Wednesday, 14 June 2023

अडाण व अरूणावती प्रकल्पाच्यासुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यवाही करावी

 अडाण व अरूणावती प्रकल्पाच्यासुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यवाही करावी


         -अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड


 


            मुंबई , दि. 14 : “अडाण प्रकल्पाच्या विशेष दुरूस्तीअंतर्गत कालव्याचे अस्तरीकरण करून शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यात यावे. त्यासाठी दोन टप्प्यांत कामे करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही करावी”, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत.


                अडाण प्रकल्पाच्या विशेष दुरूस्तीअंतर्गत कालव्याचे अस्तरीकरण करण्याचे काम त्वरित सुरू करणे व अरूणावती प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी मंत्री श्री. राठोड बोलत होते. बैठकीला जलसंपदा विभागाचे उपसचिव श्री. फुंदे, श्रीमती नमिता बशेर, यवतमाळचे अधीक्षक अभियंता श्री. राजभोज आदी अधिकारी उपस्थित होते.


              बेंबळा प्रकल्पाच्या धर्तीवर अडाण प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना करीत मंत्री श्री. राठोड म्हणाले, “मुख्य वितरिका, उप वितरिका, तसेच अन्य 'स्ट्रक्चरल' कामे पूर्ण करावी. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावात व अंदाजपत्रक तयार करताना कुठलीही बाब सुटता कामा नये. वितरिकेचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी द्यावे”, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या.


0000

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत.


            मुंबई, दि. 14 :- मुंबई येथे दि. 15 ते 17 जून 2023 या कालावधीत ‘राष्ट्रीय विधायक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. विधिमंडळाचे महत्व, लोकप्रतिनिधींचे योगदान, संविधानिक मूल्य अशा विविध विषयावर उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी विस्तृत माहिती जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 15 जून 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक पुढीलप्रमाणे-


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


००००


 




आरोग्याची वारी - पंढरीच्या दारी’ उपक्रम


आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी  आरोग्याची वारी - पंढरीच्या दारी’ उपक्रम


- सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत


            मुंबई, दि. 14 : “आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. शेजारच्या राज्यांमधील भाविकांचाही त्यामध्ये समावेश असतो. यंदाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. या दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, पंढरपूर येथे आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याची आरोग्य तपासणी व्हावी, आपात्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा तात्काळ मिळावी, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे”, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.


            पंढरपूरकडे येणाऱ्या दिंडीमध्ये दिंडीच्या सुरूवातीलाच एक हजार आरोग्य किटचे वाटप केले असल्याचे सांगत मंत्री श्री. सावंत म्हणाले, “दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर दिंडीसोबत प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर एक आरोग्य पथक असणार आहे. यामध्ये आरोग्यदूत वारकऱ्यांसोबत असतील. या पथकांची संख्या 127 आहे. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत 24 तास फिरती वैद्यकीय आरोग्य पथके कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. तसेच औषधोपचारासाठी तात्पुरते दवाखाने उभारण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत 3 रूग्णवाहिका पथके, तर श्री संत तुकाराम महाराज पालखीसोबत 4 रूग्णवाहिका पथके असणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी 75 शासकीय रूग्णवाहिका पालखीसोबत कार्यरत असणार आहेत.”


            मंत्री श्री. सावंत पुढे म्हणाले, “पालखी मार्गावर सर्व 1921 हॉटेलमधील कामगार व पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच 156 टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पालखी मुक्कामाचे ठिकाणी तीन दिवसांपूर्वी व एक दिवस आधी धूरफवारणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील आरोग्य संस्थेमार्फत जैवकचरा विल्हेवाटीचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य संदेश देणारे तीन चित्ररथ, तीन पथनाट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा पद्धतीने पहिल्यांदाच एवढ्या सूक्ष्म नियोजन पद्धतीने आरोग्याच्या वारीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पालखीसोबत 30 बाईक ॲम्बुलन्सही असणार आहे.”


पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन


            आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान 27, 28 व 29 जून 2023 रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर पंढरपूर येथील वाखरी, गोपाळपूर व 65 एकर तिन रस्ता याठिकाणी आयोजित केले जाणार आहे. या शिबिरास राज्यातून खाजगी व सरकारी असे एकत्रितपणे 9 हजार डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी मोफत आरोग्य सेवा पुरविणार आहे. वारकऱ्यांची सुरूवातीस तपासणी, रोग आढळून आल्यास त्वरित उपचार, विनामूल्य औषधे, गरज असल्यास मोफत संदर्भ सेवा महात्मा फुले प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमार्फत मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. दृष्टीदोष असणाऱ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार असून 5 लक्ष चष्मे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच मोतिबिंदू असणाऱ्या रूग्णांची मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. पालखी तळावर जाऊन सर्व वारकऱ्यांना प्रत्येक 2 किलोमीटर अंतरावर ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मार्फत मोफत तपासणी व औषधे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.


            यासोबतच मंत्री श्री. सावंत विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना म्हणाले, “राज्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात आले. या अभियानातून 2 कोटी 39 लाख माता भगिनींची तपासणी करण्यात आली. आजारांचे निदान झालेल्या 52 हजार महिलांवर उपचार करण्यात आले. तसेच ‘जागरूक पालक – सुदृढ बालक’ अभियानही राबविण्यात आले. यामध्ये वयानुसार तीन टप्प्यात बालकांची तपासणी करण्यात आली. संपूर्ण 0 ते 18 वयोगटातील बालके, किशोरवयीन यांची तपासणी करण्यात आली. भविष्यात 18 वर्षावरील सर्व पुरूषांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. उपकेंद्रापासून ते जिल्हा रूग्णालयापर्यंत ‘सुंदर माझा दवाखाना’ स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रत्येक शनिवारी स्वच्छता अभियान यापुढे राबविले जाणार आहे.”


 

जनसेवा जिवन धिधले, बलसागर भारत होवो

 वर एक फोटो शेयर केला असून,ओडिशाच्या बालासोर मधील रेल्वे अपघातानंतर तुटलेल्या ओवरहेड वायर फिटिंगचं काम करण्यास खुद्द रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव वर चढले अन उपस्थित रेल्वे विभागाचे इंजिनिअर व कर्मचारी आवाक झाले,इंजिनिअर व कर्मचारी कसं काम करत आहेत हे पाहताना लागणारा वेळ व टेक्निकल त्रुटी लक्ष्यात आल्यानंतर स्वतः काम हातात घेतलं तेंव्हा उपस्थित अचंबित झाले होते, बाकी विरोधकांप्रमाणे तुम्ही ही म्हणाल हे फक्त फोटोसेशन होतं,तर तुमचा अंदाज साफ चूक आहे,कारण... रेल्वे मंत्री वअश्विनी वैष्णव हे जोधपुरच्या रीजनल इंजीनियरिंग कॉलेज मधून 1980 साली इंजीनियरिंग विभागातुन टॉपर आहेत,अन त्यांनी इंजिनिअरिंग सुद्धा इलेक्ट्रिकल्स मधून केलं आहे,इंजिनिअरिंग नंतर त्यांनी आईआईटी कानपुर मधून एमटेक करत पुन्हा टॉपर होते,इथे ही त्यांनी इलेक्ट्रिकल सब्जेक्ट घेतला होता. त्यानंतर त्यांनी रेल्वे निर्मिती करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एलस्ट्रोम मध्ये काही वर्ष नौकरी केली आहे, खाजगी नौकरीनंतर त्यांनी सिविल सर्विस परीक्षा दिली व देशातून बारावी रँक मिळवत त्यांनी जिल्हाधिकारी पासून प्रधानमंत्र्याचे प्रमुख सचिव पर्यंत मजल मारली. त्यानंतर नौकरी मधून VRS घेऊन जनरल इलेक्ट्रिक या कंपनीत एमडी या पदावर कार्यरत झाले,काही वर्षांनंतर तिथून बाहेर पडत पावर इंस्ट्रूमेंटेशन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सीमेंस मध्ये डायरेक्टर या पदावर कार्य केलं,अन मग या सर्व क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन थेट केंद्रात मंत्रिपद मिळाले,आज ही त्याच उर्मीने व जिद्दीने काम सुरू आहे. अश्या हिऱ्यांना पंतप्रधान मोदींनी जनतेच्या सेवेसाठी मदतीला घेतले आहे.🤷🏼‍♂️



राज्यात सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार

 राज्यात सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार


                                               - पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा


            मुंबई, दि.१४ : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यामार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक व रामटेक येथे सहा ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थीम पार्क उभारणार आहे. या सर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून एक वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी व त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी राज्य शासन व पर्यटन विभाग विविध उपक्रम राबवत आहे. राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो, हेच लक्षात घेवून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटन व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे. शिवसृष्टीच्या कामाबाबत जनतेच्या आलेल्या सूचनांनुसार या कामामध्ये बदल करण्यात येईल. तसेच विविध लोगो स्पर्धांचे आयोजनही करण्यात येईल. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ७० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.


            गोराई (मुंबई) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली व आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे. बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, औरंगाबाद येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल.


थीम पार्क,आचार्य चाणक्य म्युझियम


            भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्कसाठी १५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून सावरकरांचे पूर्ण जीवन चरित्र व अंदमान-निकोबार कारागृहातील प्रमुख घटना यांचा यामध्ये समावेश असेल.कार्ला - आचार्य चाणक्य म्युझियमसाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आचार्य चाणक्य नीतीचे ५ प्रखंड राजनीती, अर्थनीती, सामाजिक नीती, युद्ध नीती, धर्म नीती व याचसोबत ७ दिवस ते १ महिन्याचा अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांकरिता पडघा (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथे निवास व्यवस्थेसाठी ३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.


प्रत्येक शाळा व महाविद्यालयात युवा पर्यटन क्लब


            नव्या पिढीला पर्यटनस्थळांचे जतन आणि संवर्धनाचे महत्व कळावे यासाठी लवकरच प्रत्येक शाळा व महाविद्यालयात युवा पर्यटन क्लब स्थापन करण्यात येणार आहे.प्रत्येक शाळा व महाविद्यालयानजीक असलेल्या पर्यटनस्थळांचे जतन करावे, स्थानिक ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक यावेत यासाठी पर्यटन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.


अंगणवाडीत योग दिवस साजरा होणार


            महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, २१ जून हा जगभरात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने योग साधनेचे महत्व अनन्य साधारण आहे. राज्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत विशेष करुन महिला वर्गामध्ये योग साधनेची गोडी वृद्धींगत व्हावी, यासाठी प्रत्येक अंगणवाडी स्तरावर, अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुली, नोंदणी झालेल्या महिला (गरोदर महिला वगळून) यांचेसाठी अंगणवाडीत प्रशिक्षणाचा उपक्रम आयोजित करुन ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.


0000



संध्या गरवारे/विसंअ


राज्यात ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती होणार

 राज्यात ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती होणार

राज्यात ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानिर्मितीमहात्मा फुले कृषी विद्यापीठमहाऊर्जा आणि एसजेवीएन

यांच्यात सामंजस्य करार

            मुंबईदि. १४ :- ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौरपवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मितीमहात्मा फुले कृषी विद्यापीठमहाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन)  यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार  करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या माध्यमातून सुमारे ४१ हजार कोटींची गुंतवणूक आणि ६ हजार ७६० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.

            आज सहयाद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मितीमहात्मा फुले कृषी विद्यापीठमहाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्लामहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रामहापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमारमहाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगनसतलज जलविद्युत निगम लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक गीता कपूरउपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीमहात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटीलमेडाच्या महासंचालक डॉ कादंबरी बलकवडेस्वतंत्र संचालक विश्वास पाठक आदिसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            केंद्र आणि राज्य शासन नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे. २०३० पर्यत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के  विजेची पूर्तता नवीकरणीय ऊर्जेद्वारे करावयाची आहे.

            ऊर्जा स्थिरतेसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणुकीची गरज आहे. त्यासाठी महानिर्मितीने सौरजलपवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी गती द्यावीअशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केल्या.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत

            अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 400 एकर परिसरात 100 मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे ५०० कि.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास 472.19 कोटी खर्च अपेक्षित आहे.

महाऊर्जा -पुणे (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण)

            महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या जागेवर चाळकेवाडी येथे २५.६मे.वॅ. क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी ५१८ कोटीची गुंतवणूक होणार आहे.

सतलज जलविद्युत निगम लिमिटेड अंतर्गत

            सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि महानिर्मिती यांच्यामार्फत ५ हजार मे.वॅ.क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सौरजलपवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

००००

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन


यांच्यात सामंजस्य करार


            मुंबई, दि. १४ :- ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या माध्यमातून सुमारे ४१ हजार कोटींची गुंतवणूक आणि ६ हजार ७६० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.


            आज सहयाद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगन, सतलज जलविद्युत निगम लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, मेडाच्या महासंचालक डॉ कादंबरी बलकवडे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक आदिसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            केंद्र आणि राज्य शासन नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे. २०३० पर्यत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के विजेची पूर्तता नवीकरणीय ऊर्जेद्वारे करावयाची आहे.


            ऊर्जा स्थिरतेसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणुकीची गरज आहे. त्यासाठी महानिर्मितीने सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केल्या.


महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत


            अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 400 एकर परिसरात 100 मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे ५०० कि.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास 472.19 कोटी खर्च अपेक्षित आहे.


महाऊर्जा -पुणे (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण)


            महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या जागेवर चाळकेवाडी येथे २५.६मे.वॅ. क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी ५१८ कोटीची गुंतवणूक होणार आहे.


सतलज जलविद्युत निगम लिमिटेड अंतर्गत


            सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि महानिर्मिती यांच्यामार्फत ५ हजार मे.वॅ.क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.


००००

राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांना गती द्यावी

 राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांना गती द्यावी


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास नियामक मंडळाची बैठक


            मुंबई, दि.१४: राज्यातील विजेची वाढती मागणी आणि शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा करता यावा, यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे धोरण तयार केले. संबंधित यंत्रणांनी राज्यात सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास नियामक मंडळाच्या १०५ व्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास मंडळाच्या (मेडा) महासंचालक डॉ कादंबरी बलकवडे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कोळसा आणि पाण्याचा विचार करता सध्या सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. यामुळे महाऊर्जेने मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पावर गुंतवणूक करावी. वीज पुरवठा आणि भारनियमनबाबत राज्यातील कोणत्याही भागातील नागरिक, शेतकरी, लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी.


            यावेळी महाऊर्जाचे संचित आयकर दायित्व अंतर्गत उपाययोजना करून दीर्घकालीन उत्पादक स्वरुपाची भांडवली गुंतवणूक व त्याद्वारे महाऊर्जाचे बळकटीकरण करण्याच्या सूचनाही श्री. फडणवीस यांनी केल्या.


            यावेळी मेडामध्ये सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढवणे, सौर ऊर्जा प्रकल्प अधिकारी व प्रकल्प कार्यकारी अधिकारी पदासाठींच्या सरळ सेवा भरतीच्या नियमात सुधारणा, महाऊर्जा कर्मचारी सेवा नियमांतील निवड समिती व पदोन्नती समितीच्या रचनेत सुधारणा करणे, महाऊर्जा आस्थापनेवर कंत्राटी पध्दतीने संगणक संयोजकाची नेमणूक करणे, महाऊर्जा कार्यालयात वरिष्ठ महाव्यवस्थापक संवर्गात ऊर्जा क्षेत्रातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, ऊर्जाकूर निधी ट्रस्ट अंतर्गत, ऊर्जाकूर श्री. दत्त पॉवर कंपनी लि. यांच्याकडून महाऊर्जाच्या मालकीचे शेअर्स बाय-बॅकद्वारे हस्तांतरीत झालेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यास मान्यता देण्यात आली.


            महाऊर्जा स्वनिधीचे वित्तवर्ष २०२२-२३ चे सुधारित अंदाजपत्रकास व वित्तवर्ष २०२३-२४ चे प्रस्तावित वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.


            महाऊर्जाच्या विविध विभागीय कार्यालय अंतर्गत सौर प्रकल्पासाठी आस्थापित करणेसाठी निधी उपलब्ध करून देणे, महाऊर्जाच्या मालकीच्या जागेवर पवन, सौर संकलित प्रकल्प आस्थापित करण्यासाठी महानिर्मिती कंपनीसोबत सामंजस्य करार करण्याबाबत ठराव पारित झाला.


            महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास मंडळाच्या (मेडा) महासंचालक डॉ कादंबरी बलकवडे यांनी सादरीकरण केले.

Featured post

Lakshvedhi