Saturday, 13 May 2023

ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियनचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 -ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियनचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अडचणीतील सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. 12 : केंद्र आणि राज्य शासन सहकार खात्यामध्ये अमुलाग्र बदल घडविण्याचे काम करीत आहे. राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.


            दादरमधील स्वामी नारायण मंदिरच्या योगी सभागृहात आयोजित को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियन, मुंबईचा ६३ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत, माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजित अडसूळ, धनवर्षा समुहाचे अध्यक्ष अंशुमन जोशी, युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे यांच्यासह युनियनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियनच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देवून मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, बॅंका ह्या देशाची अर्थव्यवस्था आहेत. देशाची अर्थव्यवस्था ही जागतिकस्तरावर ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आली आहे. राज्याच्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी दावोस येथे कोट्यवधींचे औद्योगिक करार करण्यात आले आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात सहकार विभागात अमुलाग्र बदल केले जात आहेत. राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल. त्यांच्या अडीअडचणींबाबत मार्ग काढला जाईल. को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियनच्या माध्यमातून बॅंकाना बळकट करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियन ही बॅंकेच्या एकेका कर्मचाऱ्याच्या पाठिशी ठामपणे उभी राहते, ही कौतूकास्पद बाब आहे. रंगभूमी आणि चित्रपटांमधील कलाकारांसह बॅंकांमध्ये देखील अतिशय उच्च स्तर असलेले कलाकार आहेत, हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. ज्या बॅंका, संस्थांमध्ये सांस्कृतिक चळवळ असते ती संघटना संस्कारी असते. हा अनमोल ठेवा जपला पाहिजे, अशी भावना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.


            या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त बॅंकामधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नृत्य, गीतगायन, पोवाडे, नाटक, हास्यविनोद अशा विविध कलांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.

Friday, 12 May 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज 209 तक्रारींचे निराकरण.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज 209 तक्रारींचे निराकरण.

            मुंबई, दि. 12 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात घाटकोपर पूर्व येथील एन वॉर्ड येथे आज 490 तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच 209 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे उर्वरीत तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.


            यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.      


            दिनांक 15 मे रोजी भांडुप वेस्ट एस वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 वाजता सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 60 कोटींचा निधी वितरित

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 60 कोटींचा निधी वितरित

       मुंबई दि. 12 :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 60 कोटी रुपये इतका निधी शासनाकडून आज दिनांक 12 मे 2023 रोजी वितरीत करण्यात आलेला आहे. समाज कल्याण आयुक्तालयाकडून हा निधी अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्‍यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे.


            मागासवर्गीय मुलामुलींना उच्च ‍शिक्षण घणे सुकर व्हावे यासाठी राज्यात मागासवर्गीय मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहाची योजना राबविण्यात येते. राज्यात 441 ( मुले- 229 व मुली-212) शासकीय वसतिगृहे सुरू असून त्यामधून मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य इ. सोयीसुविधा पुरविण्यात येतात.


            सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन,निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई,ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रू.60,000/- इतर महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू.51,000/- व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू.43,000/- इतकी रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येते.


            या योजनेअंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रू.126 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत रू.150 कोटी इतकी तरतूद करण्यात आली असून त्यामधून यापूर्वी रू.15 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे.आता रू.60 कोटी इतका निधी शासनाकडून दिनांक 12 मे,2023 रोजी वितरीत करण्यात आलेला आहे.


000000

काही_गोष्टी_आजही_मनात_आहेत

 काही_गोष्टी_आजही_मनात_आहेत...


त्या दिवसांची गोष्ट आहे

  *मी शाळेत इयत्ता 2 मध्ये शिकायचो..


*मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना मार्कशीट दाखवली ज्यात मला गणितात १०० पैकी ९० गुण मिळाले..!*


घरच्यांनी मार्कशीट पाहिली आणि मला मारायला सुरुवात केली *तू कधीपासून इतका हुशार झालास?  नक्कीच तू 9 चे 90 केले असावेत....*


तू स्वतः *"0" वाढवलेस असे  *म्हणुन मला मारत होते आणि मी *"0"* वाढवले नाही असे म्हणत रडत होतो..!

पण कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि मला मारहाण सुरूच होती.

,

आज इतक्या वर्षांनंतरही मी हेच म्हणेन की मी *"0"* वाढवले नव्हते...!

,


*मी "9" वाढवले होते*

😅😅🤣😂🤣😂

छातीत जळजळ, सारखी ॲसि़डीटी होते? डॉक्टर सांगतात ३ सोपे उपाय, ॲसिडीटीपासून मिळेल सुटका.....*

 *छातीत जळजळ, सारखी ॲसि़डीटी होते? डॉक्टर सांगतात ३ सोपे उपाय, ॲसिडीटीपासून मिळेल सुटका.....*


ॲसिडीटी ही अनेकांना नियमितपणे सतावणारी समस्या आहे. ॲसिडीटीमुळे कधी डोके जड होणे, छातीत जळजळणे, उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात. कधी कधी ॲसिडीटी इतकी जास्त होते की डोकं ठणकतं आणि अस्वस्थ होऊन उलट्या होऊन ती बाहेर पडते. जागरण, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव, अपचन, व्यायामाचा अभाव यांमुळे ॲसिडीटी होते. काही जणांची प्रकृतीच पित्ताची असते असे म्हटले जाते


ॲसिडीटी झाली की काहीच सुधरत नाही मग आपण जेलोसिल, पॅन डी यांसारखी औषधे घेतो. एखादवेळी अशी औषधे घेणे ठिक असते, मात्र सातत्याने अशी औषधे घेतल्यास आरोग्याच्या विविध तक्रारी निर्माण होतात. अशावेळी ॲसिडीटी होऊ नये म्हणून घरच्या घरी काही उपाय केले तर? प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार काही सोपे उपाय सांगतात. सलग ३ महिने हे उपाय केल्यास ॲसिडीटी कमी होते, आणि आराम मिळण्यास मदत होते. मायग्रेन, पोटाचे त्रास, हार्मोन्सचे संतुलन. 


*पाहूयात घरच्या घरी करता येतील असे हे सोपे उपाय नेमके कसे करायचे...*


*१. धण्याचा चहा...*

१ ग्लास पाण्यात १ चमचा धणे घालायचे. यामध्ये ५ पुदीन्याची पाने आणि १५ कडीपत्त्याची पाने घालायची. हे सगळे मिश्रण ५ मिनीटे गॅसवर चांगले उकळायचे. त्यानंतर हे मिश्रण गाळायचे आणि सकाळी झोपेतून उठल्या, उठल्या चहा घेतो त्याप्रमाणे चहाऐवजी घ्यायचे. 


*२. बडीशोप...*

आपण हॉटेलमध्ये गेलो की आवर्जून जेवणानंतर बडीशोप खातो. पण घरात आपण ती खातोच असे नाही. पण प्रत्येक जेवणानंतर बडीशोप खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे अॅसिडीटी बऱ्याच प्रमाणात कमी होते. 


*३. रोज टी...*

१ कप पाणी घ्यायचे ते ३ मिनीटे चांगले उकळायचे आणि त्यात गुलाबाची वाळलेली पाने घालून पुन्हा काही वेळ उकळायचे. दररोज झोपण्याआधी अर्धा तास हे पाणी प्यायचे.  


*कुमार चोप्रा,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



रोटी बँक एक अतुलनीय उपक्रम

 


शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचामुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ

 शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचामुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ


            मुंबई, दि. 12 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या (दि.१३ मे) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.


            राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर २ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


महारोजगार मेळावा, मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन


            ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या परिसरातील युवावर्गाला ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘मोफत महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून गरजू रुग्णांच्या विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.


            ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम, महारोजगार मेळावा आणि महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


००००

Featured post

Lakshvedhi