Wednesday, 14 June 2023

अडाण व अरूणावती प्रकल्पाच्यासुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यवाही करावी

 अडाण व अरूणावती प्रकल्पाच्यासुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यवाही करावी


         -अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड


 


            मुंबई , दि. 14 : “अडाण प्रकल्पाच्या विशेष दुरूस्तीअंतर्गत कालव्याचे अस्तरीकरण करून शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यात यावे. त्यासाठी दोन टप्प्यांत कामे करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही करावी”, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत.


                अडाण प्रकल्पाच्या विशेष दुरूस्तीअंतर्गत कालव्याचे अस्तरीकरण करण्याचे काम त्वरित सुरू करणे व अरूणावती प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी मंत्री श्री. राठोड बोलत होते. बैठकीला जलसंपदा विभागाचे उपसचिव श्री. फुंदे, श्रीमती नमिता बशेर, यवतमाळचे अधीक्षक अभियंता श्री. राजभोज आदी अधिकारी उपस्थित होते.


              बेंबळा प्रकल्पाच्या धर्तीवर अडाण प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना करीत मंत्री श्री. राठोड म्हणाले, “मुख्य वितरिका, उप वितरिका, तसेच अन्य 'स्ट्रक्चरल' कामे पूर्ण करावी. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावात व अंदाजपत्रक तयार करताना कुठलीही बाब सुटता कामा नये. वितरिकेचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी द्यावे”, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi