Thursday, 15 June 2023

आरोग्य समस्येवर कोणत्या भाज्या गुणकारी आहेत,

 कोणत्या आरोग्य समस्येवर कोणत्या भाज्या गुणकारी आहेत, हे माहिती असल्यास योग्य त्या भाजीचा नियमित आहारात समावेश करणे शक्य होऊ शकते. यासाठी यासंबंधीची माहिती करून घेणे खुप गरजेचे आहे. तसे पाहता सर्वच भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. 


पालकचे सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढते. रक्ताची समस्या दूर होते.

 मटारमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत नाही.

कोबीमध्ये कॅल्शिअम असल्याने शरीराची हाडे मजबूत होतात.


टोमॅटोच्या सेवनाने रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहते.


बीट खाल्ल्याने मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

गाजराचे सेवन केल्यास शरीराची ताकद वाढवते. मधुमेहाचा त्रास कमी होतो. चेहऱ्यावर तेज येते. मुरुमेदेखील कमी होतात. रोगप्रतिकारक क्षमता वाढते.


प्रमोद पाठक.



अनेक रोगांवर रामबाण उपाय - "तुळशीची पानं" !!*

 *अनेक रोगांवर रामबाण उपाय - "तुळशीची पानं" !!* 


तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. प्रत्येक घराच्या अंगणात तुळस लावली जाते. तिची पूजा केली जाते. तुळशीचे रोप फायदेशीर मानले जाते.


आयुर्वेदात तुळशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तुळशीचा वापर करून अनेक लहान-मोठे आजार बरे करता येतात. आयुर्वेदानुसार तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीवायरल, अँटी फंगल असे गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात. तुळशीची पाने पोटासाठी गुणकारी असतात. पोटात जळजळ, अपचन, ऍसिडिटी यांसारख्या पोटाच्या समस्या असतील तर त्या तुळशीमुळे दूर करता येतात. तुळशीची पाने देखील पीएच पातळी राखण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या ठिकाणी आम्ही तुम्हाला तुळशीची पानं अनेक रोगांवर कशी गुणकारी आहेत हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया तुळशीचे फायदे...


*थंडीपासून संरक्षण :* 


तुळशीची पाने हिवाळ्याच्या त्रासापासून वाचवू शकतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्यास सर्दी-खोकल्यासारख्या समस्या होणार नाहीत. घसा खवखवणे, घसा दुखणे यांसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते.


*हृदयाचे आरोग्य राखणे :* 


तुळशीच्या पानांना हृदयाच्या आरोग्याचा खजिना म्हटले जाते, मग तेही कमी नाही. रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. आणि हृदय नेहमी सुरक्षित राहते. तुळशीच्या पानांमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखे आजार दूर राहतात.


*पोटाच्या समस्या दूर होतील :* 


रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर राहतील. पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटाची सूजही कमी होते. इतकंच नाही तर ही पाने तुम्हाला ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन, आंबट ढेकर यांसारख्या समस्यांपासूनही आराम देतात.


*त्वचेची काळजी घ्या :* 


रोज सकाळी तुळशीची पाने चघळल्याने त्वचा तजेलदार होते. तुळशीच्या पानांमध्ये आढळणारे अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म त्वचेत खोलवर जाऊन ते स्वच्छ करतात. मुरुम देखील येणं बंद होतं.


*दुर्गंधीपासून मुक्त होणे :* 


श्वासात दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने नियमित घ्या. यामध्ये आढळणारे गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून श्वासाची दुर्गंधी कमी करतात.


*कर्करोग टाळण्यास मदत होते :* 


तुळशीची पाने कॅन्सरसारख्या भयंकर रोगापासून बचाव करण्याचे काम करतात. दररोज तुळशीची चार पाने खाल्ल्याने त्वचा, यकृत, तोंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यास मदत होते.


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



उत्तम आरोग्य साठी खा कंदमूळ त्याचे फायदे.*

 *कंदमूळ त्याचे फायदे.*



 जमिनीखाली वाढणाऱ्या वनस्पतींना कंदमूळं असं म्हणतात. अश्मयुगात माणसं फक्त फळं आणि कंदमूळंच खात असत. आजकाल मात्र फक्त उपवासाच्या दिवशी अथवा सॅलेडमधून कंदमूळं खाण्याची पद्धत आहे. जमिनीखाली दडलेल्या या कंदमूळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व असतात. ज्यामुळे तुम्हाला त्वरीत ऊर्जा मिळू शकते. भारतात बटाटा, रताळी, गाजर, बीट, अरवी, सुरण अशी अनेक कंदमूळं आढळतात. यासाठीच जाणून घ्या रोजच्या आहारात कंदमुळांचा समावेश करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे.


बटाटा

स्वयंपाकघरात बटाटा हे कंदमूळ आवर्जून आढळतं. बटाट्याचे विविध प्रकार आपण नेहमीच तयार करत असतो. शिवाय डाळ, सांबर, भाजी, पराठा, काप, भजी करण्यासाठी बटाट्याचा वापर केला जातो. घाईघाईत केलेली अगदी साधी बटाट्याची भाजीदेखील जेवणाला एक मस्त रूचकर चव आणते. मात्र या बटाट्यामध्ये उत्तम अशी पोषकतत्व दडलेली असतात. बटाटा खाण्याने वजन वाढते या गैरसमजापोटी अनेकजण बटाटा खाणं टाळतात. उत्तम आरोग्यासाठी बटाट्याचे तळलेले पदार्थ खाणं नक्कीच टाळायला हवं. मात्र बटाटा उकडून खाण्यास काहीच हरकत नाही. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेड, फायबर्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 असते. ज्यामुळे तुमचे योग्य पद्धतीने पोषण होऊ शकते.


रताळं


रताळं हे भारतात पिकणारं आणखी एक महत्त्वाचं कंदमूळ आहे. रताळी बाहेरून पांढरी आणि आतून लाल रंगाची असतात. पचनास हलकं असल्यामुळे तुम्ही रताळी कधीही खाऊ शकता. रताळ्यामधील नैसर्गिक साखरेचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत नाही. ज्यामुळे मधुमेहींनीदेखील रताळी खाण्यास काहीच हरकत नाही. सामान्यपणे उपवासाच्या दिवशी रताळी उकडून अथवा रताळ्याचा कीस करून खाल्ला जातो. रताळ्यामध्ये फासबर्स, व्हिटॅमिन ए, बी 6, सी, डी आणि ई, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, लोह असतात जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहेत


मुळा

मुळा हे एक आयुर्वेदिक कंदमूळ आहे. मुळ्याला एक प्रकारचा उग्र वास असतो. त्यामुळे मुळा खाण्याचा लोक कंटाळा करतात. मात्र कच्चा मुळा खाणं आरोग्यासाठी फार गुणकारी असतं. मुळ्यात प्रथिनं, कर्बोदकं, फॉस्फरस, लोह असतं. ज्यामुळे मुळा नियमित खाण्यामुळे युरीनच्या समस्या कमी होतात. ताप आल्यावर मुळा खाण्याने ताप कमी होण्यास मदत होते. मुळ्याची भाजी आणि मुळ्याचं थालीपिठ अथवा पराठा फारच चविष्ट लागतं. 


गाजर

गाजर हे कंदमूळ केशरी आणि गुलाबी रंगाचं असून ते आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतं. चवीला गोडसर असल्याने बऱ्याचदा आपण गाजराचा हलवा करतो. मात्र गाजराचा रस आणि सॅलेडदेखील खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. गाजरामधील अ जीवनसत्वामुळे ते डोळ्यांसाठी उपयुक्त असतं. नियमित गाजराचे सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यसमस्या कमी होऊ शकतात. गाजरातील पोषकघटक तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी फार उपयुक्त ठरतात. 


सुरण

सुरणाचा कंद जमिनीखाली वाढतो. विशेष म्हणजे या कंदमूळाला वर्षातून एकदाच आणि एकच पान येतं. सुरण आरोग्यासाठी फारच गुणकारी असते. सुरणाला देखील खाज येते म्हणून ते व्यवस्थित स्वच्छ करून चिंच अथवा कोकमासोबत शिजवलं जातं. मुळव्याधीचा त्रास असणाऱ्या लोकांनी मुळव्याध अवश्य खावं. सुरणामधील औषधी गुणधर्मामुळे त्याला कंदनायक असंही म्हणतात. सुरणाच्या वड्या, भजी, भाजी काप असे अनेक पदार्थ करता येतात.


प्रमोद पाठक.



*⭕️

Wednesday, 14 June 2023

वारीच्या निमित्ताने


दिव्यांग 'संदेश'च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग युवकाला तातडीची मदत

 अन् दिव्यांग 'संदेश'च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग युवकाला तातडीची मदतअवघ्या काही मिनिटांत मिळाला पाच लाखांचा धनादेश


            मुंबई, दि. १४ : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कनवाळू स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा सर्वांना आला.. भेटीसाठी आलेल्या बांधकाम मजूर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोले याला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा पाच लाखांचा धनादेश दिला...मुख्यमंत्र्यांच्या वागणुकीने भारावून गेलेल्या संदेशच्या आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...


            मुख्यमंत्री मंत्रालयात बैठकीसाठी आल्यावर त्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सामान्य नागरिक येत असतात. त्यांना प्रत्येकाला भेटल्याशिवाय मुख्यमंत्री श्री. शिंदे मंत्रालय सोडत नाही. सामान्यांसाठी कल्याणकारी योजना राबवितानाच त्याची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे नेहमीच आढावा बैठकांमधून प्रशासनाला निर्देशही देत असतात.


            आज दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. नियोजित बैठका सुरू झाल्या...लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक देखील त्यांना भेटायला आले होते. या गर्दीत पालघर जिल्ह्यातील जव्हारचा संदेश पिठोले त्याच्या वडिलांसह मुख्यमंत्र्यांना भेटायला आला होता. मुख्यमंत्र्यांचे लक्ष व्हिलचेअरवर बसलेल्या संदेशकडे गेले. विधि व न्याय विभागाच्या आढावा बैठकीसाठी जात असताना संदेशजवळ थांबून मुख्यमंत्र्यांनी त्याची विचारपूस केली आणि ते समिती कक्षात आले. विधी व न्याय विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी त्या संदेशला बोलावले. त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.


            यावेळी मुख्यमंत्र्यांनी संदेशला तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले. तत्काळ संपूर्ण प्रक्रिया झाली. धनादेशावर संबंधित अधिकाऱ्यांनी तिथेच मुख्यमंत्र्यांसमोरच स्वाक्षरी केली आणि संदेशच्या हातात पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला.


            बांधकाम मजूर असलेल्या संदेशचा कामावर असताना अपघात झाला. त्यात त्याचा एक हात आणि दोन्ही पाय गमावले. आपल्या तरुण मुलाला व्हिलचेअरवरून आणाव्या लागलेल्या पित्याला मुख्यमंत्र्यांनी दिलासा देत तातडीने मदतीचा धनादेश दिला. शिवाय संदेशला कृत्रिम पाय, हात बसविण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे यांना समन्वय करण्याच्या सूचनाही दिल्या. व्यवसायासाठी स्टॉल सुरू कर. त्यासाठी पालघर येथे जागा देण्यासाठी मदत करतानाच बांधकाम महामंडळाकडून संदेशला मदत देण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी 

दिल्या.


०००००


अडाण व अरूणावती प्रकल्पाच्यासुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यवाही करावी

 अडाण व अरूणावती प्रकल्पाच्यासुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यवाही करावी


         -अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड


 


            मुंबई , दि. 14 : “अडाण प्रकल्पाच्या विशेष दुरूस्तीअंतर्गत कालव्याचे अस्तरीकरण करून शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यात यावे. त्यासाठी दोन टप्प्यांत कामे करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही करावी”, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत.


                अडाण प्रकल्पाच्या विशेष दुरूस्तीअंतर्गत कालव्याचे अस्तरीकरण करण्याचे काम त्वरित सुरू करणे व अरूणावती प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी मंत्री श्री. राठोड बोलत होते. बैठकीला जलसंपदा विभागाचे उपसचिव श्री. फुंदे, श्रीमती नमिता बशेर, यवतमाळचे अधीक्षक अभियंता श्री. राजभोज आदी अधिकारी उपस्थित होते.


              बेंबळा प्रकल्पाच्या धर्तीवर अडाण प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना करीत मंत्री श्री. राठोड म्हणाले, “मुख्य वितरिका, उप वितरिका, तसेच अन्य 'स्ट्रक्चरल' कामे पूर्ण करावी. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावात व अंदाजपत्रक तयार करताना कुठलीही बाब सुटता कामा नये. वितरिकेचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी द्यावे”, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या.


0000

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत.


            मुंबई, दि. 14 :- मुंबई येथे दि. 15 ते 17 जून 2023 या कालावधीत ‘राष्ट्रीय विधायक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. विधिमंडळाचे महत्व, लोकप्रतिनिधींचे योगदान, संविधानिक मूल्य अशा विविध विषयावर उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी विस्तृत माहिती जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 15 जून 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक पुढीलप्रमाणे-


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


००००


 




Featured post

Lakshvedhi