Thursday, 15 June 2023

ई- ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करा

 ई- ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करा


- सचिव सुमंत भांगे


           


            मुंबई दि. 15 : शासकीय कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे धोरण असून या प्रणालीच्या वापरामुळे कामकाज अधिक सुलभ व कागद विरहित होणार आहे. शासकीय कामकाजामध्ये ई- ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले.


            आज मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या वापराबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी सचिव श्री.भांगे बोलत होते.


            यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव रवींद्र गोरवे, सहाय्यक संचालक कल्याण अवताडे उपस्थित होते.


            श्री.भांगे म्हणाले, मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई- ऑफिसच्या माध्यमातून पाठविण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही प्रणाली कशा पद्धतीने राबविण्यात येते. तसेच ई- ऑफिस प्रणालीच्या तांत्रिक बाजू समजून घ्याव्यात व या प्रणालीचा वापर तात्काळ सुरू करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय...*

 *पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय...*


  १) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या.

    २) १०० मि.लि पाण्यात एक चमचा मेथि दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे. व जेवणानंतर हे मेथिचे दाणे घालून खावे. याने सकाळी पोट साफ होते.

   ३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर घ्या. पाण्यासोबत.,

  ४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे., रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात इसबगोल मिसळून घ्यावे..

  ५) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध घ्यावे.

   ६), दूधात दोन तीन अंजिर उकळून मग अंजिर खावे . आणि वरून दूध घ्यावे..

   ७) एक ग्लास पाण्यात २ चमचे कोरफड गर मिसळून घ्यावे..,. त्रिफळा चूर्ण मातिच्या भांड्यात भिजवून मग सकाळी हे गाळून घ्यावे. याने पोट साफ होते.

    ८) रात्री झोपण्यापूर्वी एक कप पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तुप व किंचित सैंधव मीठ घालून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते.

     ९) रोज सकाळी दोन खजुर साजुक तुपासोबत खाल्ल्यास पोट साफ होते..

     १०) ताजी कोरफड मंद गॅसवर भाजून, नंतर साल काढून, यातिल गर मलमलच्या कपड्यात गाळून, त्यात मध मिसळून घ्यावे.. याने सकाळी पोट साफ होते..

    ११,) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून ओवा खावा, याने पोट साफ होते..

    १२) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून एरंडेल तेल घ्यावे, याने सकाळी पोट साफ होते..


 वरील उपाय करावेत आणि, आहारात नेहमी पालेभाज्या फळे खावीत.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,



ऑयली त्वचा (Oily Skin) साठी उपाय कसा करावा :*

 *👉ऑयली त्वचा (Oily Skin) साठी उपाय कसा करावा :*


1) बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो.


2) मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.


3) हळद, मुलतानी माती आणि चंदन यांचा लेप चेहऱ्यातील मॉश्चराइज ओढून घेतो आणि स्कीन ऑईल फ्री होते. या घरगुती उपाया मुळे स्कीन टाईट होते. यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश दिसाल. हा लेप लावल्यावर 30 मिनिटांनी चेहरा धुवावा.


4) चेहऱ्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी चोळल्यामुळे देखील फायदा होतो.


👉चेहरा गोरा आणि सुंदर कसे बनवायचे :


1) एलो वीरा ज्यूस, एप्पल साइडर विनिगर आणि हळद, या तीन वस्तू मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सावळे पण दूर होतो.


2) गोरा रंग मिळवण्यासाठी हळद आणि लिंबूरस वापरणे उत्तम आहे. हा उपाय तेलकट त्वचेच्या लोकांसाठी उत्तम आहे.


3) दुधा ची मलाई, बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा. हा लेप चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. ऑईल स्कीन वाल्यांनी हा उपाय करू नये. ड्राय स्कीन वाले करू शकतात.


4) मध, गुलाबाच्या पाकळ्या आणि दुध यांचा लेप रंग उजळण्या साठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी वापरा.


5)बाहेरून आल्यावर त्वरित चेहरा स्वच्छ धुवावा कारण त्वचेच्या रोम छिद्रात मळ जमा होऊ शकतो.


6) पपई चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी फायदेशीर आहे. कच्ची पपई dead skin cells दूर करण्यासाठी उपयोगी आहे.


 👉तुळशीची पाने बारीक वाटून याचा लेप चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा टवटवीत होतो.


👉अननस आणि पिकलेले टोमाटो चेहऱ्यावर face pack बनवून लावल्याने हळूहळू गोरे पण येईल.


👉वाफ घेतल्याने छिद्रात साठलेले तेल, माती आणि डेड स्कीन सेल्स सहज निघून जातात. हा skin care चा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे.


👉दही, आवळा पावडर, हळद आणि बेसन मिक्स करून एलोवीरा ज्यूस आणि थोडा लिंबूरस मिक्स करून फेशियल पैक तयार करा. यास चेहऱ्यावर लावा. या उपायाने काळे दाग दूर होतील आणि skin moisturize होईल.


☝️शरीराची बाहेरील सुंदरता वाढवण्यासाठी आवश्यक आहे कि तुम्ही शरीराच्या आतून देखील निरोगी असले पाहिजे. वर सांगितलेले ब्युटी चे घरगुती उपाय करण्या सोबतच आवश्यक आहे तुम्ही हे उपाय देखील केले पाहिजेत.


👉पौष्टिक भोजन खावे ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील आणि त्वचा निरोगी राहील. यासाठी तळलेले, मसालेदार, फास्ट फूड खाण्याच्या एवजी विटामिन आणि मिनरल्स असलेले पदार्थ आहारात घ्यावेत.


👉पोटाच्या आजारा पासून स्वताला वाचवा. सकाळी पोट सोफ्ट करण्यासाठी गरम पाण्यात थोडासा लिंबूरस, मध आणि अद्रक रस मिक्स करून प्यावे.


👉रोज 3 ते 4 लीटर पाणी प्यावे ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातील.


👉वेळेवर भोजन करावे.


👉रोज व्यायाम करावा.

तणाव मुक्त राहावे आणि चांगली झोप घ्यावी.


👉खाण्यापिण्याच्या वाईट सवयी पासून वाचावे.


👉जर तुम्ही पिंपल्स ने हैराण आहे तर कांदा आणि लसून यांची पेस्ट बनवून यामध्ये कडूलिंबाची पाने मिक्स करून पेस्ट बनवा. आता हे मिश्रण थोडी हळद मिक्स करून फेस वर लावा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाफ घेऊ शकता ज्यामुळे pimples दूर होतील.




भांडूप पोलिस स्टेशन येथेमहिला समुपदेशन केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 भांडूप पोलिस स्टेशन येथेमहिला समुपदेशन केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 15 : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येत्या पंधरा दिवसात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात अर्ज करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी केले आहे.


            त्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :- अर्जदार संस्था मुंबई उपनगर जिल्हयातील (स्थानिक) तसेच महिला पदाधिकारी असल्यास प्रथम प्राधान्य असेल., संस्था नोंदणी अधिनियम १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे., संस्थेस किमान ३ वर्षांचा महिला समुपदेश क्षेत्रातील अनुभव आवश्यक जास्त अनुभव असल्यास प्राधान्य., समुपदेशनासाठी एमएसडब्ल्यू (MSW) उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागदपत्र जोडणे आवश्यक आहे., संस्थेची घटना व नियमावली आवश्यक ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे हा उददेश असावा, सनदी लेखापालांची स्वाक्षरी असलेला मागील तीन वर्षांचा अहवाल (ऑडीट रिपोर्ट ), संस्थेचे मागील तीन महिन्यांचे माहिना निहाय बँक स्टेटमेंट जोडावे., संस्थेचे कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी, संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत तसेच कोणीही सदस्य शांसकीय सेवेत नाहीत याबाबतचे हमीपत्र सोबत जोडावे., संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. आवश्यक, संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव) यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे विना दुराचार प्रमाणपत्र जोडावे., ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव आवश्यक आहे. (सोबत आवश्यक ती कागदपत्रे पुरावा म्हणून जोडावेत.) असे मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच. नागरगोजे यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.


००००

तूर, उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे,

 तूर, उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश


 


            नवी दिल्ली, 15 : तूर आणि उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, साठ्याच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आणि साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश, ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी राज्यांना दिले.


            तूर आणि उडीद डाळींचा साठा जाहीर करण्यासंदर्भात आणि राज्य सरकारांकडून साठा मर्यादेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्यांचे अन्न आणि नागरी पुरवठा विभाग, केंद्रीय गोदाम महामंडळ (सीडब्लूसी) आणि राज्य गोदाम महामंडळ एसडब्लूसी) यांची श्रीमती खरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.


            ग्राहक व्यवहार विभागाने 2 जून 2023 रोजी साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी तसेच तूर आणि उडीद डाळीचे दर ग्राहकांना परवडतील असे ठेवण्यासाठी अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू करत तूर आणि उडीद यांच्या साठ्यांवर मर्यादा घातली होती.


            या आढावा बैठकीत, दोन्ही डाळींचे किरकोळ दर, डाळी साठवणूक करणाऱ्या विविध उद्योगांनी जाहीर केलेला साठा, केंद्रीय गोदाम महामंडळ आणि राज्य गोदाम महामंडळांकडील साठा तसेच तत्सम विषयांवर चर्चा करण्यात आली. बाजारातील साठवणूकदार उद्योगांनी बँकेकडे तारणाच्या स्वरुपात दाखवलेला साठा आणि पोर्टलवर जाहीर केलेला साठा यामधील तफावतीची पडताळणी करण्यासाठी राज्यांनी उचललेली पावले आणि साठा मर्यादेची अंमलबजावणी या मुद्यांवर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सीडब्लूसी आणि एसडब्लूसी यांना त्यांच्या गोदामांमध्ये असलेल्या तूर आणि उडीद डाळींच्या साठ्याचे तपशील सादर करण्यास सांगण्यात आले.


            या डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि साठवणूकदार उद्योगांच्या साठ्यांच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आणि ज्यांनी साठा मर्यादा आदेशाचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारांना बैठकीत देण्यात आले.


            मार्च 2023 रोजी विभागाने आयातदार, मिलर्स, साठवणूकदार, व्यापारी यांच्याकडे असलेल्या साठ्यावर राज्य सरकारांच्या समन्वयाने देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. यासाठी, विभागाने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधील विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे.


००००



 


कच्ची पपयी.*

 *कच्ची पपयी.*



काही आवश्यक माहिती. शरीरातील वाढतं युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कच्ची पपई हा रामबाण उपाय ठरतो. हा नैसर्गिक उपाय असल्याने कच्ची पपई खाल्ल्याने कुठलेच साईड इफेक्ट्स होत नाहीत.शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्याने विविध आजारांना आणि दुखण्यांना सामोरं जावं लागतं. संधिवात म्हणजेच अर्थरायटिस सारखं गंभीर दुखणं कोणत्याही वयात होऊ शकतं. यासाठीच युरिक अ‍ॅसिड आणि इतर अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचं शरीरातील वाढणारं प्रमाण नियंत्रणात राखणं गरजेचं आहे. संधिवात हा आजार बहुतांशपणे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत दिसून येणारा आजार आहे. या आजाराची लागण होऊ नये यासाठी आहारात कच्च्या पपईचा वापर अनिवार्य ठरतो. संधिवात झालेल्या व्यक्तींना उठणं, बसणं, फिरणं या साध्या हालचाली करताना अत्यंतिक वेदना होतात.शरीसाठी आवश्यक अँटिऑक्सिडंटचं आणि खनिजांचं, जीवनसत्त्वांचं प्रमाण कच्च्या पपईत भरपूर प्रमाणात आढळून येतं. कच्च्या पपईत कॅलरीजचं प्रमाणही अतिशय कमी असतं तर व्हिटॅमिन सी, फोलेट अर्थात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई यांचं प्रमाण मुबलक असतं. या तीन व्हिटॅमिन्समुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहतं, पर्यायाने संधिवाताच्या पेशंट्सच्या तब्येतीला आराम पडतो.शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या पपईचा ज्युस घेणं गुणकारी आहे. या ज्युसमध्ये लिंबू किंवा मध घालून सेवन केल्यास तो शरीराला विपुल प्रमाणात आवश्यक ते पोषक घटक देतो. हा ज्युस सकाळी उठल्यावर अनुशापोटी घेतल्यास निश्चितच खूप फायदा होतो. इतकंच नाही तर वजन घटवण्यासाठी ही कच्ची पपई वरदानच ठरते. यासोबतच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात कच्च्या पपईच्या भाजीचा नियमितपणे समावेश केल्यास तब्येतीसाठी गुणकारी ठरतं. फक्त कच्च्या पपईच्या भाजीला थोडीशी मेथी आणि हिंग यांची फोडणी देऊन हळद आणि मीठ घालून शिजवून घ्यावी. म्हणूनच शरीरात युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढल्यास अँन्टिबायोटिक् घेण्याऐवजी नैसर्गिक अशा कच्च्या पपयांचा आहारातला समावेश विविध आजारांना रोखतोच, पण तब्येतही तंदुरूस्त ठेवतो                                                                                                            .प्रमोद पाठक.




खोकला... 👇व..त्यावर प्रभावी उपाय..*

 🇮 🇲 🇵 


*खोकला... 👇व..त्यावर प्रभावी उपाय..*


...(१). हळदिच्या दुधात खारिक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारिक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्या. याने कफ सुटतो व बाहेर पडतो . खोकला बरा होतो

...(२). आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो

....(३). लसुण प्रक्रुतीने उष्ण आहे. त्यात एन्टि बॅक्टेरियल गुण असतात, लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात, याने गळ्याला शेक बसतो. व बरं वाटतं.

     (४).. काळि मिरे, जायफळाची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो. दिवसातून दोन तीन वेळा घ्यावे.

.....(५) पिंपळि गाठ कुटून घ्यावे व मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो.

    (६) खोकला बरा होत नसेल तर नीलगिरिच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात मिसळून मग याने छातिला मालिश करा. याने कफ सुटतो व बरं वाटतं.

      (७) ज्येष्ठमध हे एक उपयुक्त औषध आहे. खोकल्याची उबळ आली कि, ज्येष्ठमध काडि चघळल्यास ढास जाते. बरं वाटते

.... किंवा ज्येष्ठमध व मध यांचे मिश्रण करून हे चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो..

      (८).. पुदिना पाने व तुळस. या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहे. १०-१५ पुदिन्याची पाने व १५-१६ तुळशी ची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून अर्ध झाले कि. एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम प्यावे. याने कफ सुटतो व बरं वाटतं.

     (९). लवंग व मध.. खोकला आल्यावर नुसती लवंग व मध खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून याचे चाटण दिवसभर घेतल्यास आराम मिळतो. बरेच वेळा रात्री ढास लागते. झोप लागत नाही. अशा वेळी. पाव चमचा जिरेपूड + पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उबळ जाते. मध मिसळून द्यावे त्यात..

    (१०).. सर्दि व खोकला झाल्यास मूठभर कडुनिंब पाने धूवून घ्या व एक चमचा ओवा त्यात घालून बारीक वाटावे व हा लेप कानशिलाला लावा.. संक्रमण दूर होतील

   (११). खोकला बरा होत नसेल तर चार वेलदोडे व तितकिच सुंठ पावडर एकत्र करून मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो 

   (१२).. नुसति कोरडी ढास लागलि असेल तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्या पावडर करून त्यात तुप व साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

  १३).. सारखा खोकला येत असेल, किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धने व एक तुकडा ज्येष्ठ मध टाकून उकळून घ्यावे आटवून अर्धं करा मग कोमट करून घ्या. याने आराम मिळतो.

(१४). खोकला, कफ, सर्दिवर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे.

(१५). खोकल्यावर सुंठिचि पावडर अर्धा चमचा + पिंपळि चूर्ण + बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

(१६) खोकला झाल्यास बडिशेप व खडिसाखर खावि.

(१७). एक चिमटि काताचि पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. बरं वाटते.

(१८). खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्यात पाच ,सहा मनुका घालून खावे..

(१९).. खोकला आल्यावर चिकणी सुपारी खावि

(२०). खोकला बरा होत नसेल तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून घ्यावे. दिवसातून तीन , चार वेळा घ्यावे. असे तीन दिवस घ्यावे.

(२१). कोरडा खोकला झाल्यास. खसखशिचि खिर खावि. मुठभर खसखस भाजून (तुपात). घ्या. मग दूधामध्ये शिजवून घ्या व गरम गरम प्यावे. साखर आवडिनुसार मिसळून द्यावे.

२२).. डांग्या खोकल्यावर तुरटि कुटून गरम करून घ्या. मग त्या त्या पाणि मिसळून ती बशी उन्हात ठेवावी. पाणी निघून जाते. व शुद्ध तुरटि शिल्लक राहते. त्यात एक चमचा मध मिसळून घ्यावे.

(२३).. तिळाचे तेल कोमट करून प्यावे.

(२४). बकुळिचि फुले ओंजळभर + सोनचाफ्याचि ओंजळभर फुले + दोन तांबे पाणी घेऊन साखर घालून काढा करावा व दिवसातून पाव वाटी घ्या.

(२५).. अडुळसा पाने वाफेवर उकडून, त्याचा रस काढून घ्यावा. व थोडा गूळ घालून पाव कप रस घ्यावा.

(२६).. एक कप दूधामध्ये लसणिच्या चार पाकळ्या उकळून घ्यावे.

(२७).. ज्येष्ठ मध + खडिसाखर चघळावि.

(२८). कोरफडिचि पाने भाजून घ्या. त्यांचा रस काढून घ्यावा.. एक चमचा रस घेऊन त्यात मध मिसळून घ्यावे..

(२९).. भिमसेन कापुर व एक चमचा साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो

(३०).. खोकला झाल्यास तुळशी ची पाने ठेचून व गरम करून या पोटिसनि छाति शेकावि..


सुनिता सहस्रबुद्धे


*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*




Featured post

Lakshvedhi