Friday, 16 June 2023

खालील काही सामान्य आरोग्यदायी टिप्स पाळा आणि उत्तम आरोग्य मिळवा*

 *खालील काही सामान्य आरोग्यदायी टिप्स पाळा आणि उत्तम आरोग्य मिळवा*

1 कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा. वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. 

2 दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील.

3 जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या. 

4 रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका. आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. ताजे, सकस व पौष्टिक जेवण घ्या. 

5 रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सिझनल फळे व भाज्यांचा समावेश करा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीविटामिन सप्लिमेंट्स घ्या. तुमच्या शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य ठेवण्यासाठी दररोज मल्टीविटामिन सप्लिमेंट घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण अनेक व्हिटॅमिन्स आपल्याला रोजच्या अन्नातून मिळतीलच असे नाही. 

6 व्हिटॅमिन A, B6, B12, C, D आणि E, तसेच जस्त, लोह, तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून त्यासाठी आवश्यकता असेल तर डॉक्टरांना विचारून मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या. 

7 दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतोवर टाळा किंवा मर्यादित ठेवा. त्याऐवजी नारळपाणी, ताक, लिंबू सरबत, घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणे फायदेशीर आहे. पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका. साध्या पाण्याबरोबरच डिटॉक्स वॉटर किंवा इन्फ्युज्ड वॉटर प्या.

8 नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे. दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे. 

9 तुमचा स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवतो. म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. 

10 पुरेशी शांत झोप घ्या. तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे. जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो. म्हणूनच दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. 

11 मद्यपान व धुम्रपानापासून लांब राहा. धुम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका. मद्यपानामुळेही लिव्हर व किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवा. 

12 शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याचीही काळजी घ्या. आयुष्यातील ताणतणाव व भावनांचे योग्य व्यवस्थापन करा. जर तुम्हाला काही कारणाने नैराश्य किंवा अँझायटी किंवा इतर काही मानसिक त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय मदत घेण्यास संकोच करू नका. 

13 आपल्या मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य जपणे देखील तितकेच महत्वाचे आहे. प्राणायाम व ध्यानधारणा करणे, रोजनिशी लिहिणे, छंद जोपासणे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे यामुळे मनावर सकारात्मक परिणाम होतात आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

संकलन-

 डॉ. प्रमोद ढेरे,

शासन दिव्यांगांच्या दारी’!प्रत्येक जिल्ह्यात शिबिराचे आयोजन होणार

 शासन दिव्यांगांच्या दारी’!प्रत्येक जिल्ह्यात शिबिराचे आयोजन होणार

एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ मिळणार

            मुंबई दि. 15 : राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून त्यांच्या नियंत्रणाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे समितीचे सदस्य सचिव असतील.

            शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान सुरु केले असून आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आहेत.

            दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानेच दिव्यांगांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली आहे, त्यांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी शासनाने "दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी" हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास २९ लाख लोकसंख्या असलेल्या दिव्यांग बांधवांना याचा फायदा होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात एकूण २९ लाख ६३ हजार ३९२ दिव्यांगांची संख्या असून त्यापैकी केवळ ९ लाख दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र प्राप्त झाले आहे, उर्वरित दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र नसल्याने अनेक योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या शिबिरात वैश्विक ओळखपत्र देण्याच्या कार्यक्रमाला गती मिळणार आहे.

            त्याचबरोबर शेत जमिनी संबंधित कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र व अन्य आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी देखील या एक दिवसीय शिबिराची मदत मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनातून तसेच सामाजिक संस्था यांच्या सीएसआर मधून उपलब्ध झालेली दिव्यांगांना लागणारी विविध उपकरणे देखील वाटप करण्यात येणार आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली असून त्यांची मुख्य मार्गदर्शक म्हणून या अभियानाकरिता नियुक्ती केलेली आहे. या अभियानाची सुरुवात दि. ७ जून रोजी मुंबई येथून करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यात देखील मुख्य मार्गदर्शक यांच्या सूचनाप्रमाणे कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

मुंबईत एकाच दिवशी साडेतीन हजार दिव्यांगांना लाभ

            'दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी' उपक्रमाची मुंबई येथुन सुरूवात झाली आहे.

            दि. ७ जून रोजी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील ३५०० दिव्यांग व्यक्तींनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला. एकूण ६० विभागांचे स्टॅाल या उपक्रमामध्ये सहभागी होते, विविध ९० शासकीय सुविधांची/ योजनांची माहीती व अर्ज या स्टॅालवर उपलब्ध होते, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन यांनी दिली.

****

मान्सूनची “केरळ स्टोरी”

 विषय :

मान्सूनची “केरळ स्टोरी”

(मान्सून आणि केरळ यांचे घट्ट नाते! ते उलगडण्यासाठी ‘भवताल’ तर्फे नुकतेच Welcoming Monsoon @Kerala या इकोटूरचे आयोजन केले होते. 

त्याद्वारे उलगडलेली ‘मान्सूनची केरळ स्टोरी’ सांगणारा कट्टा...)

वक्ते :

अभिजित घोरपडे

(संस्थापक, भवताल मंच / हवामान अभ्यासक)

शुक्रवार, १६ जून २०२३

सायं. ७ ते ८.३०

सहभागासाठी:

झूम लिंक -

http://bitly.ws/IaoB

Meeting ID: 883 6323 2615

Passcode: 601646

किंवा

भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह.

पेजची लिंक- https://facebook.com/bhavatal

--

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9

545350862 / bhavatal@gmail.com

घामाचा वास येणे✍*

 *घामाचा वास येणे✍*

शरीरात त्वचेवर असलेल्या बँक्टेरीया व क्लोरोफीलच्या कमतरतेमुळे ही वास येत असतो.

उपाय-

१)कायाकल्प क्वाथ,गिलोय घनवटी दोन दोन गोळ्या

२)शितसुधा रस रोज घेणे.

३)गुलाब जल व लिंबूरस अंगाला लाऊन आंघोळ करणे.

४)बेसन व बेकींग सोडा एकत्र करुन महीनाभर अंगाला लावणे.

५)गहू रोपरस घेणे दोन चमचे

६)तुरटीच्या पाण्याने अंघोळ करणे.

७)मध व लिंबू रस ज्या पोरशन ला घाम येते तेथे लावणे.

पथ्य-मीठ,गोड पदार्थ, व मटण,मास कमी करणे,लालमटण खाऊ नये.तसेच कांदा,लसुण कमी करणे.

काय खावे-हिरवा भाजीपाला जास्त खाणे .

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*

शीतपीत्त अर्टिकेरीया,*

 *शीतपीत्त अर्टिकेरीया,*

उर्टिकरिता

आयुर्वेदामध्ये, अर्टिकेरियाचे वर्णन शीतपीत नावाने केले आहे शीतपीत्त हा शब्द शीत आणि पीत्त या दोन शब्दांपासून बनलेला आहे, ज्यामध्ये पित्त म्हणजे उष्णता आणि शीत म्हणजे थंड

प्रामुख्याने थंड हवामानात जास्त प्रमाणात अंगाला पित्त उठत असल्याने या समस्येला 'शीतपित्त' असे नाव दिलेले आहे.आयुर्वेदा नुसार या आजारात वाताचे आधिक्य जास्त असते म्हणून यास शीतपित्त म्हणतात.तर या आजारात कफाचे आधिक्य असेल तर उदर्द म्हणतात.

   शीतपित्ताला आधुनिक वैद्यकीय भाषेत अर्टिकेरिया असे म्हणतात तर बोलीभाषेत 'अंगावर पित्त उठणे' असे म्हंटले 

काही वर्षांपूर्वी हा आजार उन्हाळ्यातून पावसाळ्यात प्रवेश करताना तसेच पावसाळ्यातून थंडीत प्रवेश करतानाच होत असे. परंतु, गेल्या दशकात याचे प्रमाण खूपच वाढले असून प्रमुख त्रास देणाऱ्या आजारांमध्ये आज याचा समावेश झाला 

*आधुनिक वैद्यकीय भाषेत का होतो हा आजार*

      त्वचेतील केशिका (सूक्ष्म रक्तवाहिन्या) हिस्टामीन या द्रव्यामुळे आणि रोहिणिका (रोहिणीपेक्षा लहान पण केशिकेपेक्षा मोठ्या रक्तवाहिन्या) ॲसिटिलकोलीन या द्रव्यामुळे एकदम प्रसारित होऊन त्यांच्यातून रक्तरस (रक्त गोठल्यावर उरणारा पिवळसर व न गोठणारा पेशीरहित द्रवपदार्थ) बाहेर पडून त्वचेच्या वरच्या वा आतल्या भागात साठतो, ही या रोगाची संप्राप्ती (कारणमीमांसा) आहे. गांधी उठण्याला अनेक कारणे असली, तरी त्या सर्वांचे मूळ कारण म्हणजे शरीरातील ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांमध्ये) विशिष्ट पदार्थांविरुद्ध अधिहर्षता (ॲलर्जी) उत्पन्न होणे हे आहे.

*लक्षण

 अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रुग्णाच्या शरीराच्या एखाद्या भागावर किंवा संपूर्ण शरीरावर लाल गांधी उठतात आणि खूप खाज सुटते. या गांधीगुलाबी किंवा त्वचेचे रंगाचे असू शकतात.

गाठी असलेली त्वचा जेव्हा दाबून सोडली जाते तेव्हा पांढरेपण दिसून येते,शरीरातल्या नवीन भागांमध्ये शीतपित्त सहजपणे दिसू लागत आणि अदृश्य देखील होत.मुख्य म्हणजे त्वचेवर आग होत असली तरी अंगात मात्र बारीक थंडी वाजत असते. ताप नसला तरी तोंडाला चव नसते. मळमळून उलटी देखील काही रुग्णांत होते. या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प्रमाणात आढळून येते

*कारणे ः *अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठींच्या संभाव्य कारणांमध्ये खराब पचन, औषधांच्या प्रतिक्रिया, झोप न लागणे, रात्री उशिरा झोपण्याची सवय किंवा दिवसा झोपताना, जास्त खारट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले अन्न सेवन, थंड पदार्थांचे सेवन, थंड प्रदेशात किंवा हवामानात राहणे, थंड वाऱ्याचा संपर्क या गोष्टी कारणीभूत आहेत.

*कशामुळे त्रास होऊ शकतो*ः

काही जणांना विशिष्ट पदार्थ खाल्यानंतर असा त्रास होऊ लागतो. यामध्ये अंडी, शेंगदाणा, काजू, मासे, ,मांसाहार, स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा डाळ, तूर डाळ वैगेरे खाद्यपदार्थ यापैकी कशाचीही ऍलर्जी असू शकते. असा पदार्थ खाण्यात आल्यास त्यांच्या अंगावर पित्त उठते.विशिष्ट औषधे घेत असल्यासही असा त्रास होऊ शकतो. यामध्ये अँटीबायोटिक्स किंवा वेदनाशामक औषधे यांची ऍलर्जी असू शकते. घरातील कुत्री, मांजरी, घोडे इत्यादी पाळीव प्राण्यांच्या केसांची ऍलर्जी असल्यास त्यामुळे अंगावर पित्त उठू शकते.

थंड वातावरण, थंड पदार्थ यामुळे अंगावर पित्त उठू शकते,सूर्यप्रकाश, उष्ण वातावरण, उष्ण पदार्थ यांची ऍलर्जी असल्यास त्यामुळेही अंगावर पित्त येते.

्धूळ, धूर, हवेतील प्रदूषण, परागकण, केमिकल्स यांच्या संपर्कात आल्यामुळे, टेरेलीन, टेरीकाट अशा कपडांची ऍलर्जी असल्यास शितपित्त होऊ शकते.

तसेच पोटामध्ये कृमी व जंत झाल्याने, कीटक चावल्याने किंवा सर्दीसारखे इन्फेक्शन झाल्यामुळेही अंगावर पित्त उठू शकते.

*आहार*ः

अशा परिस्थितीत आपल्या नकळत आपण चुकीचा आहारही घेतो. तिखट चमचमित खाणे, ठेचा वापरणे, जागरण करणे आणि चहा पिणे, आंबट ताक- दही वारंवार खाणे यामुळे पित्तप्रकोप होतो आणि त्वचेवर लालसर रंगाची आग होणारी मंडले निर्माण करतो.

*काय आहार घ्यावा.*

आजाराचे मूळ खाण्यात आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. बदलत्या वातावरणाप्रमाणे बदलता पथ्यकर आहार ही व्याधी मुळासह नष्ट करण्यास सहाय्य ठरतो. तात्पुरत्या बरे वाटणाऱ्या इतर औषधांना पथ्याची जोड दिल्यास फायदा होतो.

शीतपित्ताचा त्रास असताना मुगाचे काढण व मसुराची डाळ अत्यंत गुणकारी ठरते. तुरीची डाळ व मटकीसारखी डाळसुद्धा पथ्यकर असून या दोन्हींनीही शीतपित्त वाढत नाही,जायफळ व केशर ही द्रव्ये ,गायीचे दूध,आल्याचा रस घ्यावा,वरचेवर शीतपित्ताचा त्रास होत असल्यास आहारात *तूप घालून वरण भात खावा*. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा यामध्ये खूप चांगला उपयोग होतो.

शीतपित्त असताना आवर्जूनह. सेवन करावीत. फायदा होतो.

उपचार ः

* गिलोय, हळद, आवळा आणि कडुलिंब एकत्रित करून काढा बनवा. 

*कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ करू शकता.

*खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल संपूर्ण शरीरावर लावल्याने फायदा होतो.

* समस्या दीर्घकाळ असेल तर तुम्ही पंचकर्माची मदत घेऊ शकता 

 *3 ग्रॅम (1/2 चमचे) हळद आणि एक काळी मिरीची पावडर एक ग्लास दूध किंवा पाण्यासोबत दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे

*काळी मिरी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. काळी मिरी बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात तूप मिसळा आणि ती पेस्ट खाज, पुळ्यावर लावा. ह्याने बरं वाटेल.

*अंगावर पित्त झाल्यावर तेथे एलोवेरा जेल लावल्याने आराम मिळतो.

*तुळशीच्या सेवनाने थंडीत शीतपित्ताने होणाऱ्या समस्येवर मात करता येते. अशा स्थितीत तुळशीची पाने नीट धुवून त्याचा चहा तयार करा. आता ह्या चहाचे सेवन केल्याने केवळ रक्त शुद्ध होत नाही तर शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.

*अंगावर पित्त आल्यावर तेथे हळदीचा लेप लावल्यास होणारी खाज कमी होऊन आराम पडतो.

3-4 आमसुले पाण्यात भिजत घालावीत व ते पाणी अंगाला लावावे.

*खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून लावल्यासही फायदा होतो. हळदीपासून बनवलेले हरिद्राखंड हे औषध या गांधींवर उत्तम कार्य करते.

*,आयुर्वेदिक उपाययोजना

*सुतशेखर वटी, कामदुधा वटी ,आरोग्यवर्धीनी, परिपाठादी काढा,रक्तदोषांतक, महामंजिष्ठादी काढा,कायाकल्प वटी. यांसारखी अनेक औषधे उत्तम कार्य करतात फक्त तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावी.

*पोट साफ राहील याकडे लक्ष द्यावे. एरंडेल तेल चमचाभर रात्री झोपताना घेतल्यास पोट साफ राहण्यास मदत होते.

*अंगाला खाज येऊन पित्त उठल्यास अंगाला करंज तेल चोळावे. ज्यामुळे त्वचा कोरडी राहत नाही आणि खाज कमी होते.

*लेख आवड्याल शेअर करा*

वैद्य गजानन

श्रावण आला रे

Featured post

Lakshvedhi