Sunday, 25 June 2023

आला पाऊस, भिजले अंगण..........

 


पर्यावरण दिवस कधीही असो पणश्री समर्थ रामदास स्वामी लिखित 'बाग' प्रकरण अवश्य वाचावे लागेल.

 पर्यावरण दिवस कधीही असो पण आपले ऋषी मुनी नित्यच पर्यावरणावर प्रेम करणारे व त्याचे जतन करणारे आहेत उदाहरण घ्यायचे तर

श्री समर्थ रामदास स्वामी लिखित 'बाग' प्रकरण अवश्य वाचावे लागेल.

         या प्रकरणात समर्थांनी तब्बल २९५ झाडांची नावे सांगितली आहेत. एका संताचा वनस्पती शास्त्राचा अभ्यास आजही आपल्याला थक्क करून सोडणारा आहे.

कल्याणस्वामी व इतर शिष्यांच्या साहाय्याने त्यांनी अनेक मठात अश्या बाग जतन केल्या असाव्यात.  


प्रसंग निघाला स्वभावें । 

बागेमध्ये काय लावावे ।

म्हणूनि घेतली नावे । 

काही एक ॥


कांटी रामकांटी फुलेकांटी । 

नेपती सहमुळी कारमाटी ।

सावी चीलारी सागरगोटी । 

हिंवर खैर खरमाटी ॥


पांढरफळी करवंदी तरटी ।

आळवी तोरणी चिंचोरटी ।

सिकेकाई वाकेरी घोंटी । 

करंज विळस समुद्रशोक ॥


अव्हाटी बोराटी हिंगणबेटी ।

विकळी टांकळी वाघांटी ।

शेर निवडुंग कारवेटी । 

कांटेशेवरी पांगेरे ॥


निरगुडी येरंड शेवरी । 

कासवेद कासळी पेरारी ।

तरवड उन्हाळ्या कुसरी । 

शिबी तिव्हा अंबोटी ॥


कांतुती काचकुहिरी सराटी ।

उतरणी गुळवेल चित्रकुटी ।

कडोची काटली गोमाटी । 

घोळ घुगरी विरभोटी ॥


भोंस बरु वाळा मोळा । 

ऊंस कास देवनळा ।

लव्हे पानि पारोस पिंपळा । 

गुंज कोळसरे देवपाळा ॥


वेत कळकी चिवारी । 

ताड माड पायरी पिंपरी ।

उंबरी अंबरी गंभिरी । 

अडुळसा मोही भोपळी ॥


साव सिसवे सिरस कुड । 

कोळ कुंभा धावडा मोड ।

काळकुडा भुता बोकडा । 

कुरंडी हिरंडी लोखंडी ॥


विहाळ गिळी टेंभुरणी । 

अवीट एणके सोरकिन्ही ।

घोळी दालचिनी । 

कबाबचीनी जे ॥


निंबारे गोडे निंब । 

नाना महावृक्ष तळंब ।

गोरक्षचिंच लातंब । 

परोपरीची ॥


गोधनी शेलवंटी भोंकरी । 

मोहो बिब्बा रायबोरी ।

बेल फणस जांब भरी । 

चिंच अंबसोल अंबाडे ॥


चांफे चंदन रातांजन । 

पतंग मैलागर कांचन ।

पोपये खलेले खपान । 

वट पिंपळ उंबर ॥


आंबे निंबे साखरनिंबे । 

रेकण्या खरजूरी तूंते दाळिंबे ।

तुरडे विडे नारिंगे । 

शेवे कविट अंजीर सीताफळे ॥


जांब अननस देवदार । 

सुरमे खासे मंदार ।

पांढरे जंगली लाल ।

पुरे उद्वे चित्रकी ॥


केळी नारळी पोफळी । 

आवळी रायआवळी जांभळी ।

कुणकी गुगुळी सालफळी ।

वेलफळी माहाळुंगी ॥


भुईचांफे नागचांफे मोगरे ।

पारिजातक बटमोगरे ।

शंखासुर काळे मोगरे ।

सोनतरवड सोनफुले ॥


जाई सखजाई पीतजाई । 

त्रिविध शेवंती मालती जुई ।

पाडळी बकुळी अबई । 

नेवाळी केतकी चमेली ॥


सुर्यकमळिणी चंद्रकमळिणी ।

जास्वनी हनुमंतजास्वनी ।

केशर कुसुंबी कमळिणी । 

बहुरंग निळायाति ॥


तुळसी काळी त्रिसेंदरी । 

त्रिसिंगी रायचचु रायपेटारी ।

गुलखत निगुलचिन कनेरी ।

नानाविध मखमाली ॥


काळा वाळा मरुवा नाना । 

कचोरे गवले दवणा ।

पाच राजगिरे नाना । 

हळदी करडी गुलटोप ॥


वांगी चाकवत मेथी पोकळा ।

माठ शेपु खोळ बसळा ।

चवळी चुका वेल सबळा ।

अंबुजिरे मोहरी ॥


कांदे मोळकांदे माईणमुळे ।

लसूण आलें रताळें ।

कांचन कारिजे माठमुळे । 

सुरण गाजरें ॥


भोंपळे नाना प्रकारचे । 

लहानथोर पत्रवेलीचे ।

गळ्याचे पेढ्या सांगडीचे । 

वक्र वर्तुळ लंबायमान ॥


गंगाफळ काशीफळे क्षीरसागर ।

सुगरवे सिंगाडे देवडांगर ।

दुधे गंगारूढे प्रकार । 

किनऱ्या रुद्रविण्याचे ॥


वाळक्या कांकड्या चिवड्या ।

कोहाळे सेंदण्या सेंदाड्या ।

खरबूजा तरबुजा कलंगड्या ।

द्राक्षी मिरवेली पानवेली ॥


दोडक्या पारोशा पडवळ्या ।

चवळ्या कारल्या तोंडल्या ।

घेवड्या कुही-या खरमुळ्या ।

वेली अळूचमकोरे ॥


अठराभार वनस्पती । 

नामे सांगावी किती ।

अल्प बोलिलो श्रोतीं । 

क्षमा केली पाहिजे ॥

दादर प्राणी संग्रहालय

 New Aqua zoo at Dadar absolutely fascinating and exciting. Do visit it's amazing and Paisa vasool...👍🏻👍🏻

मुलांनाअवश्यदाखव

आला पाऊस


 

पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे.*

 *पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे.* 


निरोगी आरोग्यासाठी झोप का महत्वाची आहे ते पाहुया. यासाठी झोपलेल्या अवस्थेत शरीरात कोणती कार्ये होत असतात याची माहिती घेऊया.


१. झोपेत शरीरातील ऊर्जेचे संवर्धन होते. या अवस्थेत शरीराच्या हालचाली अत्यल्प असल्यामुळे ऊर्जेची बचत होते. अभ्यासक सांगतात ८ तासाच्या झोपेमुळे ३५% टक्के ऊर्जेची बचत होते. यामुळेच शांत झोपून उठल्यावर आपण ताजेतवाने होतो.


२. दिवसभरात ग्रहण केलेल्या माहिती पैकी उपयुक्त माहिती दीर्घकाळासाठी स्मरणात ठेवण्यासाठी ती योग्य ठिकाणी साठवली जाते आणि अनावश्यक माहितीचा कचरा मेंदूतून काढून टाकला जातो. त्यामुळे झोपून उठल्यावर मेंदू तरतरीत आणि ग्रहणक्षम बनतो.


३. दिवसभरात पेशींची मोडतोड किंवा झीज होते. पेशींच्या दुरुस्तीचे आणि पुनरुज्जीवनाचे कार्य झोपेतच होते. त्यामुळेच झोप पूर्ण झाली असेल तर शरीर पुढील दिवसासाठी सक्षम होते.


४. रोगप्रतिकारक शक्ती बळकट बनविणे, इन्सुलिनचा योग्य वापर करणे आणि हृदयावरचा भार कमी करण्याचे कार्यही झोपेतच होते.


५. झोपेत आपण काही खात नाही म्हणूनच भुकेचे जे दोन हार्मोन्स आहेत ghrelin आणि leptin यांचे नियंत्रण योग्य प्रकारे होते. त्यामुळे वजनाचे संतुलन राखण्यास मदत होते.


तर मित्रहो किमान सहा ते आठ तास शांत झोप घेण्याचा प्रयत्न अवश्य करा.


 *माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका 🙏🏻*


डॉ. प्रमोद ढेरे,




डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे*

 पाण्याबद्दल एक माहितीचा लेख वाचनात आला. तो पाठवतो आहे.

*डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे*

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 


1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते.माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 


2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते. *एक मृत साठ्याचे पाणी*

*दुसरे जिवंत साठ्याचे पाणी* 


       मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते.

       जेेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते.जे कि एकदा उपसले कि संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 


       तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते. 


3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्याठी एक वर्षाचा कालावधी लागतो.म्हणजेच दहा फुटावर जाण्याठी दहा वर्ष लागतात. 


4) एक झाड एका दिवसाला ५० फुटावर दहा लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. कारण झाडं हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात.म्हणून झाडं हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, 


5) एक लिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब,चिंच,जांबळ,अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील.म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 


6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 


      एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 


      *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. 


         आपण एक बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'. 


           कारण आपली नियत ही धुर्त असते, डोंगर संपुष्टात आणण्याची,डोंगारावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची म्हणून पाणी तरी कुठून येणार? 


6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानव निर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही.खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 


           हवा ही ऊर्जा आहे.

           पाणी हे अमृत आहे

          तर माती ही जननी आहे.

        तर झाडं हे जीवनदायी आहेत. 


झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.

         

7) झाडांचं मूल्य समजून घ्या... आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर,डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या.... 


       या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. 


          झाडं मानसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. 


8) एक सदैव लक्षात असु द्या. झाडांची पाणी पाठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या 

वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.


🌳🌴🪴🍀🌿🌱🌳🙏 Copy paste Kara pan kiman 10 lokana pathava

*वजन कमी करण्यासाठी 'या' तीन पांढऱ्या पदार्थांपासून दूर रहा.*

 *वजन कमी करण्यासाठी 'या' तीन पांढऱ्या पदार्थांपासून दूर रहा.* 


आपल्यापैकी अनेकांना वजन कमी करण फार कठीण काम वाटतं. कारण वजन कमी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतील याची अनेकांना कल्पनाही करावीशी वाटत नाही.


अनेकजण तर या भीतीनेच वजन कमी करत नाहीत. वजन कमी करण्यासाठी बहुतेकदा जंक फूड बंद करायला सांगतात. वजन वाढू नये म्हणून, लोक प्रथम कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करतात. तर अनेक लोक लहान चुकांमुळे वजन वाढवतात आणि नंतर ते कमी करू शकत नाहीत.


जर तुम्हाला वजनाची काळजी वाटत असेल, तर पांढऱ्या पदार्थांपासून तुम्ही अंतर ठेवलं पाहिजे. कारण या पांढऱ्या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. सर्वच पांढऱ्या खाद्यपदार्थांवर प्रक्रिया केली जात नाही. पण, काही पदार्थ आहेत की जे टाळल्याने तुमचं वजन झपाट्याने कमी होईल.


*1. व्हाईट ब्रेड* :


वजन कमी करण्यासाठी, तुम्ही सर्वात आधी व्हाईट ब्रेड सोडणं आवश्यक आहे. कारण हा ब्रेड वजन वाढवण्याचे काम करतो. तुम्ही अनेकदा चहाबरोबर ब्रेड खाता. नाश्त्यात ब्रेडबरोबर जाम खा. यामुळे तुमचे पोट भरू शकते, पण वजनही वेगाने वाढू शकते. संशोधनात असं दिसून आलंय की व्हाईट ब्रेडचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते.


*2. व्हाईट साखर :* 


प्रक्रिया केलेली व्हाईट साखर टाळल्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहू शकते. व्हाईट साखर वजन वाढवण्याचे काम करते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. जेव्हा लोक वजन कमी करण्याचा विचार करतात तेव्हा सर्वात आधी गोड पदार्थ बंद करण्याचा सल्ला देतात. विशेषत: साखरेशी संबंधित पदार्थ. व्हाईट साखरेचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढण्याचा धोका असतो. खराब कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोकाही वाढतो. जर तुम्हाला साखर खायची असेल तर तुम्ही ब्राऊन शुगर खाऊ शकता. पांढऱ्या प्रक्रिया केलेल्या साखरेऐवजी तुम्ही साखर कँडी वापरू शकता.


*3. व्हाईट राईस :* 


व्हाईट ब्रेड आणि साखरेप्रमाणेच व्हाईट राईसदेखील खाद्यपदार्थांच्या श्रेणीत येतो. बरेच लोक व्हाईट राईस खातात. व्हाईट राईस हा वाईट आहार नसला तरी कॅलरी आणि कर्बोदकांशिवाय त्यात विशेष पोषण नसते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi