Sunday, 25 June 2023

मला जाऊ द्या ना वारी,

 घरातली बाई जेव्हा वारीला जायचा विचार घरात बोलून दाखवते ....खूपच छान ...नक्की वाचा ...!!!

*वारी*

मी नुसतं घरात म्हटलं.. 

मी पंढरीच्या वारीला जाणार.. 

पांडुरंगा सोबत 

चार गुजगोष्टी करणार.. 

दुःखाचं वाळवंट माझं

इंद्रायणीत भिजवणार.. 

सुखाच्या रिंगणात 

भान हरपून फिरणार.. 

तर केवढा कांगावा

घरातल्या विठोबाने केला ..

कंबरेवर हात घेत... 

मुलांचं काय..? 

माझा डबा कोण देणार..? 

आईशी बोललीस..? 

काही जबाबदारीची जाणीव..? 

नुसता माझ्या नावाने 

मुक्त घोष केला... 

मी नुसतं घरात म्हटलं.. 

मी पंढरीच्या वारीला जाणार.. 

सासूबाईंनी तर पार 

'आवडी' च मौनचं घेतलं..

टाळ चिपळ्यांच्या आवाजानं

अवघं स्वयंपाकघर दुमदुमलेलं.. 

का तर मी नुसतं घरात म्हटलं.. 

मी पंढरीच्या वारीला जाणार.. 

छोटी मुक्ताई 

वाट अडवून उभी राहिली.. 

मोठ्या जनीने 

व्याकुळ नजर दिली.. 

'आई' च्या टाहोचा 

एकच गजर झाला.. 

कारण मी नुसतं घरात म्हटलं.. 

मी पंढरीच्या वारीला जाणार.. 

दारात तुळस थरथरली 

अगं पाणी कोण घालणार... 

कपडे वाळत घालताना 

मन कोण मोकळं करणार.. 

रांगोळी घालताना 

नवी गणितं कोण मांडणार.. 

हो तिने ही ऐकलं होतं.. 

मी नुसतं घरात म्हटलं .. 

मी पंढरीच्या वारीला जाणार.. 

ती दारातूनच म्हणाली

तु थांब इथचं.. नको करू वारी.. 

हिच तुझी पंढरी.. 

भरला संसार घरी, 

पांडुरंगा हृदयी.. 

जन्मोजन्मी सलगी माझी.. 

कळवीन सारी त्याला,

सुख दुःख तुझी.. 

विठू राया उभ्या

जगाची माऊली 

तुझ्या रुपानं त्याची

घरी वावरते सावली... 

तू नुसतं आज म्हणालीस .. 

तू पंढरीच्या वारीला जाणार.. 

अगं माऊली विना हा 

गाभारा मात्र रिता होणार .. 

*(प्राची निलेश मुळीक, दहिसर, मुंबई यांची आहे ही कविता)*

मराठा मंदिर संस्थेला गौरवशाली परंपरा

 मराठा मंदिर संस्थेला गौरवशाली परंपरा

मराठा मंदिर संस्थेने उदात्त हेतूने केमराठा मंदिर संस्थेला गौरवशाली परंपरा

मराठा मंदिर संस्थेने उदात्त हेतूने केलेले कार्य प्रेरणा देणारे

                                                   -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि.24: स्वातंत्र्यपूर्व काळात  उदात्त हेतूने मराठा मंदिर ही संस्था सुरू झाली. या संस्थेतील सदस्यांची एकनिष्टता,कामातील सातत्य आणि समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व यामुळे मराठा मंदिर सारख्या संस्थेने  विश्वास संपादन करून महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व समृद्ध केले आहे. मराठा मंदिर  गौरवशाली इतिहास असलेली संस्था आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

            मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मराठा मंदिरचे अध्यक्ष  तथा ज्येष्ठ नेते शरद पवार, उच्च  तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,उद्योगमंत्री उदय सामंत, मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख,संजय राणे,शंकर पाल देसाई, मराठा मंदिरच्या सरचिटणीस पुष्पा साळुंखे यासह मराठा मंदिर या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  मराठा मंदिरचे पहिले अध्यक्ष सर जिवाजीराव महाराज शिंदे आणि आद्य संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांच्या सह अनेक सदस्यांनी आपल्या कार्यातून उभी राहिलेली ही संस्था आज बहरली आहे. या संस्थेच्या विकासासाठी सर्वोतोपरी शासनाकडून सहकार्य केले जाईल. आपण स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. अशा या काळात आपल्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून सांगणाऱ्यास्वातंत्र्याचा अर्थ शिकवणाऱ्या संस्थांची गरज होती. ती गरज मराठा मंदिर सारख्या संस्थांनी पूर्ण केली. आपल्या समाजमनाची मशागत केली. समाजाचा विश्वास संपादन करूनआपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. यातील मराठा मंदिर सारख्या संस्थांचे योगदान मोठे आहे. या संस्थांनी महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व समृद्ध केले आहे असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमराठा मंदिरने मुंबईसहसोलापूरसांगलीरत्नागिरी अशा विविध प्रांतात आपल्या शैक्षणिक कार्याचे जाळे उभे केले आहे. मराठा मंदिर च्या वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांचे   अभिनंदन करतो. तसेच मराठा मंदिरची ही दिमाखदार शैक्षणिक वाटचाल यापुढेही अशीच सुरु राहीलहा विश्वास आहे. मराठा मंदिर च्या अमृत महोत्सवी वाटचालीसआणि या निमित्ताने आयोजित सर्व उपक्रमांना मनापासून शुभेच्छा असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

मराठा मंदिरच्या माध्यमातून परदेशी शिक्षण घेणाऱ्या

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करणार :मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार

            मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले,  संस्थेत निःस्वार्थी काम करणाऱ्या पदाधिकारी यांच्यामुळेच संस्था ही मोठी होते. मराठा मंदिरचे पहिले अध्यक्ष सर जिवाजीराव महाराज शिंदे आणि आद्य संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांचे कार्य मोलाचे आहे. रत्नागिरी येथे नव्याने सुरू करण्यात येणारे सागरी संशोधन महाविद्यालय यासाठी लागणारी परवानगी तसेच संस्थेच्या इतर काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी शासनाचे सहकार्य आवश्यक आहे. मराठा मंदिर या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी परदेश शिष्यवृत्ती सुरू करणार असून यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्याची जबाबदारी मी घेत आहे. या संस्थेची वाटचाल अशा प्रकारे पुढे चालू राहण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन असेही श्री.पवार म्हणाले.

समाजाच्या विविध पैलूना स्पर्श करणारी मराठा मंदिर संस्था

: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की,कोणतीही संस्था अनेक विषय घेवून काम करत असूनही या संस्थेचे काम उत्कृष्टरित्या सुरू आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मला माझे शालेय शिक्षण या संस्थेतून घेता आले याचा मला अभिमान आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेतांना स्कॉलरशिप देखील मराठा मंदिर कडून मला मिळाली. मला घडवण्यात या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६३ हजार जणांना उद्योगासाठी कर्ज वितरण करण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार नोकऱ्या देण्याचे घोषित केले आणि त्या दृष्टीने काम देखील सुरू झाले आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत असेही ते याप्रसंगी म्हणाले.

मराठा मंदिरने मला घडवले: उद्योगमंत्री उदय सामंत

            उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले,या संस्थेच्या माध्यमातून मी शालेय शिक्षण घेतले. राजकीय विद्यापीठ देखील याच व्यासपीठावरून मार्गदर्शन मिळाले. वयाच्या २८ व्या वर्षी मी विधानसभेत निवडून गेलो. मराठा मंदिरच्या माध्यमांतून अनेक विद्यार्थी घडले. मराठा मंदिर मुळे आज मी या क्षेत्रात आहे आणि याचा मला अभिमान आहे. ग्रामीण भागातील मराठा मंदिर अनेक उत्कृष्ट विद्यार्थी घडवत आहे खरोखरच खूपच अभिमनाची गोष्ट आहे.    

            या कार्यक्रमाप्रसंगी मराठा मंदिर रत्नागिरी हायस्कूल च्या राखेतून उडाला मोर या राज्यस्तरीय बालनाट्य पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक संतोष गारडीलेखक डॉक्टर संतोष साळुंखे आणि विद्यार्थी व कलाकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मराठा मंदिरच्या स्मरणिकेचे  व अस्मिता महाराष्ट्राच्या ई-बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कै.शशीकांत पवार यांनी केलेल्या संस्थेच्या कार्याबद्दल त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुलभा शशिकांत पवार यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

*****लेले कार्य प्रेरणा देणारे

                                                   - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि.24: स्वातंत्र्यपूर्व काळात उदात्त हेतूने मराठा मंदिर ही संस्था सुरू झाली. या संस्थेतील सदस्यांची एकनिष्टता,कामातील सातत्य आणि समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व यामुळे मराठा मंदिर सारख्या संस्थेने विश्वास संपादन करून महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व समृद्ध केले आहे. मराठा मंदिर गौरवशाली इतिहास असलेली संस्था आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

            मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,उद्योगमंत्री उदय सामंत, मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख,संजय राणे,शंकर पाल देसाई, मराठा मंदिरच्या सरचिटणीस पुष्पा साळुंखे यासह मराठा मंदिर या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा मंदिरचे पहिले अध्यक्ष सर जिवाजीराव महाराज शिंदे आणि आद्य संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांच्या सह अनेक सदस्यांनी आपल्या कार्यातून उभी राहिलेली ही संस्था आज बहरली आहे. या संस्थेच्या विकासासाठी सर्वोतोपरी शासनाकडून सहकार्य केले जाईल. आपण स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. अशा या काळात आपल्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून सांगणाऱ्या, स्वातंत्र्याचा अर्थ शिकवणाऱ्या संस्थांची गरज होती. ती गरज मराठा मंदिर सारख्या संस्थांनी पूर्ण केली. आपल्या समाजमनाची मशागत केली. समाजाचा विश्वास संपादन करून, आपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. यातील मराठा मंदिर सारख्या संस्थांचे योगदान मोठे आहे. या संस्थांनी महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व समृद्ध केले आहे असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा मंदिरने मुंबईसह, सोलापूर, सांगली, रत्नागिरी अशा विविध प्रांतात आपल्या शैक्षणिक कार्याचे जाळे उभे केले आहे. मराठा मंदिर च्या वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो. तसेच मराठा मंदिरची ही दिमाखदार शैक्षणिक वाटचाल यापुढेही अशीच सुरु राहील, हा विश्वास आहे. मराठा मंदिर च्या अमृत महोत्सवी वाटचालीस, आणि या निमित्ताने आयोजित सर्व उपक्रमांना मनापासून शुभेच्छा असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

मराठा मंदिरच्या माध्यमातून परदेशी शिक्षण घेणाऱ्या

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करणार :मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार

        मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, संस्थेत निःस्वार्थी काम करणाऱ्या पदाधिकारी यांच्यामुळेच संस्था ही मोठी होते. मराठा मंदिरचे पहिले अध्यक्ष सर जिवाजीराव महाराज शिंदे आणि आद्य संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांचे कार्य मोलाचे आहे. रत्नागिरी येथे नव्याने सुरू करण्यात येणारे सागरी संशोधन महाविद्यालय यासाठी लागणारी परवानगी तसेच संस्थेच्या इतर काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी शासनाचे सहकार्य आवश्यक आहे. मराठा मंदिर या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी परदेश शिष्यवृत्ती सुरू करणार असून यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्याची जबाबदारी मी घेत आहे. या संस्थेची वाटचाल अशा प्रकारे पुढे चालू राहण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन असेही श्री.पवार म्हणाले.

समाजाच्या विविध पैलूना स्पर्श करणारी मराठा मंदिर संस्था

: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की,कोणतीही संस्था अनेक विषय घेवून काम करत असूनही या संस्थेचे काम उत्कृष्टरित्या सुरू आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मला माझे शालेय शिक्षण या संस्थेतून घेता आले याचा मला अभिमान आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेतांना स्कॉलरशिप देखील मराठा मंदिर कडून मला मिळाली. मला घडवण्यात या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६३ हजार जणांना उद्योगासाठी कर्ज वितरण करण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार नोकऱ्या देण्याचे घोषित केले आणि त्या दृष्टीने काम देखील सुरू झाले आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत असेही ते याप्रसंगी म्हणाले.

मराठा मंदिरने मला घडवले: उद्योगमंत्री उदय सामंत

            उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले,या संस्थेच्या माध्यमातून मी शालेय शिक्षण घेतले. राजकीय विद्यापीठ देखील याच व्यासपीठावरून मार्गदर्शन मिळाले. वयाच्या २८ व्या वर्षी मी विधानसभेत निवडून गेलो. मराठा मंदिरच्या माध्यमांतून अनेक विद्यार्थी घडले. मराठा मंदिर मुळे आज मी या क्षेत्रात आहे आणि याचा मला अभिमान आहे. ग्रामीण भागातील मराठा मंदिर अनेक उत्कृष्ट विद्यार्थी घडवत आहे खरोखरच खूपच अभिमनाची गोष्ट आहे.    

            या कार्यक्रमाप्रसंगी मराठा मंदिर रत्नागिरी हायस्कूल च्या “राखेतून उडाला मोर” या राज्यस्तरीय बालनाट्य पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक संतोष गारडी, लेखक डॉक्टर संतोष साळुंखे आणि विद्यार्थी व कलाकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मराठा मंदिरच्या स्मरणिकेचे व अस्मिता महाराष्ट्राच्या ई-बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कै.शशीकांत पवार यांनी केलेल्या संस्थेच्या कार्याबद्दल त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुलभा शशिकांत पवार यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

*****

Saturday, 24 June 2023

माहिती असायला च हवी

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठीअभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा

 भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठीअभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा

- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबई, दि. २३ : भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व अभियांत्रिकी संस्थांनी पुढाकार घेऊन या धोरणाच्या अंमलबजावणीस अधिक गती द्यावी, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा, मुंबई येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी एक दिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी,माजी कुलगुरू व सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, उद्योजक भरत अमलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वायत्त अभियांत्रिकी संस्था अभ्यासक्रमातील बदल अंमलात आणण्यासाठी सक्षम असतात. त्यांना संलग्न संस्थेप्रमाणे विद्यापीठावर अवलंबून रहावे लागत नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त अभियांत्रिकी संस्थामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करून त्या अनुभवाच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षापासून हे धोरण इतरही ज्ञानशाखेच्या महाविद्यालयांमध्ये राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे देशभरात अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्याला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींची अमंलबजावणी करून पुन्हा आपले स्थान अधिक भक्कम करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

            या धोरणानुसार अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील गरजा आणि रोजगारांच्या संधी, नवीन संशोधनाचा अभ्यास करून विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्ययन, शाखांची रचना, संधी, समानता, समावेशकता आणि नावीन्यपूर्ण शिक्षण, मातृभाषेतील शिक्षण, विद्यार्थ्यांना कसे सहज उपलब्ध होईल यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय यांनी पुढाकार घेतला आहे.

            त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकी बरोबरच बहुशाखीय अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, केमिकल, कला, विज्ञान, भारतीय ज्ञानसंपदा, असे इतर शाखेचे विषय सुद्धा घेऊ शकतील. तसेच शिक्षणाबरोबर त्या त्या क्षेत्रातील प्रशिक्षण सुद्धा घेता येईल. हे या शैक्षणिक धोरणाचे महत्त्पपूर्ण वैशिष्ट्ये आहे.

            या धोरणाच्या अमंलबजावणीस अधिक गती देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

Tu हसत रहा , सखी शेजारणी

कल्पनेच्या पलीकडे जाऊन केली हि *शॉर्ट फिल्म*

 कल्पनेच्या पलीकडे जाऊन केली हि *शॉर्ट फिल्म*

आपणास *खरा पांडूरंग* 

तर दाखवतेच तसेच 

*शॉर्ट फिल्म*असून 

 *किती मोठा अर्थ सांगते*

*या शॉर्ट फिल्म च्या सर्व टिम ला सलाम*🙏🙏🙏🙏🙏🙏

पहिला नशा पेहेला खुमा

 *"भाव अत्तराचे आज पार कोसळले,* 

*थेंब पावसाचे जेव्हा मातीत मिसळले".*    

*मिजास अत्तरांची क्षणात विरून गेली..* 

*पहिलीच सर जेव्हा,* 

*मातीत जिरून गेली..!!!* 

*पहिल्या पावसाच्या शुभेच्छा !*

⛈️🌧️🌨️💦

Featured post

Lakshvedhi