Friday, 2 June 2023

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले

 शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले


- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


रायगड येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा दिमाखात साजरा.






            मुंबई, दि. 2 : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला.


            छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपणही करण्यात आले.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार सुनील तटकरे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले तसेच इतर लोकप्रतिनिधी, मान्यवर तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य गोरगरीब रयतेचे राज्य होते. त्यांनी जातिभेद केला नाही, शिवाजी महाराजांनी महिलांना पुढे येण्याची संधी दिली. महाराज त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमुळे लोकप्रिय होते, जनतेची काळजी घेणारा हा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कारभार करतोय, याचा आम्हाला अभिमान आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना केलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारनेदेखील ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजना सुरु केली आहे. सिंचन वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु केली आहे. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.


छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


       “छत्रपती शिवाजी महाराजांनी सुशासन, राष्ट्रकल्याण, लोककल्याणाचा मार्ग दाखवला. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले. कठीण काळात जनतेत आत्मविश्वास जागवला. सैन्य नेतृत्वाचे गुण त्यांनी शिकवले. राष्ट्र निर्माणाचे व्हिजन दिले. महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांनी आरमाराचे महत्त्व जाणले. त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. आजही जलदुर्ग अढळपणे टिकून आहेत. महाराजांनी एकता आणि अखंडता यांना प्राधान्य दिले. आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब 'एक भारत - श्रेष्ठ भारत' या संकल्पनेत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. महाराजांनी आक्रमकांच्या विरोधात लढाच दिला नाही, तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला. त्यांचे व्यक्तिमत्व अद्भुत होते त्यांनी स्वराज्य ही स्थापन केले आणि सुराज्य ही स्थापन केले. त्यांनी राष्ट्र उभारणीचा व्यापक दृष्टिकोन मांडला. आपल्या सर्वांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा”, या शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या दृकश्राव्य संदेशातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.


नवी दिल्ली येथे छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, “शिवराज्याभिषेक सोहळा आपण अनुभवत आहोत, हे आपले भाग्य आहे. महाराष्ट्र निर्मितीची सुरुवात स्वराज्य स्थापनेपासून झाली. राज्य कसे करावे, हे शिवरायांनी जगाला शिकविले. शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर आहेत. दिल्लीतही शिवरायांचा भव्य पुतळा उभारला पाहिजे, अशी मागणी राज्याच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केलेली कामे आजही आम्हाला आदर्शवत आहेत. त्यांच्या राज्याभिषेकाने नवी नाणी तयार करण्यात आली, गडकिल्ल्यांना नवे अस्तित्व मिळाले. छत्रपतींची राजमुद्रा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर आणली आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी नवी दिल्ली येथे झाले पाहिजे, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याच्या वतीने करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


शिवाजी महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचविण्याचा संकल्प


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


            यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मनामनात पोहोचवण्याचा संकल्प आपण केला आहे. यापुढील काळात किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्य शासन खंबीरपणे शिवराज्याभिषेक समितीच्या पाठीशी राहिल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जगदंब तलवार देशात आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. महाराजांच्या जीवनावरील गॅझेटीयर सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. याशिवाय, तंजावर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभ्यास होण्यासाठी पाच कोटी रुपये दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.


            खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्याचा आदर्श जगभरातील लोकशाही मानणाऱ्या देशांनी घेतला आहे.


            शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्ष सोहळ्यानिमित्त राज्यभर वर्षभरात विविध कार्यक्रम होणार असून त्याचा प्रारंभ 1 जूनपासू

न करण्यात आला आहे.


००००


 


थोडीशीच गंम्मत* (

 *थोडीशीच गंम्मत* (Forwarded)

१) स्वर्गात जायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा.. मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..😂


२) काही चेहरे मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी भाग पाडतात..😂


3) काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत. फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.


४) रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂


५) चष्मे लावणाऱ्या लोकांचं अर्ध आयुष्य.. "माझा चष्मा कुठं आहे" हे शोधण्यातच निघून जातं.. 😂


६) तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी.. ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..😂


७) मटणाच्या आणि दारुच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला.. Corona ची किंचित ही भीती नसते..😂


८) कुंडली खरं तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे. मुलगा बिचारा कुणाशीही adjust करून घेतो..😂


९) ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात.. त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते..😂


१०) लग्नात मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही..😂


११) आज कालच्या पोरा पोरींपेक्षा संस्कारी तर मच्छर आहेत.. सातच्या आत घरात येतात..😂


१२) ज्यांचं मन साफ असतं ना.. त्यांना रोज आंघोळ करायची गरज नसते...😂


१३) जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😂


१४) आयफोन वाल्यांच अर्ध आयुष्य.. मिरर सेल्फी काढण्यात अन् आयफोन चा EMI भरण्यातच निघून जातं...😂


१५) वर्षभर Dp न बदलणारे.. जेव्हा २-२ दिवसात Dp बदलतात.. तेव्हा समजून जायचं.. कोणीतरी नवीन 'जेवलीस का ' add झाली आहे..😂


१६) पोट आणि Ego कमी असेल तर.. माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. 😂


१७) गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 😂


१८) काही लोक रोज सकाळी लवकरच उठतात.. फक्त त्यांना शुद्धीवर यायला १-२ तास लागतात.. 😂


१९) आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..😂


२०) जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😂


२१) जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो.. तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं..की आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षाही खराब आहे.. 😂 😄


*ज्ञान समाप्त*

Sw.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना
















 

राजभवनात प्रथमच 'तेलंगणा राज्य स्थापना दिन' साजरा होणार

 राजभवनात प्रथमच 'तेलंगणा राज्य स्थापना दिन' साजरा होणार

            मुंबई, दि. १ : 'एक भारत - श्रेष्ठ भारत' उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच राजभवन येथे 'तेलंगणा राज्य स्थापना दिन' साजरा केला जाणार आहे.


            राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २ जून) सायंकाळी ५.३० वाजता तेलंगणा राज्य स्थापना दिनानिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


            २ जून हा तेलंगणा राज्य स्थापना दिवस देशातील सर्व राजभवनांमध्ये साजरा केला जाणार आहे. दिनांक २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती.


            राजभवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात 'जय जय हे तेलंगणा' नृत्य, 'बथकम्मा' व 'बोनालू' नृत्याचे सादरीकरण केले जाणार आहे. 


            देशातील सर्व राज्यांच्या सांस्कृतिक परंपरा याविषयी माहिती व्हावी हा आयोजनामागचा उद्देश आहे.


            राजभवन तसेच तेलंगणा शासन व फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (F - TAM) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


**


 


Maharashtra Raj Bhavan to celebrate 'Telangana State Formation Day' on Friday


      Maharashtra Raj Bhavan will be celebrating the 'Telangana State Formation Day' at Raj Bhavan Mumbai at 5.30 pm on Friday (2 June).


      Maharashtra Governor Ramesh Bais will preside over the cultural programme. 


      This is for the first time that Maharashtra Raj Bhavan will be hosting the 'Telangana State Formation Day' function. The Telangana State was formed on 2 June 2014.


      The Telangana State Formation Day is being celebrated in all Raj Bhavans in the country as part of the 'Ek Bharat Shreshtha Bharat' initiative. The objective of the programme is to promote harmony and understanding among people about the cultural traditions and languages of other States.


      The programme at Maharashtra Raj Bhavan is being organised in association with 'Government of Telangana' and the Federation of Telugu Associations of Maharashtra (F - TAM).


0000


 

सर्वांनी मिळून स्वच्छ, आरोग्यदायी मुंबई बनवूया

 सर्वांनी मिळून स्वच्छ, आरोग्यदायी मुंबई बनवूया

- पालकमंत्री दीपक केसरकर

'शासन आपल्या दारीकार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ

 

            मुंबईदि. १ : आपण सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छआरोग्यदायी मुंबई बनविण्याचा प्रयत्न करू याअसे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. 'शासन आपल्या दारीकार्यक्रमांतर्गत पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते स्थानिक लाभार्थ्यांना एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

            मुंबई शहर जिल्ह्यातील माटुंगा (प) येथील सिटी ऑफ लॉस एंजेलिस शाळेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आयोजित या कार्यक्रमात स्थानिक आमदार सदा सरवणकरजिल्हाधिकारी राजीव निवतकरजिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

            पालकमंत्री श्री. केसरकर म्हणालेशासनामार्फत नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. तथापि या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई शहरात विविध घटकांतील रहिवाशांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. युवकांसाठी रोजगारमहिलांच्या हाताला कामआरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाविद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाकोळीवाड्यांसाठी फूड कोर्टज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुंबई शहरातील उंदिरांची संख्या कमी करण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

            आमदार सदा सरवणकर यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. तर जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी प्रास्ताविकाद्वारे विविध योजनांबाबत माहिती दिली. अशाच प्रकारचा उपक्रम दर महिन्याला आयोजित करून वंचित घटकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

            कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. या अनुषंगाने शासनस्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात आल्या आहेत. शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी तसेच विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ दिले जात आहेत.

            ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाद्वारे प्रामुख्याने दिव्यांगांना साहित्य वितरणसंजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रमाणपत्र तसेच हयातीचा दाखला भरून घेणेमतदार ओळखपत्रबचत गटांना प्रमाणपत्रअनाथ बालकांना प्रमाणपत्रघरेलु सन्मानधन योजनेअंतर्गत धनादेशशिधापत्रिकाशैक्षणिक कर्ज प्रमाणपत्रजात प्रमाणपत्रआधारकार्ड वाटप तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र वितरण आदी योजनांचा लाभ एकाच छताखाली प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आला.

0000

जागतिक दुग्ध दिनानिमित्त विशेष लेखप्रति जनावर दुग्ध उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येणार..

 जागतिक दुग्ध दिनानिमित्त विशेष लेखप्रति जनावर दुग्ध उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येणार..


 


            दूध हे पूर्णान्न असून त्यात मानवी शरीरासाठी आवश्यक असणारी पोषण मुल्ये असतात. सध्या आपला ओढा फास्ट फूडवर अधिक असून तो कमी करुन आपण दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करण्यावर भर देणे आवश्यक आहे. राज्यातील दूध व्यवसायातील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याशिवाय प्रति जनावर दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी चांगल्या दुधाळ जनावरांची पैदास होणे गरजेचे असून हे कसे करता येईल यासाठीचा अभ्यास करण्यात येत आहे. दुग्ध उत्पादन वाढीसाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत.


दुधात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध लवकरच कायदा


- पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील


            राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. येणाऱ्या काळात दूध भेसळ रोखण्यासाठी एक हेल्पलाईन तयार करण्यात येईल, जेणकरुन या हेल्पलाईनवर ग्राहकांना दूध भेसळीबाबत तक्रार करता येईल. सध्या राज्यात 70 टक्के दूध संकलन हे खासगी क्षेत्राकडून, 30 टक्के दूध संकलन हे सहकारी क्षेत्राकडून केले जात आहे. जागतिकीकरण व खुल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दुधाचे दर हे बाजारातील मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात. खासगी क्षेत्रातील दूध व्यावसायिक व त्यांच्या मार्फत खरेदी व विक्री करण्यात येणाऱ्या दुधाच्या दरावर शासनाचे कोणतेही नियंत्रण नाही.येणाऱ्या काळात एक विशेष अभ्यासगट तयार करुन यामध्ये ग्रामीण भागातील प्रतिनिधी आणि या क्षेत्रातील तज्ञ घेऊन सहकारी दूध संघांना बळकटी देण्यासाठी काय करता येईल याबाबत अभ्यास करण्यात येईल.याशिवाय दुधात भेसळ करणाऱ्यांविरुध्द लवकरच कायदा करुन तो अंमलात आणला जाईल. याशिवाय दुधातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल व्हॅन, क्यूआर कोड यांचा वापर तसेच दुधाची तपासणी करुन दूध भेसळ करणाऱ्यांवर जरब बसविली जाणार आहे.


            दूध उत्पादन वाढविण्याबरोबरच दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन वाढविण्यावरही येणाऱ्या काळात भर देण्यात येणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी उत्तम दर्जाचे पशुखाद्य रास्त दरात मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. दूध उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रति जनावर दूध उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. यासाठी जातिवंत वंशावळीचे सिमेन्स, उच्च गुणप्रतीचे पशुखाद्य, मिनरल मिक्चर आणि औषध सुविधा पुरविण्यात येऊन दूध उत्पादकांकडून स्वच्छ दूध उत्पादन कसे गोळा होईल यावर भर देण्यात येणार आहे.


            देशी गो-वंशाचे संवर्धन, संगोपन व संरक्षणासाठी महाराष्‍ट्र गो-सेवा आयोगाची स्‍थापना ही ऐतिहासिक बाब म्‍हणावी लागेल. या आयोगाच्‍या माध्‍यमातून गोवर्धन, गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्‍यवर्धन योजना व देशी गोवंशांच्‍या संवर्धनासाठी भ्रूणबाह्य फलन व प्रत्यारोपण सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील 11 जिल्‍हे दुग्‍ध विकासाच्‍या दुसऱ्या टप्‍प्यासाठी 160 कोटी रुपयांच्‍या तरतुदीमुळे या सर्व जिल्‍ह्यांमध्‍ये दूग्‍ध व्‍यवसाय विकासास चालना मिळणार आहे. विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत 11 जिल्ह्यातील 4 हजार 263 गावांमध्ये, अनुदानावर पशुखाद्य व खनिज मिश्रण पुरवठा, संतुलित आहार सल्ला, दुधाळ जनावरे वाटप, वैरण विकास कार्यक्रम, प्रशिक्षण, वंधत्व निवारण शिबिरे, गोचीड निर्मूलन इत्यादी बाबी राबविण्यात येत आहेत.


            शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून पशुधन व्यवसायाकडे पाहिले जाते. दूग्ध व कुक्कुटपालन व्यवसायाला नवीन दिशा मिळावी, नव-नवीन तंत्रज्ञानाचा पशुधन व्यवसायाला फायदा कसा होईल याला प्राधान्य दिले जाणार आहे. शेळी-मेंढी पालनाला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या महामंडळाचे मुख्यालय अहमदनगर असणार आहे. यासाठी दहा हजार कोटीचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पशुसंवर्धनाच्या व्यवसायात ग्रामीण अर्थचक्राला गतिमान करण्याची क्षमता असल्याने या व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

नागपूरच्या ‘एम्स’ला एनएबीएचची मान्यता देशातील पहिले रुग्णालय

 नागपूरच्या ‘एम्स’ला एनएबीएचची मान्यता  देशातील पहिले रुग्णालय.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


        नवी दिल्ली, 1 : नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) हे देशातील नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) मानांकन प्राप्त करणारे पहिले रुग्णालय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या एम्स रुग्णालयातील पथकाचे अभिनंदन केले.


‘एनएबीएच’ची मान्यता प्राप्त करणे या रुग्णालयासाठी महत्वाची पावती असून उच्च दर्जाची रुग्ण सेवा आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या वचनबद्धतेचा हा दाखला आहे. ‘एनएबीएच’ची मान्यता हे आरोग्य सेवेच्या गुणवत्तेसाठी जागतिकस्तरावर मान्यताप्राप्त मानाकंन आहे. ही मान्यता मिळणे हा कुठल्याही रूग्णालयासाठी मोठा सन्मान समजला जातो. 


‘एनएबीएच’ची मान्यता प्रक्रिया कठोर आणि सर्वसमावेशक असते. यामध्ये रुग्णांची काळजी, सुरक्षितता आणि संस्थांत्मक कार्यक्षमतेसह विविध क्षेत्रांमध्ये रुग्णालयाच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. नागपूरच्या ‘एम्स’ रुग्णालयाने या सर्व मापदंडामध्ये उत्कृष्टतेची वचनबद्धता दाखवून ही मान्यता मिळविली आहे. ‘एम्स’ रुग्णालयाने एनएबीएचची मान्यता मिळवून आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.


‘एम्स’ नागपूरबाबतचे ट्विट सामायिक करीत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी रुग्णालयाचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले आहे की, “या कामगिरीबद्दल एम्स नागपूरच्या चमूचे अभिनंदन, ही कामगिरी करत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा एक मापदंड स्थापित केला आहे.” प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये झाले होते.


नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) ही भारतीय गुणवत्ता परिषदेची एक घटक आहे. याची स्थापना आरोग्य सेवा संस्थांसाठी मान्यता प्रदान करणे व संचालित करणे यासाठी करण्यात आली आहे. एनएबीएच मंडळाचे कार्य स्वायत्त आहे. आरोग्य सुविधांच्या मान्यतेसह ही संस्था उत्कृष्ट परिचारिका घडविण्यास प्रोत्साहन देत असते. प्रयोगशाळा प्रमाणन उपक्रम राबविते, गुणवत्ता आणि रूग्णांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करीत असते. 

Featured post

Lakshvedhi