्यथा नाही. लस्सीदेखील दह्यापासूनच बनत असल्याने उष्णच. मग सर्दीचे त्रास गोड असलेल्या या लस्सीनेदेखील कसे होतात? कारण मुळात लस्सी हा पदार्थ गोड होतो तो साखरेमुळे ती लस्सीची अंगभूत चव नव्हे. त्यातच पाणी मिसळले गेल्याने पुन्हा त्यातला जलांश वाढल्याने या पदार्थाने सर्दी होऊ शकते. असे असले तरी लस्सीसुद्धा उष्णच बरं का. मिरची फ्रीजमध्ये ठेवली म्हणून. ‘थंड’ असं म्हणतो का आपण? अगदी तसंच इथेही आहे.*

*दही हा कॅल्शियमपासून ते शरीराला उपयुक्त बॅक्टेरियापर्यंत विविध गोष्टींचा उत्तम स्रोत आहे असे आधुनिक आहारशास्त्राने कितीही ओरडून सांगितले तरी त्याचे ‘नियमित’ सेवन टाळाच. बाकी वरील नाममात्र काळजी घेऊन दही खुशाल खा. त्याने शरीरावर सुपरिणाम दिसून येतील. आणि कोणतेही दुष्परिणाम मात्र होणे टळेल.*

*© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.) आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते.*
*।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

*(

Featured post

Lakshvedhi