*शीतपीत्त अर्टिकेरीया,*
उर्टिकरिता
आयुर्वेदामध्ये, अर्टिकेरियाचे वर्णन शीतपीत नावाने केले आहे शीतपीत्त हा शब्द शीत आणि पीत्त या दोन शब्दांपासून बनलेला आहे, ज्यामध्ये पित्त म्हणजे उष्णता आणि शीत म्हणजे थंड
प्रामुख्याने थंड हवामानात जास्त प्रमाणात अंगाला पित्त उठत असल्याने या समस्येला 'शीतपित्त' असे नाव दिलेले आहे.आयुर्वेदा नुसार या आजारात वाताचे आधिक्य जास्त असते म्हणून यास शीतपित्त म्हणतात.तर या आजारात कफाचे आधिक्य असेल तर उदर्द म्हणतात.
शीतपित्ताला आधुनिक वैद्यकीय भाषेत अर्टिकेरिया असे म्हणतात तर बोलीभाषेत 'अंगावर पित्त उठणे' असे म्हंटले
काही वर्षांपूर्वी हा आजार उन्हाळ्यातून पावसाळ्यात प्रवेश करताना तसेच पावसाळ्यातून थंडीत प्रवेश करतानाच होत असे. परंतु, गेल्या दशकात याचे प्रमाण खूपच वाढले असून प्रमुख त्रास देणाऱ्या आजारांमध्ये आज याचा समावेश झाला
*आधुनिक वैद्यकीय भाषेत का होतो हा आजार*
त्वचेतील केशिका (सूक्ष्म रक्तवाहिन्या) हिस्टामीन या द्रव्यामुळे आणि रोहिणिका (रोहिणीपेक्षा लहान पण केशिकेपेक्षा मोठ्या रक्तवाहिन्या) ॲसिटिलकोलीन या द्रव्यामुळे एकदम प्रसारित होऊन त्यांच्यातून रक्तरस (रक्त गोठल्यावर उरणारा पिवळसर व न गोठणारा पेशीरहित द्रवपदार्थ) बाहेर पडून त्वचेच्या वरच्या वा आतल्या भागात साठतो, ही या रोगाची संप्राप्ती (कारणमीमांसा) आहे. गांधी उठण्याला अनेक कारणे असली, तरी त्या सर्वांचे मूळ कारण म्हणजे शरीरातील ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांमध्ये) विशिष्ट पदार्थांविरुद्ध अधिहर्षता (ॲलर्जी) उत्पन्न होणे हे आहे.
*लक्षण
अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रुग्णाच्या शरीराच्या एखाद्या भागावर किंवा संपूर्ण शरीरावर लाल गांधी उठतात आणि खूप खाज सुटते. या गांधीगुलाबी किंवा त्वचेचे रंगाचे असू शकतात.
गाठी असलेली त्वचा जेव्हा दाबून सोडली जाते तेव्हा पांढरेपण दिसून येते,शरीरातल्या नवीन भागांमध्ये शीतपित्त सहजपणे दिसू लागत आणि अदृश्य देखील होत.मुख्य म्हणजे त्वचेवर आग होत असली तरी अंगात मात्र बारीक थंडी वाजत असते. ताप नसला तरी तोंडाला चव नसते. मळमळून उलटी देखील काही रुग्णांत होते. या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प्रमाणात आढळून येते
*कारणे ः *अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठींच्या संभाव्य कारणांमध्ये खराब पचन, औषधांच्या प्रतिक्रिया, झोप न लागणे, रात्री उशिरा झोपण्याची सवय किंवा दिवसा झोपताना, जास्त खारट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले अन्न सेवन, थंड पदार्थांचे सेवन, थंड प्रदेशात किंवा हवामानात राहणे, थंड वाऱ्याचा संपर्क या गोष्टी कारणीभूत आहेत.
*कशामुळे त्रास होऊ शकतो*ः
काही जणांना विशिष्ट पदार्थ खाल्यानंतर असा त्रास होऊ लागतो. यामध्ये अंडी, शेंगदाणा, काजू, मासे, ,मांसाहार, स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा डाळ, तूर डाळ वैगेरे खाद्यपदार्थ यापैकी कशाचीही ऍलर्जी असू शकते. असा पदार्थ खाण्यात आल्यास त्यांच्या अंगावर पित्त उठते.विशिष्ट औषधे घेत असल्यासही असा त्रास होऊ शकतो. यामध्ये अँटीबायोटिक्स किंवा वेदनाशामक औषधे यांची ऍलर्जी असू शकते. घरातील कुत्री, मांजरी, घोडे इत्यादी पाळीव प्राण्यांच्या केसांची ऍलर्जी असल्यास त्यामुळे अंगावर पित्त उठू शकते.
थंड वातावरण, थंड पदार्थ यामुळे अंगावर पित्त उठू शकते,सूर्यप्रकाश, उष्ण वातावरण, उष्ण पदार्थ यांची ऍलर्जी असल्यास त्यामुळेही अंगावर पित्त येते.
्धूळ, धूर, हवेतील प्रदूषण, परागकण, केमिकल्स यांच्या संपर्कात आल्यामुळे, टेरेलीन, टेरीकाट अशा कपडांची ऍलर्जी असल्यास शितपित्त होऊ शकते.
तसेच पोटामध्ये कृमी व जंत झाल्याने, कीटक चावल्याने किंवा सर्दीसारखे इन्फेक्शन झाल्यामुळेही अंगावर पित्त उठू शकते.
*आहार*ः
अशा परिस्थितीत आपल्या नकळत आपण चुकीचा आहारही घेतो. तिखट चमचमित खाणे, ठेचा वापरणे, जागरण करणे आणि चहा पिणे, आंबट ताक- दही वारंवार खाणे यामुळे पित्तप्रकोप होतो आणि त्वचेवर लालसर रंगाची आग होणारी मंडले निर्माण करतो.
*काय आहार घ्यावा.*
आजाराचे मूळ खाण्यात आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. बदलत्या वातावरणाप्रमाणे बदलता पथ्यकर आहार ही व्याधी मुळासह नष्ट करण्यास सहाय्य ठरतो. तात्पुरत्या बरे वाटणाऱ्या इतर औषधांना पथ्याची जोड दिल्यास फायदा होतो.
शीतपित्ताचा त्रास असताना मुगाचे काढण व मसुराची डाळ अत्यंत गुणकारी ठरते. तुरीची डाळ व मटकीसारखी डाळसुद्धा पथ्यकर असून या दोन्हींनीही शीतपित्त वाढत नाही,जायफळ व केशर ही द्रव्ये ,गायीचे दूध,आल्याचा रस घ्यावा,वरचेवर शीतपित्ताचा त्रास होत असल्यास आहारात *तूप घालून वरण भात खावा*. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा यामध्ये खूप चांगला उपयोग होतो.
शीतपित्त असताना आवर्जूनह. सेवन करावीत. फायदा होतो.
उपचार ः
* गिलोय, हळद, आवळा आणि कडुलिंब एकत्रित करून काढा बनवा.
*कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ करू शकता.
*खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल संपूर्ण शरीरावर लावल्याने फायदा होतो.
* समस्या दीर्घकाळ असेल तर तुम्ही पंचकर्माची मदत घेऊ शकता
*3 ग्रॅम (1/2 चमचे) हळद आणि एक काळी मिरीची पावडर एक ग्लास दूध किंवा पाण्यासोबत दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे
*काळी मिरी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. काळी मिरी बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात तूप मिसळा आणि ती पेस्ट खाज, पुळ्यावर लावा. ह्याने बरं वाटेल.
*अंगावर पित्त झाल्यावर तेथे एलोवेरा जेल लावल्याने आराम मिळतो.
*तुळशीच्या सेवनाने थंडीत शीतपित्ताने होणाऱ्या समस्येवर मात करता येते. अशा स्थितीत तुळशीची पाने नीट धुवून त्याचा चहा तयार करा. आता ह्या चहाचे सेवन केल्याने केवळ रक्त शुद्ध होत नाही तर शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
*अंगावर पित्त आल्यावर तेथे हळदीचा लेप लावल्यास होणारी खाज कमी होऊन आराम पडतो.
3-4 आमसुले पाण्यात भिजत घालावीत व ते पाणी अंगाला लावावे.
*खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून लावल्यासही फायदा होतो. हळदीपासून बनवलेले हरिद्राखंड हे औषध या गांधींवर उत्तम कार्य करते.
*,आयुर्वेदिक उपाययोजना
*सुतशेखर वटी, कामदुधा वटी ,आरोग्यवर्धीनी, परिपाठादी काढा,रक्तदोषांतक, महामंजिष्ठादी काढा,कायाकल्प वटी. यांसारखी अनेक औषधे उत्तम कार्य करतात फक्त तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावी.
*पोट साफ राहील याकडे लक्ष द्यावे. एरंडेल तेल चमचाभर रात्री झोपताना घेतल्यास पोट साफ राहण्यास मदत होते.
*अंगाला खाज येऊन पित्त उठल्यास अंगाला करंज तेल चोळावे. ज्यामुळे त्वचा कोरडी राहत नाही आणि खाज कमी होते.
*लेख आवड्याल शेअर करा*
वैद्य गजानन
No comments:
Post a Comment