हैप्पी बर्थडे की जगह अब संस्कृत में बहुत ही अच्छा वाक्य / संगीत बनाया है सिर्फ दो ही लाईन है सभी लोग याद करें ..औरों को भी याद कराएं और इसका प्रयोग करें।👍
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 28 May 2023
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना राजभवन येथे जयंतीनिमित्त अभिवादन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना राजभवन येथे जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. २८: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आज राजभवन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Raj Bhavan pays tributes to Swatantryaveer Savarkar
Floral tributes were offered to the portrait of Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar on the occasion of the 140th birth anniversary of Veer Savarkar at Raj Bhavan, Mumbai on Sunday ( 28 May)
Principal Secretary to the Governor Santosh Kumar, Special Secretary Vipin Kumar Saxena, Joint Secretary Shweta Singhal, Comptroller of the Governor's Households Arun Anandkar and officers and staff of Raj Bhavan offered tribute to Veer Savarkar.
समाधान
समाधान
बसायला आरामखुर्ची आहे,
हातामध्ये पुस्तक आहे....
डोळ्यावर चष्मा आहे,
इतके मला पुरेसे आहे !
📖 📚 🤓
निसर्गामध्ये सौंदर्य आहे,
निळे आकाश, हिरवी झाडी आहे....
सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे,
इतके मला पुरेसे आहे !
🌌🌳🌤️🌧️🌈
जगामध्ये संगीत आहे,
स्वरांचे कलाकार आहेत...
कानाला सुरांची जाण आहे,
इतके मला पुरेसे आहे !
🎼🎤🎻🪗🎺
बागांमध्ये फुले आहेत,
फुलांना सुवास आहे....
तो घ्यायला श्वास आहे,
इतके मला पुरेसे आहे !
🌷🌸🌺🌹
साधे चवदार जेवण आहे,
सुमधुर फळे आहेत....
ती चाखायला रसना आहे,
इतके मला पुरेसे आहे !
🍲🥗🍛🥭🍒🍉
जवळचे नातेवाईक, मित्र आहेत,
मोबाईल वर संपर्कात आहेत...
कधीतरी भेटत आहेत,
इतके मला पुरेसे आहे !
👨👩👦👦 👩👩👦 📲
डोक्यावरती छत आहे,
कष्टाचे दोन पैसे आहेत....
दोन वेळा, दोन घास आहेत,
इतके मला पुरेसे आहे !
🏡 💸 🍛
देहामध्ये प्राण आहे,
चालायला त्राण आहे...
शांत झोप लागत आहे,
इतके मला पुरेसे आहे !
😇🚶♂️😴
याहून आपल्याला काय हवे ?
जगातील चांगले घेण्याचा....
आनंदी, आशावादी राहण्याचा विवेक आहे,
इतके मला पुरेसे आहे !
😊 🤗 😇
विधात्याचे स्मरण आहे,
प्रार्थनेत मनःशांती आहे...
परमेश्वराची कृपा आहे,
इतके मला पुरेसे आहे !
🙏🕉️🙏
नागिण... उपाय✍️
नागिण... उपाय✍️
१) कडुलिंबाचि पाने गरम पाण्यात टाकून आंघोळ करावि.
२) रक्तदोषांतक घ्यावे
३) रात्रि झोपतांना नाकपुडित १-२ थेंब मोहरिचे तेल घालणे.
४) कँलेंडुला किंवा कँथाँरिसचे मलम जखमेवर लावणे.
५) जळजळ बंद होण्यासाठि शतघौत घ्रुत लावणे. अथवा कैलास जीवन लावणे.
६) मंजिष्ठादि काढा ३ चमचे ३ चमचे पाण्यात घेणे.
७) गंधक रसायन १ गोळि आणि वातगजांकुश १ गोळि गरम पाण्यात आग आग होत असल्यास.
८) त्रिफळा चूर्ण गरम पाण्यात रात्रि.
९) वातविद्धवंस १-१ गोळि मधा बरोबर तिव्र कळा येत असल्यास
१०) गेरू लावल्यास ही फरक पडतो..
वैद्य. गजानन.
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
_*(
खोकला... 👇व..त्यावर प्रभावी उपाय..*
🇮 🇲 🇵
*खोकला... 👇व..त्यावर प्रभावी उपाय..*
...(१). हळदिच्या दुधात खारिक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारिक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्या. याने कफ सुटतो व बाहेर पडतो . खोकला बरा होतो
...(२). आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो
....(३). लसुण प्रक्रुतीने उष्ण आहे. त्यात एन्टि बॅक्टेरियल गुण असतात, लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात, याने गळ्याला शेक बसतो. व बरं वाटतं.
(४).. काळि मिरे, जायफळाची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो. दिवसातून दोन तीन वेळा घ्यावे.
.....(५) पिंपळि गाठ कुटून घ्यावे व मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो.
(६) खोकला बरा होत नसेल तर नीलगिरिच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात मिसळून मग याने छातिला मालिश करा. याने कफ सुटतो व बरं वाटतं.
(७) ज्येष्ठमध हे एक उपयुक्त औषध आहे. खोकल्याची उबळ आली कि, ज्येष्ठमध काडि चघळल्यास ढास जाते. बरं वाटते
.... किंवा ज्येष्ठमध व मध यांचे मिश्रण करून हे चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो..
(८).. पुदिना पाने व तुळस. या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहे. १०-१५ पुदिन्याची पाने व १५-१६ तुळशी ची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून अर्ध झाले कि. एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम प्यावे. याने कफ सुटतो व बरं वाटतं.
(९). लवंग व मध.. खोकला आल्यावर नुसती लवंग व मध खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून याचे चाटण दिवसभर घेतल्यास आराम मिळतो. बरेच वेळा रात्री ढास लागते. झोप लागत नाही. अशा वेळी. पाव चमचा जिरेपूड + पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उबळ जाते. मध मिसळून द्यावे त्यात..
(१०).. सर्दि व खोकला झाल्यास मूठभर कडुनिंब पाने धूवून घ्या व एक चमचा ओवा त्यात घालून बारीक वाटावे व हा लेप कानशिलाला लावा.. संक्रमण दूर होतील
(११). खोकला बरा होत नसेल तर चार वेलदोडे व तितकिच सुंठ पावडर एकत्र करून मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो
(१२).. नुसति कोरडी ढास लागलि असेल तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्या पावडर करून त्यात तुप व साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
१३).. सारखा खोकला येत असेल, किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धने व एक तुकडा ज्येष्ठ मध टाकून उकळून घ्यावे आटवून अर्धं करा मग कोमट करून घ्या. याने आराम मिळतो.
(१४). खोकला, कफ, सर्दिवर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे.
(१५). खोकल्यावर सुंठिचि पावडर अर्धा चमचा + पिंपळि चूर्ण + बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
(१६) खोकला झाल्यास बडिशेप व खडिसाखर खावि.
(१७). एक चिमटि काताचि पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. बरं वाटते.
(१८). खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्यात पाच ,सहा मनुका घालून खावे..
(१९).. खोकला आल्यावर चिकणी सुपारी खावि
(२०). खोकला बरा होत नसेल तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून घ्यावे. दिवसातून तीन , चार वेळा घ्यावे. असे तीन दिवस घ्यावे.
(२१). कोरडा खोकला झाल्यास. खसखशिचि खिर खावि. मुठभर खसखस भाजून (तुपात). घ्या. मग दूधामध्ये शिजवून घ्या व गरम गरम प्यावे. साखर आवडिनुसार मिसळून द्यावे.
२२).. डांग्या खोकल्यावर तुरटि कुटून गरम करून घ्या. मग त्या त्या पाणि मिसळून ती बशी उन्हात ठेवावी. पाणी निघून जाते. व शुद्ध तुरटि शिल्लक राहते. त्यात एक चमचा मध मिसळून घ्यावे.
(२३).. तिळाचे तेल कोमट करून प्यावे.
(२४). बकुळिचि फुले ओंजळभर + सोनचाफ्याचि ओंजळभर फुले + दोन तांबे पाणी घेऊन साखर घालून काढा करावा व दिवसातून पाव वाटी घ्या.
(२५).. अडुळसा पाने वाफेवर उकडून, त्याचा रस काढून घ्यावा. व थोडा गूळ घालून पाव कप रस घ्यावा.
(२६).. एक कप दूधामध्ये लसणिच्या चार पाकळ्या उकळून घ्यावे.
(२७).. ज्येष्ठ मध + खडिसाखर चघळावि.
(२८). कोरफडिचि पाने भाजून घ्या. त्यांचा रस काढून घ्यावा.. एक चमचा रस घेऊन त्यात मध मिसळून घ्यावे..
(२९).. भिमसेन कापुर व एक चमचा साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो
(३०).. खोकला झाल्यास तुळशी ची पाने ठेचून व गरम करून या पोटिसनि छाति शेकावि..
सुनिता सहस्रबुद्धे
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
_*(
जांभूळ खाताना या चुका करु नका...*
*जांभूळ खाताना या चुका करु नका...*
जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधीवात आणि इतर अनेक पचन समस्या बरे करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. पण अनेक वेळा असे घडते की आपण जांभूळ खाण्याच्या पद्धतींकडे जास्त लक्ष देत नाही. ज्यामुळे आपण आजारी पडतो किंवा आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या उद्भवतात. चला जाणून घेऊया जांभुळ खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
*रिकाम्या पोटी जांभुळ खाणे टाळा*
रिकाम्या पोटी जांभुळ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि यामुळे तुमच्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात. जांभुळची चव आंबट असते, त्यामुळे रिकाम्या पोटी जांभुळ खाल्ल्याने एसिडीटी, पोटदुखी, पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
*जांभुळ आणि हळद एकत्र कधीही खाऊ नका*
जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच हळदयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. जर तुम्हाला जांभुळ खाल्ल्यानंतर हळद खाण्याची इच्छा असेल तर किमान 30 मिनिटे थांबा. वास्तविक, जांभुळ आणि हळद एकत्र मिसळल्याने शरीरात प्रतिक्रिया होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला बराच काळ अस्वस्थ वाटेल. तसेच यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
*दूध आणि जांभुळ एकत्र खाल्ल्याने गॅस होतो*
दूध आणि जांभुळ एकत्र सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. हे फळ खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्याने गॅस, पोटदुखी यांसारख्या पचनाच्या समस्या होऊ शकतात. जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून दूर रहा आणि किमान 30 मिनिटांनंतरच दूध प्या.
*लोणचे आणि जांभुळ एकत्र खाऊ नका*
घरी बनवलेले आंबट-गोड लोणचे खायला कोणाला आवडत नाही. पण इथे काही फूड कॉम्बिनेशनसोबत लोणचे खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. या दोन गोष्टींच्या मिश्रणाने पोटाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत जांभुळ खाल्ल्यानंतर एक तास लोणचे टाळले तर बरे होईल.
*जांभुळ खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नका*
जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे कारण जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे हे अनेक समस्यांवर मेजवानीसारखे आहे. त्यामुळे डायरियासारखा आजार तुम्हाला घेरतो. येथे जांभुळ खाल्ल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनंतरच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
*डॉ. प्रमोद ढेरे,
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...

