Sunday, 25 June 2023

पर्यावरण दिवस कधीही असो पणश्री समर्थ रामदास स्वामी लिखित 'बाग' प्रकरण अवश्य वाचावे लागेल.

 पर्यावरण दिवस कधीही असो पण आपले ऋषी मुनी नित्यच पर्यावरणावर प्रेम करणारे व त्याचे जतन करणारे आहेत उदाहरण घ्यायचे तर

श्री समर्थ रामदास स्वामी लिखित 'बाग' प्रकरण अवश्य वाचावे लागेल.

         या प्रकरणात समर्थांनी तब्बल २९५ झाडांची नावे सांगितली आहेत. एका संताचा वनस्पती शास्त्राचा अभ्यास आजही आपल्याला थक्क करून सोडणारा आहे.

कल्याणस्वामी व इतर शिष्यांच्या साहाय्याने त्यांनी अनेक मठात अश्या बाग जतन केल्या असाव्यात.  


प्रसंग निघाला स्वभावें । 

बागेमध्ये काय लावावे ।

म्हणूनि घेतली नावे । 

काही एक ॥


कांटी रामकांटी फुलेकांटी । 

नेपती सहमुळी कारमाटी ।

सावी चीलारी सागरगोटी । 

हिंवर खैर खरमाटी ॥


पांढरफळी करवंदी तरटी ।

आळवी तोरणी चिंचोरटी ।

सिकेकाई वाकेरी घोंटी । 

करंज विळस समुद्रशोक ॥


अव्हाटी बोराटी हिंगणबेटी ।

विकळी टांकळी वाघांटी ।

शेर निवडुंग कारवेटी । 

कांटेशेवरी पांगेरे ॥


निरगुडी येरंड शेवरी । 

कासवेद कासळी पेरारी ।

तरवड उन्हाळ्या कुसरी । 

शिबी तिव्हा अंबोटी ॥


कांतुती काचकुहिरी सराटी ।

उतरणी गुळवेल चित्रकुटी ।

कडोची काटली गोमाटी । 

घोळ घुगरी विरभोटी ॥


भोंस बरु वाळा मोळा । 

ऊंस कास देवनळा ।

लव्हे पानि पारोस पिंपळा । 

गुंज कोळसरे देवपाळा ॥


वेत कळकी चिवारी । 

ताड माड पायरी पिंपरी ।

उंबरी अंबरी गंभिरी । 

अडुळसा मोही भोपळी ॥


साव सिसवे सिरस कुड । 

कोळ कुंभा धावडा मोड ।

काळकुडा भुता बोकडा । 

कुरंडी हिरंडी लोखंडी ॥


विहाळ गिळी टेंभुरणी । 

अवीट एणके सोरकिन्ही ।

घोळी दालचिनी । 

कबाबचीनी जे ॥


निंबारे गोडे निंब । 

नाना महावृक्ष तळंब ।

गोरक्षचिंच लातंब । 

परोपरीची ॥


गोधनी शेलवंटी भोंकरी । 

मोहो बिब्बा रायबोरी ।

बेल फणस जांब भरी । 

चिंच अंबसोल अंबाडे ॥


चांफे चंदन रातांजन । 

पतंग मैलागर कांचन ।

पोपये खलेले खपान । 

वट पिंपळ उंबर ॥


आंबे निंबे साखरनिंबे । 

रेकण्या खरजूरी तूंते दाळिंबे ।

तुरडे विडे नारिंगे । 

शेवे कविट अंजीर सीताफळे ॥


जांब अननस देवदार । 

सुरमे खासे मंदार ।

पांढरे जंगली लाल ।

पुरे उद्वे चित्रकी ॥


केळी नारळी पोफळी । 

आवळी रायआवळी जांभळी ।

कुणकी गुगुळी सालफळी ।

वेलफळी माहाळुंगी ॥


भुईचांफे नागचांफे मोगरे ।

पारिजातक बटमोगरे ।

शंखासुर काळे मोगरे ।

सोनतरवड सोनफुले ॥


जाई सखजाई पीतजाई । 

त्रिविध शेवंती मालती जुई ।

पाडळी बकुळी अबई । 

नेवाळी केतकी चमेली ॥


सुर्यकमळिणी चंद्रकमळिणी ।

जास्वनी हनुमंतजास्वनी ।

केशर कुसुंबी कमळिणी । 

बहुरंग निळायाति ॥


तुळसी काळी त्रिसेंदरी । 

त्रिसिंगी रायचचु रायपेटारी ।

गुलखत निगुलचिन कनेरी ।

नानाविध मखमाली ॥


काळा वाळा मरुवा नाना । 

कचोरे गवले दवणा ।

पाच राजगिरे नाना । 

हळदी करडी गुलटोप ॥


वांगी चाकवत मेथी पोकळा ।

माठ शेपु खोळ बसळा ।

चवळी चुका वेल सबळा ।

अंबुजिरे मोहरी ॥


कांदे मोळकांदे माईणमुळे ।

लसूण आलें रताळें ।

कांचन कारिजे माठमुळे । 

सुरण गाजरें ॥


भोंपळे नाना प्रकारचे । 

लहानथोर पत्रवेलीचे ।

गळ्याचे पेढ्या सांगडीचे । 

वक्र वर्तुळ लंबायमान ॥


गंगाफळ काशीफळे क्षीरसागर ।

सुगरवे सिंगाडे देवडांगर ।

दुधे गंगारूढे प्रकार । 

किनऱ्या रुद्रविण्याचे ॥


वाळक्या कांकड्या चिवड्या ।

कोहाळे सेंदण्या सेंदाड्या ।

खरबूजा तरबुजा कलंगड्या ।

द्राक्षी मिरवेली पानवेली ॥


दोडक्या पारोशा पडवळ्या ।

चवळ्या कारल्या तोंडल्या ।

घेवड्या कुही-या खरमुळ्या ।

वेली अळूचमकोरे ॥


अठराभार वनस्पती । 

नामे सांगावी किती ।

अल्प बोलिलो श्रोतीं । 

क्षमा केली पाहिजे ॥

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi