समाधान
बसायला आरामखुर्ची आहे,
हातामध्ये पुस्तक आहे....
डोळ्यावर चष्मा आहे,
इतके मला पुरेसे आहे !
📖 📚 🤓
निसर्गामध्ये सौंदर्य आहे,
निळे आकाश, हिरवी झाडी आहे....
सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे,
इतके मला पुरेसे आहे !
🌌🌳🌤️🌧️🌈
जगामध्ये संगीत आहे,
स्वरांचे कलाकार आहेत...
कानाला सुरांची जाण आहे,
इतके मला पुरेसे आहे !
🎼🎤🎻🪗🎺
बागांमध्ये फुले आहेत,
फुलांना सुवास आहे....
तो घ्यायला श्वास आहे,
इतके मला पुरेसे आहे !
🌷🌸🌺🌹
साधे चवदार जेवण आहे,
सुमधुर फळे आहेत....
ती चाखायला रसना आहे,
इतके मला पुरेसे आहे !
🍲🥗🍛🥭🍒🍉
जवळचे नातेवाईक, मित्र आहेत,
मोबाईल वर संपर्कात आहेत...
कधीतरी भेटत आहेत,
इतके मला पुरेसे आहे !
👨👩👦👦 👩👩👦 📲
डोक्यावरती छत आहे,
कष्टाचे दोन पैसे आहेत....
दोन वेळा, दोन घास आहेत,
इतके मला पुरेसे आहे !
🏡 💸 🍛
देहामध्ये प्राण आहे,
चालायला त्राण आहे...
शांत झोप लागत आहे,
इतके मला पुरेसे आहे !
😇🚶♂️😴
याहून आपल्याला काय हवे ?
जगातील चांगले घेण्याचा....
आनंदी, आशावादी राहण्याचा विवेक आहे,
इतके मला पुरेसे आहे !
😊 🤗 😇
विधात्याचे स्मरण आहे,
प्रार्थनेत मनःशांती आहे...
परमेश्वराची कृपा आहे,
इतके मला पुरेसे आहे !
🙏🕉️🙏
No comments:
Post a Comment