Wednesday, 28 June 2023

सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात

 सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यातडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा


 - कुलपती रमेश बैस


            मुंबई, दि. २७ : सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी अध्यक्षीय भाषणात काढले.


            डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला.


            संतांची व कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात आज हा सोहळा होत आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणारे या विद्यापीठ व बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही ‘शिक्षा भूमी’ आहे.


            आजपर्यंत विद्यापीठाचे ६२ दीक्षांत सोहळे यशस्वी झाले आहेत. या सोहळ्यांना राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, डॉ.एपीजे अब्दुल कलाम, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनी निरुपम राव, न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली आहे. तर यंदाच्या सोहळ्यास ‘एआयु’च्या महासचिव डॉ.पंकज मित्तल यांची उपस्थिती आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ‘नॅक’चे ’अ’मूल्यांकन प्राप्त असे राज्य विद्यापीठ आहे. देशातील सर्वाधिक नेट-सेट-जेआरएफ विद्यार्थी, संशोधकांची संख्या आहे. तसेच बार्टी, सारथी, महाज्योती, राजीव गांधी फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांची संख्याही सर्वाधिक याच विद्यापीठात आहे.


            शिक्षण घेत असतानांच स्वावलंबन अर्थार्जनासाठी ’कमवा व शिका योजना’ ही वैशिष्ट्यपूर्ण योजना विद्यापीठात सुरु आहे. ‘कोविड’च्या काळात विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबविले. यामध्ये दोन कोविड टेस्टिंग लॅब सुरु करण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीत दीड कोटींची भर विद्यापीठाने घातली. ‘व्हायरॉलॉजी’ सारखा महत्वपूर्ण अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरु केला आहे. ही समाधानाची बाब आहे.


            तरुणांना स्पर्धेच्या युगात केवळ पदवीच्या आधारे नव्हे तर ज्ञान, कौशल्याच्या बळावर स्वतःचे करिअर घडवावे लागेल भारताला महासत्ता बनविण्याचे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तरुणांवर आहे, असेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.


तरुणाईच्या पंखात गगनभरारीचे बळ : डॉ. मित्तल यांचे प्रतिपादन


            जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या महासत्तेकडे भारताची वेगाने वाटचाल सुरु आहे. तरुणाईचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशातील युवकांच्या पंखांमध्ये गरुड भरारी घेण्याचे बळ आहे, या शब्दात दीक्षांत सोहळ्याच्या प्रमुख अतिथी डॉ. मित्तल यांनी तरुणांचे कौतुक केले. तरुणांनी विचार आणि कृती याची सांगड घालून परिवर्तन घडविले पाहिजे. शिक्षणाचे ’पॅशन’ असल्याशिवाय तरुण पुढे जाऊ शकणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.


गुणवंतामुळे विद्यापीठाचा नावलौकिक : कुलगुरु


            ‘संशोधन छात्रवृत्ती’सह सर्वच क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला नावलौकिक मिळवून दिला, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले स्वागतपर भाषणात म्हणाले. यावेळी ते म्हणाले, विद्यापीठांशी संलग्नित सुमारे ३९४ महाविद्यालयाचे अ‍ॅकडमिक ऑडिट पूर्ण करण्यात आलं आहे हा एक महाराष्ट्रातील उच्चांक होय. ज्या महाविद्यालयांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक पायाभूत सुविधा, प्राचार्य, प्राध्यापक उपलब्ध नाहीत त्यांच्यावर विद्यापीठाने कठोर कारवाई केलेली आहे. शैक्षणिक गुणवत्तेबाबत विद्यापीठ वचनबध्द आहे. विद्यापीठात व संलग्नित महाविद्यालयांच्या संशोधन केंद्रात आजघडीला पाच हजाराहून अधिक विद्यार्थी संशोधन करीत आहेत. यातील १ हजार ९६५ संशोधकांना बार्टी, सारथी , महाज्योतीसह विविध राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती प्राप्त आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे ७५ कोटी रुपयांचा निधी या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षात अश्वमेध, इंद्रधनुष्य, आव्हान, आविष्कार आदी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये वीसहून अधिक पारितोषिके जिंकली आहेत. आजच्या दीक्षांत समारंभात २९१ संशोधकांना पीएच.डी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक मानव्यविद्या शाखेतील १२१जण असून विज्ञान-तंत्रज्ञान -९१, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र ४५ तर आंतरविद्या शाखेत ३४ जणांनी पीएच.डी प्राप्त केली आहे. तर एमफिल, पदवी व पदव्युत्तर अशा ५९ हजार ९६६ जणांना पदवी प्रदान करण्यात आली.


            दीक्षांत समारंभाला भारतीय विद्यापीठ संघटनेच्या सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले, प्र-कुलगुरु डॉ श्याम शिरसाठ, कुल‍सचिव डॉ भगवान साखळ, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ भारती गवळी यांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते. दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांमधील 59966 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका व पीएच.डी. प्रदान करण्यात आली.


            यावेळी राज्यपालांच्या हस्ते बी. व्हॉक स्टडीज इमारत व पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडींग ॲन्ड बायोडायव्हरसिटी स्टडीज इमारतीचे दूरस्थ माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. 


००००



 

खान्देशसाठी जळगाव येथे स्वतंत्र विभागीय आयुक्तालय;

 







खान्देशसाठी जळगाव येथे स्वतंत्र विभागीय आयुक्तालय;

केळी विकास महामंडळासाठी १०० कोटींची तरतूद

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिल्ह्यातील प्रकल्पांना गती देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            जळगावदि. २७ (जिमाका) :- खान्देशातील जळगावधुळेनंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल. तसेच केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर बोदवड उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. अशा जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केल्या. जळगाव शहर खड्डेमुक्त करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री गुलाबराव पाटीलग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्यासह जिल्ह्यतील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भाषणात मागणी केलेल्या याबाबींवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी या घोषणा केल्या.

            पोलीस कवायत मैदान येथे 'शासन आपल्या दारीया अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते‌. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटीलवैद्यकिय शिक्षणग्रामविकासक्रीडा मंत्री गिरीष महाजनकृषीमंत्री अब्दुल सत्तारबंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेखासदार रक्षा खडसेखासदार उन्मेष महाजनआमदार चिमणराव पाटीलआ.सुरेश भोळेआ.किशोर पाटीलआ.संजय सावकारे आ.लता सोनवणेआ.चंद्रकांत पाटीलआ.मंगेश चव्हाणमाजी आमदार स्मिता वाघचंदुलाल पटेलशिरीष चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

            'शासन आपल्या दारीअभियानात जळगाव जिल्ह्यात 3 लाख ३ हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे‌. यापैकी ३५ हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमागील एक वर्षात शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. सततच्या पावसामुळे झालेले नुकसान नैसर्गिक आपत्ती म्हणून धरले. शेतकऱ्यांना १५०० कोटी रूपयांची नुकसान भरपाई दिली. नैसर्गिक आपत्तीसाठी आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत केली आहे‌. एक रूपयात पीक विम्याचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रूपये प्रोत्साहन रक्कम दिली. महिला सक्षमीकरणासाठीसर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल करण्यासाठी शासन निर्णय घेत आहे. लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. शासकीय योजनांचा लाभ घेऊन सरपंचांनी आपले गाव स्वच्छ व समृद्ध करण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेसर्वाधिक पायाभूत सुविधा निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे‌. परदेशी गुंतवणुकीत राज्याने आघाडी घेतली आहे. १ लाख १८ हजार कोटी रूपयांची परदेशी गुंतवणूक राज्यात मागील वर्षभरात झाली आहे. राज्यातील सर्व साडेबारा कोटी नागरिकांना आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ५ लाखांपर्यंतचा मोफत उपचार केला जाणार आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांना गती देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी पाडळसे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. बोदवड उपसा सिंचन योजनेचे बाकी राहिलेले २० टक्के काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना गती देण्यात येईल. सिंचनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेमागील वर्षभरात जिल्ह्यात २० हजार हेक्टर शेती क्षेत्रावर ठिंबक सिंचनाचा लाभ देण्यात आला‌. याचा २१ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला. ५० हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला. १ हजार ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. रस्ते कामांकरिता जिल्ह्याला अडीच हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा चाळ जळगाव जिल्ह्यात उभारण्यात आल्या. जलजीवन मिशनच्या १३५४ योजना जिल्ह्यात सुरू आहेत‌. फळबाग योजना व नैसर्गिक आपत्तीत जळगाव जिल्ह्याला भरघोस मदत करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कीशासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी ४७ कोटींची मदत दिली आहे. जलजीवन मिशनच्या १७६५ कोटींच्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. मुक्ताईनगर मध्ये १८५ कोटींचा पूल मंजूर केला आहे. चोपडा पूला करिता १७५ कोटींची शासन मदत झाली आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी शासन योजना गतिमान पद्धतीने राबवित आहे.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणालेशासनाने जिल्ह्यात मेहरूण येथे १२४ कोटींचे नवीन अद्यावत क्रीडा संकुल मंजूर केले आहे. अत्याधुनिक मेडिकल हब जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये यासाठी ‘शासन आपल्या दारी’ लोकाभिमुख अभियान आणले आहे. यात दुर्गमपाड्या-वस्त्यावरील लाभार्थ्यांला शासकीय योजनांचा लाभ घरबसल्या मिळत आहे.

            यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शासनाच्या विविध योजनांच्या १५ लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. यामध्ये लताबाई पाटीलशशिकांत कोळीअथर्व साळुंखेदिपक भिलगोमा गायकवाडनीता पाटीलहिलाल बिलमधुकर धनगरमोहिनी चौधरीसोनी गवळेदत्तात्रय महाजनविजया देवरेज्ञानेश्वर आमलेकु. सायली शिरसाठमिलिंद निकम यांचा समावेश होता. यातील प्रातिनिधिक पाच लाभार्थ्यांचा लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून यावेळी दहा रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

            यावेळी जळगाव जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांचे खान्देशी टोपीरूमालकेळीपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूतृणधान्याचा संच व बहिणाबाईंच्या कवितांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेनाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटीलजिल्हाधिकारी अमन मित्तलजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशियापोलीस अधिक्षक एम. राजकुमारमहानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले‌. तर उपस्थितांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आशिया यांनी मानले.

            यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किटटॅक्टरचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातून आलेल्या सरपंचाशीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यासपीठावरून खाली येत प्रत्यक्ष संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांनी केले हार्वेस्टिंग मशीनचे सारथ्य

            जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या समारोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः व्यासपीठावर खाली येऊन शेतकऱ्यांना पॉवर टिलर वाटप करण्यासाठी गेले. त्याठिकाणी त्यांना महाडीबीटी योजनेत एका लाभार्थ्यांला मिळालेले हार्वेस्टिंग मशीन दिसले. मुख्यमंत्री स्वतः या मशीनवर चढले आणि त्यांनी मशीनचे सारथ्य केले. त्यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजनआमदार  किशोर पाटील,  मंगेश चव्हाण हे ही हार्वेस्टिंग मशीनवर सोबत उपस्थित होते.

            कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीमुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ योजनेची माहिती दिली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आले‌ आहेत‌. यामाध्यमातून जनकल्याण योजनांचा सर्वसामान्यांना लाभ दिला जात आहेअसे त्यांनी यावेळी सांगितले.

एका छताखाली २५ शासकीय विभागाच्या माहितीचे स्टॉल

            शासन आपल्या दारी अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे २५ स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्यातक्रारीनिवेदने स्वीकारण्यात आली. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासही या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाअगोदर स्थानिक कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रोजगार मेळाव्यात एकूण 1335 युवकांनी नोंदणी केली. यापैकी 1074 युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली तर 46 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यात 12 विविध आस्थापना सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अपूर्वा वाणी केले.

00000


 

न्याहरी*🥗🍛

 *न्याहरी*🥗🍛


सकाळची न्याहारी करताना खालील मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे.


१ ) रात्रीची झोप होऊन सकाळी नीट मलविसर्जन होऊन कडकडीत भूक लागली असेल तर भरपेट आहार घ्यावा. परंतु जर उशिरा जेवण झाले असेल, सकाळी मलविसर्जन नीट नसेल झाले तर हलका आहार घ्यावा. परंतु शरीराला चांगल्या सवयी लावाव्यात.


२) ऋतूनुसार उन्हाळा, हिवाळा, पावसाळा न्याहारीत बदल करावा.


३) सकाळी खूप तेलकट व तिखट न्याहारी करू नये.


४) न्याहारीत प्रथिने (proteins), कर्बोदके(carbohydrates), व साखर यांचे प्रमाण संतुलित असावे. आजकाल खुपजण मधुमेह होईल या भीतीने मधुमेह नसताना साखर खाणे बंद करतात. हे अतिशय घातक आहे कारण मेंदूला कार्यरत राहण्यासाठी साखरेची गरज असते.


५) आपण ज्या देशात राहतो त्या देशात पिकणारी फळे, भाज्या, यांचाच शक्यतो आहार घटकात समावेश करावा.


६) आहारात कोणतेही रासायनिक घटक, अथवा कृत्रिमरंग यांचा वापर न करता नैसर्गिक भाजीपाला, धान्ये, फळे यांचा वापर करावा.


७) मनुष्य कोणत्याही प्रकृतीचा असला तरी त्याने सकाळी एक चमचा गाईचे तूप व एक कप गाईचे दूध घेणे गरजेचे आहे. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने दूध घेताना त्यात चिमूटभर हळद व सुंठ पावडर टाकून घ्यावे.


वरील गोष्टींना अनुसरून न्याहारीत घेता येतील असे पदार्थ :


धपाटे


हा महाराष्ट्रीयन पारंपारीक पदार्थ आहे. गव्हाचे पीठ, हरभरे डाळीचे पीठ, ज्वारी पीठ, नागली पीठ, तांदूळ पीठ सर्व एकत्र करावीत.


स्रोत


त्यात हींग, जिरे पूड, तिखट, मीठ, कोथिंबीर, थोडा लसूण घालून पाणी टाकून पोळी सारखी कणिक मळावी. त्याचे छोटे छोटे गोळे करून लाटून तव्यावर भाजावेत. हे धपाटे, चांगले तूप, लिंबू लोणचे, खोबऱ्याची ओली चटणी, याबरोबर खावेत.


मेतकूट भात


ज्यांची पचनशक्ती कमी आहे किंवा ज्यांना हलका आहार घ्यावयाचा आहे त्यांनी तांदळाचा गरम गरम आसट भात, त्यावर साजूक तूप, वर खमंग मेतकूट टाकून खावे.


खिचडी


मोड आलेली धान्ये, शेंगदाणे, सर्व डाळी ( मूग, हरभरा, तूर, मसूर) एकत्र करून केलेली खिचडी व त्यावर तूप घालून लिंबू लोणचं सोबत खावी. सर्व डाळी असल्याने यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात.


उपमा


बाजरीचे पीठ, रवा, नागलीचे पिठ यांचा पारंपारीक पद्धतीने उपमा बनवावा. यात कढीपत्ता, आले टाकावे म्हणजे पचण्यास सोपे जाते.


धिरडे


सर्व डाळींची पिठ, तांदूळ पीठ, गव्हाचे पीठ यात हिंग, जिरे, मीठ, तिखट, कोथिंबीर, पाणी घालून पातळ मिश्रण करावे व nonstick pan वर डोसा सारखे घालावे.


पचडी


कोबी, टोमॅटो, गाजर, मोडाचे मूग, जिरे, मीठ, लिंबूरस आवडीनुसार घालून एकत्र करावे व खावे. याच्या जोडीला निरनिराळे लाडू देखील खाऊ शकता, कारण सकाळची न्याहारी भरपेट पाहिजे.

दररोज घरामध्ये देवपुजा का करावी?*

 *दररोज घरामध्ये देवपुजा का करावी?*


वातावरणात दोन प्रकारच्या ऊर्जा असतात एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक उर्जा (मनाची उर्जा). जर का घरामध्ये/मनामध्ये नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला तर घरामध्ये चिडचिड होणे, वाद होणे, उदास वाटणे, एकमेकांसोबत संबंध बिघडणे, कुठलंही काम मनासारखं न घडणे, कोणत्याही कार्यामध्ये सतत अपयश येणे अशा घटना वारंवार घडत राहतात त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते.


परंतु घरामध्ये/मनामध्ये सकारात्मक उर्जा असेल तर घरातील वातावरण हे नेहमीच प्रसन्न आणि आनंददायी असेल. घरातले वातावरण हे नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरून राहण्यासाठी दैनंदिन देवपूजा हिंदुंच्या प्रत्येक घरामध्ये झाली पाहिजे.


देवपूजेमुळे घरातील सकारात्मक उर्जा टिकुन राहण्यासाठी मदत होते... त्यासाठी हिंदू धर्मामध्ये दोन वेळेस सकाळ संध्याकाळ देवपूजा करण्याची प्रथा, पद्धत आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे.


उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने आपल्याला शिवीगाळ केली अथवा वाईट बोलली तर आपल्या शरीरामध्ये लगेचच बदल व्हायला सुरुवात होते जसे की श्वासोच्छवास वाढणे राग येणे शरीराला कंप सुटणे हे का घडतं तर समोरच्याने जे शब्द वापरले त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच होतो व आपले शरीर लगेच हार्मोन्स मध्ये बदल करते त्याचे परिणाम दिसायला लागतात. 


तसंच स्तोत्र मंत्र पठण करण्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात आणि त्याचे दुरोगामी परिणाम आपल्याला दिवसभर जाणवतात जसे की मन प्रसन्न राहणे. कुणी जरी आपल्या वाईट भाषा वापरली तरीही आपल्यावर त्या व्यक्तीच्या शब्दांचा कसलाही परिणाम न होणे म्हणजे ते व्यक्तीने वाईट बोलल्यामुळे आपल्याला राग येत नाही. त्यामुळे कोणाशी वाद होत नाही. अशा कठीण परिस्थितीतही त्या समोरच्या व्यक्ती सोबत आपण सकारात्मक संवाद साधतो. हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमचं मन प्रसन्न आणि सकारात्मक असत. 


हे तुम्ही सकाळी केलेल्या देवपूजा व स्तोत्रपठनाचे परिणाम असणार आहेत. त्यानंतर पुन्हा १२ तासाने आपल्याला संध्याकाळची देवपूजा करायची आहे आणि जर कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून सामुहिक संध्यापूजा जर केली तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला दिसून येतील कुटुंबामध्ये कधीही नकारात्मक विचार येणार नाहीत ते कुटुंब कायम आनंदी असेल यासाठी तुम्ही दैनंदिन देवपूजा करणे खूप गरजेचे आहे.


आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही स्तोत्र मंत्र यांची रचना आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी (शास्त्रज्ञ) यांनी खूप अभ्यास करून बनवलेली आहे जसं की गायत्री मंत्र, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र जर तुम्ही या स्तोत्रांच मंत्रांच पठन दररोज केलं तर तुमच्या शरीरातल्या अँटीबोडीज ऍक्टिव्ह होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते गायत्री मंत्राच पठन अतिशय स्वच्छ स्वरामध्ये केल्यास पोटापासून ते छाती डोकं या ठिकाणी व्हायब्रेशन्स क्रियेट होतात, कंपन निर्माण होतात, त्या कंपनांमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात सक्रिय होतात त्यामुळे तुम्ही कधीही आजारी न पडण्याचा फायदा तुम्हाला होतो. 


विचार करा, आपल्या पूर्वजांनी शरीरशास्त्र मानसशास्त्राचा किती गाढा अभ्यास करून आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. पण आपल्याला त्या माहीत नसल्या कारणामुळे, कुणीही न शिकवल्यामुळे आज त्या दुर्लक्षित आहेत अथवा त्या अंधश्रद्धा आहेत. तरी याचा तुम्ही सहा महिने दैनंदिन न चुकता स्तोत्रमंत्राचं पठण करून अनुभव घेऊ शकता.


लक्षात ठेवा प्रत्येक हिंदूंनी आपल्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी देवपूजा केली पाहिजे प्रत्येक सण उत्सव हे अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरे करायला पाहिजेत.त्यामुळे लहान मुलांनाही हिंदू संस्कृतीची माहिती मिळेल व ते कधीही वाईट आचरण करणार नाहीत, चुकीचे वागणार नाहीत....

विरोधाभास आसव च

 😊😇 रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂  


ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात.. त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते..😂


जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😂 


गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 😂 


आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..😂 .  


जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😂 


जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो.. तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं..की आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षा पण खराब आहे.. 😂 😄 😅 😜


होमिओपॅथीची औषधं घेण्यातली मजा काही औरच...

औषधाच्या बाटलीतून ४ गोळ्या काढाव्या म्हटलं तर साबुदाण्याच्या ६ गोळ्या बाहेर पडतात. त्यातल्या पुन्हा २ गोळ्या परत टाकायला गेलो तर ४ गोळ्या बाटलीत परत जातात... 😂

या गदारोळात रोग्याचं लक्ष आजारावरून दूर होतं आणि तो लवकर बरा होतो...


😂खरं पाहिलं तर जगातला कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो ...

कारण , 

थोडं बहुत डोकं तर प्रत्येकच जण खात असतो.

😛😛😛😛😛😛


🌹 नोटा कागदापासून बनतात, कागद लाकडापासून बनतो आणि लाकूड झाडापासून मिळतं .......

याचा अर्थ असा की पैसे झाडाला लागतात. 😜😜👍👍


🌹 विवाहित माणसाला त्याच्या जीवनात किमान दोन खर्च तरी करावेच लागतात...

१. बायको गोरी असेल तर..

Sun Screen...

आणी

२. काळी असेल तर...

Fair & Lovely.....

😝😝😝😝😜


🌹 म्हणतात की, जो हसला, त्याचं घर बसलं !!

पण .........

ज्याचं घर वसलं, त्याला विचारा......

की तो मग केव्हा हसला??

😄😄😄😛😛😛


🌹 बायकोला समजून घेणं म्हणजे :~

32 GB चा 

Video Download करणं.

आणि ..........

31.5 GB Download

झाल्यावर Error मेसेज दिसणं !!!!

😝😝😝😝


🌹 जगात केवळ तेच लोक साधेभोळे असतात, ज्याच्या मोबाइल मध्ये पासवर्ड नसतात.

😛😛😛😛😛😛


🌹 कांही लोक whatsapp वर फक्त

दोनच स्टेटस पोस्ट करतात....

पहिलं:-- good morning....

दूसरं:-- good night .....

असं वाटतं..... जणू whatsapp च्या दुकानाचं शटर उघडायची आणि बंद

करायची जबाबदारी यांच्यावरच सोपवली असावी...... आणि मालाच्या खरेदी - विक्रीची जबाबदारी आपली.

😜😜😜😒😒


🌹एक सर्व्हेनुसार, आजही आपल्या देशात......

'तू प्यार है, किसी और का, तुझे चाहता कोई और है'

हे गाणं वाजल्यावर १० पैकी ८ मुलं इमोशनल होऊन जातात ...

💔💔😂😂😝😝


🌹 भारतातले लोक इतके टॅलंटेड असतात की, गाड़ी हालवून सांगू शकतात ....

की गाडीत पेट्रोल किती आहे ?

😎😜😜😜😜


🌹 ट्रेनच्या आंतल्या गर्दीच्या 'चक्रव्यूहा' ला भेदण्याचं जे कौशल्य या "नमकीन अथवा शहाळी" विकणाऱ्यांपाशी असतं ते तर 'अभिमन्यु' पाशीही नव्हतं.

😊😛😖😆😉😄


🌹 माणूस सर्वात अधिक खुश तेव्हा होत असतो, जेव्हा रेल्वे फाटक बंद होत असतं त्याच्या आधीच तो आपली गाडी फाटका पलिकडे काढून घेतो.......

आई शप्पथ सांगतो की त्याला ओलंपिक रेस जिंकल्याचं समाधान मिळत असतं.

😂😂😂😂


🌹 अजून पर्यंत हे समजलं नाही की 

OK च्या ऐवजी K आणि GOOD MORNING च्या ऐवजी GM लिहिणारे, आयुष्याचे २ सेकंद वाचवून काय करत असतील ?

आणि .....ह्या hmmm ...वाल्यांनी तर फारच त्रास दिला आहे, असं वाटतं की आपण म्हशीशीच बोलतोय ! 

😜😜😃😛


🌹So confusing 😳

आई बाप आपल्या मुलीसाठी सुयोग्य स्थळ शोधताना दोन गोष्टींकडे लक्ष देतात...

पहिली म्हणजे मुलगा खात्या पित्या घरातला असावा.....

आणि दूसरी

तो पिणारा - खाणारा नसावा ....

हे कसं काय बुवा ....?? 

😳😄😂😂


गळ्यात मंगळसूत्र पडलेलं असेल तर मुलीचं लग्न झालेलं आहे.....

आणि

चेहरा पडलेला असेल तर मुलाचं लग्न झालेलं असावं ,,,,

😂😜😂😜😂😭😜


जीवन चांगलं जगायचं असेल तर हसणं आवश्यक आहे. ।।।


🙏🤗🙏

आला .. पावसाळा... स्वास्थ सांभाळा

 *... आला .. पावसाळा... स्वास्थ सांभाळा...☔️💨...*


##.. कडक- रणरणत्या उन्हाने तापलेल्या भूमिला, मलूल झालेल्या तना मनाला जून महिना सुरू झाला की वेध लागतात ते वरुणराजाचे..

...आणि मग..,, नेमेची आला पावसाळा,, करत मेघराजा आपलि दणक्यात वर्दि लावतो..

      सगळि स्रूष्टि हिरविकंच दिसते, वातावरण एकुणच प्रफूल्लित होते,, ...हे सगळे खरे असले तरी, याच दिवसात आपलि प्रक्रूति सांभाळणे तितकेच महत्वाचे असते.. हवेत खुप दमटपणा येतो, त्रिदोषांचा विचार करता पावसाळ्यात विशेषतः वातदोषाचा प्रकोप होतो व पित्तदोष साठायला सुरूवात होते,


##.. धातूंचिहि शक्ति कमि झालेलि असते, अग्नि मंद झाल्याने पचनहि मंदावते, व दमटपणामूळे जंतूंचि वाढ होते, शरिराचि प्रतिकारशक्ति कमी होते, म्हणुनच या काळात आहार, आचरण, व आरोग्यरक्षण या त्रिसूत्रिच्या माध्यमातून, ऋतूचर्या ठरवायचि असते..

       ## पाण्याचे प्रदूषण हि समस्या उद्भवते पावसाळ्यात पाण्याचा विपाक आंबट होतो असे आयुर्वेदात सांगितले आहे, जंतूंचि वाढ होते, तेव्हा पिण्याचे पाणी, २० मिनिटे उकळावे, व उकळतांना, त्यात, चंदन, वाळा, अनंतमूळ, वावडिंग, सुंठ, यासारखी द्रव्ये टाकावित पाणि शुद्ध होऊन पचायला हलके होते.


##*. मंद झालेल्या अग्निला प्रज्वलित करण्यासाठि, जेवण तयार करतांना, हिंग, धने, तमालपत्र, ओवा, जिरे, दालचिनि, आले, हळद, आमसूल, अश्या मसाल्यांचा वापर योग्य प्रमाणात करावा, अधून मधून जेवणापूर्वी काळे मिठ व जिरेपुड टाकून लिंबुरस घ्यावे

    .. आले व सुंठ म्हणजे पावसाळ्यात मोठे वरदानच.. अग्निमांद्य दूर करते.. आयुर्वेदात तर आल्याला। ,, विश्वषौधा,, म्हटले आहे, पावसाळ्यात शक्य तिथे आल्याचा वापर करावा, चहात आले घालावे, भाजि, कढि, आमटित घालावे, दूधात सुंठ टाकुन प्यावे,

     प्रवासात आलेपाक चघळावा,..

          घरातला दमटपणा जाण्यासाठि, वेखंड, सुंठ, ओवा, कडूनिंबाची पाने यांचा धूप करावा,, हवा शुद्ध होते

   अभ्यंग स्नान करावे, उटणे वनौषधि असलेले वापरावे चर्मरोग होत नाही, रात्रि झोपतांना कोमट पाण्यात मध टाकून प्यावे व जागरण करू नये..

     नियमितपणे अंगाला तिळाच्या तेलाने मालिश करावी,

....। आहारः

      ।। भजेत्साधारणं सर्वं उष्मणस्तेजनं च यत्।।

 अश्या अन्नाचे सेवन करावे कि जे वात पित्त, कफ या तिघांचे संतूलन करतिल, उष्ण असेल, व अग्निला प्रदिप्त करण्यास सक्षम असेल... या दिवसात अल्प आहार घ्यावा, संद्धाकाळि लवकरच जेवावे, मुगाचि मवु खिचडि, कढि भात, मेतकुट भात, पेज, टोमटो सार, हे पदार्थ ठेवा, नाश्यात, दूध साळ्याच्या लाह्या, तांदळाचि उकड, गरम गरम, नाचणि लापशि, ज्वारिच्या पिठाचा उपमा, राजगिरा चिक्कि, असे घ्यावे,


##*.. भाज्यामद्धेः। दूधि, तोंडली, परवर, दोडकि, घोसाळि, कार्ले, कोहळा, गाजर, भेंडि, करटोलि, व काहि पालेभाज्या , टाकळा, कूरडयी, घोळ, लाल माठ, भारंगि, अश्या खाव्या.. कडधान्येः। मूग, कुळिथ, तूर, मटकि, अंकुरित.. धान्येः.. तांदुळ, ज्वारि, बाजरि, नाचणी, गहू, . शक्यतोवर भाजून घ्यावी.

       फळेः... सफरचंद, अंजिर, पपयि, शहाळे, मोसंबि, संत्रि, नाश्पति, घरचे साजूक तुप वापरावे, ख डिसाखर, सैंधव मिठ, मध, याचा वापर करावा,

..... मसालाः। बडिशेप, आले, हिंग,लवंग, पुदिना, कोथिऔबिर, हिंग, ओवा,..


##*.. दमछाक होणारे व्यायाम न करता, योगासने, लोम, विलोम, प्राणायम, भस्रिका, करावे, पावसाळ्यात सर्दि खोकला, दमा बळावतो, तेव्हा सितोपलादि चूर्ण घ्यावे. ओव्याच्या पुरचुंडीनै छाति शेकावी, रूईच्या पानाने शेकावे, कफ मोकळा होतो, कपभर पाण्यात, गवति चहा, सुंठ, तुळशिचे पाने, काहि पुदिन्याचि पाने, आले हळद, बडिशेप , मिरे लवंग, दालचिनि घालून काढा घ्यावा,.. जुलाब झाल्यास जायफळ उगाळून चाटण घ्यावे

     मेथिचे दाणे पाण्यासोबत गिळावे..


##*.. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, डास निर्मूलनाकरता विविध उपाययोजना अंमलात आणाव्या,

   अश्या प्रकारे काळजि घेतल्यास नक्किच तुमचा.. नेमेचि पावसाळा, आल्हाददायक, सुसह्य, व सुखाचा जाईल.....,, Happy Rainy season.....💐



Tuesday, 27 June 2023

फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडविण्यास 21 ऑगस्टपर्यंत बंदी

 

फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडविण्यास 21 ऑगस्टपर्यंत बंदी


 


            मुंबई, दि. 27 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्टयांच्या दृष्टीकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जित करणारी वस्तू, पतंग आदींमुळे विमानांचे सुरक्षित अवागमन धोक्यात येते. त्यामुळे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजुबाजूच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात उंच उडणारे फटाके उडवणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू सोडणे, पतंग उडवणे आणि लेझर बीम प्रकाशित करणे, फुगे, पॅराग्लायडर्स उडविण्यावर बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 21 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू करण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.


            कोणत्याही विमानाच्या लँडिंग, टेक ऑफ आणि अवागमनामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर केल्याचे लक्षात येताच कोणतीही व्यक्ती जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती देईल. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.


००००

Featured post

Lakshvedhi