Tuesday, 13 June 2023

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला करपरताव्यापोटी 7472 कोटी रूपये

 केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला करपरताव्यापोटी 7472 कोटी रूपये


 


            नवी दिल्ली, 12 :- केंद्र सरकारने, सर्व राज्यांना 59,140 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून 1,18,280 कोटी रुपये आज वितरित केले असून, महाराष्ट्र राज्याला कर परताव्यापोटी 7472 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे.


            सर्व राज्यांना जून 2023 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला आहे, ज्यामुळे राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, त्यांच्या विकास तसेच कल्याणविषयक खर्चाला वित्तीय सहायता करण्यासाठी आणि महत्त्वाचे प्रकल्प व योजनांसाठी संसाधने उपलब्ध करून देण्यात येत आहे.


        वाटप केलेल्या रकमेचा राज्यनिहाय विभाजन तक्ता जारी करण्यात आला आहे.


००००



 

तांदळाच्या.. पाण्याचे.. पेजेचे.. आरोग्यदायि फायदे*

 *तांदळाच्या.. पाण्याचे.. पेजेचे.. आरोग्यदायि फायदे*



१) तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकुन प्यायल्यास भूक वाढते.

२) तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जि मिळते. थकवा दूर होतो.

३) तांदळाचि पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास

 रक्ताचि कमतरता दूर होते.

४) तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

५) तांदळाच्या पेजेत दहि टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

६) केळे व तांदळाचि पेज एकत्र करून प्यायल्याने जुलाब बंद होतात, 

७) तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.

८) तांदळाच्या पेजेत मीठ व जीरे मिसळून प्यायल्यास

 डायजेशन सुधारते.

९) भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटस् चे प्रमाण अधिक असते त्यामूळे उर्जा मिळते बाहेर जातांना पिउन जावे दिवसभर ताजेतवाने वाटते.

१०) वायरल संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजि पेज घ्यावि, आजारपणात आलेली कमजोरि दूर होते.

११) उच्च रक्तदाब कमी होतो ः। तांदळाचे पाणी घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमि होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.

१२) तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तजेलदार, मूलायम होतो, काळे डाग निघून जातात.

१३) केसांकरता उत्तम टाँनिक आहे. याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो, केस रेशमि, चमकदार, व मजबूत होतात. रूक्षता निघून जाते

 दुतोंडि केसांचि समस्या दूर होते, कारण यात मुबलक विटामिन, मिनरल असतात.

१४) तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कँसरच्या पेशि आटोक्यात राहतात.

१५) तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते, पचनक्रिया सुरळित चालते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.

२६) डायरियात डिहायड्रेशन होते अश्या वेळि तांदळाचि पातळ पेज प्यायला द्यावि. ताकद येते.

१७) सर्दि, पडसे, ताप, वायरल इंनफेक्शन मध्ये

 तांदळाचे पाणि प्यायल्यास प्रतिकारशक्ति वाढून हे आजार दूर होतात.




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





भटक्या जमाती/ धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठीमेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार

 भटक्या जमाती/ धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठीमेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नियोजन बैठकीत योजनेच्या स्वरूपाबाबत चर्चा


            मुंबई दि 12:- अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली राज्यातील भटक्या जमाती/ धनगर व तत्सम जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालनाकरिता अर्थसहाय्य योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्यातील भटक्या जमाती/ धनगर व तत्सम प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या संयुक्त दायित्व गटास (Joint Liability Group) राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून मेंढी/शेळी पालनाकरीता कर्ज व अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य योजना राबविण्याबाबत बैठक झाली.


यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, प्रधान सचिव जे पी गुप्ता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, आयुक्त डॉ हेमंत वसेकर हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकरी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायांद्वारे तो स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. मेंढी- शेळी पालनाकरिता लाभार्थ्यांसाठी सध्याही योजना राबविण्यात येत आहेच, आता ही नवीन योजना अधिक जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ठोस प्रस्ताव तयार करण्यात यावा. ब्रीडींगसंदर्भात लक्ष्य निर्धारित करुन योजना राबविण्यात यावी. योजनेचे संनियंत्रण व ट्रॅकिंग अतिशय काटेकोरपणे करण्यात यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.


शेळी-मेंढी पालन करणाऱ्या समुदायाला स्थिर व वाढीव उत्पन्नासाठी योजना


-पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील


            पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, शेळी-मेंढी पालन करणाऱ्या समुदायाला गटाद्वारे रोजगार निर्मिती करणे, स्थिर व वाढीव उत्पन्नासाठी, चांगल्या दर्जाच्या शेळी-मेंढी संगोपनासाठी आर्थिक मदत करणे तसेच उच्च वंशावळीच्या मेंढ्या व शेळ्यांची संख्या वाढविणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहेत.


या योजनेसाठी 'एनसीडीसी'कडून स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


            ही योजना तीन टप्प्यांत पुढील तीन वर्षांत राबविण्यात येईल. यासाठी राज्यस्तरावर फेडरेशन तयार करण्याच्या तसेच जिल्हास्तरावर शेळी-मेंढी सहकारी संस्था स्थापन करण्याची कार्यवाही


करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच योजनेअंतर्गत इतर राज्यांतून पशुधनाची खरेदी करण्यात येणार असल्याची आणि पुरवठा करण्यात येणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांना टॅगिंग करतेवेळी जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्याबाबत पडताळणी करण्यात आली असल्याची माहिती यावेळी दे

ण्यात आली.


----000----


तूप.. येईल आरोग्य,रूप

 *तूप....*


जेवण कसलेही असो, पंगतीला तूप वाढले कि मगच जेवायला सुरुवात करायची आपली परंपरा आहे, एकंदरीत तूप हा स्वयंपाकघरातला एक अविभाज्य घटक आहे..


तुपः ।। घ्रुतम् आयुः।। , सहस्रवीर्य विधिभिघ्रुतं कर्मसहस्रक्रुत्।।


ज्याच्या आहारात थोड्या फार प्रमाणात तुप रोज आहे तो निरोगी आयुष्य दिर्घकाळ जगतो. सर्व प्रकारच्या स्निग्ध पदार्थात तूप हे सर्वश्रेष्ठ आहे.. शरिराची दर क्षणाला झिज होत असते, ती भरून यायला शरिरात स्निग्धता लागते..


◼️सात धातूंमध्ये मज्जा हा धातू सर्वात श्रेष्ठ धातू होय. शरिराच्या ठिकठिकाणाच्या कार्यास तुपाची मदत मोठी होते, आयुर्वेदाप्रमाणे तूप हे आयुष्यवर्धक व मधूर रसाच्या पदार्थात श्रेष्ठ आहे, शरिराला तुपामुळे स्थैर्य मिळते, बुद्धि, धारणा शक्ति, स्मरणशक्ति वाढवणे याकरता तूप माफक प्रमाणात रोज घ्यावे.


◼️घ्रुत हे शित गुणांचे असून वात व पित्त विकारात काम करते, अरूची, भूक न लागणे, अग्निमांद्य, या विकारात अग्निवर्धन होते, शीतपित्त, व गांधी उठणे या विकारात, तुपात कालवून मिरेपुड लावली तर अंगाची खाज कमी होते,


◼️आम्लपित्तात, नियमाने सकाळी व संद्याकाळी पंधरा ग्रँम तूप घ्यावे, स्रियांच्या प्रदर विकारात गुणकारी आहे, क्रूश व्यक्तिने कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी यावर थोडे तुप गरम पाण्याबरोबर घ्यावे,


◼️ज्यांचा कोठा रुक्ष आहे, बद्धकोष्ठ आहे, त्यांनी रोज रात्री एक कप गरम दुधासोबत एक चमचा तूप घ्यावे.


◼️कान सतत वाहणे, कानात आवाज येणे, कान कोरडे पडणे, तसेच डोळे रूक्ष होणे, डोळ्यांचा वाढता नंबर, डोळे लाल होणे, या विकारात रसायनकाली म्हणजे सकाळी, वीस ग्रँम तूप खावे..


◼️उष्णतेने केस गळत असल्यास, केसात खवडे, चाई, फोड होत असल्यास, नियमित तूप खावे, कुरूप या विकारात कुरूप कापण्यापेक्षा, शतघौत तुप तिथे घासावे, बरे होतात. शांत झोपेकरता, तळपायाला, कानशिल, कपाळपट्टि, यांना तूप चांगले जिरवावे.


◼️वात, गुल्म, पोटात फिरणारा वायू गोळा याकरता जेवणाच्या सुरुवातीला तूप चमचाभर खाउन जेवण संपतांना पुन्हा चमचाभर खावे.


◼️शरिरातील कोणतिही जखम भरून येण्यास व आतड्यातील व्रण भरण्यास तुपाचे सेवन गुणकारी आहे..


◼️क्रुश व्यक्तिच्या छातीत दुखणे, क्षयरोग, थुंकीतून रक्त पडणे, कडकी, बारीक हाडे ताप या विकारात नेमाने तुप खावे, बल मिळते,. सततची डोकेदुखी, असल्यास नाकपुडीत दोन थेंब तुपाचे टाकावे,


◼️तोंड आल्यास, अल्सर झाल्यास जिभेला तुप चोळावे. त तोंडात तुप धरावे,


◼️त्वचा विकारात , खाज व आग, थांबवण्याकरता, विशेषतः सोरायसिस मद्ये तुप खाणे लाभदायी आहे,


◼️समस्त विषविकारात पोटात घेण्यासाठी तुपासारखा उपाय नाही, विषाच्या दहा गुणाविरूद्ध लढा देण्यास तुपाचे दहा गुण आहेत, चुकिच्या औषधांचे परिणाम डोळ्यावर, त्वचेवर, केसांवर, किडनीवर, झाल्यास , सकाळी तूप घ्यावे.


◼️फिटस् येणे, आकडी, विस्मरण, उन्माद, या वातविकारात, पोटात तूप घ्यावे, तळहात, पाय, कानशिले, यांना तूप घासावे, लकवा, तोंडावरून वारे जाणे, तोंड वाकडे होणे, या विकारात, नाकात दोन थेंब तुप टाकावे, डोळ्यात टाकावे


◼️मूळव्याधीत गरम दूधात तुप घालून प्यावे, वारंवार गर्भपात होत असल्यास तूपाचे नियमित सेवन केल्यास गर्भाशय बलवान होते, कँसर व्याधित केमोथेरपी, रेडिएशन, यांचे दुष्परिणाम टाळण्याकरता तूपाचे सेवन करावे. शुद्ध तुपाने चेहर्‍यावर मालिश केल्यास चमकतो, मुलायम राहतो,


◼️डाळ शिजतांना तूप टाकल्यास गँस होत नाही.


◼️तुपामध्ये विटामिन ए. डी. व कँलशिअम, फाँस्फोरस, मिनरल्स, पोटँशिअम, असे अनेक पोषक तत्वे असतात,


*तेव्हा, आपल्या आहारात नक्कीच तूप कायम असावे. देशी गाईचे तूप अतिउत्तम.*


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,




सेवानिवृ्तीनंतर जेष्ठ व अतिजेश्ठा पेन्शन वाढ

 


शत शत नमन त्या कलाकाराला

 


Monday, 12 June 2023

पित्ताशयातील खडे*

 पित्ताशयातील खडे* 

आयुर्वेदानुसार, तीन दोष आहेत जे पित्ताशयाच्या खड्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

पत्त दोष: त्याच्या अत्याधिक वाढीचे मुख्य कारण म्हणजे पित्ताशयात खडे तयार होणे. जास्त मसालेदार आणि गरम अन्न, अल्कोहोल इत्यादींच्या सेवनामुळे ही वाढ झाली आहे.


कफ दोष: हे चरबीयुक्त, प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे वाढते जे संपूर्णपणे पित्ताशयामध्ये जास्त चिकट पदार्थ तयार करतात.


वात दोष: पित्त आणि कफषांच्या मिश्रणात कोरडेपणा वाढतो ज्यामुळे खडे तयार होतात

*पंचकर्म चिकित्सा* 


आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सेला खूप महत्त्व आहे एका ठिकाणी म्हंटल आहे चुकीचा आहार आणि चुकीच्या दिनचर्येमुळे पित्त प्रधानआम दोष आपल्या शरीरात वाढतो आणि ऋतूनुसार पंचकर्म न केल्यामुळे हा आजार दिवसेंदिवस वाढू लागला आहे या आजारावर पंचकर्मातील वमन विरेचन तसेच औषधीय स्नान चिकित्सा, तसेच आवाहन स्वेद या क्रीया केल्यास रूग्णाचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होते.

आयुर्वेदाने यावर काही रामबाण उपाय व औषधी सुचवल्या आहेत ज्याचा वापर तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास रुग्णाचे खडे विरघळण्यास निश्चितच मदत होते.




*आयुर्वेदिक उपचार व घरगुती उपचार* 




◼️कडुनिंब आणि मोठी वेलची यांचे चूर्ण मिसळून खाल्ल्याने पित्तदुखी दूर होते.




◼️मक्याचे तंतू किंवा केस पाण्यात उकळून त्याचे पाणी प्या. यामुळे काही दिवसात पित्ताचे खडे बरे होतात




◼️रोज आल्याचा चमचाभर रस घेणे देखील फायदेशीर आहे


 


◼️कुळीथ मुठभर पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी उठून प्यावे आहारात कुळीथाचा त्याच्या डाळीचा समावेश करा




◼️ग्लासभर सफरचंदाच्या रसामध्ये चमचाभर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळून घेतल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.




◼️रोज एक छोटा चमचा हळद कोमट पाण्यासोबत घेतल्यास खडे विरघळण्यास मदत होते




◼️गाजर,काकडी रस प्रत्येकी 100 मिली एकत्र करुन दिवसातून दोनदा प्यायल्यास फायदा होतो.




◼️सकाळी रिकाम्या पोटी एक मध्यम लिंबाचा रस आठवडाभर प्यायल्याने फायदा होतो.




◼️नाशपाती मध्ये आढळणाऱ्या रासायनिक घटकांमुळे खडे विरघळण्यास मदत होते.




◼️गोमूत्र: तुमच्या आयुर्वेद तज्ञाच्या निर्देशानुसार 30 मिली ते 40 मिली ताजे गोमूत्र फिल्टर करून सकाळी रिकाम्या पोटी घेतले जाऊ शकते. हे पित्त प्रवाह नियंत्रित करते, अतिरिक्त कोलेस्टेरॉलशी लढा देते, यकृत शुद्ध करते, कफ पचवते आणि विकृत वात व्यवस्थापित करते.




https://chat.whatsapp.com/G6dpqL1eDIH4pqpcCtbd3w




◼️भृंगराज: यकृतावर भृंगराजची मुख्य क्रिया पित्तप्रवाह सुधारते. हे एक उत्कृष्ट तहान,भूक वाढवणारे औषध आहे आणि पचनाला चालना देते आणि यकृत उत्तेजक म्हणून कार्य करते. त्यामुळे वात कमी होतो.




◼️सैधव /रॉक मीठ: हा एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय असू शकतो जो तुम्हाला पित्ताचा प्रवाह वाढवण्यास मदत करू शकतो. तुम्हाला फक्त रिकाम्या पोटी नाश्ता करण्यापूर्वी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा रॉक सॉल्ट किंवा सैधव . हे पेय घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला सुमारे ४५ मिनिटे झोपावे लागेल. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असे केल्याने परिणामकारक परिणाम दिसून येतील.


 


◼️गोखरू काढा किंवा पावडर घेणे लाभप्रद




◼️इसबगोल हे उत्तम असे विरघळणारे फायबर आहे. याच्या सेवनामुळे पोटात फायबरचे प्रमाण योग्य राहते आणि पित्ताशयातील खड्यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.




◼️बर्बेरिस अरिस्टाटा: याला दारुहरिद्र असेही म्हणतात. हे पित्त प्रवाह अवरोधित करण्यात मदत करते आणि अशा प्रकारे अडथळ्यामुळे होणारी तीक्ष्ण वेदना कमी करते. सतत वापर केल्याने, आपण नैसर्गिकरित्या पित्त खडे विरघळवू शकतो.




◼️मिल्क थिस्ल नावाच्या गोळ्या बाजारात मिळतात.ज्यांच्यामुळे पित्ताशयातील खडे विरघळतात




◼️एक कप पाण्यात सिंहपर्णीच्या पानाचे एक चमचा चुर्ण टाकून अर्धा तास भिजवून ठेवा नंतर मध घालून ते पाणी प्या.




◼️गुळवेलीचा काढा घेणे ही फायदेशीर




◼️जास्वंदीच्या फुलांची पावडर चमचाभर एक चमचा मधात हा यावरती सगळ्यात बेस्ट उपाय आहे




◼️वासागुलुच्यादी कषायम, अविपित्तीकर चुर्ण, द्राक्षादी कषाय, वरूणादी कषाय, पटोलकतुरोहीन्यादी कषायम, त्रिविल लेहम, आरोग्यवर्धीनी, भुनिंबादी काढा,रोहितकारिष्ट इ. औषध रचना तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करता येते.


अजूनही असंख्य औषधी आयुर्वेदात आहेत ज्याचा वापर निष्णात वैद्य रूग्ण बरा होण्यासाठी करत असतात.


ताम्र सिंदूर, हजरुल यहूद भस्म, मेदोहरविडंगदी लौह, फलत्रिकादी क्वाथ अश्मरीहर रस,श्वेत पर्पटी, गोखरू क्वाथ इ.यासारख्या औषधींचा उपयोग आयुर्वेदिक वैद्याच्या सल्याने व मार्गदर्शनाखाली करावा.




*संकलन-* 


*

Featured post

Lakshvedhi