Tuesday, 16 May 2023

उच्चरक्तदाबावर प्रभाविउपाय...👇*

 *उच्चरक्तदाबावर प्रभाविउपाय...👇*


  १) अर्जुनारिष्ट काढा रोज दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर दोन वेळा घ्या

२) मुक्तावटि गोळी रोज दोन वेळा घ्या जेवणानंतर

३) अश्वगंधा चूर्ण रोज कपभर दुधात उकळून घ्यावे एक चमचा भरून

४) लसूण पाकळ्या तूपात परतवून रोज रिकाम्या पोटी सकाळी दोन पाण्यासोबत घ्या

५) दुधिभोपळा रस काढून रोज ब्रेकफास्ट च्या वेळि घ्या

६) ओवा व जवस भाजून याचि पूड करून रोज जेवणानंतर एक चमचा भरून घ्या

७) रोज दुपारी एक डाळिंब किंवा डाळिंबाचा रस काढून घ्यावा

८) रोज प्राणायाम व अनुलोम करावा..

९) रोज. ओंम. याचा उच्चार वीस वेळा करावा


... वरील उपाय केल्यास नक्कीच उच्च रक्तदाब नियंत्रणात राहील...



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



अनुसूचित जातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनीअनुदान आणि बीजभांडवलासाठी अर्ज करण्याचे

 अनुसूचित जातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनीअनुदान आणि बीजभांडवलासाठी अर्ज करण्याचे आवाहन.



            मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील १२ पोटजातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान आणि बीजभांडवलासाठीच्या योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई उपनगर- शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.  


            अनुसूचित जातीतील मांग/ मातंग/मिनी,मादींग/दानखणी मांग/मांग महाशी/मदारी/राधेमांग/मांग गारुडी/ मांग गारोडी/ मदारी/मादगी या १२ पोटजातीतील समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांनी उद्योग/व्यवसाय करण्यासाठी महामंडळाच्या २० कलमी कार्यक्रमानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाकरिता अनुदान योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ५०, बीजभांडवल योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ३० व मुंबई शहर जिल्हा कार्यालयाकरिता अनुदान योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ५०, बीजभांडवल योजनेतंर्गत भौतिक उद्दिष्ट ३० चे प्राप्त असून अर्ज करण्यासाठी जिल्हा कार्यालय, मुंबई उपनगर शहर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर संपर्क करावा, असे जिल्हा व्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे.


            अर्जदार मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा, महाराष्ट्रातील रहिवासी असावा, वय १८ ते ५० वर्ष असावे, यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.३ लाखांपेक्षा जास्त नसावे, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल,अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षित असावा. अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरूप असलेली आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र/करारपत्रे/कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, मुंबई शहर, उपनगर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

पश्चिम क्षेत्रातील लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आखणार

 पश्चिम क्षेत्रातील लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आखणार

- सुधीर मुनगंटीवार


            उदयपूर, दि. 15: पश्चिम क्षेत्रातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लुप्त होणाऱ्या कला कौशल्यांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आखण्याचा निर्णय शनिवारी येथे झालेल्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. यासाठी पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यांतून त्या त्या राज्यातील लुप्त होत चाललेल्या कला कौशल्यांचे दस्तावैजीकरण करण्यात येणार आहे. तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र देशात अव्वल क्रमांकावर राहावे यासाठीही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत अनेक उपयुक्त सूचना केल्या आहेत.


            शनिवारी उदयपूर येथे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीची वार्षिक नियोजनाची बैठक झाली. या बैठकीला प.क्षे.सां.केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता, संतोष जोशी, अशोक परब, प्रा.युगांक नाईक उपस्थित होते. तर राज्याचे सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह इतर सदस्य राज्यातील शासकीय अधिकारी आणि इतर अशासकीय सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


            यावेळी बोलतांना मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रमांसाठी व योजनांसाठी सीएसआर मधून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सीएसआर निधीमुळे यापुढे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या विविध योजनांना निधीची कमतरता जाणवणार नाही, असे ते म्हणाले.


सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक ज्ञान विकिपेडियावर आणणार


            पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यांकडे मोठा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक ज्ञानाचा खजिना असून या सांस्कृतिक वारशाची तसेच पारंपरिक ज्ञान व साहित्याची माहिती विकिपेडीयावर नवीन पिढीला उपलब्ध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिल्या. यासंदर्भात विकिपेडियाचे जागतिक संचालक होरे वर्गीस आणि त्यांच्या चमूने या बैठकीसमोर सादरीकरण केले.


कलाकारांचे मानधन वाढविण्याचा प्रयत्न


            पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राशी संबंधित योजना आणि कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कलाकारांचे मानधन अनेक वर्षे वाढवले गेलेले नाही. हे मानधन काळानुरूप वाढविण्यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक खात्याला शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.


देशातील इतर क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राशी समन्वय निर्माण करणार


            देशातील विविध भागात असलेल्या विविधतेतही सांस्कृतिक एकता विद्यमान आहे. त्यामुळेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या विविध योजना आणि कार्यक्रमांचे आयोजन करताना देशातील इतर क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांशी सांस्कृतिक कार्य विषयात योग्य तो समन्वय साधला जावा असे श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत सांगितले.


गेटवे ऑफ इंडिया येथे दर सप्ताहात होणार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


            भारतात येणारे परदेशी पर्यटक तसेच देशांतर्गत पर्यटक मोठ्या प्रमाणात गेटवे ऑफ इंडिया येथे भेट देत असतात. त्यांच्यासमोर पश्चिम क्षेत्रातील चार राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण केल्यास या भागातील कला कौशल्यांच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक पातळीवर पोहोचविणे सोपे जाईल, असे मत श्री. मुनगंटीवार यांनी मांडले. त्याला समिती सदस्यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार गेटवे ऑफ इंडिया येथे दर आठवड्यात शनिवार, रविवारी सहा सदस्य राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची कायमस्वरूपी योजना आखण्याची जबाबदारी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री.खारगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे इतर अधिकारी आणि इतर अशासकीय सदस्य त्यांना मदत करतील.


पंढरपूर येथे होणार भक्तीसंस्कृती संमेलन


            राज्यातील वारकरी संप्रदाय आणि भक्तीसंस्कृतीची माहिती देशातील इतर राज्यांना व्हावी याकरिता पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे कार्तिकी वारीच्या काळात पंढरपुरात राष्ट्रीय भक्तीसंस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे या कामात पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला मदत करणार आहेत.


नागपूर येथे व्याघ्र परिषद


            पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यातील व्याघ्र प्रकल्प, त्यातील गावे, तेथील निसर्गप्रेमी संस्कृती यांची माहिती जगाला करून देण्यासाठी नागपूर येथे व्याघ्र परिषद घेण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे स्वतःचे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक गीत तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेतला गेला.


पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांचे संमेलन


            पश्चिम क्षेत्रातील भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्राप्त सर्व कलाकारांचे संमेलन आयोजित करण्याच्या सूचना श्री.मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. या संमेलनात केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांसह पश्चिम क्षेत्रातील सर्व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी यांना निमंत्रित केले जाणार आहे. या संमेलनात पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांसोबत थेट चर्चा करून सांस्कृतिक क्षेत्रासंबंधी त्यांच्या सूचना समजून घेतल्या जातील.


प्रत्येक राज्याच्या नावावर किमान एक गिनीज जागतिक विक्रम असावा


            पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सदस्य राज्यांपैकी प्रत्येक राज्याच्या नावाने सांस्कृतिक क्षेत्रातील एक गिनीज जागतिक विक्रम असला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिल्या आहेत.पश्चिम क्षेत्रातील प्रत्येक राज्याला चांगला ऐतिहासिक वारसा असून त्यातील गड किल्ल्यांशी अनेक ऐतिहासिक कथा जोडल्या आहेत. त्या कथांसह या गडकिल्ल्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी म्हणून विशेष योजना आखण्याचे निर्देश श्री मुनगंटीवार यांनी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीची पुढील बैठक मुंबईत जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही श्री. मुनगंटीवार यांनी केली.

तळपायांची, हाताची सतत आग होणे.....*

 *तळपायांची, हाताची सतत आग होणे.....*


*कारणे...*

१) नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास.


२) मधुमेहाची शक्यता असल्यास.


३) व्हिटॅमीन बी-१२ ची कमी.


४) उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते.


५) लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास.


६) थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास


७) रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास.


८) तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.


९) फोलिक अ‍ॅसिड किंवा कॅल्शिअमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते.


१०) बध्दकोष्ठाचा त्रास पोटसाफ नसेल तरीही.


११) मद्यपानाचे व्यसन.


१२) किडनी संबंधित आजार.


१३) एखाद्या किटकाचा दंश.


*उपाययोजना...*


१) गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते.


२) नस्य (नाकात दोन दोन थेंब सोडणे) .


३) एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते.हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.


४) दोन चमचे मोहरीचे तेल व दोन चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे.


५) तुपाची तळपायांना मालिश व भीमसेन कापुर गरमपाण्यात घेतल्यास तात्काळ रिझल्ट येतो.


६) पायाला कोकम तेल लावायच ! हे तेल कोकणात मिळेल, हे तेल मळकट पांढर्या रंगाच असुन , सर्व साधारण खुप घट्ट असतं हे तेल, हे तेल खडु पेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध.


७) कोहळा, पाव किलो साल काढुन,पांढरा दुधी पाव किलो साल काढुन,आवळा गर पाव किलो, आलं १२५ ग्रॅम साल काढुन एकत्रित करून ज्युस करून रोज घेत जा.


८) शतधौत घ्रुत पायाला लावत जा.


९) धनेजीरे पाणी पीत जा.


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



हृदयरोग व मधुमेहींसाठी एक वरदान : टोमॅटो-*

 *हृदयरोग व मधुमेहींसाठी एक वरदान : टोमॅटो-* 


टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे.


टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर तो मलेशिया, भारत, अमेरिका, आफ्रिका असा संपूर्ण जगामध्ये आला. संपूर्ण जगात बटाट्या खालोखाल जास्त पिकवले जाणारे टोमॅटो हे लोकप्रिय पीक आहे.


*औषधी गुणधर्म :-* 


कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस 'अ', 'क' जीवनसत्त्व, प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अशा सर्व घटकांनी टोमॅटो परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार टोमॅटो हे अग्निप्रदीपक, पाचक, सारक, रक्तशोधक मधुर आम्ल गुणात्मक, रुचकर, हृदय, लघु स्निग्ध व उष्ण वीर्यात्मक आहे. टोमॅटोमध्ये कमी उष्मांक असल्यामुळे मधुमेहींसाठी, हृदयरोग्यांसाठी एक वरदानच आहे.


*उपयोग :-* 


◼️ आहारामध्ये टोमॅटो हा उत्तम औषधी गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. टोमॅटोची भाजी, रस काढून सूप, तर जेवणामध्ये टोमॅटो कोशिंबीर, सॅलॅड अशा अनेकविध प्रकारांनी टोमॅटो वापरण्यात येतो.


◼️ टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कार्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटोचा औषधासारखा वापर करता येतो. वरील विकार असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे आहारात वापरावा.


◼️ अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.


◼️ टोमॅटोमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा. तसेच टोमॅटोची मूठभर पाने कुस्करून १ लिटर पाण्यात उकळावीत व हे पाणी दिवसातून तीन वेळा जेवण्यापूर्वी अर्धा कप प्यावे. यामुळे दृष्टीला तेज प्राप्त होते.


◼️ रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.


◼️ टोमॅटोच्या १ कप रसामध्ये १००० इ.यु. 'अ' जीवनसत्त्व असते. तसेच 'क' जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.


◼️ टोमॅटोमध्ये मॅलिक आणि सायट्रिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने टोमॅटो खाल्ल्याने लहान व मोठे आतडे अधिक कार्यक्षम होते व शरीरात साचलेला घट्ट मल पुढे ढकलण्यास मदत होते. म्हणून मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.


◼️ पिकलेल्या टोमॅटोचा ताजा रस लहान मुलांना २ ते ३ वेळा दिल्यास मुले निरोगी, बलवान व सुदृढ होतात.

टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण व साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ल्यास हृदयविकार कमी होतो.


*सावधानता :-* 

टोमॅटो आरोग्यास लाभदायक असला तरी मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये.


*संकलन-*


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



घशात दुखणे (Sore throat).....*

 *घशात दुखणे (Sore throat).....*


वातावरणातील बदलामुळे थंडी आणि पावसाच्या दिवसामध्ये किंवा घशात इन्फेक्शन झाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे घसा सुजून घसा दुखू लागतो. अनेकदा सर्दी खोकला होण्याआधी सुरवातीला घशात खवखव होणे, घशात सूज येणे, घसादुखी ही लक्षणेही असतात. घसा दुखत असल्यास कोणते उपाय करावेत याची माहिती खाली दिली आहे.


*घसादुखी होण्याची कारणे...*


अनेक कारणांमुळे घशात वेदना होऊ शकतात. त्यातही प्रामुख्याने वातावरणातील बदलामुळे आणि घशात इन्फेक्शन झाल्याने घसादुखी होत असते...


*सर्दी, खोकला झाल्यामुळे घसादुखी होऊ शकते.

*टॉन्सिल्सला सूज आल्याने,

*स्वरयंत्राला सूज (Laryngitis) आल्यामुळे,

*गालफुगी आजारामुळे,

*एलर्जीमुळे,

*वायुप्रदूषण, 

*सिगारेटच्या स्मोकिंगमुळे,

*तसेच घशातील कँसर किंवा घशात जखम झाल्यानेही घशात दुखते.


*घसा दुखीवर हे करा घरगुती उपाय...*


*मीठाच्या पाण्याच्या गुळण्या...*

घशामध्ये दुखत असल्यास कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशामधील सूज व वेदना कमी होतात. तसेच कोमट पाण्याने कफ निघण्यास मदत होते. या कोमट पाण्यात अर्धा चमचा हळदसुद्धा घातल्यास व गुळण्या केल्यास हा आयुर्वेदिक उपाय घसादुखीवर खूप उपयुक्त ठरतो.


*आले व मध...*

घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. यामुळे घशात दुखणे कमी होते. आले आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.


*लवंग आणि मध...*

काही लवंगा मधात टाकून थोड्या वेळाने त्या लवंगा आणि मध यांचे चाटण करावे. यामुळेही घशात दुखणे कमी होण्यास मदत होते व घशाला आराम मिळतो.


*लिंबू आणि मध...*

ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा अर्धा चमचा रस व एक चमचा मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे घशातील वेदना दूर होतात.


*गरम दूध प्यावे...*

घशात सूज आल्यास घसा दुखत असल्यास हळद घालून ग्लासभर गरम दूध प्यावे. यामुळे घशातील सूज व वेदना कमी होऊन घशाला आराम मिळेतो.


*घसादुखी असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे...?*

*घसादुखी ही प्रामुख्याने सर्दी, खोकला यासारख्या इन्फेक्शनमुळे होत असते. त्यावर घरगुती उपाय करून घसादुखी दूर होण्यास मदत होते. मात्र घरगुती उपाय करुनही आठवडाभर घसादुखी कमी न झाल्यास आपल्या डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत.


*याशिवाय घसादुखी बरोबरच खालील लक्षणे दिसून येत असल्यास जास्त खबरदारी घेणे गरजेचे असते. यामध्ये...*

*घसादुखी बरोबर अन्न गिळताना त्रास होत आल्यास,

*श्वास घेण्यास त्रास होत असल्यास,

*तोंड उघडण्यास त्रास होत असल्यास,

*थुंकी व कफातून रक्त येत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन होणाऱ्या त्रासाचे निदान व योग्य उपचार करून घेणे गरजेचे आहे. 


*डॉ. सतीश उपळकर,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

ST canteen rate

 


Featured post

Lakshvedhi