Friday, 19 May 2023

तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे !!*

 *तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे !!* 


लसूण हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, परंतु त्याचे फायदे खाण्याच्या पद्धतीवर देखील अवलंबून असतात. तुपात तळलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.


या दोघांमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. लसणात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, तर तुपात जीवनसत्त्वे आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळतात. ते अनेक रोगांशी लढण्याचे काम करतात.


*हृदयासाठी चांगले आहे* 


लसूण हृदयासाठी चांगले मानले जाते. तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तुपात तळलेला लसूण देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.


*श्वसनासंबंधित रोग चांगले होतात* 


लसणाचा प्रभाव हा गरम असतो. हिवाळ्यात लसूण तुपासोबत खाल्ल्यास श्वासासंबंधीच्या समस्या टाळता येतात. अशा प्रकारे लसूण खाल्ल्याने श्वसनसंस्था मजबूत होते. दम्यासारख्या आजारातही हे फायदेशीर आहे.


*पचनासाठी चांगले* 


लसूण हे चांगले पाचक मानले जाते. तुपात लसूण तळून खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि ॲसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने अन्न पचायला सोपे जाते.


*प्रतिकारशक्ती वाढते* 


तुपात तळलेला लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. लसणात असलेले औषधी गुणधर्म सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर आहेत. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. तुपात भाजून लसूण खाल्ल्याने सर्दी-खोकला यांसारख्या समस्या दूर होतात.


*हाडे मजबूत होतात* 


लसणात कॅल्शियमसारखे खनिजे आढळतात जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, सूज आणि दुखण्याची समस्याही दूर होते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_*(

कृषी पुरस्कार

 



उजव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे*

 *उजव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे* 


काहीवेळा आपल्या पोटात उजव्या बाजूला वेदना होऊ लागतात. या पोटदुखीची वेगवेगळी कारणे असू शकतात. कारण आपल्या पोटात उजव्या बाजूस यकृत, पित्ताशय, आतड्याचा उजवीकडील भाग, अपेंडिक्स, उजव्या बाजूची किडनी तसेच स्त्रियांमध्ये right ovary असे अवयव असतात, त्यामुळे विविध कारणांमुळे उजव्या बाजूला पोटदुखी होऊ शकते. पोटात उजव्या बाजूला दुखणे याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.


*पचनासंबधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता (Constipation) :*

◼️गॅस्ट्रोएन्टेरिटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), IBD, अन्न विषबाधा अशा कारणांनी उजव्या बाजूस पोटात दुखू लागते.

◼️अपेंडिक्सला सूज आल्याने पोटात उजवीकडे दुखते.

◼️उजव्या किडनीत स्टोन किंवा इन्फेक्शन झाल्याने पोटात उजव्या बाजूला दुखते.

◼️हर्नियामुळे सुध्दा काहीवेळा उजव्या बाजूला पोटदुखी होते.

◼️यकृताला सूज येणे, यकृताचे आजार तसेच पित्ताशयातील खडे यामुळेही उजव्या बाजूला पोटात दुखू लागते.

◼️स्त्रियांमध्ये मासिक वेळी, तसेच गरोदरपणात Ectopic pregnancy मुळे उजव्या बाजूला पोटात दुखू शकते.


*कधी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे ? :*

खालील लक्षणे जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.

◼️पोटात उजव्या बाजूला अतिशय वेदना होणे,

◼️छातीत दुखणे,

◼️ताप येणे,

◼️शौचावाटे रक्त पडणे,

◼️लघवीतून रक्त पडणे,

◼️उलट्या होणे,

◼️उलटीतून रक्त पडणे,

◼️ त्वचा पिवळसर होणे,

◼️पोटावर सूज येणे

अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.


*पोटात उजव्या बाजूला दुखणे यावर घरगुती उपाय :*

◼️अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे.

◼️गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.

◼️आल्याचे तुकडे पाण्यात घालून ते पाणी उकळावे. मिश्रण कोमट झाल्यावर ते पाणी अर्धा कप प्यावे.

◼️चहामध्ये आले टाकून काळा चहा प्यावा.

◼️डाळिंबाच्या दाण्यात थोडे काळे मीठ मिसळून ते दाणे खाल्याने उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.

◼️पोटावर गरम शेक घ्यावा.

◼️हे घरगुती उपाय खानपान संबंधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता अशा कारणांमुळे पोटात उजव्या बाजूला दुखत असल्यास उपयोगी पडतात. मात्र जर इतर गंभीर कारणामुळे पोटात उजवीकडे दुखत असल्यास त्यावर घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



पुढील उष्णतेच्या लाटेसाठी तयार रहा*40 ते 50 डिग्री सेल्सिअस दरम्यान. नेहमी खोलीच्या तापमानाचे पाणी हळूहळू प्या.*

 *पुढील उष्णतेच्या लाटेसाठी तयार रहा*40 ते 50 डिग्री सेल्सिअस दरम्यान. नेहमी खोलीच्या तापमानाचे पाणी हळूहळू प्या.*

   *थंड किंवा बर्फाचे पाणी पिणे टाळा!*


   *सध्या, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि इतर देश "उष्णतेची लाट" अनुभवत आहेत.*


 *हे करा आणि करू नका:-*


   1. *तापमान ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावर खूप थंड पाणी न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात, कारण आपल्या लहान रक्तवाहिन्या फुटू शकतात.*


 अशी बातमी आली की एका डॉक्टरचा मित्र खूप उष्ण दिवसातून घरी आला होता - त्याला खूप घाम येत होता आणि त्याला स्वतःला लवकर थंड करायचे होते - त्याने ताबडतोब आपले पाय थंड पाण्याने धुतले... अचानक, तो कोसळला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले.


   *2. जेव्हा घराबाहेर उष्णता 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते आणि घरी आल्यावर थंड पाणी पिऊ नका - फक्त कोमट पाणी हळूहळू प्या.*


   *कडक उन्हातून आल्यावर हात किंवा पाय लगेच धुवू नका. धुण्या आधी किंवा आंघोळ करण्यापूर्वी किमान अर्धा तास प्रतीक्षा करा.*


   3. कोणीतरी उष्णतेपासून थंड होऊ इच्छित होता आणि लगेचच शॉवर घेतला. आंघोळीनंतर, व्यक्तीला ताठ जबडा आणि स्ट्रोकसह रुग्णालयात नेण्यात आले.


 *कृपया लक्षात ठेवा:*

  *उष्णतेच्या महिन्यांत किंवा तुम्ही खूप थकले असाल तर लगेचच खूप थंड पाणी पिणे टाळा, कारण यामुळे शिरा किंवा रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात, ज्यामुळे पक्षाघाताचा झटका येऊ शकतो.*


 *कृपया चेतावणी इतरांपर्यंत पसरवा!*अतिशय महत्वाचे आहे.योग्य वेळीच share केले आहे.कानाडोळा करू नका. लहान मुलांकडे विशेष लक्ष द्या.

केस गळती*

 *केस गळती*


1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा परत आणण्याचेही काही उपाय आहेत. केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केस गळणे थांबवणे अवघड आहे. पण जर तुम्ही Hair Loss थांबवण्यासाठी केसांची निगा संपूर्ण घेतली म्हणजे तुमचे केस पुन्हा वाढायला लागतील यासाठी आणखी काय करता येईल ते पुढे पाहू. 


2) मक्याचे तेल घेऊन त्यामध्ये आवळ्याचा रस किंवा जास्वंदीची पाने उपलब्ध असल्यास त्यांचा रस मिक्स करून केसांना मालीश करावी. 


3) आवळा, कोथंबीर आणि लिंबू यांचे मिश्रण केसांना लावा. थोडयावेळाने केस धुवून घ्या. केस मजबूत होतील आणि तुटणार नाहीत. 


4) बदाम खालल्याने केसांना आवश्यक असणारे विटामिन्स मिळतात. 


5) केसांना डाय करणे, कलर लावणे, प्रेस करणे किंवा कोणत्याही प्रकारे केसांना नुकसान पोहचेल अश्या गोष्टी करणे टाळा. 


6) पौष्टिक आणि योग्य आहार, व्यायाम, केसांना तेल लावणे, पाणी भरपूर प्यावे. 


7) वाईट व्यसनाच्या पासून दूर रहावे. 


8) Hair Loss Problem होण्यासाठी अनेक कारणे असतात त्यामध्येच एक Vitamin D ची कमतरता हे देखील एक कारण असू शकते. जसे इतर पोषक घटक केसांचे आरोग्य वाढवतात तसेच Vitamin D हे देखील केसांचे आरोग्य वाढवते. Vitamin D हे एक निशुल्क असा घटक आहे. Vitamin D केसांच्या वाढीसाठी मदत करतो. Vitamin D स्वताहून Iron and Calcium शोषून घेतो. Iron ची कमतरता पण Hair Loss होण्याचे कारण असते. तुम्ही दिवसातील १५ मिनिट सूर्यप्रकाशात राहिलात तरी तुमची त्यादिवाशाची Vitamin D ची आवश्यकता पूर्ण होते. सूर्यकिरण घेत असताना सकाळचे किंवा संध्याकाळचे सूर्यकिरण अंगावर घ्या प्रखर सूर्यकिरण त्वचेला अपाय करू शकतो हे पण लक्षात ठेवा. 


9) बरेचसे लोक असंतुलित खानपानाच्या सवयी मुळे Hair Loss Problem मध्ये फसतात. केवळ पौष्टिक आहार घेऊन Hair Loss Problem पासून दूर राहता येत नाही



*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_

सतत जांभई देत असाल तर मोठ्या आजारांचे लक्षण असू शकतं, दुर्लक्ष करू नका !*

 *सतत जांभई देत असाल तर मोठ्या आजारांचे लक्षण असू शकतं, दुर्लक्ष करू नका !* 


अनेकांना आजकाल सातत्याने आळस येतो. काहीजण काही मिनिटा मिनिटाला जांभई देतात. काही अभ्यासानुसार, असे बरेच लोक आहेत जे दिवसातून तब्बल 100 वेळा जांभई देतात.


अशा लोकांमुळे त्यांच्या आसपास बसणाऱ्या लोकांच्या कामात अडथळा येण्याची शक्यता असते. तुम्हालाही नेहमी आळस येत असेल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष्य करू नका. कारण हे मोठ्या आजारांचे लक्षण सुद्धा असू शकत. चला जाणून घेऊया जांभई येण्याची मुख्य कारणे कोणती -


*अपुरी झोप :-* 

सातत्याने जांभई येण्याचे मुख्य कारण म्हणजे अपुरी झोप. काही लोक रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. यामुळे त्यांना शरीराला पुरेशी अशी झोप मिळत नाही. रात्री झोप न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी तुम्हाला खूप थकवा जाणवतो आणि तुम्हाला जास्त जांभई येते.


*मधुमेह :-* 

जास्त जांभई येणे हे हायपोग्लाइसेमियाचे प्रारंभिक लक्षण मानले जाते. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी झाल्यामुळे सुद्धा आपल्याला जांभई येते.


*हृदयविकाराचा धोका :-* 

तुम्हाला जर सतत जांभई येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे हृदय विकाराचे सुद्धा लक्षण असू शकत. जास्त जांभई येणे हे हृदयाच्या आसपास रक्तस्त्राव किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील दर्शवते.


*निद्रानाश :-* 

निद्रानाश हा झोपेशी संबंधित आजार आहे. यामध्ये माणसाला एकतर रात्री लवकर झोप लागत नाही, आणि जर लागली आणि काही कारणास्तव तो जागा झाला तर पुन्हा झोपणे त्याच्यासाठी कठीण होऊन बसते. रात्री झोप न मिळाल्याने लोकांना दिवसा जास्त झोप येऊ लागते त्यामुळे त्यांना खूप जांभई येते


*नार्कोलेप्सी :-* 

नार्कोलेप्सी ही झोपेबाबतची गंभीर समस्या मानली जाते. अशा व्यक्तीला बसेल त्या ठिकाणी लगेच झोप येते. अशा व्यक्तीला दिवसातून अनेक वेळा झोप येते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय.

 *पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय...*


  १) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या.

    २) १०० मि.लि पाण्यात एक चमचा मेथि दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे. व जेवणानंतर हे मेथिचे दाणे घालून खावे. याने सकाळी पोट साफ होते.

   ३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर घ्या. पाण्यासोबत.,

  ४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे., रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात इसबगोल मिसळून घ्यावे..

  ५) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध घ्यावे.

   ६), दूधात दोन तीन अंजिर उकळून मग अंजिर खावे . आणि वरून दूध घ्यावे..

   ७) एक ग्लास पाण्यात २ चमचे कोरफड गर मिसळून घ्यावे..,. त्रिफळा चूर्ण मातिच्या भांड्यात भिजवून मग सकाळी हे गाळून घ्यावे. याने पोट साफ होते.

    ८) रात्री झोपण्यापूर्वी एक कप पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तुप व किंचित सैंधव मीठ घालून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते.

     ९) रोज सकाळी दोन खजुर साजुक तुपासोबत खाल्ल्यास पोट साफ होते..

     १०) ताजी कोरफड मंद गॅसवर भाजून, नंतर साल काढून, यातिल गर मलमलच्या कपड्यात गाळून, त्यात मध मिसळून घ्यावे.. याने सकाळी पोट साफ होते..

    ११,) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून ओवा खावा, याने पोट साफ होते..

    १२) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून एरंडेल तेल घ्यावे, याने सकाळी पोट साफ होते..


 वरील उपाय करावेत आणि, आहारात नेहमी पालेभाज्या फळे खावीत.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,



Featured post

Lakshvedhi