Sunday, 28 May 2023

मॉरिशसमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

 मॉरिशसमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण


स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोचविण्याची गरज


                                                     - सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

       मॉरिशस, दि. २८ : - एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले,फळे, मुळे उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर हे कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील, कवी, लेखक, साहित्यिक, तत्वचिंतक, समाजसुधारक, दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते. त्यामुळे सावरकर यांचे प्रखर विचार हे आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मॉरिशस येथे केले.


                  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत रुजवण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु रहावे म्हणून मॉरिशस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजन करण्यात आले आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.


                 मॉरिशस आणि महाराष्ट्राचे भावबंध महासागराएवढे गहिरे आणि विशाल आहेत. मॉरिशसच्या मराठी बंधू-भगिनींनी २०० वर्ष आपली हिंदू संस्कृती जपून येथे मराठी भाषा वाढविण्याचे आणि संवर्धनाचे कार्य केले आहे. येथील सरकारच्या विविध मंत्रालयांना भेटी देत असताना २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसला विशेष मित्रराष्ट्राचा दर्जा दिल्याने भारताचे आणि मॉरिशसचे भावबंध अधिक दृढ झाले आहेत असेही यावेळी मंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.


      महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात व्यावसायिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ऋणानुबंध वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. त्यातूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अर्धाकृती पुतळा महाराष्ट्रातर्फे आम्ही आज भेट दिला आहे. स्वातंत्र्यवीर यांच्या विचारांची ऊर्जा मॉरिशसमधील समस्त मराठी बांधवांना मिळत राहील असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.


         सावरकरांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होते. सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते. त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. अंदमानच्या कारावासातही सावरकरांनी आपले अजरामर काव्य रचले. अंदमानमधील सेल्युलर जेलमधील भिंतीवर कोरलेले सावरकरांचे राष्ट्रभक्तीपर काव्य आजही त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.


      भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत होताना दिसत आहेत. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत आणि मॉरिशस हे दोन्ही देश विकासाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मकरित्या पुढे जात आहेत. मॉरिशस मधील सांस्कृतिक चळवळ ही वृद्धिंगत होताना दिसत आहे असेही गौरवोद्गार मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी काढले.


         या प्रसंगी मॉरिशस हाऊसिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद बब्बीआ, मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आणि मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे मुख्य निर्माते अर्जुन पुतलाजी, मराठी भाषिक संघाचे अध्यक्ष नितीन बाप्पू, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे अध्यक्ष आणि सीएसके असंत गोविंद, खासदार अ‍ॅश्ले इट्टू, कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय वारसा निधी संचालक शिवाजी दौलतराव, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे सरचिटणीस बाबुराम देवरा, क्रॉसवेज इंटरनॅशनल, मॉरिशसचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप ठाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.


000000

नवीन संसद भवनाचे उद्घाटन देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब

 नवीन संसद भवनाचे उद्घाटन देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब

                                                     – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            नवी दिल्ली, २८ : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमानाची व सन्मानाची बाब असून या अभूतपूर्व सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.


देशाच्या राजधानीमध्ये नव्या संसद भवनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे खासदार, विविध मंत्रालयांचे सचिव, माजी केंद्रीय मंत्री, संसदेचे दोन्ही सभागृहांचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.


नवीन संसदेच्या निर्मितीबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले आहे, ही देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब आहे. आज या वास्तूचे लोकार्पण झाले असून संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट, वृद्धिंगत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. आजचा दिवस हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील या नव्या वास्तूचे बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री यांचे अभिनंदन केले.


नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी सर्व धर्म प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री यांनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला व नंतर या नव्या इमारतीच्या उभारणीमध्ये हातभार लावलेल्या कामगारांचा गौरव त्यांनी केला.


000



नई संसद भवन का उद्घाटन देश की जनता के लिए सम्मान की बात है


                                                                     – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे






     नई दिल्ली, २८ : नए संसद भवन का उद्घाटन एवं लोकार्पण, समस्त देशवासियों के लिए गर्व और सम्मान की बात है और इस अभूतपूर्व समारोह का साक्षी होने का सौभाग्य मुझे मिला है, यह भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने व्यक्त की.


      देश की राजधानी में नए संसद भवन का उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों आज हुआ। इस अवसर पर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला समेत केंद्रीय मंत्री, विविध राज्यों के राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, उपमुख्यमंत्री, दोनों सभागृह के सांसद, विविध मंत्रालयों के सचिव, पूर्व केंद्रीय मंत्री, संसद के दोनों सभागृह के पूर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित थे।


      नए संसद के निर्माण को लेकर कहते हुए मुख्यमंत्री ने बताया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों नए संसद भवन का उद्घाटन हुआ है और यह देश की जनता के लिए गर्व की बात है। आज इस वास्तू का लोकार्पण हुआ है और समूचे देश को गर्व महसूस हो, ऐसी इस नई वास्तू के माध्यम से लोकशाही अधिक मजबूत, वृद्धिंगत होगी, यह विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस दौरान व्यक्त किया। आज का यह दिन सभी भारतीयों के लिए गर्व का दिन है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना से इस नई वास्तू निर्माणकार्य विक्रमी समय में पूरा होने पर उन्होंने प्रधानमंत्री का अभिनंदन किया।


      नए संसद भवन के उद्घाटन के इस पहले चरण में सुबह सर्व धर्म प्रार्थना सभा का आयोजन किया गया था। इस दौरान मुख्यमंत्री श्री. शिंदे इस कार्यक्रम में शामिल हुए थे। इस कार्यक्रम में प्रधानमंत्री ने सेंगोल को साष्टांग प्रणाम किया और इसके बाद नई इमारत के निर्माण में काम करनेवाले कामगारों का सम्मान उन्होंने इस अवसर पर किया।


0000

                         

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!*

 *उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!*


डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि त्याचबरोबर जळजळ, मुत्रानालीकेत दाह व काहीवेळा रक्त जाणे. हा त्रास मुख्यत्वे उन्हाळ्यात उद्भवतो. अशावेळी लघवी गढूळ होते किंवा रक्तामुळे ती लालसर तपकिरी असतेआपण बघणार आहोत उन्हाळी लागण्याची करणे आणि त्यावरचे घरघुती उपाय !!...


*कारणे !*

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कामी होतं. पाणी कमी झाल्याने लघवीत क्षारचं प्रमाण वाढतं. म्हणजेच शरीरात पाणी नसल्याने ‘उन्हाळी लागते’. स्त्री आणि पुरुषांमध्ये हा त्रास वेगवेगळ्या प्रकारे असतो.

पुरुषांमध्ये लघवीला व मुत्रानालीकेत आणि जळजळ व आग होण्यासारखी लक्षणे दिसतात तर स्त्रियांमध्ये हीच लक्षणे काही प्रमाणात तीव्र असतात. स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याबरोबरच कळ येणे आणि रक्तस्त्रावाचा त्रास होतो. यापासून लहान मुलंही वाचलेली नाहीत .

, या समस्येवर काही घरघुती उपाय आहेत. चला तर बघुयात !!

.

.

.

*उपाय*

१. पहिला आणि मुख्य उपाय म्हणजे ‘भरपूर पाणी प्या.’


२. खाण्याचा सोडा आणि लिंबू पाण्यात मिसळून प्यायल्यास त्रास कमी होतो.


३. शहाळ्याचे पाणी प्या.


४. धने, जिरे, बडीशेप भिजवून, कुस्करून त्यांना पाण्यात मिसळा व त्यात खडीसाखर घालून प्यावे.


५. कलिंगडचा रस प्या.


६. नारळाच्या पाण्यात धने व गूळ घालून प्या.


७. नीरा प्यायलाने देखील फायदा होतो.


८. आमसुलाचे पाणी, कोकम सरबत साखर घालून प्यावे.


९. कैरीचे पन्हे वेलदोडा घालून प्यावे.


१०. पुदिन्याचे पाणी प्या !!

.

११ रोज दोन विलायच्या खाव्यात..

  

 १२.. चूना ओला करून. तो बेंबित भरा. लगेच आराम मिळतो.

   

  १३एका बादलीत थंड पाणी भरून मग त्यात पाय सोडून बसा...


       आयुर्वेद अभ्यासक...... सुनिता सहस्रबुद्द्धे .🍁☘️🍁



_*(

हैप्पी बर्थडे की जगह अब संस्कृत में बहुत ही अच्छा वाक्य

 हैप्पी बर्थडे की जगह अब संस्कृत में बहुत ही अच्छा वाक्य / संगीत बनाया है सिर्फ दो ही लाईन है सभी लोग याद करें ..औरों को भी याद कराएं और इसका प्रयोग करें।👍


स्वातंत्र्यवीर सावरकर यांना राजभवन येथे जयंतीनिमित्त अभिवादन

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांना राजभवन येथे जयंतीनिमित्त अभिवादन


मुंबई, दि. २८: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आज राजभवन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.


            यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Raj Bhavan pays tributes to Swatantryaveer Savarkar


      Floral tributes were offered to the portrait of Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar on the occasion of the 140th birth anniversary of Veer Savarkar at Raj Bhavan, Mumbai on Sunday ( 28 May)


      Principal Secretary to the Governor Santosh Kumar, Special Secretary Vipin Kumar Saxena, Joint Secretary Shweta Singhal, Comptroller of the Governor's Households Arun Anandkar and officers and staff of Raj Bhavan offered tribute to Veer Savarkar.


 

समाधान

 समाधान


बसायला आरामखुर्ची आहे,

हातामध्ये पुस्तक आहे....

डोळ्यावर चष्मा आहे,

इतके मला पुरेसे आहे !

📖 📚 🤓


निसर्गामध्ये सौंदर्य आहे,

निळे आकाश, हिरवी झाडी आहे....

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे,

इतके मला पुरेसे आहे !

🌌🌳🌤️🌧️🌈


जगामध्ये संगीत आहे,

स्वरांचे कलाकार आहेत...

कानाला सुरांची जाण आहे,

इतके मला पुरेसे आहे !

🎼🎤🎻🪗🎺


बागांमध्ये फुले आहेत,

फुलांना सुवास आहे....

तो घ्यायला श्वास आहे,

इतके मला पुरेसे आहे !

🌷🌸🌺🌹


साधे चवदार जेवण आहे,

सुमधुर फळे आहेत....

ती चाखायला रसना आहे,

इतके मला पुरेसे आहे !

🍲🥗🍛🥭🍒🍉


जवळचे नातेवाईक, मित्र आहेत,

मोबाईल वर संपर्कात आहेत...

कधीतरी भेटत आहेत,

इतके मला पुरेसे आहे !

👨‍👩‍👦‍👦 👩‍👩‍👦 📲


डोक्यावरती छत आहे,

कष्टाचे दोन पैसे आहेत....

दोन वेळा, दोन घास आहेत,

इतके मला पुरेसे आहे !

🏡 💸 🍛


देहामध्ये प्राण आहे,

चालायला त्राण आहे...

शांत झोप लागत आहे,

इतके मला पुरेसे आहे !

😇🚶‍♂️😴


याहून आपल्याला काय हवे ?

जगातील चांगले घेण्याचा....

आनंदी, आशावादी राहण्याचा विवेक आहे,

इतके मला पुरेसे आहे !

😊 🤗 😇


विधात्याचे स्मरण आहे,

प्रार्थनेत मनःशांती आहे...

परमेश्वराची कृपा आहे,

इतके मला पुरेसे आहे !                   


🙏🕉️🙏

नागिण... उपाय✍️

 नागिण... उपाय✍️

१) कडुलिंबाचि पाने गरम पाण्यात टाकून आंघोळ करावि.

२) रक्तदोषांतक घ्यावे

३) रात्रि झोपतांना नाकपुडित १-२ थेंब मोहरिचे तेल घालणे.

४) कँलेंडुला किंवा कँथाँरिसचे मलम जखमेवर लावणे.

५) जळजळ बंद होण्यासाठि शतघौत घ्रुत लावणे. अथवा कैलास जीवन लावणे.

६) मंजिष्ठादि काढा ३ चमचे ३ चमचे पाण्यात घेणे.

७) गंधक रसायन १ गोळि आणि वातगजांकुश १ गोळि गरम पाण्यात आग आग होत असल्यास.

८) त्रिफळा चूर्ण गरम पाण्यात रात्रि.

९) वातविद्धवंस १-१ गोळि मधा बरोबर तिव्र कळा येत असल्यास

१०) गेरू लावल्यास ही फरक पडतो..


 वैद्य. गजानन.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



_*(

Featured post

Lakshvedhi