Friday, 26 May 2023

Jai Hind

नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा

नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबईदि. 25 : यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केलात्या हेतूची जनजागृती करणारा गणेशोत्सव असावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई गणेशोत्सव पूर्व तयारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला आमदार आशिष शेलारसांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेउपसचिव विद्या वाघमारेमुंबई महानगर पालिकेचे उपयुक्त रमाकांत बिरादारमुंबई शहर अप्पर जिल्हाधिकारी रवी कट्टकधोंडआदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले कीसांस्कृतिक कार्य विभागाकडून यावर्षीही गणेशोत्सवात स्पर्धा घेण्यात येतील. यावर्षी साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी बैठक घेतलेली आहे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार चार फुटाच्या आतील गणपती मूर्ती मातीच्या व चार फुटावरील मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा मातीच्या बनविण्यात याव्यात. त्याबाबत न्यायालयाने दिलेले निर्देश पाळावेत. याबाबत मूर्तीकार बांधवांची पर्यावरण विभागासोबत बैठक घेण्यात येईल. महापालिकेने मूर्ती बनविणेमूर्तींचे विसर्जनमूर्तीकारांना देण्यात येणारी जागा याबाबत सुलभ कार्यप्रणाली तयार करावी. ध्वनी क्षेपकाव्यतिरिक्त रात्री १० वाजेनंतर मंडपात करण्यात येणाऱ्या गणपती आरत्यांना परवानगी बाबत सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. या प्रकरणात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाहीयाची काळजी घ्यावी. गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नयेयाबाबत पोलीस विभागाने दक्ष असावे. त्यासाठी कडक बंदोबस्त ठेवावा. महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजने'ची अंमलबजावणी करावीअसेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

            बैठकीला पोलीसमहापालिकासांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी व मूर्तिकार बांधव उपस्थित होते.

Thursday, 25 May 2023

हळद*..एक गुणकारि औषध...

 *हळद*..एक गुणकारि औषध...

 माहिती आवडली तर नक्की शेअर करा 📲

 हळदीमुळे अन्नाला रूची तर येतेच, पण हळद हि आमदोष पचवण्याकरता मदत करते, आव होणे, जुलाब, याकरता हळद गुणकारि आहे. जंतावर ते एक प्रभावि औषध आहे. ः। रोज सकाळि १/२ चमचा हळद व १/२ चमचा वावडिंग हे मिश्रण मधासोबत घेतले तर, आणि शेवटि एंरडेल तेलाचा एनिमा घेतला तर संपूर्ण जंत निघून जातात.

           🌾. अति रक्तस्राव होतो जेव्हा जखमेतून.,,हळद,, दाबून ठेवलि तर बंद होतो. संसर्ग न होता जखम पूर्ण बरि होते. डोळे येतात, तेव्हा हळदिच्या पाण्याने धुवावे. डोळ्यांचि आग, लालसरपणा, सूज, डोळ्यातून येणारा स्राव बंद होतो. 

      शरिराच्या कुठल्याहि भागाला जर मूका मार लागला, पाय ,हात लचकला, तर हळकुंड व आंबेहळद उगाळून लेप लावावा.

🌾.. चेहर्यावर पिंपल, पुरळ, काळे डाग येत असल्यास, हळद व चंदन उगाळून लेप लावावा. भारतिय संस्क्रुतीत लग्नाच्या आधि वर वधुच्या अंगाला हळद लावण्याचा प्रघात आहे. म्हणून ऐरविसुद्धा साबण न वापरता। हळद+साय+ दहि+ मसूरिच्या डाळीचे पिठ या मिश्रणाने स्नान करावे कायम.

🌾 रोज रात्रि झोपण्यापूर्वि हळद गरम पाण्यातून घेतल्यास चरबि कमि होते., खोकला असतांना, कफ पडत नसेल तर, झोपण्यापूर्वि हळकुंडाचा तुकडा भाजून घेउन, चावून रस गिळावा. आराम होतो.. स्रियांच्या डिलिव्हरिनंतर, गर्भाशय संकुचित होण्याकरता, गर्भाशयाचि ताकद वाढवण्याकरता, जंतु संसर्ग होउ नये यासाठी, बाळंतिणिच्या आहारात हळद समाविष्ट करतात.

🌾ः कानांतून पाणि जात असेल तर, हळद. वावडिंग, वेखंड याची धुरि देतात., अग्निमांद्य, झाल्यास, ओलि हळद, आले, लिंबूरस, व सैंधव मीठ, याचे लोणचे उपयुक्त आहे.. मधुमेहि रूग्णांनि १/२ चमचा हळद, आवळयाचा रस, व मधासोबत घेतल्यास शुगर नियंत्रित राहते.

🌾.. तसेच पाव चमचा हळद, पाव चमचा दालचिनिचे चूर्ण, हापण उपचार आहे मधुमेहावर. वारंवार आवाज बसणे, घसा बसणे, कफाचि सर्दि यावर हळद+दूध कोमट करून पिणे.. हळद भूक वाढवते, पोटातला अग्नि प्रज्वलित करते.. हळदीत,,करक्युमिन,, रसायन असते जे कँसर रोगावर काम करते पेशिंचि वाढ बंद करते.

     गुडघेदुखि बंद करते. , संधिवाताकरता खुप गुणकारि आहे..

         🌾🌾🌾🌾

   सुनिता सहस्रबुद्धे..... 

एलबीटीसंदर्भात व्यापाऱ्यांवर कुठलीही अन्यायकारक कारवाई होणार नाही

 एलबीटीसंदर्भात व्यापाऱ्यांवर कुठलीही अन्यायकारक कारवाई होणार नाही

- विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाला ग्वाही

नाशिक : एलबीटी संदर्भात असेसमेंट प्रलंबित असलेल्या व्यापाऱ्यांना नोटिस काढण्याच्या हालचाली सुरु झाल्यामुळे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त तथा प्रभारी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महानगरपालिकेतर्फे एलबीटी कर निर्धारण संदर्भात प्रलंबित असलेल्या 24 हजार व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

            विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एलबीटी कर संदर्भात कुठल्याही प्रकारच्या नोटिसा व्यापाऱ्यांना दिल्या नसून व्यापाऱ्यांवर कुठलीही अन्यायकारक कारवाई होणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले व तसे आदेश मनपा उपायुक्त (कर) श्रीकांत पवार यांना दिले. महाराष्ट्र चेंबर व महानगरपालिका कर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच व्यापाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, मनपा उपायुक्त (कर) श्रीकांत पवार, महाराष्ट्र चेंबरचे ललित गांधी व शिष्टमंडळाने केले आहे.

निवेदनात महाराष्ट्र सरकारने दिनांक 31 ऑगस्ट 2015 रोजी स्थानिक संस्था कर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 50 कोटी पेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांचा एलबीटी रद्द करण्याचा निर्णय शासनाने 31 जुलै 2017 रोजी घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व महापालिकेस दिनांक ८ मार्च 2017 रोजी परिपत्रक काढून अभय योजनेमध्ये सहभागी असलेल्या व्यापारी उद्योजकांना नोटीसा पाठवून बोलावलं जाऊ लागले. त्याची तक्रार व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडून 12 ऑक्टोबर 2018 रोजी एक परिपत्रक काढून अभय योजनेत सहभागी व्यापारी व उद्योजकांना महानगरपालिकेने स्थानिक संस्था कराचे असेसमेंट पूर्ण करण्याविषयी नोटीस पाठवू नये व त्याची मुदत 31 मार्च 2018 रोजी संपली आहे अशा सूचना केल्या. तसेच स्थानिक संस्था कर कायदा कलम क्रमांक 33.4 (2) 7 नुसार स्थानिक संस्था करदात्यांची कर निर्धारणा ५ वर्षाच्या आत करणे बंधनकारक होते, तो ५ वर्षाचा कालावधी संपलेला आहे त्यामुळे कर निर्धारण करू शकत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. गेली दोन वर्ष महापूर व ३ वर्ष करोनामुळे महामारीमुळे व्यापारी हैराण झालेला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना कोणत्या नोटीसा न पाठवता वरील कलमाधारे कर निर्धारण करता येत नसल्याने स्थानिक संस्था कर विभाग बंद करून व्यापाऱ्यांवरील कारवाई रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

            याप्रसंगी शिष्टमंडळात महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन कांतीलाल चोपडा, को-चेअरमन संजय सोनवणे, युथ विंगचे चेअरमन संदीप भंडारी, उत्तर महाराष्ट्र व्यापार समितीचे चेअरमन प्रफुल संचेती, कार्यकारणी सदस्य व्हीनस वाणी, नेमीचंद कोचर, नाशिकरोड किराणा घाऊक संघटनेचे अध्यक्ष राजन दलवानी, पेट्रोल डिलर्स मर्चंट संघटनेचे सदस्य नाना नगरकर, नाशिकरोड किराणा घाऊक संघटनेचे अजित करवा उपस्थित हो

ते.

मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचे 28 मे रोजी अनावरण

  मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचे 28 मे रोजी अनावरण

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित

             मुंबई, दि. 25 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त 28 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मॉरिशस येथे होणाऱ्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

          मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन आणि उपपंतप्रधान लीलादेवी डुकन लच्छुमन यांची उपस्थिती लाभणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातून असंख्य सावरकर भक्त या अपूर्व सोहळ्यासाठी मॉरिशसमध्ये दाखल होणार आहेत.

            महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये रस्ते विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक याबाबत मंत्री श्री.चव्हाण विविध स्तरांवर भेटीगाठी घेणार असून दोहोंमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर त्यांचा भर असणार आहे. मॉरिशस म्हणजे चहूबाजूंनी हिंदी महासागराने वेढलेले पाचूचे बेट असून निसर्गाने मुक्त उधळण केलेले पर्यटन स्थळ आहे. सागरी जैव विविधता आणि पारदर्शक स्फटिकासारखे निळेशार पाणी व सुंदर स्वच्छ समुद्रकिनारे अनुभवणे असा सुवर्णयोग जुळून आला आहे.

0000

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठीसहकार विभागाने पाठपुरावा करावा

                    शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठीसहकार विभागाने पाठपुरावा करावा

- सहकार मंत्री अतुल सावे यांचे निर्देश

            मुंबई, दि. २५ : मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे आणि त्याचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज दिले.

            सहकार मंत्री श्री. सावे यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली सहकार विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपसचिव संतोष खोरगडे, नितीन गायकवाड, श्री. शिंगाडे, विशेष कार्य अधिकारी तथा अवर सचिव श्रीकृष्ण वाडेकर, साखर संचालक उत्तम इंदलकर, कक्ष अधिकारी अनिल चौधरी, राहुल शिंदे उपस्थित होते, तर साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. 

            मंत्री श्री. सावे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठ्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सहकार विभागाने कार्यवाही करावी. 

            राज्यातील सहकार क्षेत्र, कृषी उत्पादन, पणन क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्राचे प्रशासन आणि सनियंत्रणासाठी हा जबाबदार असून या क्षेत्राला सक्षम करून सहकार क्षेत्रातील सदस्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. त्यानुसार विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. या संस्थांच्या ऑनलाइन नोंदणीवर उपनिबंधक कार्यालयाने भर द्यावा. त्यासाठी विविध कार्यकारी संस्थांना मार्गदर्शन करावे. तसेच नवीन सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी प्रमाणित पद्धत तयार करून तिचा वापर करावा, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. 

            यावेळी मंत्री श्री. सावे यांनी शेतकरी कर्जमाफी योजना, अटल अर्थसाहाय्य योजना, सहकारी पाणीपुरवठा संस्था अनुदानाचा आढावा, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी भरती पॅनल, सहकारी पतसंस्था तपासणी लेखापरीक्षण व निधी वितरण, बंद, अवसायानातील साखर कारखाने, सहकार विभागाचे तालुका व जिल्हास्तरी कार्यालयांचे शासकीय जागेत स्थलांतर, साखर गाळप हंगाम, सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदांचा आढावा घेतानाच विभागातील पदोन्नती प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश दिले. अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

००००

Featured post

Lakshvedhi