*कच्ची पपयी.*
काही आवश्यक माहिती. शरीरातील वाढतं युरिक अॅसिड कमी करण्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कच्ची पपई हा रामबाण उपाय ठरतो. हा नैसर्गिक उपाय असल्याने कच्ची पपई खाल्ल्याने कुठलेच साईड इफेक्ट्स होत नाहीत.शरीरात युरिक अॅसिड वाढल्याने विविध आजारांना आणि दुखण्यांना सामोरं जावं लागतं. संधिवात म्हणजेच अर्थरायटिस सारखं गंभीर दुखणं कोणत्याही वयात होऊ शकतं. यासाठीच युरिक अॅसिड आणि इतर अॅसिडयुक्त पदार्थांचं शरीरातील वाढणारं प्रमाण नियंत्रणात राखणं गरजेचं आहे. संधिवात हा आजार बहुतांशपणे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत दिसून येणारा आजार आहे. या आजाराची लागण होऊ नये यासाठी आहारात कच्च्या पपईचा वापर अनिवार्य ठरतो. संधिवात झालेल्या व्यक्तींना उठणं, बसणं, फिरणं या साध्या हालचाली करताना अत्यंतिक वेदना होतात.शरीसाठी आवश्यक अँटिऑक्सिडंटचं आणि खनिजांचं, जीवनसत्त्वांचं प्रमाण कच्च्या पपईत भरपूर प्रमाणात आढळून येतं. कच्च्या पपईत कॅलरीजचं प्रमाणही अतिशय कमी असतं तर व्हिटॅमिन सी, फोलेट अर्थात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई यांचं प्रमाण मुबलक असतं. या तीन व्हिटॅमिन्समुळे शरीरातील युरिक अॅसिड नियंत्रणात राहतं, पर्यायाने संधिवाताच्या पेशंट्सच्या तब्येतीला आराम पडतो.शरीरातील युरिक अॅसिड नियंत्रणात राहण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या पपईचा ज्युस घेणं गुणकारी आहे. या ज्युसमध्ये लिंबू किंवा मध घालून सेवन केल्यास तो शरीराला विपुल प्रमाणात आवश्यक ते पोषक घटक देतो. हा ज्युस सकाळी उठल्यावर अनुशापोटी घेतल्यास निश्चितच खूप फायदा होतो. इतकंच नाही तर वजन घटवण्यासाठी ही कच्ची पपई वरदानच ठरते. यासोबतच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात कच्च्या पपईच्या भाजीचा नियमितपणे समावेश केल्यास तब्येतीसाठी गुणकारी ठरतं. फक्त कच्च्या पपईच्या भाजीला थोडीशी मेथी आणि हिंग यांची फोडणी देऊन हळद आणि मीठ घालून शिजवून घ्यावी. म्हणूनच शरीरात युरिक अॅसिडचं प्रमाण वाढल्यास अँन्टिबायोटिक् घेण्याऐवजी नैसर्गिक अशा कच्च्या पपयांचा आहारातला समावेश विविध आजारांना रोखतोच, पण तब्येतही तंदुरूस्त ठेवतो .प्रमोद पाठक.
No comments:
Post a Comment