Thursday, 4 May 2023

खावटी कर्ज वाटप प्रक्रियेस गती द्यावी

 खावटी कर्ज वाटप प्रक्रियेस गती द्यावी


- सहकार मंत्री अतुल सावे.

            मुंबई, दि. 3 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खावटी कर्ज वाटप करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. यानुसार पात्र शेतकऱ्यांना उपलब्ध निधीतून कर्ज वितरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले.


            आज मंत्रालयात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खावटी कर्जमाफीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. सावे बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, आमदार राजन तेली, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहसचिव श्रीकृष्ण वाडेकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. सावे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विकास संस्थांच्या माध्यमातून खावटी कर्ज वाटप करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये अल्पमुदत पीक कर्जाबरोबरच अल्पमुदत शेतीपूरक खावटी कर्ज वितरीत केले जाते. मात्र, प्रलंबित २५ कोटीचे खावटी कर्ज विभागाकडे उपलब्ध असलेल्या निधीतून वितरित करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा. तसेच थकीत कर्जदार सभासदांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर लेखापरीक्षण करून अपलोड करण्यात आल्या होत्या, संबंधित पोर्टलही सुरू करण्यात यावे, असेही निर्देश मंत्री श्री. सावे यांनी दिले.


०००

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठीदरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती

 कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठीदरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश


 


            मुंबई, दि. ३ : कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ जणांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.


            वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही योजना मांडली होती. या योजनेअंतर्गत दरवर्षी २५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर केल्याबद्दल वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.


            वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात येणार असून टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग (THE च्या २०० च्या आतील किंवा QS – Quacquarelli Symonds रँकिंग १५० च्या आतील) परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. यापैकी तीस टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येईल. मरिन सायन्स, मरिन इकॉलॉजी, ओशोनोग्राफी, मरिन बायोलॉजी, मरिन फिशरीज, मरिन बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोडायव्हर्सीटी या अभ्यासक्रमांसाठी १५ पदव्युत्तर पदवी आणि १० पीएच.डी. अशा दरवर्षी २५ शिष्यवृत्ती दिल्या जातील. पदव्युत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे वय कमाल ३५ वर्षे आणि पीएचडीसाठी कमाल वय ४० वर्षे असावे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. या योजनेसाठी ३१ कोटी ५० लाख रुपये इतका खर्च येणार आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी पीएचडी करीता ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो, तसेच पदव्युत्तर पदवीकरीता २ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो ठरविण्यात आला आहे.


            या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. परदेशातील हा अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्याने दोन महिन्यांच्या आत कार्यकारी संचालक कांदळवन प्रतिष्ठान यांना अंतिम परीक्षेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र व प्रगती अहवाल, पदवीदान समारंभाचे छायाचित्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.


            राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे जैवविविधता या विषयावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार असून या क्षेत्राकडे नवतरुणांचे लक्ष केंद्रित होईल, असा विश्वास वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन यासाठी शासन कटिबद्ध असून, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात उचलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन श्री. मुनगंटीवार यांनी केले.


००००

भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त

 भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


 


            मुंबई, दि. 3 : भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त आहे. जगातील ज्या चांगल्या शिक्षण पद्धती अथवा चांगले अभ्यासक्रम असतील त्यांचा अवश्य स्वीकार करा. तथापि प्राथमिक स्तरावर भारतीय शिक्षण पद्धती योग्य असल्यास ती विनाकारण बदलू नका, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. तसेच इंग्रजीच्या अट्टाहासातून बाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी केले.


            महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) नियामक मंडळाची २५१ वी सभा आज शालेय शिक्षण मंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झाली. यावेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक तथा माध्यमिक शिक्षण संचालक आणि नियामक मंडळाचे सदस्य सचिव कृष्णकुमार पाटील तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि शिक्षण पद्धती पुरातन आहे. विद्यार्थ्यांना हसत - खेळत शिकवताना झालेला अभ्यास कायम लक्षात राहतो. त्यामुळे जे चांगले आहे ते स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, बालभारतीची पुस्तके आणि त्यासाठी साठवायचा पेपर खराब होणार नाही याची दक्षता घेताना राज्यातील गोडाऊन सुस्थितीत ठेवावेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत. जगात ज्या चांगल्या शिक्षण पद्धती आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी जाणून घेता याव्यात याअनुषंगाने एक संग्रहालय तयार करावे, असे सांगून हे संग्रहालय संशोधनासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


            सर्व शाळा इंटरनेटशी जोडल्या जाणार आहेत. यासाठी दुर्गम भागातील ज्या शाळांमध्ये नेटवर्क नाही, त्यांची माहिती घेऊन त्या उपग्रहाद्वारे जोडण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी केली. येत्या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध करून देण्यात येणारी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वेळेत मिळतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देऊन लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर आवडीची पुस्तके देखील शाळेत उपलब्ध करून द्या, असेही त्यांनी सांगितले.

ल व ल व ती विक्राळ ब्रम्हांडी ज्वाला

 



Noto की गड्डी देखी अपने

 


महाराशट्र दिन ठाणे कोरास टॉवर,वर्तक नगर

 1मे पूर्ण कोरस टाॅवर्स दिंडी


उत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय ?*

 *उत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय ?*


              जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी, आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व सामाजिक दृष्टया सुखकारक किंवा कल्याणकारी मानवी अवस्था म्हणजे आरोग्य.

             समजा एखाद्या व्यक्तीचं शरीर व्याधी मुक्त आहे , त्याला कोणताही आजार नाही परंतु तो सतत कोणत्या न कोणत्या तणावाखाली असतो, कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो. एकादा कायमस्वरूपी रागीट, आदळआपट करत असतो, लालची किंवा लोभी असतात तर अशा व्यक्तीला निरोगी म्हणता येणार नाही.

               आपल्याला जर अध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर आपल्याला शारीरिक आरोग्या सोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तितकाच भर दिला पाहिजे तरच आपण एक मानव म्हणून समाजाचा उत्कर्ष करू शकू...


*मानसिक आरोग्य* 

मानसिक स्वास्थ्य म्हणजे अशी स्थिती जिथं ताण , तणाव, चिंता , नकारात्मक विचारसरणी ला आपल्याला मनात स्थान नसेल .


*भावनिक आरोग्य* 

भावनिक आरोग्य म्हणजे अशी संतुलीत स्थिती जिथं राग लोभ, अहंकार व तिरस्कार ला आपल्याला जीवनात स्थान नसेल.


*अध्यात्मिक आरोग्य* 

अध्यात्मिक आरोग्य म्हणजे एकात्मता आणि सुसंवाद ने राहणं म्हणजेच अध्यात्मिक आरोग्य. आपल्या स्वतःच्या धर्म आणि परंपरागत चालीतीरी वर विश्वास असणे व दुसऱ्यांच्या धर्म व परंपरा चा आदर करणे म्हणजे अध्यात्मिक आरोग्य व स्वास्थ.


*शारीरिक आरोग्य* 

जेव्हा आपल शरीर कोणत्याही प्रकारच्या व्याधी पासून व शारीरिक इजे व अनियमितते पासून मुक्त असतो अशा स्थितीस उत्तम शारीरिक आरोग्य म्हणून ओळखलं जात.


*संकलन-* 


*डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi