Wednesday, 28 June 2023

दररोज घरामध्ये देवपुजा का करावी?*

 *दररोज घरामध्ये देवपुजा का करावी?*


वातावरणात दोन प्रकारच्या ऊर्जा असतात एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक उर्जा (मनाची उर्जा). जर का घरामध्ये/मनामध्ये नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला तर घरामध्ये चिडचिड होणे, वाद होणे, उदास वाटणे, एकमेकांसोबत संबंध बिघडणे, कुठलंही काम मनासारखं न घडणे, कोणत्याही कार्यामध्ये सतत अपयश येणे अशा घटना वारंवार घडत राहतात त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते.


परंतु घरामध्ये/मनामध्ये सकारात्मक उर्जा असेल तर घरातील वातावरण हे नेहमीच प्रसन्न आणि आनंददायी असेल. घरातले वातावरण हे नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरून राहण्यासाठी दैनंदिन देवपूजा हिंदुंच्या प्रत्येक घरामध्ये झाली पाहिजे.


देवपूजेमुळे घरातील सकारात्मक उर्जा टिकुन राहण्यासाठी मदत होते... त्यासाठी हिंदू धर्मामध्ये दोन वेळेस सकाळ संध्याकाळ देवपूजा करण्याची प्रथा, पद्धत आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे.


उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने आपल्याला शिवीगाळ केली अथवा वाईट बोलली तर आपल्या शरीरामध्ये लगेचच बदल व्हायला सुरुवात होते जसे की श्वासोच्छवास वाढणे राग येणे शरीराला कंप सुटणे हे का घडतं तर समोरच्याने जे शब्द वापरले त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच होतो व आपले शरीर लगेच हार्मोन्स मध्ये बदल करते त्याचे परिणाम दिसायला लागतात. 


तसंच स्तोत्र मंत्र पठण करण्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात आणि त्याचे दुरोगामी परिणाम आपल्याला दिवसभर जाणवतात जसे की मन प्रसन्न राहणे. कुणी जरी आपल्या वाईट भाषा वापरली तरीही आपल्यावर त्या व्यक्तीच्या शब्दांचा कसलाही परिणाम न होणे म्हणजे ते व्यक्तीने वाईट बोलल्यामुळे आपल्याला राग येत नाही. त्यामुळे कोणाशी वाद होत नाही. अशा कठीण परिस्थितीतही त्या समोरच्या व्यक्ती सोबत आपण सकारात्मक संवाद साधतो. हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमचं मन प्रसन्न आणि सकारात्मक असत. 


हे तुम्ही सकाळी केलेल्या देवपूजा व स्तोत्रपठनाचे परिणाम असणार आहेत. त्यानंतर पुन्हा १२ तासाने आपल्याला संध्याकाळची देवपूजा करायची आहे आणि जर कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून सामुहिक संध्यापूजा जर केली तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला दिसून येतील कुटुंबामध्ये कधीही नकारात्मक विचार येणार नाहीत ते कुटुंब कायम आनंदी असेल यासाठी तुम्ही दैनंदिन देवपूजा करणे खूप गरजेचे आहे.


आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही स्तोत्र मंत्र यांची रचना आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी (शास्त्रज्ञ) यांनी खूप अभ्यास करून बनवलेली आहे जसं की गायत्री मंत्र, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र जर तुम्ही या स्तोत्रांच मंत्रांच पठन दररोज केलं तर तुमच्या शरीरातल्या अँटीबोडीज ऍक्टिव्ह होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते गायत्री मंत्राच पठन अतिशय स्वच्छ स्वरामध्ये केल्यास पोटापासून ते छाती डोकं या ठिकाणी व्हायब्रेशन्स क्रियेट होतात, कंपन निर्माण होतात, त्या कंपनांमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात सक्रिय होतात त्यामुळे तुम्ही कधीही आजारी न पडण्याचा फायदा तुम्हाला होतो. 


विचार करा, आपल्या पूर्वजांनी शरीरशास्त्र मानसशास्त्राचा किती गाढा अभ्यास करून आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. पण आपल्याला त्या माहीत नसल्या कारणामुळे, कुणीही न शिकवल्यामुळे आज त्या दुर्लक्षित आहेत अथवा त्या अंधश्रद्धा आहेत. तरी याचा तुम्ही सहा महिने दैनंदिन न चुकता स्तोत्रमंत्राचं पठण करून अनुभव घेऊ शकता.


लक्षात ठेवा प्रत्येक हिंदूंनी आपल्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी देवपूजा केली पाहिजे प्रत्येक सण उत्सव हे अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरे करायला पाहिजेत.त्यामुळे लहान मुलांनाही हिंदू संस्कृतीची माहिती मिळेल व ते कधीही वाईट आचरण करणार नाहीत, चुकीचे वागणार नाहीत....

विरोधाभास आसव च

 😊😇 रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂  


ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात.. त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते..😂


जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😂 


गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 😂 


आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..😂 .  


जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😂 


जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो.. तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं..की आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षा पण खराब आहे.. 😂 😄 😅 😜


होमिओपॅथीची औषधं घेण्यातली मजा काही औरच...

औषधाच्या बाटलीतून ४ गोळ्या काढाव्या म्हटलं तर साबुदाण्याच्या ६ गोळ्या बाहेर पडतात. त्यातल्या पुन्हा २ गोळ्या परत टाकायला गेलो तर ४ गोळ्या बाटलीत परत जातात... 😂

या गदारोळात रोग्याचं लक्ष आजारावरून दूर होतं आणि तो लवकर बरा होतो...


😂खरं पाहिलं तर जगातला कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो ...

कारण , 

थोडं बहुत डोकं तर प्रत्येकच जण खात असतो.

😛😛😛😛😛😛


🌹 नोटा कागदापासून बनतात, कागद लाकडापासून बनतो आणि लाकूड झाडापासून मिळतं .......

याचा अर्थ असा की पैसे झाडाला लागतात. 😜😜👍👍


🌹 विवाहित माणसाला त्याच्या जीवनात किमान दोन खर्च तरी करावेच लागतात...

१. बायको गोरी असेल तर..

Sun Screen...

आणी

२. काळी असेल तर...

Fair & Lovely.....

😝😝😝😝😜


🌹 म्हणतात की, जो हसला, त्याचं घर बसलं !!

पण .........

ज्याचं घर वसलं, त्याला विचारा......

की तो मग केव्हा हसला??

😄😄😄😛😛😛


🌹 बायकोला समजून घेणं म्हणजे :~

32 GB चा 

Video Download करणं.

आणि ..........

31.5 GB Download

झाल्यावर Error मेसेज दिसणं !!!!

😝😝😝😝


🌹 जगात केवळ तेच लोक साधेभोळे असतात, ज्याच्या मोबाइल मध्ये पासवर्ड नसतात.

😛😛😛😛😛😛


🌹 कांही लोक whatsapp वर फक्त

दोनच स्टेटस पोस्ट करतात....

पहिलं:-- good morning....

दूसरं:-- good night .....

असं वाटतं..... जणू whatsapp च्या दुकानाचं शटर उघडायची आणि बंद

करायची जबाबदारी यांच्यावरच सोपवली असावी...... आणि मालाच्या खरेदी - विक्रीची जबाबदारी आपली.

😜😜😜😒😒


🌹एक सर्व्हेनुसार, आजही आपल्या देशात......

'तू प्यार है, किसी और का, तुझे चाहता कोई और है'

हे गाणं वाजल्यावर १० पैकी ८ मुलं इमोशनल होऊन जातात ...

💔💔😂😂😝😝


🌹 भारतातले लोक इतके टॅलंटेड असतात की, गाड़ी हालवून सांगू शकतात ....

की गाडीत पेट्रोल किती आहे ?

😎😜😜😜😜


🌹 ट्रेनच्या आंतल्या गर्दीच्या 'चक्रव्यूहा' ला भेदण्याचं जे कौशल्य या "नमकीन अथवा शहाळी" विकणाऱ्यांपाशी असतं ते तर 'अभिमन्यु' पाशीही नव्हतं.

😊😛😖😆😉😄


🌹 माणूस सर्वात अधिक खुश तेव्हा होत असतो, जेव्हा रेल्वे फाटक बंद होत असतं त्याच्या आधीच तो आपली गाडी फाटका पलिकडे काढून घेतो.......

आई शप्पथ सांगतो की त्याला ओलंपिक रेस जिंकल्याचं समाधान मिळत असतं.

😂😂😂😂


🌹 अजून पर्यंत हे समजलं नाही की 

OK च्या ऐवजी K आणि GOOD MORNING च्या ऐवजी GM लिहिणारे, आयुष्याचे २ सेकंद वाचवून काय करत असतील ?

आणि .....ह्या hmmm ...वाल्यांनी तर फारच त्रास दिला आहे, असं वाटतं की आपण म्हशीशीच बोलतोय ! 

😜😜😃😛


🌹So confusing 😳

आई बाप आपल्या मुलीसाठी सुयोग्य स्थळ शोधताना दोन गोष्टींकडे लक्ष देतात...

पहिली म्हणजे मुलगा खात्या पित्या घरातला असावा.....

आणि दूसरी

तो पिणारा - खाणारा नसावा ....

हे कसं काय बुवा ....?? 

😳😄😂😂


गळ्यात मंगळसूत्र पडलेलं असेल तर मुलीचं लग्न झालेलं आहे.....

आणि

चेहरा पडलेला असेल तर मुलाचं लग्न झालेलं असावं ,,,,

😂😜😂😜😂😭😜


जीवन चांगलं जगायचं असेल तर हसणं आवश्यक आहे. ।।।


🙏🤗🙏

आला .. पावसाळा... स्वास्थ सांभाळा

 *... आला .. पावसाळा... स्वास्थ सांभाळा...☔️💨...*


##.. कडक- रणरणत्या उन्हाने तापलेल्या भूमिला, मलूल झालेल्या तना मनाला जून महिना सुरू झाला की वेध लागतात ते वरुणराजाचे..

...आणि मग..,, नेमेची आला पावसाळा,, करत मेघराजा आपलि दणक्यात वर्दि लावतो..

      सगळि स्रूष्टि हिरविकंच दिसते, वातावरण एकुणच प्रफूल्लित होते,, ...हे सगळे खरे असले तरी, याच दिवसात आपलि प्रक्रूति सांभाळणे तितकेच महत्वाचे असते.. हवेत खुप दमटपणा येतो, त्रिदोषांचा विचार करता पावसाळ्यात विशेषतः वातदोषाचा प्रकोप होतो व पित्तदोष साठायला सुरूवात होते,


##.. धातूंचिहि शक्ति कमि झालेलि असते, अग्नि मंद झाल्याने पचनहि मंदावते, व दमटपणामूळे जंतूंचि वाढ होते, शरिराचि प्रतिकारशक्ति कमी होते, म्हणुनच या काळात आहार, आचरण, व आरोग्यरक्षण या त्रिसूत्रिच्या माध्यमातून, ऋतूचर्या ठरवायचि असते..

       ## पाण्याचे प्रदूषण हि समस्या उद्भवते पावसाळ्यात पाण्याचा विपाक आंबट होतो असे आयुर्वेदात सांगितले आहे, जंतूंचि वाढ होते, तेव्हा पिण्याचे पाणी, २० मिनिटे उकळावे, व उकळतांना, त्यात, चंदन, वाळा, अनंतमूळ, वावडिंग, सुंठ, यासारखी द्रव्ये टाकावित पाणि शुद्ध होऊन पचायला हलके होते.


##*. मंद झालेल्या अग्निला प्रज्वलित करण्यासाठि, जेवण तयार करतांना, हिंग, धने, तमालपत्र, ओवा, जिरे, दालचिनि, आले, हळद, आमसूल, अश्या मसाल्यांचा वापर योग्य प्रमाणात करावा, अधून मधून जेवणापूर्वी काळे मिठ व जिरेपुड टाकून लिंबुरस घ्यावे

    .. आले व सुंठ म्हणजे पावसाळ्यात मोठे वरदानच.. अग्निमांद्य दूर करते.. आयुर्वेदात तर आल्याला। ,, विश्वषौधा,, म्हटले आहे, पावसाळ्यात शक्य तिथे आल्याचा वापर करावा, चहात आले घालावे, भाजि, कढि, आमटित घालावे, दूधात सुंठ टाकुन प्यावे,

     प्रवासात आलेपाक चघळावा,..

          घरातला दमटपणा जाण्यासाठि, वेखंड, सुंठ, ओवा, कडूनिंबाची पाने यांचा धूप करावा,, हवा शुद्ध होते

   अभ्यंग स्नान करावे, उटणे वनौषधि असलेले वापरावे चर्मरोग होत नाही, रात्रि झोपतांना कोमट पाण्यात मध टाकून प्यावे व जागरण करू नये..

     नियमितपणे अंगाला तिळाच्या तेलाने मालिश करावी,

....। आहारः

      ।। भजेत्साधारणं सर्वं उष्मणस्तेजनं च यत्।।

 अश्या अन्नाचे सेवन करावे कि जे वात पित्त, कफ या तिघांचे संतूलन करतिल, उष्ण असेल, व अग्निला प्रदिप्त करण्यास सक्षम असेल... या दिवसात अल्प आहार घ्यावा, संद्धाकाळि लवकरच जेवावे, मुगाचि मवु खिचडि, कढि भात, मेतकुट भात, पेज, टोमटो सार, हे पदार्थ ठेवा, नाश्यात, दूध साळ्याच्या लाह्या, तांदळाचि उकड, गरम गरम, नाचणि लापशि, ज्वारिच्या पिठाचा उपमा, राजगिरा चिक्कि, असे घ्यावे,


##*.. भाज्यामद्धेः। दूधि, तोंडली, परवर, दोडकि, घोसाळि, कार्ले, कोहळा, गाजर, भेंडि, करटोलि, व काहि पालेभाज्या , टाकळा, कूरडयी, घोळ, लाल माठ, भारंगि, अश्या खाव्या.. कडधान्येः। मूग, कुळिथ, तूर, मटकि, अंकुरित.. धान्येः.. तांदुळ, ज्वारि, बाजरि, नाचणी, गहू, . शक्यतोवर भाजून घ्यावी.

       फळेः... सफरचंद, अंजिर, पपयि, शहाळे, मोसंबि, संत्रि, नाश्पति, घरचे साजूक तुप वापरावे, ख डिसाखर, सैंधव मिठ, मध, याचा वापर करावा,

..... मसालाः। बडिशेप, आले, हिंग,लवंग, पुदिना, कोथिऔबिर, हिंग, ओवा,..


##*.. दमछाक होणारे व्यायाम न करता, योगासने, लोम, विलोम, प्राणायम, भस्रिका, करावे, पावसाळ्यात सर्दि खोकला, दमा बळावतो, तेव्हा सितोपलादि चूर्ण घ्यावे. ओव्याच्या पुरचुंडीनै छाति शेकावी, रूईच्या पानाने शेकावे, कफ मोकळा होतो, कपभर पाण्यात, गवति चहा, सुंठ, तुळशिचे पाने, काहि पुदिन्याचि पाने, आले हळद, बडिशेप , मिरे लवंग, दालचिनि घालून काढा घ्यावा,.. जुलाब झाल्यास जायफळ उगाळून चाटण घ्यावे

     मेथिचे दाणे पाण्यासोबत गिळावे..


##*.. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, डास निर्मूलनाकरता विविध उपाययोजना अंमलात आणाव्या,

   अश्या प्रकारे काळजि घेतल्यास नक्किच तुमचा.. नेमेचि पावसाळा, आल्हाददायक, सुसह्य, व सुखाचा जाईल.....,, Happy Rainy season.....💐



Tuesday, 27 June 2023

फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडविण्यास 21 ऑगस्टपर्यंत बंदी

 

फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडविण्यास 21 ऑगस्टपर्यंत बंदी


 


            मुंबई, दि. 27 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्टयांच्या दृष्टीकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जित करणारी वस्तू, पतंग आदींमुळे विमानांचे सुरक्षित अवागमन धोक्यात येते. त्यामुळे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजुबाजूच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात उंच उडणारे फटाके उडवणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू सोडणे, पतंग उडवणे आणि लेझर बीम प्रकाशित करणे, फुगे, पॅराग्लायडर्स उडविण्यावर बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 21 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू करण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.


            कोणत्याही विमानाच्या लँडिंग, टेक ऑफ आणि अवागमनामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर केल्याचे लक्षात येताच कोणतीही व्यक्ती जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती देईल. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.


००००

रास्त दरात तूरडाळ

 रास्त दरात तूरडाळ उपलब्धतेसाठीकेंद्र सरकार राखीव साठ्यातून डाळ उपलब्ध करुन देणार


 


            नवी दिल्ली 27 : तूरडाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच आयात केलेली तूरडाळ भारतीय धान्य बाजारात उपलब्ध होईपर्यंत, राष्ट्रीय राखीव साठ्यातून टप्पा-टप्याने आणि लक्षीत तूरडाळ साठा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला आहे. त्यादृष्टीने, डाळ उत्पादित करणाऱ्या पात्र मिलधारकांकडून ऑनलाईन लिलावाद्वारे डाळ घेण्याचे निर्देश ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ग्राहक व्यवहार विभागाने नाफेड (राष्ट्रीय कृषी सहकार विपणन महासंघ) आणि एनसीसीएफ म्हणजे राष्ट्रीय सहकार ग्राहक महासंघाला दिले आहेत. याद्वारे सर्व राज्यांच्या ग्राहकांना तूरडाळ उपलब्ध होणार आहे.


            ग्राहकांना रास्त दरात तूरडाळ उपलब्ध होण्याच्या निकषांवर वितरणाचे मूल्यमापन करुन, त्या आधारे लिलावासाठी तूरडाळीचे प्रमाण आणि नियमितता निश्चित केली जाईल.


            सरकारने 2 जून, 2023 रोजी, अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 लागू करून तूर आणि उडीद डाळीवर साठा मर्यादा लागू केली होती. त्यामुळे अवैध साठेबाजी रोखता येईल आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात डाळी उपलब्ध होऊ शकतील. या आदेशानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत तूर आणि उडीद डाळीसाठी साठा मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.


            घाऊक विक्रेत्यांसाठी प्रत्येक डाळीबाबत वैयक्तिकरित्या लागू असलेली साठवणूक मर्यादा 200 टन आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी 5 टन, मोठ्या साखळी विक्रेत्यांसाठी प्रत्येक किरकोळ दुकानांमधे 5 टन आणि गोदामामधे ती 200 टन आहे. डाळीच्या गिरणी मालकांसाठी उत्पादनाचे शेवटचे 3 महिने किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 25 टक्के, यापैकी जास्त असेल ती मर्यादा असेल. या आदेशाद्वारे विभागाच्या पोर्टलवर (https://fcainfoweb.nic.in/psp) साठ्याची स्थिती घोषित करणे संबंधितांना बंधनकारक केले आहे.


            या आदेशान्वये साठा मर्यादेची अंमलबजावणी आणि पोर्टलवरील साठ्याची जाहीर केलेली माहिती यावर ग्राहक व्यवहार विभाग आणि राज्य सरकार सतत लक्ष ठेवतात.


            या संदर्भात, केन्द्रीय गोदाम महामंडळ (CWC) आणि राज्य गोदाम महामंडळ (SWCs) यांच्या गोदामांमध्ये विविध संस्थांनी ठेवलेला साठा आणि बाजारातील व्यापाऱ्यांनी बँकांकडे तारण ठेवलेला साठा यांची पुन्हा पडताळणी पोर्टलवर घोषित केलेल्या प्रमाणांच्या तुलनेत केली आहे.


            राज्य सरकारे आपापल्या राज्यातील किमतींवर सतत लक्ष ठेवत असून आवश्यक साठा उपलब्ध आहे किंवा नाही याची पडताळणी करत असून, साठा मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल, असेही नमूद केले आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र

 अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र

सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ


            मुंबई, दि. 27 : विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब विचारात घेवून इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.


            मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए), पुणे व पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इ. 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. सन 2023-24 ची इ. 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून प्रथम फेरीचे प्रवेश दिनांक 21 जून 2023 पासून सुरू करण्यात आले आहेत. इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र आणि ईडब्ल्युएस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्युएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तथापि विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


00000


ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महा हब’ साकारण्यात येणार

 ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महा हब’ साकारण्यात येणार

५०० कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 



            मुंबई, दि. 27 : राज्यातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महा हब’ ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात महा हब संदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नानौटिया, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्यासह महा हबचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

L

            श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे - कल्याण या परिसरात मजबूत उद्योजकीय इको - सिस्टीम तयार करण्यासाठी काम करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील स्टार्टअपची संख्या वाढावी, तसेच उद्योजकांना एका छताखाली स्टार्ट - अप आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी पोषक वातावरण मिळावे ही महा हबची प्रमुख संकल्पना आहे. यासाठी उद्योग विभागासह कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यासह इतर विभाग एकत्रितपणे काम करणार आहे.

            महा हबमध्ये प्रामुख्याने उद्योग आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठीचे पोषक वातावरण तयार करण्याचे काम करण्यात येईल. महा - हब हे प्रामुख्याने स्टार्ट - अप सुरु करणाऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी, संशोधन आणि शैक्षणिक संस्था आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी उपयोगी पडणार आहे. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध मान्यता, आवश्यक बैठका, चर्चासत्र, परिषद याचे आयोजन आणि समन्वय या महा हबमार्फत करण्यात येईल.यामध्ये प्रामुख्याने फिनटेक, डेटा सेंटर्स, औषधी कंपन्या, वाहन उद्योग, उत्पादन यांचा समावेश असेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            महा - हब नावीन्यपूर्ण आराखड्यानुसार यामध्ये ‘वन स्टॉप शॉप’ ही प्रमुख कल्पना आहे. यामध्ये विविध संसांधनासह इको सिस्टीम कार्यालये, कार्यालयासाठी आवश्यक जागा, क्षमता बांधणी, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, निधी, कायदेशीर तसेच आर्थिक बाबींमधील निपुणता, कौशल्य बांधणी, सॉफ्ट आणि हार्ड टेक्नॉलॉजीमधील पायाभूत सुविधा, संस्थात्मक भागीदारी यावर भर असणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री, कौशल्य विकास मंत्री, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव या समितीचे सदस्य असतील. माहिती व तंत्रज्ञानचे नोडल डिपार्टमेण्ट म्हणून काम पाहणार आहेत.




--

Featured post

Lakshvedhi