*तूप....*
जेवण कसलेही असो, पंगतीला तूप वाढले कि मगच जेवायला सुरुवात करायची आपली परंपरा आहे, एकंदरीत तूप हा स्वयंपाकघरातला एक अविभाज्य घटक आहे..
तुपः ।। घ्रुतम् आयुः।। , सहस्रवीर्य विधिभिघ्रुतं कर्मसहस्रक्रुत्।।
ज्याच्या आहारात थोड्या फार प्रमाणात तुप रोज आहे तो निरोगी आयुष्य दिर्घकाळ जगतो. सर्व प्रकारच्या स्निग्ध पदार्थात तूप हे सर्वश्रेष्ठ आहे.. शरिराची दर क्षणाला झिज होत असते, ती भरून यायला शरिरात स्निग्धता लागते..
◼️सात धातूंमध्ये मज्जा हा धातू सर्वात श्रेष्ठ धातू होय. शरिराच्या ठिकठिकाणाच्या कार्यास तुपाची मदत मोठी होते, आयुर्वेदाप्रमाणे तूप हे आयुष्यवर्धक व मधूर रसाच्या पदार्थात श्रेष्ठ आहे, शरिराला तुपामुळे स्थैर्य मिळते, बुद्धि, धारणा शक्ति, स्मरणशक्ति वाढवणे याकरता तूप माफक प्रमाणात रोज घ्यावे.
◼️घ्रुत हे शित गुणांचे असून वात व पित्त विकारात काम करते, अरूची, भूक न लागणे, अग्निमांद्य, या विकारात अग्निवर्धन होते, शीतपित्त, व गांधी उठणे या विकारात, तुपात कालवून मिरेपुड लावली तर अंगाची खाज कमी होते,
◼️आम्लपित्तात, नियमाने सकाळी व संद्याकाळी पंधरा ग्रँम तूप घ्यावे, स्रियांच्या प्रदर विकारात गुणकारी आहे, क्रूश व्यक्तिने कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी यावर थोडे तुप गरम पाण्याबरोबर घ्यावे,
◼️ज्यांचा कोठा रुक्ष आहे, बद्धकोष्ठ आहे, त्यांनी रोज रात्री एक कप गरम दुधासोबत एक चमचा तूप घ्यावे.
◼️कान सतत वाहणे, कानात आवाज येणे, कान कोरडे पडणे, तसेच डोळे रूक्ष होणे, डोळ्यांचा वाढता नंबर, डोळे लाल होणे, या विकारात रसायनकाली म्हणजे सकाळी, वीस ग्रँम तूप खावे..
◼️उष्णतेने केस गळत असल्यास, केसात खवडे, चाई, फोड होत असल्यास, नियमित तूप खावे, कुरूप या विकारात कुरूप कापण्यापेक्षा, शतघौत तुप तिथे घासावे, बरे होतात. शांत झोपेकरता, तळपायाला, कानशिल, कपाळपट्टि, यांना तूप चांगले जिरवावे.
◼️वात, गुल्म, पोटात फिरणारा वायू गोळा याकरता जेवणाच्या सुरुवातीला तूप चमचाभर खाउन जेवण संपतांना पुन्हा चमचाभर खावे.
◼️शरिरातील कोणतिही जखम भरून येण्यास व आतड्यातील व्रण भरण्यास तुपाचे सेवन गुणकारी आहे..
◼️क्रुश व्यक्तिच्या छातीत दुखणे, क्षयरोग, थुंकीतून रक्त पडणे, कडकी, बारीक हाडे ताप या विकारात नेमाने तुप खावे, बल मिळते,. सततची डोकेदुखी, असल्यास नाकपुडीत दोन थेंब तुपाचे टाकावे,
◼️तोंड आल्यास, अल्सर झाल्यास जिभेला तुप चोळावे. त तोंडात तुप धरावे,
◼️त्वचा विकारात , खाज व आग, थांबवण्याकरता, विशेषतः सोरायसिस मद्ये तुप खाणे लाभदायी आहे,
◼️समस्त विषविकारात पोटात घेण्यासाठी तुपासारखा उपाय नाही, विषाच्या दहा गुणाविरूद्ध लढा देण्यास तुपाचे दहा गुण आहेत, चुकिच्या औषधांचे परिणाम डोळ्यावर, त्वचेवर, केसांवर, किडनीवर, झाल्यास , सकाळी तूप घ्यावे.
◼️फिटस् येणे, आकडी, विस्मरण, उन्माद, या वातविकारात, पोटात तूप घ्यावे, तळहात, पाय, कानशिले, यांना तूप घासावे, लकवा, तोंडावरून वारे जाणे, तोंड वाकडे होणे, या विकारात, नाकात दोन थेंब तुप टाकावे, डोळ्यात टाकावे
◼️मूळव्याधीत गरम दूधात तुप घालून प्यावे, वारंवार गर्भपात होत असल्यास तूपाचे नियमित सेवन केल्यास गर्भाशय बलवान होते, कँसर व्याधित केमोथेरपी, रेडिएशन, यांचे दुष्परिणाम टाळण्याकरता तूपाचे सेवन करावे. शुद्ध तुपाने चेहर्यावर मालिश केल्यास चमकतो, मुलायम राहतो,
◼️डाळ शिजतांना तूप टाकल्यास गँस होत नाही.
◼️तुपामध्ये विटामिन ए. डी. व कँलशिअम, फाँस्फोरस, मिनरल्स, पोटँशिअम, असे अनेक पोषक तत्वे असतात,
*तेव्हा, आपल्या आहारात नक्कीच तूप कायम असावे. देशी गाईचे तूप अतिउत्तम.*
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
*डॉ. प्रमोद ढेरे,
No comments:
Post a Comment