Friday, 23 June 2023

कफनाशक ज्येष्ठमध*

 *👉कफनाशक ज्येष्ठमध*


*१. गुणधर्म*


१. स्निग्ध, मधुर व थंडावा देते.

२. त्रिदोषांचे शमन करते.

४. त्वचेचा वर्ण सुधारतो.

३. दृष्टी व आवाज सुधारते.

५. केशवर्धक.

६. सूजनाशक.

८. कफनि:सारक.

७. पित्तशामक

९. रक्तशुद्धीकर

१०. शुक्रवर्धक इ.


*२. उपयोग*


१. घशातील सूज, कफ / खोकला व क्षय यांवर उपयोगी.


२. श्वासमार्गातील व आतड्यातील सूज, व्रण / अल्सर व जळजळ यावर उपयोगी.


३. कोणत्याही कारणाने आलेली अशक्तता कमी होते - शक्ती येते.


४. कंड, खरूज, सूज इ. त्वचाविकारात उपयोगी.


*३. वापरण्याची पद्धती :*


१. चाटण : अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण + एक चमचा मध = मुख्यतः घशासाठी व कफासाठी.


२. गुळण्या : अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण + अर्धा कप पाणी उकळवणे - आवाजासाठी.


३. उकळवून गाळून पिणे : वरील क्र. २ मधील पाणी रोज ३ वेळा पिणे - कफासाठी.


डॉ. प्रमोद ढेरे


केंद्र, राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची समन्वयातून अंमलबजावणी करावी

 केंद्र, राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची समन्वयातून अंमलबजावणी करावी


- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया


            मुंबई, दि. 23 : केंद्राची आयुष्यमान भारत योजना व राज्य शासनाची महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना नागरिकांचा आरोग्यावरील खर्च उचलतात. राज्यातील नागरिकांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची समन्वयातून अंमलबजावणी करावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिल्या.


            सह्याद्री अतिथिगृहात आज आयुष्यमान भारत योजनेविषयी आढावा बैठक झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपालकृष्णन, उपसंचालक रोहित झा, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव श्री. सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करण्याच्या सूचना करीत आरोग्य मंत्री श्री मांडविया म्हणाले, केंद्राची व राज्याची योजना समन्वयाने राबवल्यास केंद्र शासनाचा 60 टक्के निधी मिळतो. राज्याची बचत होते. त्यासाठी भारत सरकार आयुष्यमान केंद्र योजनेला व्यापक स्वरूप देत आहे. समन्वित योजनेतून लाभार्थ्याला त्याच्या आजारावर किती पैसा खर्च केला, याचा संदेश जाणार आहे. तसेच रुग्णालयांना रक्कमही लवकर मिळणार आहे. राज्यात दहा कोटी लाभार्थ्यांकडे हे कार्ड असले पाहिजे. संकेतस्थळावरून लाभार्थी स्वतः आपले कार्ड डाऊनलोड करू शकतो. गावातच त्याला कार्ड मिळेल. गावातील कार्ड धारकांची यादी ग्रामसभेकडे असेल.


            ते पुढे म्हणाले, या योजनेत सर्वच सार्वजनिक रुग्णालयांना जोडावे. रुग्णालयातील काम करणाऱ्या डॉक्टरला यामध्ये प्रोत्साहन भत्ता देता येतो. तसेच आशा सेवकांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून कार्ड बनवून दिल्यास आशा सेवकांना प्रति कार्ड पाच रुपयेदेखील मिळणार आहेत. गावातील आशा कार्यकर्ती यांना गावातील लाभार्थ्यांची यादी पोहोचवावी. योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक रुग्णालय बळकट झाली आहे. देशात रुग्णालय मोठ्या संख्येने जोडत आहेत. प्रत्येक सहभागी रुग्णालयात आयुष्यमान भारतचा किऑस्क असावा. किऑस्कमधून लाभार्थ्यांना योजनेविषयी संपूर्ण सुविधा दिली जाईल. कोविड काळात अखर्चित असलेला निधी राज्याच्या आरोग्य विषयक मूलभूत सुविधा उभारण्यासाठी वापरावा. नॅशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन मधून प्रत्येक जिल्ह्याला निधी देण्यात येत आहे. या निधीतून वैद्यकीय सोयी सुविधा भक्कम कराव्यात.


आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या


एकत्रित कार्ड वितरण कार्यक्रम अभियान स्वरूपात राबवावा


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य योजना समन्वयातून राबविल्यास राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना अधिकचा लाभ देणे शक्य होईल. राज्यात सार्वजनिक रुग्णालय एकत्र आणून त्यांच्यासाठी 'प्रोत्साहन निधी ' देण्याची योजना तयार करावी. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुष्यमान भारत योजनेचा आढावा बैठकीत दिल्या.


            ते पुढे म्हणाले, की महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा पाच लाख रुपये करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा देखील सारखीच राहणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीचे काम मिशन मोडवर करावे. केंद्र सरकारचा निधी पूर्णपणे खर्च करावा, त्यातून राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करावी.


0000


साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठीअर्ज करण्याचे आवाहन

 साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठीअर्ज करण्याचे आवाहन


 


            मुंबई, दि. २३ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता ९ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर-उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.


              मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती' योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.


                ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, दोन फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतींमध्ये आपले पूर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), मुंबई - गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर ९ जुलै, २०२३ पर्यंत अर्ज करावेत.

पड रे पाण्या पड रे


 ♦️ पडरे पाण्या पडरे पाण्या,

मसाज आवश्यक आहे का ?*

 *मसाज आवश्यक आहे का ?* 


            आपले शरीर अनेक स्नायूंनी बनलेले आहे. ते स्नायू मोकळे करण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज असते. जरी आपण ग्रामीण भागातले असलो तर सहसा आपल्या शरीराची हालचाल तर होतेच म्हणून आपल्याला वाटेल की आम्हाला व्यायामाची काय गरज, पण व्यायाम हा आवश्यक असतोच. त्याच बरोबर मालिश ही सुद्धा तितकीच गरजेची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळापासून आपण पाहत आलोय की लहान मुलांची तेलाने मालिश केली जाते, आणि असे केल्या केल्या लहान मूल अगदी शांत झोपी जाते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मुलांची मालिश केल्यास त्यांची शारीरिक वाढ ही अतिशय लवकर होते. आज आपण पाहू प्राचीन काळापासून चालत आलेले मालिश म्हणजेच स्पर्श चिकित्सा पद्धत. या पद्धतीने मोठे मोठे आजार सुद्धा दूर होतात. अर्धांगवायू सारखे आजर तर ऍलोपॅथिक औषधाने बरे होतच नाहीत त्यांना मसाज व निसर्गोपचार आणि थोडी मेहनत पूर्णपणे आजार दूर करू शकते.


संवाहन श्रमहरं व्रस्यं निद्रा सुख प्रदम् । मांसा सृक्त्यक् प्रसन्नत्वम् कुर्याहातकफाप्रहमू ।।


म्हणजेच, शरीराची मालिश करणे श्रमनाशक, धातूंना पुष्ट करणारे, झोप आणि सुखकारक तसेच श्वासोच्छ्वास, त्वचा आणि रक्त शुद्ध करणारी आणि वात, पित्त, कफ नाशक आहे.


 *मसाज चे फायदे :*


१. तणाव दूर करण्यास मदत करते. 

२. मस्क्युलर, जॉईन्ट चे दुखणे दूर करते. 

३. ब्लडप्रेशर व्यवस्थित ठेवतो. 

४. शरीराच्या आतील दुखणे नाहीसे होते. 

५. इम्यूनिटी सिस्टिम ला बूस्ट करते. 

६. कमरेत होणारे दुखणे नियंत्रित करते. 

७. यामुळे आपल्याला झोप देखील चांगली लागते.


*या व्यक्तींनी मसाज टाळावा*


१) ज्या व्यक्तीला त्वचेचे आजार आहेत. 

२) सूज किंवा जखम झालेल्या भागावर मसाज करू नये. 

३) गर्भावस्थेत स्त्रियांनी मसाज करू नये.

४ ) हृदयविकार असेल तर मसाज करताना विशेष काळजी घ्यावी लागते.

 *तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच मालिश करावी.*


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



आंधळी उपसा सिंचन योजनेमुळे माणचा दुष्काळ दूर होणार

 आंधळी उपसा सिंचन योजनेमुळे माणचा दुष्काळ दूर होणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            सातारा दि. 22 - गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे - कठापूर )अंतर्गत आंधळी उपसा सिंचन योजना व आंधळी थेट गुरूत्वीय नलिकेच्या कामाचे भूमिपूजन होत असून ही एक आनंदाची गोष्ट आहे. यामुळे माण तालुक्याचा दुष्काळी भाग सिंचनाखाली येणार असून येथील दुष्काळ दूर होणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            या कार्यक्रमात एकूण 1 हजार 330 कोटी 74 लाख रुपयांच्या या योजनेतील बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. प्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. तु. धुमाळ आदी उपस्थित होते


            या दुष्काळी भागाचा कायापालट होण्यासाठी आंधळी सिंचन योजनेचे काम खा. नाईक निंबाळकर व आ. श्री. गोरे यांच्या प्रयत्नांमुळे व पुढाकारांमुळे होत असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. काम करीत असताना गुणवत्ताही चांगली ठेवावी. सिंचनाची सोय झाल्यानंतर येथील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन नक्की होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.


             या वितरण प्रणालीद्वारे 18 हजार 970 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून या योजनेसाठी 247 कोटी 34 लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.


            या प्रकल्पांतर्गत कृष्णा नदीतून खरीप हंगामात 3.17 अ.घ.फु. पाणी उचलून सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त खटाव व माण तालुक्यातील एकूण 27,500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजित आहे. कृष्णा नदीवर कठापूर, ता. कोरेगाव येथे बॅरेज बांधून तीन टप्प्यात 209.84 मी. उंचीवर पाणी उचलून खटाव तालुक्यातील नेर धरणात सोडण्यात येणार आहे. नेर तलावातून सोडलेले पाणी येरळा नदीत सोडण्यात येणार आहे. नेर तलावातून 12.746 कि. मी. लांबीच्या आंधळी बोगद्याद्वारे पाणी माण तालुक्यातील आंधळी धरणात व माण नदीत सोडण्यात येणार आहे. प्रकल्पात येरळा नदीवरील 15 व माण नदीवरील 17 को .प. बंधाऱ्यांचा समावेश आहे. प्रकल्पामध्ये नेर उपसा सिंचन योजना 1 व 2, आंधळी उपसा सिंचन योजना यांचा समावेश आहे. योजनेच्या एकूण लाभक्षेत्रापैकी (27,500 हे.) बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे 18,970 हेक्टर तर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील खाजगी उपसाद्वारे 8,530 हेक्टर सिंचन करण्याचे प्रस्तावि

त आहे.


अस्थमा / दमा.....*

 *अस्थमा / दमा.....*


अस्थमा किंवा दमा हा त्रास बऱ्याच लोकांना असतो. विशेषतः थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आभाळ भरून आल्यावर दम्याचे अटॅक येतात. दमा सहजासहजी बरा होऊ शकत नाही. परंतु दमा नियंत्रित करता येतो. धूर, धूळ, हवा प्रदूषण इत्यादीची अ‍ॅलर्जी, सतत सर्दी, खोकला, मानसिक तणाव, जागरण, अतिश्रम, रक्ताची कमतरता, आनुवंशिकता ही दमा होण्याची मुख्य कारणे आहेत.


*दमा/अस्थमाच्या पेशंटनी पुढील काळजी घ्यावी...*


*१. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कफ वाढवणारा आहार दही, दूध, ताक, साबुदाणा, केळी हे पदार्थ खाऊ नयेत. 


*२. थंड पदार्थ खाणे टाळावे. खूप तहान लागली तरी थंड पाणी, पेये याचा मोह टाळावा.


*३. धूम्रपान करू नये. हे व्यसन असेल तर दम्याचा धोका वाढतो. 


*४. एसी किंवा कूलरमध्ये झोपू नये. रात्री जागरण करणे, थंड हवेत फिरणे टाळावे.  


*५. पोट नेहमी साफ राहील असे पहावे. मैदा, त्याचे पदार्थ, बटाटे, शिळे अन्न, हॉटेलचे जेवण टाळावे.


*दमा/अस्थमासाठी काही घरगुती उपाय...*


*१. थंडीमध्ये सुंठ व मध किंवा आल्याचा रस व मध एकत्र करून चाटण करावे. 


*२. दम्याचा जोरात अ‍ॅटॅक आल्यास खडीसाखर, खिसमिस आणि दालचिनी चावून खावे. अ‍ॅटॅक कमी होतो. 


*३. छातीला तीळाचे तेल लावून शेक घ्यावा. यामुळे छातीतील कफ नाहीसा होतो. ही गोष्ट रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी आंघोळ करण्यापूर्वी करणे चांगले. 


*४. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी पुढील काढा घ्यावा. दोन ते तीन कप पाणी घेऊन त्यात तुळस व अडुळशाची दोन पाने घाला. पाणी उकळू द्यावे. हा काढा घेतल्यास दमा कमी होतो.


*५. छातीतील व गळ्यातील कफ सुटण्यासाठी दालचिनी दुधात उकळून घ्यावी. त्यात थोडा मध टाकून प्यावे. 


*६. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकून ते पाणी दिवसभर एक एक घोट प्यावे. पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो. हृदयरोग असल्यास हा उपाय करू नये. 


*७. मोहरीच्या तेलात मीठ टाकून छातीला चोळावे. गरम पाण्याने शेकावे. कफ पातळ होऊन सुटतो.


*८. आहारात दुधी भोपळा, लसूण, पडवळ,, चवळी इ. भाज्यांचा समावेश करावा. कोबी गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घ्यावी. 


*९. प्राणायाम तसेच इतर व्यायाम प्रकृती प्रमाणे करावे. सकाळी व संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरावे. दीर्घश्वसन करण्याची सवय लावून घ्यावी.


*डॉ. सुनील ,*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


_*(

Featured post

Lakshvedhi