Thursday, 22 June 2023

वेळ चुकली तरी चालेल,पण दिशा चुकली तर काळ घात करतो,कालाय तस्मै नमः

: *आजची तरुणाई चुकीच्या मार्गाने जात आहे* 

दोन दिवसापूर्वी सर्व वर्तमानपत्रे व टीव्ही चॅनल वर बातमी दाखवली ,आणि काळजाचा ठोकाच चुकला ,

नुकत्याच MPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला, कोपरगाव ची *दर्शना पवार* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली, 26 वर्षी वनक्षेत्र विभागात अधिकारी *RFO* तिचे व तिच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले.

काही दिवसातच कुटुंबाचे धुळीस मिळाले,

पुण्याला सत्कार समारंभासाठी आली, कार्यक्रम संपल्यानंतर मित्राबरोबर राजगड फिरण्यासाठी गेली व तिथेच तिचा खून झाला, ज्या मित्राबरोबर गेली होती तो मित्र गायब आहे,

 *दर्शना पवार* अतिशय हुशार मुलगी होती परीक्षा साठी दोन वर्ष तिने घरात कोंडून घेतले होते ती अधिकारी झाल्यावर संपूर्ण गावाने तिचा सत्कार केला होता, तिच्या आणि आई-वडिलांच्या कष्टाचे फळ मिळाले होते पण एका दिवसातच सगळे 'होत्याचे नव्हते झाले,'

ज्याला आपण मित्र मैत्रिणी म्हणतो तेच एकमेकांच्या जीवावर उठले आहेत मैत्रीच्या नावाखाली, अनेक मुलींची फसवणूक होत आहे, आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात भरकटत चाललेली आहे मित्र-मैत्रिणी बाहेर फिरायला जाणे, विविध प्रकारचे व्यसन करणे, पब च्या नावाखाली तोकडे कपडे घालून दारू पिऊन रात्रभर बीभत्सपने नाचणे, आपले शौक पूर्ण करण्यासाठी मित्र-मैत्रिणीचे नाते जोडणे, अशा पद्धतीने आजची तरुणाई चुकीच्या मार्गाने जात आहे,

आई वडील कबाड कष्ट करत आहेत, मुलींना विश्वासाने घराच्या बाहेर पाठवतात, आमच्या आयुष्यात जे आम्हाला मिळाले नाही जे आम्ही भोगले आहे, ते आमच्या मुलांच्या वाट्याला यायला नको, म्हणून ते आपल्या जिवाचा आटापिटा करत आहे ,आजचे तरुण मुले त्यांच्या ह्याच गोष्टीचा फायदा घेत आहेत,

 *चेन्नई च्या उच्च न्यायालयाने* आजच्या तरुण पिढी बद्दल खेद व्यक्त करताना म्हटले की चित्रपटातील अश्लील शब्द आणि गाणी हिंसाचार या सर्व गोष्टीमुळे आजच्या तरुणांवर परिणाम होत आहे, त्यात आणखी भर म्हणजे सोशल मीडिया व मोबाईल एक व्यसन झाले आहे,

ग्रामीण भागातील आई वडील शिक्षणासाठी, आपल्या मुला-मुलींना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पाठवत असतात, त्यांच्या कष्टाची त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची जाणीव, मुला-मुलींनी ठेवली पाहिजे, आपल्या मुलांना अडचण यायला नको म्हणून, ते फक्त पैसे पाठवण्याचे काम करत असतात ,आणि हे तरुण शिकायचे सोडून असले धंदे करत असतात,हल्ली पुण्या मुंबई सारख्या शहरात कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुली सर्रास पणे वाईन शॉप मध्ये जाऊन दारू खरेदी करताना दिसतात, स्त्री पुरुष समानता वैगरे सर्व मान्य केले तरी अल्पवयीन मुला मुलींना उपलब्ध होणारी दारू आणि स्वयराचार योग्य आहे का .तसेच आपण आपल्या पाल्याना पुढील काळात येणाऱ्या या परिस्थितीतला तोंड देण्यासाठी कसे तयार करावे. हे पालकांसमोर एक आव्हान आहे.?

आजचे तरुण विद्यार्थी कुठे चुकत आहे, यापेक्षा त्यांनी आपली जीवनशैली, विचारसरणीत काही गोष्टी आत्मसात केल्या तर, सकारात्मक गोष्टी घडु शकतात. आपला मुलगा मुलगी सध्या कुठलेही शिक्षण घेत असल्यास प्रथमच विचार करा, की आपण जे करीत आहोत त्यांच्या जीवनात कसा उपयोग होईल. दिशा नसली तर हवेतील विमान व पाण्यातील जहाज पण भरकटतात , आयुष्यात प्रसंग व अपघात पण घडतात. त्या मुळे *दिशा निश्चित करा* स्वतःचे कौटुंबिक सामाजिक दायित्व लक्षात घेऊन चांगले संस्कार, आपली संस्कृती आणि नैतिकता जोपासण्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी तुम्ही आम्ही नक्कीच प्रयत्न करू यात

 *विजय खरात* 🙏

 *पनवेल नवी मुंबई*

[

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi