Wednesday, 21 June 2023

२१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस; १३ तास १३ मिनिटे; दिवस मोठा अन् रात्र राहणार छोटी*

 🟪🟪

*२१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस; १३ तास १३ मिनिटे; दिवस मोठा अन् रात्र राहणार छोटी* 


*मुंबई-* पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळेमुळे २१ जूनला १३ तास १३ मिनिटांचा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. याच दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होत असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.


पृथ्वीचे अक्षवृत्त साडेतेवीस डिग्रीच्या झुकाव्याने ११ हजार किमी प्रति तासाच्या गतीने पश्चिमेकडे पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून १,०५,००० किमी प्रति तासाच्या वेगाने सुमारे ८९.४० कोटी किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातला जसा २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो, त्याप्रमाणे २२ डिसेंबर हा वर्षातला सर्वात लहान दिवस असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायन सुरू होत असते.


पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी जास्त होत आहे. सन २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामी झाली होती. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घड्याळामध्ये लिप सेकंद ॲडजस्ट करावा लागतो, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने, हौशी खगोल अभ्यासक यांनी दिली. खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी २१ जून या उत्तर गोलार्धातील सर्वात मोठ्या दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व अनुभव घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 *न्यूजमंत्रा*

मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ*

 *मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ*


*केळी* - कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. (मुलांना सतत कफ व सर्दी च्या तक्रारी नसल्यास)


*साय असलेले दूध* - यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.


*भात -* यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.


*चिकू* - यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.


*मासे* - यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.


*सोयाबीन* - सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.


*डाळ* - यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.


*चीज* - यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.


*अंडी*- प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.


*दही* - यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.


*संत्री* - यामधील व्हिटॅमिन सीमुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.


*डाळिंब* - यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.


*पालक* - यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.


*पनीर* - यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





लहान मुलांचे पोट दुखणे आणि अन्य दुखणे

 *लहान मुलांचे पोट दुखणे आणि अन्य दुखणे 



तान्ह्या बाळाला पोट दुखतं हे त्याला सांगत येत नाही त्यामुळे त्याला काही झालं की ते रडतं. जर बाळ रडत असेल, काही दूध प्यायला तयार नसेल, बाळाचे पोट फुगलेले दिसत असले, पोटाला हात लावला असता रडणे वाढत असले तर बाळाचे पोट दुखते आहे असे समजावे.


 *बाळाचे पोट दुखत असल्यास हिंग घालून कोमट लेप बाळाच्या बेंबीभोवती लावावा.


 *हिंगाप्रमाणेच डिकेमालीचा लेप लावल्यास बाळाच्या पोटातील गॅसेस मोकळे होऊन पोट दुखायचे कमी होते.


*ओव्याचे चूर्ण पाण्यात कालवून बाळाच्या पोटावर लेप केल्यास पोट दुखणे कमी होते.

* बाळाच्या पोटावर हलका शेक करण्यानेही बहुतेक वेळेला पोट दुखायचे लगेचच थांबते. यासाठी गरम तव्यावर सुती हातरूमाल गरम करून, चटका बसणार नाही याची खात्री करून बाळाचे पोट शेकावे.

*बाळाची शी होण्यासाठी

मुलांना रोज कमीत कमी १-२ वेळा शी व्हायला हवी. रोज पोट साफ होत नसल्यास, खडा होत असल्यास किंवा बाळाला शी करायला जोर लावावा लागत असेल तर पुढील उपाय करावे


*आईने आहार हलका ठेवावं वातूळ पदार्थ टाळावे. उकळून कोमट केलेलं पाणीच प्यावे व जेवणानंतर ओवा, बडीशेप, बाळंतशेप, जिरे, सैंधव यांचे मिश्रण मुखशुद्धीप्रमाणे खावे किंवा चूर्ण करून गरम पाण्याबरोबर घ्यावे.


*बाळाच्या पोटावर एरंडेल तेल हलक्‍या हाताने चोळावे.


*१०-१५ काळ्या मनुका कोमट पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी बाळाला पाजावे.


*आईच्या आहारात साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश असावा.


*आई ने गरम पाणी पुरेशा प्रमाणात प्यावे. ते. "शी'च्या जागी बोटाने एरंडेल तेल लावावे.


*एक दाण्या एवढे हिंग व दोन चार थेंब पाणी दिल्यास शी होते

पोस्ट आवडल्यास आयुर्वेद प्रचार हे पेज लाईक शेअर करा.

कुठलाही आजारावरील निशुल्क उपाययोजना साठी व्हाँटसप करा.


वैद्य. गजानन.



_*

कौशल्य विकास उपक्रम ग्रामीण भाग केंद्रीत हवे

 कौशल्य विकास उपक्रम ग्रामीण भाग केंद्रीत हवे


- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा


            मुंबई, दि.२० : कौशल्य विकास उपक्रम हा ग्रामीण भाग केंद्रीत असायला हवा. ग्रामीण भागातील युवकांना कुशल बनवण्याची गरज असून यातूनच ग्रामीण भागातील स्थलांतर कमी होईल आणि घरोघरी कौशल्य पोहोचेल, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे. 


            सीआयआय बिझनेस २० अंतर्गत चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी कार्यशक्ती गटाच्या परिषदेत मंत्री श्री. लोढा बोलत होते.


            उद्योग सहकार्य आणि व्यावहारिक शिक्षणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये परिवर्तन होईल, अशी अपेक्षा श्री. लोढा यांनी यावेळी व्यक्त केली.


            महाराष्ट्रात एक हजारहून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असून तिथे देशातल्या सर्वाधिक सुमारे अडीच लाख युवकांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी यावेळी सांगितले. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी विशेष कार्यक्रम राबवले जात असून देशातील स्टार्टअपच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचेही त्यांनी सांगितले.


            सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा म्हणाले की, उद्योगाने अकुशल कामगारांपर्यंत पोहोचून एक कौशल्य व्यासपीठ तयार करणे आवश्यक आहे. ज्यामुळे एकूण उत्पादकता वाढेल. सीआयआय बिझनेस २० उपक्रमाचा एक भाग म्हणून, कामाचा गतिशील मार्ग तयार करण्यासाठी आम्ही भविष्यातील कामांचा आराखडा तयार करत असून त्यामध्ये व्यापक कार्य करत आहोत.      


            असेंचर इंडियाच्या चेअरमन आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक रेखा मेनन म्हणाल्या की, मानव आणि तंत्रज्ञान यांच्यातील सहजीवन संबंधांची गरज आहे. इंडस्ट्री सहयोग, डेटा आधारित मनुष्यबळ विश्लेषण आणि महिलांचा सहभाग वाढवून कौशल्य वाढवले जाईल, असेही त्या म्हणाल्या.


000

महाराष्ट्र राजभवनात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस साजरा

 महाराष्ट्र राजभवनात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस साजरा


राज्याच्या विकासात बंगाली समाजाचे योगदान मोठे


- राज्यपाल रमेश बैस


 


            मुंबई, दि. 20 : मुंबईतील बंगाली समाजाने वैद्यकीय, कला, चित्रपट, रंगभूमी, इतिहास, पत्रकारिता व न्यायपालिका यांसह अनेक क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे वेगळा ठसा उमटवला आहे. बंगाली समाज अतिशय प्रतिभावंत असून या समाजाचे मुंबई तसेच महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


            राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. २०) राजभवन मुंबई येथे प्रथमच 'पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस' साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.


            'एक भारत श्रेष्ठ भारत' या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत विविध राज्यांचे राज्य स्थापना दिवस राजभवन येथे साजरे करण्याच्या प्रथेनुसार पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.


            पश्चिम बंगालने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात फार मोठी भूमिका बजावली असल्याचे सांगून राज्याने नेताजी सुभाषचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांसारखे द्रष्टे नेते दिले आहेत. रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले 'जन गण मन' राष्ट्रगीत ही बंगालची देशाला देण असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.


            स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशन या संस्थेचा मुंबई येथील आश्रम यंदा स्थापनेचे १०० वे वर्ष साजरे करीत असल्याचे राज्यपालांनी नमूद करून मुंबई येथून स्वामी विवेकानंद शिकागो येथील सर्व धर्म संसदेत सहभागी होण्याकरिता गेले होते याचे स्मरण राज्यपालांनी केले.


            राज्यात तसेच मुंबई येथे अनेक ठिकाणी दुर्गा पूजा महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात व काही दुर्गा पूजा मंडळे तर १०० वर्षे जुनी आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.


            पश्चिम बंगालने केवळ व्यापार वाणिज्य या क्षेत्रांमध्येच नाही, तर संसदीय लोकशाहीमध्ये देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे राज्यपालांनी सांगताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान विसरता येत नाही असे राज्यपालांनी सांगितले.


            राज्य स्थापना दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना परस्परांना समजण्याची तसेच आपली सामायिक संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होते, असे राज्यपालांनी सांगितले. 


            यावेळी रामकृष्ण मठ मुंबईचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद महाराज, ज्येष्ठ तबला व सतार वादक पं. नयन घोष, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ एस. भट्टाचार्य, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे संचालक सव्यसाची मुखर्जी, सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलच्या संचालक शारोनी मल्लिक, ताज हॉटेल्सचे उपाध्यक्ष शोमनाथ मुखर्जी, हिंदुजा हॉस्पिटलचे मुख्याधिकारी जॉय चक्रवर्ती, ग्रँट मेडिकल कॉलेज येथील निवृत्त सर्जन प्रा. डॉ. गौतम सेन व श्रीजोन फाउंडेशनच्या अध्यक्ष कमोलिका गुहा ठाकुरता यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


            यावेळी श्रीजोन फाउंडेशनच्यावतीने पश्चिम बंगालची सांस्कृतिक झलक दाखविणाऱ्या संगीत, नृत्य व गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला मुंबईतील बंगाली भाषिक मान्यवर उपस्थित होते.


००००

West Bengal State Formation Day Celebrated at Maharashtra Raj Bhavan


            Maharashtra Governor Ramesh Bais presided over the West Bengal State Formation Day at Maharashtra Raj Bhavan Mumbai on Tue (20 June).


            The Governor applauded the contribution of the Bengalis in the socio economic and cultural development of Mumbai and Maharashtra.


            The State Formation Day of West Bengal was celebrated for the first time in Maharashtra Raj Bhavan as part of the 'Ek Bharat Shrestha Bharat' initiative of Government of India.


            A cultural programme comprising Bengali songs, dance and Ravindra Sangeet was presented with the collaboration of Srijon Foundation.


            The Governor felicitated the President of Ramakrishna Math and Mission Swami Satyadevananda Maharaj, Tabla Maestro Pt. Nayan Ghosh, Vice President of Taj Hotels Somnath Mukherjee, COO of Hinduja Hospital Joy Chakraborty, Director, Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya Sabyasachi Mukherjee, Professor of Surgery Dr Gautam Sen, Director, Singapore International School Sharonee Mullick and Founder of Srijon Foundation Kamalini Guha Thakurta on the occasion.  


            Members of the Mumbai Bengali community were present.

जनजागृतीद्वारे सलोखा योजना गतिमान करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

 सलोखा वाढतोय! पाच महिन्यात १४९ दस्तांची नोंद


सलोखा योजनेंतर्गत राज्यभर दस्त नोंदणीस सकारात्मक प्रतिसाद


जनजागृतीद्वारे सलोखा योजना गतिमान करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश


            मुंबई, दि . २० : सलोखा योजनेंतर्गत राज्यभर दस्त नोंदणीस सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पाच महिन्यात १४९ दस्तांची नोंद झाल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आगामी काळात गावपातळीवर जनजागृतीच्या विविध माध्यमाद्वारे सलोखा योजना अधिक गतिमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


            सलोखा योजनेंतर्गत राज्यभरात सर्वात जास्त ७६ एवढी दस्त नोंदणी अमरावती विभागात झाली असून यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. तर पुणे आणि ठाणे विभागात प्रत्येकी १७ एवढ्या दस्त नोंद झाली आहे. त्या खालोखाल नागपूर विभागात १२, नाशिक विभागात १०, औरंगाबाद विभागात ९, लातूर विभागात ८ एवढ्या दस्त नोंद झालेली आहे. राज्यात एकूण १४९ दस्त नोंद झाली असून योजनेतील सवलतीनुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क असे अनुक्रमे १ लाख ४९ हजार २०० एवढे प्राप्त झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.


            शेतीमधील वहिवाटीसंदर्भात गावपातळीवर पिढ्यानपिढ्या वादाचे विषय सामंजस्याने मिटवितानाच गावात सलोखा राखण्याच्या दृष्टीने महसूल विभागाच्या माध्यमातून महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सलोखा योजनेसारखा व्यापक जनहिताचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला. शेतजमिनीचा ताबा एका शेतकऱ्याकडे व अभिलेख दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावे असलेल्या प्रकरणी सहमतीने अदलाबदल करुन अभिलेख दुरुस्त करण्याच्या उद्देशाने शासन निर्णयान्वये सलोखा योजना प्रत्यक्षात दि. ३ जानेवारी २०२३ पासून अंमलात आणली. या योजनेअंतर्गत नोंद होणाऱ्या अदलाबदल दस्तावर मुद्रांक शुल्कासाठी १ हजार रुपये आणि नोंदणी शुल्क १ हजार रुपये अशी नाममात्र रक्कम ठेवण्यात आली होती.


            महसूल विभागाकडे असंख्य तक्रारी दाखल असून सद्यपरिस्थिती बदलण्यासाठी, शेतकरी बांधव वर्षानूवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत राहतात म्हणून जनहित डोळ्यासमोर ठेवून महसूल विभागाने सलोखा योजना सुरु केली. या योजनेमुळे समाजात सलोखा निर्माण होण्यास, एकमेकांतील सौख्य, शांतता आणि सौहार्द वाढण्यास मदतच होणार आहे. गाव तंटामुक्ती समितीच्या सहकार्याने स्थानिक प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांना गावपातळीवर जनजागृतीच्या विविध माध्यमाद्वारे सलोखा योजना अधिक गतिमान करण्याबाबतचे निर्देश दिले असल्याचे महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


००००

लहान मुलांचे पोट दुखणे आणि शी न होणे*

 *लहान मुलांचे पोट दुखणे आणि शी न होणे*



तान्ह्या बाळाला पोट दुखतं हे त्याला सांगत येत नाही त्यामुळे त्याला काही झालं की ते रडतं. जर बाळ रडत असेल, काही दूध प्यायला तयार नसेल, बाळाचे पोट फुगलेले दिसत असले, पोटाला हात लावला असता रडणे वाढत असले तर बाळाचे पोट दुखते आहे असे समजावे.


 *बाळाचे पोट दुखत असल्यास हिंग घालून कोमट लेप बाळाच्या बेंबीभोवती लावावा.


 *हिंगाप्रमाणेच डिकेमालीचा लेप लावल्यास बाळाच्या पोटातील गॅसेस मोकळे होऊन पोट दुखायचे कमी होते.


*ओव्याचे चूर्ण पाण्यात कालवून बाळाच्या पोटावर लेप केल्यास पोट दुखणे कमी होते.

* बाळाच्या पोटावर हलका शेक करण्यानेही बहुतेक वेळेला पोट दुखायचे लगेचच थांबते. यासाठी गरम तव्यावर सुती हातरूमाल गरम करून, चटका बसणार नाही याची खात्री करून बाळाचे पोट शेकावे.

*बाळाची शी होण्यासाठी

मुलांना रोज कमीत कमी १-२ वेळा शी व्हायला हवी. रोज पोट साफ होत नसल्यास, खडा होत असल्यास किंवा बाळाला शी करायला जोर लावावा लागत असेल तर पुढील उपाय करावे


*आईने आहार हलका ठेवावं वातूळ पदार्थ टाळावे. उकळून कोमट केलेलं पाणीच प्यावे व जेवणानंतर ओवा, बडीशेप, बाळंतशेप, जिरे, सैंधव यांचे मिश्रण मुखशुद्धीप्रमाणे खावे किंवा चूर्ण करून गरम पाण्याबरोबर घ्यावे.


*बाळाच्या पोटावर एरंडेल तेल हलक्‍या हाताने चोळावे.


*१०-१५ काळ्या मनुका कोमट पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी बाळाला पाजावे.


*आईच्या आहारात साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश असावा.


*आई ने गरम पाणी पुरेशा प्रमाणात प्यावे. ते. "शी'च्या जागी बोटाने एरंडेल तेल लावावे.


*एक दाण्या एवढे हिंग व दोन चार थेंब पाणी दिल्यास शी होते

पोस्ट आवडल्यास आयुर्वेद प्रचार हे पेज लाईक शेअर करा.

कुठलाही आजारावरील निशुल्क उपाययोजना साठी व्हाँटसप करा.


वैद्य. गजानन.




Featured post

Lakshvedhi