Friday, 16 June 2023

कंबर दुखी*

 कंबर दुखी* उपाय करा घरीच


*१. बाभळीची साल*

 १.१ बाभळीची साल काढायची.

 १.२ पाण्यात टाकुन कडक उकळवा.

 १.३ त्या पाण्याने गुढघे किंवा पाय दुखत असेल तिथून धुवून टाखा. १० मिनटात फरक पडतो. 


*२. जवस* 

 २.१ रोज सकाळ संद्याकाळी बडी सौफ झाल्यासारखे जेवण झाल्यावर जवस खा.

 २.२ जवस शरीरातील वंगण सारखे काम करते, गुडखे दुखी ला खूप फरक पडतो.


३. *पांढरे तीळ* खात जा, हाडे मजबूत होतात.


*४. एरंडेल तेल*

 ४.१ भाकरीचा गोळ्यात अर्धा चमचा एरंडेल तेल घाला.

 ४.२ त्याची भाकरी १५ दिवस रोज रात्री जेवताना खा.

 ४.३ पंधरा दिवस करा हे, याने गुढघे दुखी, कंबर दुखी बरी होते.


*५ तिळाचे तेल*

 ५.१ गुडखे फारच दुखत असतील तर, तिळाचे तेल सकाळ - संद्याकाळ प्या.

 ५.२ त्या वर कोमट पाणी प्या.

 ५.३ पंधरा दिवसात गुडखे दुखी थांबते.



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




युरीक असिड च्या त्रासातून मुक्त* *होण्यासाठी घरगुती उपाय*

 *युरीक असिड च्या त्रासातून मुक्त* *होण्यासाठी घरगुती उपाय*


पूर्वी ५० - ६० वयाच्या लोकांमध्ये यूरीक ॲसिडची समस्या पाहिली जात होती, तर आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणही यामुळे पीडित आहेत. तणाव, अल्कोहोल-सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, व्यायमाचा अभाव, पाणी कमी पिणे आणि चुकीचे खानपान यामुळे यूरीक ॲसिड वाढते व त्याचा त्रास होतो.


*यूरीक ॲसिड म्हणजे काय ?* 


कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचे मिश्रण करून कंपाऊंड तयार होते, जे अमीनो ॲसिडच्या रूपात शरीराला प्रोटीनमधून प्राप्त होते त्याला युरीक ॲसिड म्हणतात.


 त्यामुळे यूरीक ॲसिड वेळेवर नियंत्रित न केल्यास त्यामुळे गठीया (Gout) आणि संधिवात देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत काही होम टिप्स आहेत, जेणेकरून तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता.


◼️ *भरपूर लिक्विड आहार घ्या* 

यूरीक ॲसिड नियंत्रित ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. आहारात फळांचा रस, नारळपाणी आण ग्रीन टी सारख्या द्रवपदार्थाचे सेवन करत रहा.


◼️ *सर्व रंगांच्या भाज्या* 

प्रत्येक रंगाची भाजी आपल्या आहाराचा एक भाग बनवा. आपल्याला हिरव्या, लाल, केशरी रंगाच्या भाज्यांमधून सर्व पोषकद्रव्ये मिळतील, जे केवळ ॲसिडवर नियंत्रण ठेवत नाहीत तर इतर समस्या देखील टाळतील.


◼️ *सिट्रस फ्रूट* (सायट्रिक ॲसिडयुक्त फळे)

सिट्रस फ्रूट युरीक ॲसिड क्रिस्टल्सला वितळवून यूरीक ॲसिड पातळी कमी करतात. असे फ्रूट आहारात जरूर घ्या, परंतु मर्यादित प्रमाणात.


◼️ *छोटी वेलची* 

पाण्यात मिसळून छोटी वेलची खाल्ल्याने यूरीक ॲसिडचे प्रमाण कमी होईल आणि कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होईल


◼️ *बेकिंग सोडा*

१ ग्लास पाण्यात १/२ चमचा बेकिंग सोडा मिसळून पिल्यास युरीक ॲसिड नियंत्रणात येण्यास मदत होते.


◼️ *ओवा* 

ओवा यूरीक ॲसिडसह शरीरातील सूज कमी करते. यूरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी, एका दिवसात २-३ चमचे ओवा खावा.


◼️ *दररोज सफरचंद खा* 

सफरचंद मध्ये उपस्थित ॲसिड यूरिक ॲसिडला न्यूट्रीलाईज करते.


◼️ *लिंबाचा रस* 

लिंबू यूरीक ॲसिडला नियंत्रित करते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबूचा रस पिल्याने आपला फायदा होईल. तसेच दिवसातून चार-पाच वेळा लिंबू-पाणी प्या.


◼️ *चेरी* 

चेरी आणि डार्क चेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे घटक असतात, जे यूरीक ॲसिड कमी करण्यास मदत करतात. सूज आणि कडकपणा दूर ठेवते.


 *योग देखील फायदेशीर* 

दररोज व्यायाम करा आणि निरोगी राहा. वजन नियंत्रित ठेवा. असे म्हणतात की फॅटी टिश्यूमुळे यूरीक ॲसिड उत्पादन देखील वाढते.


❌ *या गोष्टी टाळा* 

मद्य आणि बिअर मध्ये यीस्ट मोठ्या प्रमाणात असते म्हणून ते टाळावे. दही, राजमा, चणे, अरबी, तांदूळ, मैदा, लोणचे, कोरडे फळे, मसूर, पालक, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅक फूड, मांस, मासे, पेस्ट्री, केक्स, पॅनकेक्स, मलई बिस्किटे, तळलेल्या अन्नापासून दूर रहा.


❌ *रात्री या गोष्टी खाऊ नयेत* 

प्रोटीनयुक्त आहार युरीक ॲसिड नियंत्रणात येईपर्यंत कमी खा, शक्यतो टाळा. झोपेच्या वेळी दूध किंवा डाळ घेऊ नका. तरी तुम्हाल डाळ घेण्याची इच्छा असल्यास साल असलेली डाळ तीही थोडी खावा. तसेच, जेवण करताना पाणी पिऊ नका. अन्न खाण्यापूर्वी आर्धा-पाऊण तास आणि नंतर तास-दिड तासाने पाणी प्यावे.


डॉ. प्रमोद ढेरे,


_

माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच'ज्युनिअर आणि सीनियर केजी'चे वर्ग

 सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच'ज्युनिअर आणि सीनियर केजी'चे वर्ग


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


 


            मुंबई, दि. १५ : शिशूवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशूवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.


            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले.


            या सोहळ्याला स्थानिक आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आदी मान्यवरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले, “आज शाळेचा पहिलाच दिवस आणि आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह शाळेच्या नवीन वास्तूत शिक्षण घेता येणार आहे. या गोष्टीचा मनस्वी आनंद होत आहे. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले आहे. त्यांना वह्या मोफत दिल्या असल्या तरीही त्या शाळेत न आणता त्यांचा घरीच अभ्यास करायचा आहे. दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेले एकच पुस्तक आणायचे आहे. याच पुस्तकात धडा संपल्यानंतर वह्यांची कोरी पाने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे धडा समजून घेतल्यानंतर त्या विषयाचे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी लिहू शकतील. अशा प्रकारची चार पुस्तके वर्षभरासाठी देण्यात आली आहेत”, असे त्यांनी नमूद केले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच रोबोटिक, विज्ञान आणि भाषा विषयासंदर्भातील प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरात ज्या-ज्या ठिकाणी शाळांची गरज असेल त्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रस्ताव तयार करावा, त्याला मंजुरी देण्यात येईल, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले. दहिसर परिसरात सातवीपर्यंत असलेल्या शाळा लवकरच आठवी ते दहावीपर्यंत सुरू करण्यात येतील, असे श्री. केसरकर यांनी सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.


‘व्यावसायिक शिक्षणासह परकीय भाषादेखील अवगत करावी’


            मंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले, “जगातील अनेक देशांमध्ये मातृभाषेतच शिक्षण दिले जाते. ठराविक देश वगळता इतर ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी आवर्जून शिकावी. त्यासोबतच इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन, रशियन अशा परकीय भाषांचेही आवश्यक ज्ञान घ्यावे. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जगभरात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तसेच अभ्यास करत असतानाच गणित, विज्ञान आणि व्यावसायिक शिक्षणावरही भर द्यावा”, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी विद्यार्थी व पालकांना केले.


            उपशिक्षणाधिकारी श्रीमती संगीता तेरे यांनी प्रास्ताविक केले. आमदार मनीषा चौधरी यांनी दहिसर परिसरातील विकासकामांची माहिती देताना दहिसर नदी स्वच्छता व संवर्धनाची माहिती दिली.


चार हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ


            आर/उत्तर विभागातील सखाराम तरे मार्ग महानगरपालिका शाळेची स्थापना सन १९५७ मध्ये झाली. या इमारतीमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती माध्यमाच्या शाळा असून सुमारे ४ हजार विद्यार्थी या संकुलात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्या सतत वाढत असल्याने, तसेच वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याने प्रशासनाने या इमारतीच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेतला. आधीच्या इमारतीची रचना तळ मजला अधिक २ मजले अशी होती. पुनर्बांधणीनंतर इमारतीची रचना तळमजला अधिक ६ मजले प्रस्तावित करण्यात आली. दिनांक १४ मार्च २०२० रोजी या इमारतीची पुनर्बांधणी सुरू झाली होती.


दुसऱ्या टप्प्याचेही काम लवकरच


            दोन टप्प्यामध्ये या इमारतीची पुनर्बांधणी प्रस्तावित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये तळमजला अधिक सहा मजले इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीमध्ये विज्ञान प्रयोगशाळा वाचनालय, सभागृह, विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवीन इमारतीत जुन्या इमारतीतील विद्यार्थ्यांना स्थलांतरीत करण्यात येणार असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येईल.


शाळेच्या पहिल्याच दिवशी भारावले विद्यार्थी


            बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे मागील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये 'मिशन अॅडमिशन' या उपक्रमांतर्गत १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात आले. तसेच यंदाच्या २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरिता व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी 'मिशन मेरीट' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दहिसर येथील मुंबई स्कूलच्या नवीन इमारतीत शाळेच्या पहिल्याच दिवशी बसायला मिळणार असल्याने विद्यार्थी भारावले होते. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मंत्री श्री. केसरकर यांनी शाळेच्या नवीन इमारतीची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार

 आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती व प्रसारणमंत्र्यांचे मानले आभार


            मुंबई, दि. 15 : आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने आज जारी केले आहे, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत.


            पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग १९ जूनपासून बंद करण्याचे आदेश प्रसारभारतीने काढले होते. या आदेशाविरुद्ध सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या अपर मुख्य सचिवांना सूचना देऊन केंद्रातील अधिकाऱ्यांकडे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरू ठेवावा, अशी विनंती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामागणीवर सकारात्मक निर्णय घेत प्रसारभारतीने यापुढे पुणे प्रादेशिक वृत्त विभागातूनच बातमीपत्र प्रसारित होतील, असे आदेश आज काढले आहेत.


            सकाळी ७.१०, ८, ८.३०, १०.५८, ११.५८ वाजताचे आणि सायंकाळी ६ वाजेचे बातमीपत्र यापुढेही पुणे केंद्रावरुनच प्रसारित होणार आहेत.



००००



 


अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील

 अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील.


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गिरणी कामगारांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप


            मुंबई, दि. १५ : गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा व मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या पात्र १६२ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्या व वितरणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी श्री. शिंदे बोलत होते.


            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला कामगार मंत्री सुरेश खाडे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) अरुण डोंगरे आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आजचा दिवस आमच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस असून गेली अनेक वर्षे गिरणी कामगारांना घरे मिळणार अशी फक्त चर्चा होत होती. आज प्रत्यक्षात गिरणी कामगारांना चाव्या आणि पत्र दिले जात आहेत. सन २०२० मधील गिरणी कामगार सोडतीतील उर्वरित सुमारे ३५०० यशस्वी गिरणी कामगार/वारसांना येत्या तीन महिन्यांत सदनिकांचा ताबा देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. सदनिकेच्या चाव्या मिळत असलेल्या गिरणी कामगारांना सदनिका विक्री किंमतीचा भरणा उशिरा केल्याबद्दल लावलेला दंड माफ करून दि. ०१ जुलै २०२३ पासून सदनिकेसाठीचा देखभाल- दुरुस्ती खर्च आकारण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. कायदे हे सर्वसामान्यांसाठी असावेत, ही शासनाची भूमिका असून योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना शासनाकडे येण्याची वेळ येवू नये, यासाठी 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम राबवित आहोत. आतापर्यंत राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. गिरणी कामगारांना सदनिका खरेदी करण्यासाठी मुंबई बँकेने कर्ज दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी बँकेचेही आभार मानले.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गिरणी कामगारांची सन २०२० मध्ये सोडत काढण्यात आली. मात्र, आतापर्यंत केवळ २६ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांची पात्रता निश्चित होऊन विक्री किंमतीचा भरणा केलेला होता. सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/ वारसांच्या पात्रतेविषयक कामाला गती मिळून त्यांना सदनिकेचा लवकरात लवकर ताबा मिळावा, यासाठी आमदार सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती तयार केली. समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे कमी कालावधीत जवळपास १६२ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांची पात्रता निश्चित झाली. येत्या तीन महिन्यात उर्वरित सुमारे ३५०० गिरणी कामगार/ वारसांची पात्रता पूर्ण करुन त्यांना सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन श्री.फडणवीस यांनी दिले. गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगार/ वारसांची पात्रता निश्चितीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन इतरही गिरणी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. शेवटच्या पात्र कामगाराला सदनिकेचा ताबा मिळत नाही, तोपर्यंत हे काम सुरु राहील. सदनिका मिळण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व १ लाख ५० हजार गिरणी कामगारांना घर उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे लवकरच एक मोहीम सुरू करण्यात येणार असून विशेष कक्ष स्थापन केला जाणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            श्री. राणे म्हणाले की, मार्च-२०२० मध्ये मुंबईतील बॉम्बे डाईंग मिल, बॉम्बे डाईंग टेक्सटाइल मिल आणि श्रीनिवास मिलमधील ३८९४ सदनिकांसाठी म्हाडातर्फे सोडत काढण्यात आली. या सोडतीमधील यशस्वी गिरणी कामगार/ वारसांपैकी एकूण १४१२ यशस्वी गिरणी कामगार वारसांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठीचे तात्पुरते देकार पत्र (Provisional Offer Letter) देण्यात आले असून उर्वरित २४८२ गिरणी कामगार/ वारसांची पात्रता निश्चित करून व सदनिकीच्या विक्री किंमतीचा भरणा केल्यानंतर त्यांना चाव्यांचे वाटप तत्काळ केले जाणार आहे.

Thursday, 15 June 2023

ई- ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करा

 ई- ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करा


- सचिव सुमंत भांगे


           


            मुंबई दि. 15 : शासकीय कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे धोरण असून या प्रणालीच्या वापरामुळे कामकाज अधिक सुलभ व कागद विरहित होणार आहे. शासकीय कामकाजामध्ये ई- ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले.


            आज मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या वापराबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी सचिव श्री.भांगे बोलत होते.


            यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव रवींद्र गोरवे, सहाय्यक संचालक कल्याण अवताडे उपस्थित होते.


            श्री.भांगे म्हणाले, मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई- ऑफिसच्या माध्यमातून पाठविण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही प्रणाली कशा पद्धतीने राबविण्यात येते. तसेच ई- ऑफिस प्रणालीच्या तांत्रिक बाजू समजून घ्याव्यात व या प्रणालीचा वापर तात्काळ सुरू करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय...*

 *पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय...*


  १) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या.

    २) १०० मि.लि पाण्यात एक चमचा मेथि दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे. व जेवणानंतर हे मेथिचे दाणे घालून खावे. याने सकाळी पोट साफ होते.

   ३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर घ्या. पाण्यासोबत.,

  ४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे., रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात इसबगोल मिसळून घ्यावे..

  ५) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध घ्यावे.

   ६), दूधात दोन तीन अंजिर उकळून मग अंजिर खावे . आणि वरून दूध घ्यावे..

   ७) एक ग्लास पाण्यात २ चमचे कोरफड गर मिसळून घ्यावे..,. त्रिफळा चूर्ण मातिच्या भांड्यात भिजवून मग सकाळी हे गाळून घ्यावे. याने पोट साफ होते.

    ८) रात्री झोपण्यापूर्वी एक कप पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तुप व किंचित सैंधव मीठ घालून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते.

     ९) रोज सकाळी दोन खजुर साजुक तुपासोबत खाल्ल्यास पोट साफ होते..

     १०) ताजी कोरफड मंद गॅसवर भाजून, नंतर साल काढून, यातिल गर मलमलच्या कपड्यात गाळून, त्यात मध मिसळून घ्यावे.. याने सकाळी पोट साफ होते..

    ११,) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून ओवा खावा, याने पोट साफ होते..

    १२) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून एरंडेल तेल घ्यावे, याने सकाळी पोट साफ होते..


 वरील उपाय करावेत आणि, आहारात नेहमी पालेभाज्या फळे खावीत.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,



Featured post

Lakshvedhi