Friday, 12 May 2023

साखरे ऐवजी सेंद्रिय गुळ का खावा

 *साखरे ऐवजी सेंद्रिय गुळ का खावा.....?*


*फुफ्फुसातील संसर्ग रोखतो...*  

गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो.


*पोटाच्या तक्रारींवर गुणकारी...* 

पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॕसिडीटीची तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो.


*आंबट ढेकरींपासून सुटका...* 

गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबते.


*सांधेदुखीतून सुटका...* सांधे दुखत असतील तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो.


*थकवा दूर होतो...*  

गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा, कमजोरी जाणवत असेल तर जरूर गूळ खावा.


*रक्ताची कमतरता भरून निघते...* 

गूळ हा लोहाचा मोठा स्रोत आहे. तुमचं हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर रोज गूळ खाण्यानं तात्काळ फायदा होतो. गूळ खाण्यानं शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांना डॉक्टर गूळ खाण्याचा सल्ला देतात.


*रक्तदाब नियंत्रणात राहतो...* -गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.


*हाडं मजबूत होतात...* गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असतं. हाडांना बळकट करण्यात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे गूळ खाण्यानं हाडांसाठीही लाभदायी ठरते.


 *शरीर कार्यक्षम राहतं...* गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते. शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गूळ घालून घेणे उपयुक्त ठरते. दुध आवडत नसल्यास एक कप पाण्यात पाच ग्रॅम गूळ, थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून प्यायल्यास थकवा दूर होईल.


 *सर्दीवरही गुणकारी...* सर्दी-पडसं दूर करण्यासाठीही गूळ लाभदायी ठरतो. काळीमिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी-पडसं कमी होतं. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभकारक ठरतं. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते.


*डोळ्यांसाठीही लाभदायी...* 

गूळ खाल्ल्यानं डोळ्यांची क्षीणता कमी होते. दृष्टी सुधारण्यासही मदत होते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज 101 तक्रारींचे निराकरण

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज 101 तक्रारींचे निराकरण


             मुंबई, दि. 11 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात कांदिवली येथील आर दक्षिण वॉर्ड वॉर्ड येथे आज 1 हजार 355 तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच 101 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.


                   यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.      


                   दिनांक 12 मे रोजी एन वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 वाजता सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळ्याचे लवकरच आयोजन

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळ्याचे लवकरच आयोजन

- गिरीश महाजन.

            मुंबई दि. 11 : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            मंत्री श्री.महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यस्तरीय निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त डॉ. सुहास दिवसे, उप सचिव सुनिल हंजे, अशासकीय सदस्य नामदेव शिरगावकर, अर्चना जोशी, कविता राऊत उपस्थित होते.


            मंत्री श्री महाजन म्हणाले, राष्टकुल क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रक्कमेत दुप्पट ते चौपट वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम तातडीने पदक विजेत्या खेळाडूंच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.


            राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे या हेतूने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू ,दिव्यांग खेळाडू आणि साहसी कामगिरी करणाऱ्या व्यक्ती यांचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार याच महिन्यात प्रदान करण्यात येणार असल्याचे श्री महाजन यांनी यावेळी सांगितले.


0000

प्रधानमंत्री यांच्या हस्ते 5,800 कोटी रुपयांहून

 प्रधानमंत्री यांच्या हस्ते 5,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्याविविध वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण


महाराष्ट्रातील प्रकल्पांचाही समावेश


            नवी दिल्ली, 11 : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. यात महाराष्ट्रात असणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे.


            येथील प्रगती मैदानामध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.


            ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यामध्ये लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा लिगो-इंडिया (LIGO-India), हिंगोली, टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबईचा प्लॅटिनम ज्युबिली ब्लॉक या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या महत्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे.


            राष्ट्राला समर्पित केलेल्या प्रकल्पांमध्ये मुंबई येथील फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा तसेच नवी मुंबई येथील नॅशनल हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा, रेडिओलॉजिकल रिसर्च युनिट, तसेच महिला आणि लहान मुलांच्या कर्करोग रुग्णालयाची इमारत यांचा समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्री यांनी भारतामध्ये अलीकडच्या काळात झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले तसेच स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाणेही जारी केले.


            माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या आणि मे 1998 मध्ये पोखरण चाचणी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या सन्मानार्थ ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस नवीन आणि वेगळ्या संकल्पनेसह साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना ‘स्कूल टू स्टार्टअप्स- इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ अशी आहे.


पार्श्वभूमी


            महाराष्ट्रात हिंगोली येथे लिगो-इंडिया (LIGO-India) विकसित केले जाणार असून जगातील निवडक लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळांपैकी ते एक असेल. या परिसरातील 4 किमी लांबीची ‘भूजा’ असलेले अत्यंत संवेदनशील इंटरफेरोमीटर असून कृष्णविवर आणि न्यूट्रॉन तारे यांसारख्या प्रचंड खगोल भौतिक वस्तूंच्या विलीनीकरणादरम्यान निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी समजून घेण्यास सक्षम असणार आहे. अमेरिकेत हॅनफोर्ड, वॉशिंग्टन येथील एक आणि लिव्हिंग्स्टन, लुईझियाना येथील एक अशा दोन वेधशाळांबरोबर लिगो-इंडिया ( LIGO-India) समन्वयाने कार्य करेल.


            नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरची नॅशनल हॅड्रॉन बीम उपचार सुविधा ही एक अत्याधुनिक सुविधा आहे. शरीरात मात्रेची व्याप्ती गाठीच्या आजूबाजूच्या निरोगी अवयवांपर्यंत कमीतकमी ठेवत गाठीवर अत्यंत अचूक रेडिएशनचे वितरण करण्याचे कार्य या सुविधेमुळे शक्य होते.लक्ष्यित ऊतींना मात्रेचे अचूक वितरण करत रेडिएशन उपचाराचे प्रारंभिक आणि दीर्घकालीन दुष्परिणाम कमी करते.


            भाभा अणु संशोधन केंद्राच्या ट्रॉम्बे परिसरात फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा आहे. मॉलिब्डेनम-99 हे टेक्नेटियम-99एम चे मूळ आहे. त्याचा उपयोग कर्करोग, हृदयरोग इत्यादी व्याधींचे निदान लवकर करण्यासाठी आवश्यक 85% पेक्षा जास्त इमेजिंग प्रक्रियेमध्ये होतो. या सुविधेमुळे प्रतिवर्षी सुमारे 9 ते 10 लाख रुग्णांचे परीक्षण शक्य होणे अपेक्षित आहे.


            कर्करोग रुग्णालयांचे आणि सुविधांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये कर्करोगावरील जागतिक दर्जाच्या सेवांचे विकेंद्रीकरण होईल आणि त्याची व्याप्ती वाढेल.

Thursday, 11 May 2023

आरोग्यासाठी वरदान :- लिंबू*

 *आरोग्यासाठी वरदान :- लिंबू* 


लिंबू हे आपल्या रोजच्या आहारातील फळ आहे. लिंबू जितके आंबट असते तितकेच ते आरोग्यवर्धक असते. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. तसेच लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. 


लिंबू पाण्यासोबत सेवन करणेच फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबत लिंबाचे सेवन करणे शरिराला फायदेशीर ठरते. दिवसाची सुरुवात लिंबूपाणी घेऊन करावी. यामुळे त्वचा खुलून दिसते, पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अनेक इतर समस्यांपासून सुटका होते. लिंबात अनेक औषधी गुणधर्म असल्याने लिंबाचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. अनेक आजारात घरच्या घरी लिंबाचे उपाय केले जातात. लिंबू हे त्वचेशी संबंधित समस्या दूर करणारे नैसर्गिक अँटी सेप्टीक औषध आहे.


दात दुखत असल्यास त्या ठिकाणी लिंबू घासणे किंवा लिंबाचा रस लावणे, असे केल्याने दातांचे दुखणे थांबण्यास मदत होईल आणि दातांचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होईल. तसेच लिंबाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.


हृदयरोग्यांसाठी लिंबूपाणी रामबाण औषध आहे. यामध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने उच्च रक्तदाब, मळमळ आणि भीती तसेच मानसिक तणावही दूर होतो. तसेच गळ्याचा संसर्ग दूर करण्यासाठी लिंबू गुणकारी आहे. गळ्याशी संबंधित समस्या किंवा टॉन्सिल्सची समस्या असल्यास लिंबामुळे खूप फायदा होतो.


जर तुम्हाला ब्रद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर सकाळी उठून लिंबू पाणी पिणे, असे केल्याने ब्रद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल आणि पचनक्रिया देखील सुधारेल. आयुर्वेदामध्ये लिंबाचे अनेक फायदे आहेत.


शरीरात आयर्नची कमतरता असल्यास एनीमियाची समस्या उद्भवते आणि लिंबू एनीमियाची समस्या दूर होण्यास मदत करते. लिंबू हे आजराच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवते.


लिंबाचे सेवन केल्याने किंवा लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेण्यास मदत होते, कारण लिंबू मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



लसुण..... Garlic..*

 *लसुण..... Garlic..*


.... लसुण उत्तम जंतूनाशक आहे. मोठमोठ्या डाँ. नि ज्या असाध्य रोगांपुढे हात टेकले, असे रोग लसणाच्या पाकळ्यांनि बरे होतात. अगदि प्राचिन आयुर्वेदापासून ते आधुनिक वैद्यकशास्राचा पाया घालणारे हिपाँक्रेटस

... यांच्यापर्यंत सर्वांनिच लसणाचि मुक्तकंठाने स्तुति केलि आहे..

.. लसणात..,, अलिका सल्फाईड,, नावाचे अतिशय प्रभावि तेल असते. यामूळेच क्षयरोग, टी. बि, वाढलेला रक्तदाब, पोलिओ, ह्रदयरोग, खोकला, दमा, संधिवात, सर्दि, पोटांचे असाध्य रोग, बरे होतात.. डाँ रोडुले यांनि तर घटसर्पासारखे विकार लसूणाचा उपयोग करून बरे केले आहे.. युरोप मद्ये प्लेगसारखे भयंकर रोग बरे करण्यासाठि लसूणाचा उपयोग शेकडो वर्षापासून केला आहे.


..... लसुण म्हणजे गरिबांचि.. कस्तुरिच.. आहे. सर्व प्रकारच्या वातविकारानवर रामबाण आहे, पण डोळ्याचे तेज वाढवतो, केसांनाहि हितकर आहे.

.... लसणाविषयि.. वाग्भटांनि असे म्हटले आहे कि, 

... जो माणुस थंडिच्या दिवसात अम्रुततुल्य असा लसूण विधिपूर्वक उपयोगात आणेल तो तेजस्वि, निरोगि, धष्टपुष्ट, व बलवान होउन १०० वर्षे जगेल.. ते पुढे असेहि म्हणतात...^* विद्यते वार्यौ न द्रव्यं लशुनात्परमा ^*... म्हणजे वायुरोगावर लसूणासारखे दुसरे प्रभावि औषध नाहि...


... लसुणाला. संस्क्रुतमद्ये...,,रसोन,, असे म्हणतात.. रसोन म्हणजे केवळ एकाच रसाचि उणिव..!!!

.... लसुणात मधुर, आम्ल, खारट, कडवट, व तिखट या सहा रसांपैकि पाच रस परिपूर्ण असतात.. फक्त आम्लरसाचिच उणिव असते..

.... लसणाच्या कांद्यात एक कणिचा देखिल लसुण मिळतो. तो जास्त गुणकारि असतो..


##लकवा.. लसणाच्या एका पाकळिपासून सुरवात करावी. दररोज एक एक पाकळि वाढवा. अखेर चौदाव्या दिवशि चौदाव्या दिवशि चौदा लसूणाच्या पाकळ्या खा.

.... नंतर त्याच प्रकारे एक एक पाकळि कमि करत जा.

... पुढच्या चौदा दिवसात एक ऊक पाकळी कमि करत एक पाकळिपर्यंत यावे. आणि हा ऊपचार बंद करा.

.... २८ दिवसांच्या या उपचाराने प्रामुख्याने लकव्यात फरक पडतो..

.... ##दुसरा उपाय हा कि, लसुणाच्या तीन पाकळ्या घेउन रोज रात्री त्या भिजत घालाव्या. सकाळि उठल्यावर त्या वाटाव्यात. व भिजत घातलेल्या पाण्यात कालवून ते पाणि गाळून, प्यावे. किंवा चार लसूण व सोळा वावडिंग दुधपाण्यात उकळवा.. पाणि आटल्यावर

  ते गाळून घ्या. व ते दूध प्या..


..##महत्वाचितिन.. ##खनिजे.. कँलशिअम, पोटँशिअम, व फाँस्फरस.. ही तिनहि खनिजे लसूणात मोठ्या प्रमाणात आढळतात.. याशिवाय, आयोडिन, गंधक, लोह, व क्लोरीन हे अल्प प्रमाणात का होईना असते.. याशिवाय . बी-१ सी, व रोबोफ्लेविन हि जीवनसत्वे असतात... २ ते ३% तेल द्रव्य, ११:८.. टक्के खनिज क्षार, २०:०० % कार्बोहायड्रेट. ४:४ % प्रैटिन मिळतात.

.... सर्वसाधारणपणे अशक्त लोकांना लसुण अश्वगंधाच्या

 चूर्णासोबत खावा.. स्वरेंद्रियावर दुष्परिणाम झालेल्यांनि ज्येष्ठमधासोबत खावा.

... ज्यांच्या पोटात गोळा उठतो त्यांनि तिळाच्या तेलासोबत खावा. अंगावर पांढरे कोड उठले असता, खैराच्या सालिसोबत, क्षयरोग्यांनी दूधासोबत,

.. मूळव्याध असणार्यानी इंद्रजवा च्या सालिच्या चूर्णासोबत, पोटात क्रुमि असणार्यानी वावडिंगाच्या

  चूर्णासोबत, व खोकला व श्वास विकार असणार्यांनि, त्रिफळा चुर्णासोबत लसूणाचे सेवन करावे..


... तेव्हा लसूण.. हा अतिशय.. प्रभावि नैसर्गिक..

 अँटिबायोटिक. औषध आहे.. आपण कायमच याचे सेवन केले पाहीजे...##^##^^##


... आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे.




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



जपानच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.

 जपानच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.

जपान सरकारतर्फे भेटीचे निमंत्रणl.

            मुंबई, दि. ११ : जपानचे कॉन्सुलेट जनरल डॉ. फुकाहोरी यासूकाटा यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी डॉ. यासूकाटा यांनी जपान केंद्र सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना जपान भेटीचे निमंत्रण दिले.


            यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, जपानचे कॉन्सुल मोरी रायको, कनेको टोशीहिरो, जपान कॉन्सुलेट जनरलचे राजकीय सल्लागार विवेक कुलकर्णी उपस्थित होते.


            यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि डॉ. यासूकाटा यांच्यामध्ये भारत-जपान संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण, उद्योग, व्यापार यामध्ये सहकार्य वाढविण्याबाबत आणि संबंध अधिक दृढ होण्याविषयी चर्चा झाली.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील विविध पायाभूत सुविधेच्या कामात जपानचे मोठे योगदान आहे. जपानच्या तंत्रज्ञानाचा ठिकठिकाणी वापर होत असून या माध्यमातून जपान आणि महाराष्ट्राचे संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत. जपानची जनता आणि सरकारचा आम्ही नेहमीच आदर करीत आलो आहोत.


            डॉ. यासूकाटा यांनी यावेळी जपान केंद्र सरकारच्या वतीने श्री. फडणवीस यांना जपान भेटीचे निमंत्रण दिले, मार्च २०२४ अखेर कधीही सात दिवसांचा दौरा केला जाऊ शकेल. या काळात विविध जपानी कंपन्यांना भेटी देता येणार आहेत. याचदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण, भारतीय समुदायांशी भेटी घेण्याचे नियोजन आहे. २०१२ मध्ये गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाही जपान भेटीचे निमंत्रण देण्यात आले होते. सध्या भारतातून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना जपान दौऱ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती डॉ. यासूकाटा यांनी दिली.


००००

Featured post

Lakshvedhi