Friday, 2 June 2023

मूल येथे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यास्वतंत्र आगार निर्मितीबाबत आवश्यक कार्यवाही करावी

 मूल येथे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यास्वतंत्र आगार निर्मितीबाबत आवश्यक कार्यवाही करावी.


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. १ : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्वतंत्र आगार निर्मितीबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक घेतली. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात यासंदर्भात राज्य शासनाने सूचना केल्या होत्या. परिवहन विभागाने यातील सर्व बाबी तपासून कार्यवाही करावी.


            मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले की, मूल शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे तेथे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्वतंत्र आगाराची आवश्यकता आहे. यासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून परिवहन विभागाने तातडीने हा विषय मार्गी लावावा.


0000


 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार.


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


शिवविचारांचा जागर करण्यासाठी वर्षभर राज्यभरात विविध कार्यक्रम


शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, जाणता राजा महानाट्याने उपक्रमांचा प्रारंभ


            मुंबई, दि. 1 : छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी जगभरात असलेले शिवकालीन साहित्य आणि वस्तूंचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचा प्रारंभ गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवकालिन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, सौ. सपना मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, उपसचिव विलास थोरात, श्रीनिवास वीरकर, विनीत कुबेर आदी उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी महानाट्य : ‘जाणता राजा’चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शस्त्र प्रदर्शनाची पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच कलाकारांनी सादर केलेल्या युद्धकला प्रात्यक्षिकांनाही दाद दिली.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज अतिशय कुशल संघटक आणि प्रशासक होते. याची साक्ष शिवाजी महाराजांनी बांधलेले गड, किल्ले पाहिल्यावर येते. शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी घेतली. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त किल्ले रायगडावर शुक्रवार २ जून रोजी कार्यक्रम होत आहे. हा क्षण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आणि या विभागाचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे कौतुक केले.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, शिवराज्याभिषेक सोहळ्यास उद्या २ जून रोजी किल्ले रायगडावर प्रारंभ होईल. या सोहळ्यात राज्यातील १ हजार १०८ नद्या आणि जलाशयातील पाण्याने अभिषेक करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आणि जगदंबा तलवार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार वाघनखे दर्शनासाठी देण्याचे ब्रिटन सरकारने मान्य केले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सेनापतींवर आधारित टपाल तिकिटांचे प्रकाशन या कालावधीत व्हावे, असा प्रयत्न सुरु आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, राज्यभर महानाट्य ‘जाणता राजा’चे प्रयोग करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराजांवरील सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येईल. या वेगवेगळ्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येतील, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            महाराष्ट्राचा हा अभिमान आणि गौरवशाली इतिहास जगासमोर जाण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्न करीत असून त्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक श्री. चवरे यांनी आभार मानले.


शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन


            शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या पुढाकाराने गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात शिवकालिन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचेही उदघाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात तलवार, पट्टा, कट्यार, गुर्ज, भाला, खंजीर, चिलखत, गुप्ती, बंदूक अशी जुन्या काळातील चारशेहून अधिक शस्त्रे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. दिनांक 2 ते 6 जून 2023 या कालावधीत गेट वे ऑफ इंडियाच्या गाभाऱ्यात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व शस्त्रास्त्र वापराची प्रात्यक्षिके प्रदर्शित होतील. याशिवाय दिवसातून चार वेळेस युद्ध कला सादरीकरण व शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त २ जून रोजी राजस्थानी लोककला, शनिवार ३ व रविवार ४ जून रोजी महाराष्ट्राची लोककला, सोमवार ५ ते बुधवार ७ जून २०२३ या कालावधीत गोवा व गुजरात राज्याच्या लोककलेचे सादरीकरण होणार आहे.  


0000

वाचता वाचता ही माहिती मिळाली.

 वाचता वाचता ही माहिती मिळाली.


1. गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.

2. मोनालिसाच्या चित्राला *भुवया* नाहीत.

3. "The quick brown fox jumps over the lazy dog" हया इंग्रजी वाक्यात *इंग्रजीचे सर्व अक्षर* आलेले आहेत.

4. *जीभ* हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.

5. मुंग्या अजिबात झोपत नाहीत.

6. "I am." हे इंग्रजीतील *सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य* आहे.

7. कोका कोला हे शीत पेय मूलतः हिरव्या रंगाचे होते.

8. जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव *मोहम्मद*

9. जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमी पेक्षा जरासे कमी भरते.

10. वाळवंटातील उडणाऱ्या वालुकणापासून बचावासाठी *उंटाला तीन पापण्या* असतात.

11. "abstemious" आणि "facetious" हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात *इंग्रजीचे स्वर क्रमबध्द* आले आहेत.

12. सर्व खण्डांची इंग्रजीतील नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्यात अक्षराने संपतात.

13. अमेरिकेत दरमाणसी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.

14. TYPEWRITER हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळदाबून टाईप होणारा सर्वात लांब शब्द आहे. 

15. उणे चाळीस डिग्रीला सेल्सीअस व फॅरेनहाईट दोन्ही उणे चाळीसच असतात.

16. चाॅकलेट खाल्याने कुत्र्याचा मृत्यू होवू शकतो. कारण चाॅकलेटमधील थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्व्हससिस्टिमवर विपरित परिणाम होतो.

17. स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषां पेक्षा दुप्पटवेळा पापण्या ब्लिंक करतात.

18. आपलाच श्वास रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.

19. ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड" तशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये नमूद आहं.

20. डुकराना आकाशाकडे पाहता येत नाही.

21. "sixth sick sheikh's sixth sheep is sick" हे इंग्रजीतील सर्वात उच्चारणास अवघड वाक्य मानले जाते. 

22. "Rhythm" हा इंग्रजीतील स्वर रहीत सर्वात लांब शब्द आहे.

23. आपण खूप जोरात शिंकलो तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर डोक्यातील वा मानेतील रक्तवाहीनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.

24. पत्त्यातील चारही राजे महान राज्यांचे चित्र आहेत. 

- इस्पिक - राजा डेव्हिड

- चिलावर - अलेक्झांडर

- बदाम - चार्लेमॅग्ने

- चौकट - जुलियस सिझर

25. आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.

26. 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321

27. ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.

28. गोळीरोधक जाकेट, आगनिरोधक, कारचे वायपर व लेसर प्रिंटर्स हे सर्व स्त्रीयांनी शोधलेली साधने आहेत.

29. *मध* हे एकमेव खाद्यान्न चीरकाल टिकते.

30. मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.

31. साप तीन वर्षांपर्यत झोपू शकतो.

32. सर्व विषुवृत्तिय अस्वल डावरे असतात.

33. विमानात द्यावयाच्या सॅलड मधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.

34. फुलपांखरे पायांनी चव अनुभवतात. 

35. हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.

36. मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी मानसाळला गेलेला नाही. 

37. मृत्युपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

38. Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्याहाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.

39. मुंग्या विष प्राशना नंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.

40. विज दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.

41 रक्ताचा तीस फुट फव्वारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते. 

42. उंदिरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहालाख होवू शकतात. 

43. इअरफोन एकतास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700पट विषाणू वाढतात.

44. सिगारेटलायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.

45. बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.


ही पोस्ट मला इंग्रजीतील मिळाली.

350 वां शिवराज्याभिषेक वर्ष समारोह के अवसर परमुख्यमंत्री के करकमलों द्वारा विशेष प्रतीक चिन्ह का लोकार्पण

  

350 वां शिवराज्याभिषेक वर्ष समारोह के अवसर परमुख्यमंत्री के करकमलों द्वारा विशेष प्रतीक चिन्ह का लोकार्पण


पूरे विश्व में पहुंचेगा शिव विचारों का जागरण


- सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दिनांक 1 जून: छत्रपति शिवाजी महाराज के 350वें शिवराज्याभिषेक वर्ष के समारोह के अवसर पर राज्य सरकार के सांस्कृतिक कार्य विभाग की तरफ से विशेष प्रतीक चिन्ह (स्पेशल लोगो) बनाया गया है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के करकमलों द्वारा आज इस विशेष प्रतीक चिन्ह का लोकार्पण किया गया। वर्ष भर आयोजित किए जाने वाले कार्यक्रमों के लिए इस प्रतिक चिन्ह का इस्तेमाल किया जाएगा। इस अवसर पर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित थे। मंत्री श्री. मुनगंटीवार की पहल पर यह प्रतीक चिन्ह तैयार किया गया है।


            इस अवसर पर मुख्यमंत्री श्री. शिंदे ने प्रतीक चिन्ह की सराहना की और शुभकामनाएं दी है।


             शिवराज्याभिषेक दिवस की 350 वीं वर्षगांठ के समारोह के अवसर पर राज्य सरकार ने


छत्रपति शिवाजी महाराज के विचारों का जागरण करने के लिए विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया है। इन कार्यक्रमों के माध्यम से मराठी लोगों के मन में छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को फिर से जगाया जाएगा। उसके लिए इस विशेष लोगो (प्रतीक चिन्ह) का इस्तेमाल किया जाएगा।


              राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिति के सुनील कदम ने शिव कालीन के मंगल चिन्ह, महाराजा के पराक्रम और शौर्य को अधोरेखित करने वाले संदर्भों के साथ इस प्रतीक को तैयार किया गया है। इसके माध्यम से विश्व के हर कोने में रहने वाला हर शिवप्रेमी जुड़ा रहे और महाराज के इतिहास को नई पीढ़ी तक पहुंचाने के लिए राज्य सरकार ने संकल्प लिया है, यह बातें सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार ने कही।


              इस अवसर पर विभिन्न विभागों के वरिष्ठ अधिकारी भी उपस्थित थे।

आरक्षित पदावर महिला उमेदवारांचीचनियुक्ती करण्याबाबत लवकरच निर्णय

 आरक्षित पदावर महिला उमेदवारांचीचनियुक्ती करण्याबाबत लवकरच निर्णय


- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. १ : शासकीय नोकर भरतीमध्ये महिलांकरिता ३० टक्के आरक्षण आहे. या पदभरतीमध्ये महिलांच्या आरक्षित पदावर महिला उमेदवार न मिळाल्यास पुरुष उमेदवारांची भरती करण्यात येवू नये याबाबत मंत्रिमंडळाची मान्यता घेवून महिला व बालविकास विभागाकडून लवकरच कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


             आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी महिला आरक्षणासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेनुसार चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत मंत्री श्री. लोढा बोलत होते.


            यावेळी आमदार डॉ.भारती लव्हेकर, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.


            मंत्री श्री.लोढा म्हणाले की, महिला व बालविकास विभागाकडून महिलांच्या आरक्षित पदावर महिला उमेदवार न मिळाल्यास पुरुष उमेदवारांची भरती करण्यात येवू नये याबाबत मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महिला व बालविकास विभागाने ही कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. 

नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा

 नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


ऐरोली आणि बेलापूर मतदार संघातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा


 


            मुंबई दि. १ : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या.


            ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.


            या बैठकीला आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की बारवी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना ज्याप्रमाणे कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घेण्यात आले त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिका आणि सिडको मध्ये कार्यरत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. सिडकोतर्फे आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी नागरिकांसाठी अभय योजना राबवावी अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऐरोली - कटाई उन्नत मार्गावर मुंबईच्या दिशेने येण्या आणि जाण्यासाठी मार्ग, पामबीच - घनसोली ऐरोली रस्त्याच्या कामासह मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्याबाबत सूचना दिल्या.


            बेलापूर मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी वाशी येथे होणारे महाराष्ट्र भवन उत्तमरित्या साकारावे. हे भवन राज्याच्या संस्कृतीचे ओळख करून देणारे असावे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


००००

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्तविशेष बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्तविशेष बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


शिवविचारांचा जागर जगभर पोहोचणार


- सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. १ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विशेष बोधचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकर्पित करण्यात आले. वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी हे बोधचिन्ह वापरण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी बोधचिन्हाचे कौतुक करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.


            शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनांमनात व्हावा, जगभरात जिथे - जिथे मराठी माणूस आहे तिथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावेत यासाठी राज्य शासनाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी खास हा लोगो (बोधचिन्ह) वापरण्यात येणार आहे.


            शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणारे संदर्भ या बोध चिन्हाचे वैशिष्ट्य असून राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे सुनील कदम यांनी हे बोधचिन्ह तयार केले आहे. जगातील कानाकोपऱ्यात राहणारा प्रत्येक शिवप्रेमी या माध्यमातून जोडला जावा आणि महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi