Thursday, 22 June 2023

संधीवात रोग*

 *संधीवात रोग* 


संधीवात या रोगात, सांधे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये सूज उद्भवते आणि रुग्ण वेदनांनी त्रस्त राहतो. चालण्यात त्रास व वेदना जाणवतात. या रोगामुळे शरीराच्या तंतुंमध्ये विकार निर्माण होतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, सांधे सूजतात, चालण्यात त्रास होतो. कधीकधी ताप येतो, भूक न लागणे देखील या आजाराचे लक्षण आहे. वेळेवर उपचार न केल्यास डोळे, फुफ्फुसे, हृदय आणि इतर अवयव प्रभावित होऊ लागतात.


संधिवात कारणे


 १) अनुवांशिक कारणे

 २) चुकीचे फास्ट फूड

 ३) सांध्यावर अधिक शारीरिक दबाव, ४) जोड्यांचा कमी किंवा जास्त वापर करणे

 ५) तंतुंमध्ये विकार आणि चयापचय मध्ये त्रास.

 ६) थंड वातावरणात राहण्या मुळे दुष्परिणाम

 ७) वृद्धत्व आणि हार्मोन असुंतुलन


 *काय काळजी घ्यावी ?* 

१) सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाला हवामानानुसार २४ तासांत ३ ते ४ लिटर पाणी पिण्याची सवय लावावी. यूरिक अँसिड शरीराच्या सांध्यामध्ये जमा होतो आणि त्यापासून या वायू रोगाचा जन्म होतो. जास्त पाणी प्यायल्यामुळे जास्त लघवी होईल आणि यूरिक अँसिड बाहेर निघून जाईल

२) फळं आणि हिरव्या भाज्या आपल्या आहारात मुबलक प्रमाणात समाविष्ट करा. त्यात समृद्ध अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती बळकट होते. रोजाना ५०-५० ग्रॅम फळे किंवा भाज्या किंवा दोन्ही वापरत रहा. जर तुम्ही यांचा रस प्यायला तर तुम्हाला तेच फायदे मिळतील.  


 ३) ताज्या गाजरचा रस आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा आणि दररोज अर्धा कप सेवन करा. 

४) काकडीचा रस पिल्याने संधिवातात फायदेशीर ठरते.


५) संधीवात असलेल्यांनी हिवाळ्यामध्ये उन्हात बसावे. त्यामुळे Vit-D तयार होते

६) चहा, कॉफी, मांसामुळे रुग्णालां आजार उद्भवू शकतात त्यामुळे ते टाळावे. किमान प्रमाण तरी कमी करावे.

७)साखरेचा वापर हानिकारक असतो.

८) तळलेले अन्न, मीठ, साखर, मिरची-मसाले, अल्कोहोल वर्ज्य असते.

९) संधीवाताच्या रुग्णाला आठवड्यातून दोन दिवस उपवास करणे आवश्यक आहे.


१०) कॉड लिव्हर ऑईल 5 ml. सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यास संधीवात कमी होऊन त्वरित लाभ मिळतो.

११) कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी पूरक आहार घेणे आवश्यक असते.. जर आपण हे जीवनसत्त्वे अन्नाद्वारे घेत असाल तर ते अधिक चांगले .

१२) तीन लिंबू रस आणि 40 ग्रॅम इप्सम सॉल्ट अर्धा लिटर गरम पाण्यात मिसळा आणि एका बाटलीमध्ये भरा. आणि हे सकाळी आणि संध्याकाळी 5 मिलीलीटर औषध प्या. ही कृती खूप प्रभावी आहे.

 १३) संधीवात रोगात बटाट्याचा रस पिण्याने आराम मिळतो. दररोज २०० मिलीलीटर रस प्यावे हा पण प्रयोग प्रभाव शाली आहे.

१५) अधिक पायर्‍या चढणे हानिकारक आहे.

१६) विश्रांती दरम्यान संतुलन राखणे महत्वाचे आहे.

१७) आल्याचा रस पिल्याने संधीवातात होणाऱ्या वेदना कमी होते.

 १८) मिक्सरमध्ये जवस (अळशी) बिया घालून पावडर बनवा. आणि सकाळी २० ग्रॅम आणि संध्याकाळी २० ग्रॅम पाण्यात घ्या. यामध्ये ओमेगा फेटी अँसिड असते, जे या आजारात खूप फायदेशीर मानले गेले आहे. यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास देखील मदत होते. जवसाच्या सेवनाने अंगात कधी उष्णता होऊ शकते. जर असे झाल्यास प्रमाण कमी करावे आणि पाणी मात्र भरपूर प्यावे.


१९) चोपचीनी: कोकणात यास घोट वेल म्हणतात. जर ही मिळत असेल तर तिचा काढा करून प्यावा याने युरीक अँसीड कमी होईल.


२०) शिवाय निलगिरी तेल, दालचीनी तेल, राई तेल, कापूर आणि लवंग तेल ही बाजारातून आणून सम प्रमाणात मिक्स करून याने घुडगे किंवा दुखंणाऱ्या भागावर नित्य मालिश करून त्या भागावर सोसवेल इतक्या गरम पाण्याची धार धरावी. याने घामावाटे युरीक अँसीड तसेच त्या भागातील विष द्रव्ये निघून जातील.


अशा आजारासाठी असे काही उपाय आपण घरच्या घरी करुन गुण तर येईलच. पण कोणत्याही गोष्टीत जर श्रध्दा ठेवली आणि श्रध्दा पूर्वक केली तर तर त्याचा परिणाम पण चांगलाच येतो.


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,



वेळ चुकली तरी चालेल,पण दिशा चुकली तर काळ घात करतो,कालाय तस्मै नमः

: *आजची तरुणाई चुकीच्या मार्गाने जात आहे* 

दोन दिवसापूर्वी सर्व वर्तमानपत्रे व टीव्ही चॅनल वर बातमी दाखवली ,आणि काळजाचा ठोकाच चुकला ,

नुकत्याच MPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला, कोपरगाव ची *दर्शना पवार* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली, 26 वर्षी वनक्षेत्र विभागात अधिकारी *RFO* तिचे व तिच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले.

काही दिवसातच कुटुंबाचे धुळीस मिळाले,

पुण्याला सत्कार समारंभासाठी आली, कार्यक्रम संपल्यानंतर मित्राबरोबर राजगड फिरण्यासाठी गेली व तिथेच तिचा खून झाला, ज्या मित्राबरोबर गेली होती तो मित्र गायब आहे,

 *दर्शना पवार* अतिशय हुशार मुलगी होती परीक्षा साठी दोन वर्ष तिने घरात कोंडून घेतले होते ती अधिकारी झाल्यावर संपूर्ण गावाने तिचा सत्कार केला होता, तिच्या आणि आई-वडिलांच्या कष्टाचे फळ मिळाले होते पण एका दिवसातच सगळे 'होत्याचे नव्हते झाले,'

ज्याला आपण मित्र मैत्रिणी म्हणतो तेच एकमेकांच्या जीवावर उठले आहेत मैत्रीच्या नावाखाली, अनेक मुलींची फसवणूक होत आहे, आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात भरकटत चाललेली आहे मित्र-मैत्रिणी बाहेर फिरायला जाणे, विविध प्रकारचे व्यसन करणे, पब च्या नावाखाली तोकडे कपडे घालून दारू पिऊन रात्रभर बीभत्सपने नाचणे, आपले शौक पूर्ण करण्यासाठी मित्र-मैत्रिणीचे नाते जोडणे, अशा पद्धतीने आजची तरुणाई चुकीच्या मार्गाने जात आहे,

आई वडील कबाड कष्ट करत आहेत, मुलींना विश्वासाने घराच्या बाहेर पाठवतात, आमच्या आयुष्यात जे आम्हाला मिळाले नाही जे आम्ही भोगले आहे, ते आमच्या मुलांच्या वाट्याला यायला नको, म्हणून ते आपल्या जिवाचा आटापिटा करत आहे ,आजचे तरुण मुले त्यांच्या ह्याच गोष्टीचा फायदा घेत आहेत,

 *चेन्नई च्या उच्च न्यायालयाने* आजच्या तरुण पिढी बद्दल खेद व्यक्त करताना म्हटले की चित्रपटातील अश्लील शब्द आणि गाणी हिंसाचार या सर्व गोष्टीमुळे आजच्या तरुणांवर परिणाम होत आहे, त्यात आणखी भर म्हणजे सोशल मीडिया व मोबाईल एक व्यसन झाले आहे,

ग्रामीण भागातील आई वडील शिक्षणासाठी, आपल्या मुला-मुलींना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पाठवत असतात, त्यांच्या कष्टाची त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची जाणीव, मुला-मुलींनी ठेवली पाहिजे, आपल्या मुलांना अडचण यायला नको म्हणून, ते फक्त पैसे पाठवण्याचे काम करत असतात ,आणि हे तरुण शिकायचे सोडून असले धंदे करत असतात,हल्ली पुण्या मुंबई सारख्या शहरात कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुली सर्रास पणे वाईन शॉप मध्ये जाऊन दारू खरेदी करताना दिसतात, स्त्री पुरुष समानता वैगरे सर्व मान्य केले तरी अल्पवयीन मुला मुलींना उपलब्ध होणारी दारू आणि स्वयराचार योग्य आहे का .तसेच आपण आपल्या पाल्याना पुढील काळात येणाऱ्या या परिस्थितीतला तोंड देण्यासाठी कसे तयार करावे. हे पालकांसमोर एक आव्हान आहे.?

आजचे तरुण विद्यार्थी कुठे चुकत आहे, यापेक्षा त्यांनी आपली जीवनशैली, विचारसरणीत काही गोष्टी आत्मसात केल्या तर, सकारात्मक गोष्टी घडु शकतात. आपला मुलगा मुलगी सध्या कुठलेही शिक्षण घेत असल्यास प्रथमच विचार करा, की आपण जे करीत आहोत त्यांच्या जीवनात कसा उपयोग होईल. दिशा नसली तर हवेतील विमान व पाण्यातील जहाज पण भरकटतात , आयुष्यात प्रसंग व अपघात पण घडतात. त्या मुळे *दिशा निश्चित करा* स्वतःचे कौटुंबिक सामाजिक दायित्व लक्षात घेऊन चांगले संस्कार, आपली संस्कृती आणि नैतिकता जोपासण्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी तुम्ही आम्ही नक्कीच प्रयत्न करू यात

 *विजय खरात* 🙏

 *पनवेल नवी मुंबई*

[

हृदयरोग व मधुमेहींसाठी एक वरदान : टोमॅटो-*

 *हृदयरोग व मधुमेहींसाठी एक वरदान : टोमॅटो-* 


टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे.


टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर तो मलेशिया, भारत, अमेरिका, आफ्रिका असा संपूर्ण जगामध्ये आला. संपूर्ण जगात बटाट्या खालोखाल जास्त पिकवले जाणारे टोमॅटो हे लोकप्रिय पीक आहे.


*औषधी गुणधर्म :-* 


कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस 'अ', 'क' जीवनसत्त्व, प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अशा सर्व घटकांनी टोमॅटो परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार टोमॅटो हे अग्निप्रदीपक, पाचक, सारक, रक्तशोधक मधुर आम्ल गुणात्मक, रुचकर, हृदय, लघु स्निग्ध व उष्ण वीर्यात्मक आहे. टोमॅटोमध्ये कमी उष्मांक असल्यामुळे मधुमेहींसाठी, हृदयरोग्यांसाठी एक वरदानच आहे.


*उपयोग :-* 


◼️ आहारामध्ये टोमॅटो हा उत्तम औषधी गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. टोमॅटोची भाजी, रस काढून सूप, तर जेवणामध्ये टोमॅटो कोशिंबीर, सॅलॅड अशा अनेकविध प्रकारांनी टोमॅटो वापरण्यात येतो.


◼️ टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कार्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटोचा औषधासारखा वापर करता येतो. वरील विकार असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे आहारात वापरावा.


◼️ अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.


◼️ टोमॅटोमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा. तसेच टोमॅटोची मूठभर पाने कुस्करून १ लिटर पाण्यात उकळावीत व हे पाणी दिवसातून तीन वेळा जेवण्यापूर्वी अर्धा कप प्यावे. यामुळे दृष्टीला तेज प्राप्त होते.


◼️ रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.


◼️ टोमॅटोच्या १ कप रसामध्ये १००० इ.यु. 'अ' जीवनसत्त्व असते. तसेच 'क' जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.


◼️ टोमॅटोमध्ये मॅलिक आणि सायट्रिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने टोमॅटो खाल्ल्याने लहान व मोठे आतडे अधिक कार्यक्षम होते व शरीरात साचलेला घट्ट मल पुढे ढकलण्यास मदत होते. म्हणून मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.


◼️ पिकलेल्या टोमॅटोचा ताजा रस लहान मुलांना २ ते ३ वेळा दिल्यास मुले निरोगी, बलवान व सुदृढ होतात.

टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण व साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ल्यास हृदयविकार कमी होतो.


*सावधानता :-* 

टोमॅटो आरोग्यास लाभदायक असला तरी मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये.


*संकलन-*


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*(

हजार पंखुड़ी वाला कमल फूल के दर्शन भाग्यो से होते हैं 🌸🌸

 🌸🌸हजार पंखुड़ी वाला कमल फूल के दर्शन भाग्यो से होते हैं 🌸🌸


शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा पुरविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील

 शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा पुरविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील


दिलखुलास कार्यक्रमात संचालक विकास पाटील यांची मुलाखत


 


            मुंबई, दि. 21 : राज्यात खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा माफक दरात उपलब्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे कृषी आयुक्तालय, पुणे येथिल निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून सांगितले आहे.


            खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हंगाम असतो. या हंगामात पीक पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे व कृषी निविष्ठांची गरज भासत असते. अशावेळी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागामार्फत खरीप हंगामात होणाऱ्या पीक पेरणीसाठी कशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे, बियाणाबाबत होणारी फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत याबाबत सविस्तर माहिती श्री.पाटील यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 22, शुक्रवार दि.23 आणि शनिवार दि. 24 जून 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक महेश जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.


000

नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे

 नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मॉडर्न महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


 


            पुणे दि. 21 : कृत्रिम बुद्ध‍िमत्तेने शिक्षणासह सर्व क्षेत्रात मोठी क्रांती केल्यामुळे होणाऱ्या बदलांना लक्षात घेऊन त्यासाठीचे मनुष्यबळ शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करावे लागेल. ‘लर्न, अनलर्न, रिलर्न’ अशी त्रिसूत्री स्व‍िकारल्याशिवाय भविष्यातील आव्हानांचा सामना करता येणार नाही. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, माजी खासदार अमर साबळे, अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधार सेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव शामकांत देशमुख, सहकार्यवाह सुरेश तोडकर, जोत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शिक्षणाच्या क्षेत्रात येत्या काळात झपाट्याने बदल होणार आहेत. २१ व्या शतकात नव्या पिढीसमोर कालसुसंगत राहण्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने सातत्याने नव्या आव्हानांचा अभ्यास करुन त्यानुसार शिक्षणाच्या क्षेत्रात कालानुरूप बदल करावे लागतील, अन्यथा शिक्षण पद्धत कालबाह्य व निरुपयोगी ठरेल.


नव्या शैक्षणिक धोरणात भविष्याचा विचार


            भविष्यातील आव्हाने ओळखूनच देशात नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. ते विस्तार, सर्वसमावेशक आणि उत्तमता या त्रिसुत्रीवर आधारित असून त्यासोबत रोजगारक्षमता हा मुद्दा त्यात समाविष्ट आहे. इच्छा असणाऱ्याला शिक्षण देण्यासाठी विस्तार महत्वाचा आहे. उच्च शिक्षण घेण्याच्या वयातले मुल मुली २३ टक्के शिक्षण घेतात, हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आणायचे आहेत. विद्यार्थी दुप्पट करताना मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उभारून संपूर्ण व्यवस्था तयार करावी लागेल, हे मोठे आव्हान आहे.


प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी दीपस्तंभासारखे काम करणारी संस्था


             ज्ञान असणाऱ्याला शिक्षण मिळणे तेवढेच गरजेचे आहे. रोजगाराचे प्रश्न समोर उभे असताना शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगारक्षमता महत्त्वाची आहे. हे करण्यासाठी महाविद्यालयांचे ॲक्रीडीटेशन आणि अभ्यासक्रमासाठी स्वायत्तता यात समन्वय साधून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवून आणता येईल. विद्यापीठांनी महाविद्यालयीन शिक्षणातील उत्तमतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. नव्या काळातील शैक्षणिक गरजा लक्षात घेणाऱ्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने शिक्षणाच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवला आहे. नव्या काळातील प्रवाह लक्षात घेऊन पुढे जाणारी ही संस्था देशाच्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये दीपस्तंभासारखे काम करणारी संस्था आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी काढले.


खाजगी विद्यापीठांना अभ्यासक्रमाबाबत स्वायत्तता-चंद्रकांतदादा पाटील


            पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, प्रोग्रेसिव्ह संस्थेने नेहमीच उत्तमतेवर भर दिला आहे. मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षणात नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्याचा वेध आणि भूतकाळाबाबत गौरवाची भावना अशा दोन्ही बाबींचा समावेश आहे. राज्यात १ हजार ५०० महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.


            ते पुढे म्हणाले, भविष्याचा वेध घेवून कौशल्य विकास, मातृभाषेतून शिक्षण, राज्याच्या थोर परंपरेची जाणीव आणि मूल्यशिक्षण अशा चार पैलूंचा समावेश नव्या शैक्षणिक धोरणात आहे. खाजगी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना नवे अभ्यासक्रम सुरू करण्यातील अडथळे लवकरच दूर करण्यात येतील. खासगी विद्यापीठात १० टक्के गरीब विद्यार्थ्यांचे शुल्कही माफ केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ.गजानन एकबोटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे सदस्य, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


0000



 

महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकतेत वाढ

 महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकतेत वाढ


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            पुणे, दि. 21: बांधकाम, स्थावर संपदा व्यवसायाचे नियमन करणे हा ‘रेरा’ स्थापनेमागचा उद्देश नाही, तर या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालताना जे खरेच चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे हा मूळ उद्देश आहे. प्रोत्साहन देण्याचे काम ‘महारेरा’कडून अतिशय उत्तम पद्धतीने होत असून त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकतेत वाढ झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.


              ऑल इंडिया फोरम ऑफ रियल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीजच्या (एआयएफओ रेरा) नियामक मंडळाच्या हॉटेल कॉनरॅड येथे आयोजित बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महारेराचे अध्यक्ष तथा फोरमचे अध्यक्ष अजोय मेहता यांच्यासह देशभरातील 15 रेरा प्राधिकरणांचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने ‘रेरा’ चे जन्मस्थान आहे. ग्राहक संघटना, कार्यकर्त्यांची विशेषत: मुंबईत स्थावर संपदेबाबत नियामक व्यवस्था असावी, अशी मागणी होती. राज्य शासनही त्याबाबत गांभीर्याने विचार करत होते. त्यामुळे केंद्र शासनाने रेरा कायदा केल्याबरोबर या संधीचा लाभ घेत राज्याने ‘महारेरा’ ची स्थापना केली. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी घर घेण्यासाठी नागरिक आपल्या आयुष्याची कमाई लावतात. अशाप्रसंगी फसवणूक झाल्यास खूप मोठा धक्का बसतो. याबाबतच्या मोठ्या तक्रारी येत होत्या. मात्र ‘रेरा’च्या स्थापनेमुळे याला मोठा आळा बसला आहे”, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.


            राज्य शासनाद्वारे नागरिक, क्रेडाई-एमसीएचआय यासारख्या संस्थाचेही या कायद्याविषयी विचार जाणून घेतले जातात. त्यामुळे ‘महारेरा’ला विकासक, बांधकाम व्यावसायिकांचा विरोध न होता सहकार्यच होते. फसवणुकीविषयीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे घर खरेदीदार नागरिकही समाधानी आहेत. गृहप्रकल्पाच्या जाहिरातींमध्ये पूर्वी बिल्टअप, सुपर बिल्टअप असे उल्लेख करुन ग्राहकांची फसवणूक होत असे. तथापि, आता जाहिरातीतील ‘महारेरा कार्पेट एरिया’ चा उल्लेख होत असल्याने फसवणुकीला वाव राहिला नाही, असेही ते म्हणाले.


            संपूर्ण देशात रेरा कायद्यांतर्गत नोंदणी होणाऱ्या बांधकाम प्रकल्पातील 40 टक्के प्रकल्प ‘महारेरा’ कडे नोंदणी झालेले आहेत. यातूनच महाराष्ट्रातील या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचे दिसून येते, असेही श्री. फडणवीस म्हणाले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, तंत्रज्ञान कोणताही भेद करत नसल्याने ‘महारेरा’चे सर्व कामकाज, परवानग्यांसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा, ही भूमिका घेतली. प्रकल्प मंजुरी आदींसाठी ऑनलाईन व्यवस्था निर्माण केल्यामुळे पारदर्शकता निर्माण होण्यासह वेळेत परवानग्या आणि प्रकल्पांना गती मिळाली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे आता तिसरी मुंबई विकसित होत आहे. असे होत असताना शहरांची स्वत: आर्थिक सक्षम होण्याचीही क्षमता निर्माण होत आहे. त्यासाठी नवीन परिसंस्था (इकोसिस्टीम) विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.


            देशभरातील रेरा प्राधिकरणांच्या या क्षेत्राच्या नियमनासंदर्भातील चांगल्या कार्यपद्धतींची माहिती परस्परांना दिल्यास तसेच आव्हानांविषयी चर्चा केल्यास नियामक क्षेत्र अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करेल. त्यासाठी ही ‘एआयएफओ रेरा’ नियामक मंडळाची बैठक उपयुक्त ठरेल, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.


            यावेळी अजोय मेहता म्हणाले, महाराष्ट्राने सर्वप्रथम रेराची स्थापना केली. त्यानंतर देशातील एकूण 25 राज्यात ‘रेरा’ची स्थापना झाली आहे. ‘महारेरा’च्या स्थापनेपूर्वी बांधकाम प्रकल्प रखडण्याचे प्रमाण 25 टक्के होते ते आता 3 टक्क्यांवर आले आहे. महारेराने प्रकल्प मंजुरी, अर्ज आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे वेगाने मंजुरी दिली जात आहे. नागरिकांच्या फसवणुकीच्या तक्रारीतही मोठी घट झाली आहे, असेही ते 

म्हणाले.


0000



Featured post

Lakshvedhi