Thursday, 27 April 2023

कामगारांना लाभ देण्यासाठी शासन कटिबद्धकामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

 कामगारांना लाभ देण्यासाठी शासन कटिबद्धकामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य


- कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे


            मुंबई, दि. 27 : “कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना आणि कार्यक्रम सुरू केले आहेत. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना आर्थिक साह्य, वैद्यकीय मदत आणि शैक्षणिक साह्य यासारखे विविध फायदे प्रदान करण्यात येत असून यामुळे राज्यातील कामगारांना त्यांच्या हिताचे लाभ मिळतील”, असा विश्वास कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केला.  


            गोरेगाव येथे आज नारायण मेघाजी लोखंडे जागतिक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कार - 2022 प्रदान सोहळा तसेच सुरक्षा प्रदर्शनाचे उद्घाटन कामगार मंत्री डॉ.खाडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, डीशचे संचालक एम.आर.पाटील, गोदरेज ॲण्ड बायसचे कार्यकारी संचालक अनिल वर्मा, तसेच राज्यातील कारखान्यांचे प्रतिनिधी आणि कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            डॉ.खाडे म्हणाले की, आपले राज्य हे मजबूत औद्योगिक क्षेत्र आणि पायाभूत सुविधांसाठी देशभरात ओळखले जाते, ज्यामुळे ते औद्योगिक गुंतवणूक आणि उत्पादकांसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याचा थेट परिणाम कामगारांच्या कल्याणावर आणि व्यवसायाच्या एकूण यशावर होतो. त्यामुळे या कारखान्यांमधील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि कामगारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, सुरक्षिततेबद्दल योग्य माहिती आणि प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी, सुरक्षा क्षेत्रातील कामगार, सुरक्षा अधिकारी, कारखाना व्यवस्थापन आणि इतर भागधारकांमध्ये सुरक्षेविषयी जागरूकता आणि महत्त्व वाढवण्यासाठी "वर्ल्ड ऑफ सेफ्टी, समिट आणि एक्स्पो" चे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन मंत्री डॉ.खाडे यांनी केले.


            मंत्री डॉ.खाडे पुढे म्हणाले की, कामगारांसाठी व्यवसाय सुलभ करण्यासाठी Ease of Doing Business या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सरकारने अनेक पुढाकार घेतले आहेत. कामगारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने कामगार विभागाद्वारे विविध पावले उचलली आहेत. विभागाने आस्थापनांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी एक प्रणालीदेखील तयार केली आहे, ज्यामुळे व्यवसायांना कामगार कायद्यांचे पालन करणे तसेच विविध सेवा शासनामार्फत घेणे सोपे होत असल्याचेही ते म्हणाले.


            या प्रदर्शनात सुरक्षेशी संबंधित आपत्ती व्यवस्थापन, विद्युत सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्थापन, प्रथमोपचार प्रशिक्षण, उंच जागेवरील सुरक्षा, सुरक्षा उपकरणांचा योग्य वापर, वाहतूक सुरक्षा इ. विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त ISO 45001, सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली, व्यावसायिक सुरक्षा कोड, औद्योगिक स्वच्छता, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अधिकाऱ्यांची भूमिका आणि औद्योगिक सुरक्षिततेशी संबंधित इतर विषयांचाही समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी

 महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी

ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता


 


            मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दिनांक १ मे २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ७.१५ ते ९ वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ७.१५ वाजेपूर्वी किंवा ९ वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.


            या परिपत्रकानुसार मुंबईत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे राज्यपाल हे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. तर विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. ज्या ठिकाणी पालकमंत्री उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. तसेच, संबंधित तहसिलदार हे तालुका मुख्यालयी ध्वजारोहण करतील.


            राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘राष्ट्रगीत’ म्हणण्यात/ वाजविण्यात यावे. त्यानंतर 'राज्यगीत' म्हणण्यात/ वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९८/(ध्वजसंहिता)/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्यात यावी. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल, याचीही दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.


            महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख महाराष्ट्र दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हे परिपत्रक शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


0000

चामखिळ, मस, वार्ट

 चामखिळ, मस, वार्ट

 मुख्यतः रक्तात दोष उत्पन्न झाला, व्हिटमीन ई चि कमतरता झालि कि. त्वचेवर वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. कोणाला, त्वचारोग, कुणाला गाठि, कुणाला मस दिसू लागतात.

१) आंब्याच्या पानाचा रस व कडुलिंबाचा रस लावला कि जातात.

२) हळद, आणि चूना लावला कि जातात.

३) व्हिटामिन ई चे तेल लावणे.

४) रोज रात्री चमचाभर मेथिचे दाणे

 भिजवून सकाळि पाणि पिणे.

५) होमिओपँथि च्या थूजा ३० दोन दोन गोळ्यि तीन वेळा घेणे. तसेच वार्टोसन्स मलम लावणे.

६) चूना त्या जागेवर पाण्यात मिक्स करून पातळ लावणे.

७) आणि हे परत कधीच येउ नये वाटत असेल तर वरील उपायांबरोबरच रोज दोन वेळा २-२ चमचे रक्तदोषांतक तिन महिने घेणे.

        


 वैद्य. गजानन.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



सुपारि....(Areca Catecu)*

 *सुपारि....(Areca Catecu)*


         निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार

 सुपारी हा पदार्थ इतका घरगुती आहे कि त्याच्याशिवाय कोणतेच मंगलकार्य आपल्या घरात होत नाही.

 ,, लग्नाची सुपारी,,ही सर्वांच्या परिचयाचि आहे. संस्कृत मध्ये सुपारी ला..##पुगिफल. म्हणतात.

         बिन सोललेल्या सुपारिला पोफळ म्हणतात. सुपारी व नारळ ही झाडे बहुतेक सारखि असतात.

   सुपारीत अनेक प्रकार आहेत. हुबळी चि. तांबडि सुपारी. , गोमांतक श्रीवर्धन येथील पांढरि सुपारी

 मेंगलोर इकडिल चिकणी सुपारी प्रसिद्ध आहे..

                  सुपारी ही तोंडाला जेवणानंतर आलेला बुळबुळीत पणा घालवून तोंड स्वच्छ करण्यासाठी भोजनोत्तर सर्व लोक वापरतात.. ही दातात धरून चावली असता दात बळकट होतात.

  फार घाम येणाऱ्या मनुष्याने सुपारी विशेषतः चिकणी सुपारी खावि. शरिरास बळकटी येते. तोंडाचि रुची वाढते. व घाम कमी होतो


      सुपारी ही क्रुमिघ्न म्हणजे जंत नाहिसे करणारि असते. सर्व प्रकारचे जंत..दोर्या सारखे, चपटे, लहान , वाटोळे व मोठे जंत नाहिसे करते..बारिक पूड करून ती अंदाजे १\\ ग्रॅम मुलांना पाण्यासोबत 

खाऊ घाला. तर जंत मरून पडतात.. उलटि मळमळ. थांबवण्यासाठी सुपारी खातात..

       सुपारिचि राख करून ती लिंबाच्या रसासोबत चाटण्यास द्यावे. याने उलटि थांबते.

   तापात हि लिंबाच्या रसात मिसळून यांचे सरबत घ्यावे.. ताप उतरतो..

              मुतखड्याचे हे विशेष औषध आहे. सुपारिचि राख करून तिचा बस्तिवर लेप देतात.

 व पोटातून चिकणी सुपारी खायला देतात. सुपारी हि नशा देते. म्हणून सांभाळून खावि

  जास्त खाल्ली कि लागते म्हणतात. अशा वेळी थोडि साखर पाण्यात मिसळून प्यावे. मग बरं वाटतं

   ....... सुपारी ही कंठशुद्धी करणारी आहे. कफाने गळा धरला असता थोडि चिकणी सुपारी चघळावि कंठ लगेच मोकळा होतो.. आलेले तोंड सुपारी खाल्ल्यास बरं होतं.


        


##सुपारिचे ##वरूनहोणारे##उपयोग.. अर्धशिशी वर अर्धी सुपारी उगाळून लेप जिथं वेदना होतात तिथे लावा वा.. अर्धशिशी दुखायचे थांबते. खरूज, दाद, खाज यांवर सुपारी जाळून ति राख तिळाच्या तेलातुन लावावे. खरूज बरि होते.

              नायट्यावर चिकणी सुपारी पाण्यात टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी ते शिळं पाणी नायट्यावर लावावे म्हणजे नायटे बरं होतं. लहान मुलांना गालगुंड होतात त्यावर चिंचोका , चिकणी सुपारी ,व गुग्गुळ ही पाण्यात उगाळून घट्ट होईपर्यंत गरम करून गालगुंडाना लेप द्यावा..

      असे दिवसातून दोन तीन वेळा केल्यास गालगुंड बरे होतात..

   अशि हि सुपारी घरोघरी स्नेहसंबंध वाढविण्यासाठी मदत करते....


सुनिता सहस्रबुद्धे..

                          

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



शांत झोप

 शांत झोप 

रात्री झोप न येणे ही आज मोठी समस्या झालेय.शांत झोप न लागल्याने अनेक आजार आणि समस्या उद्भवतात. पण झोप न येण्या मागे जशी बाह्य कारणे आहेत तशीच. अंतर्गत कारण ही आहेत त्यांच्या मुळाशी पाठपुरावा केला तर ही समस्या सोडवता येते.झोप चांगली येण्यासाठी शरीरात झिंक, आणि मँग्नेशियमची गरज असते तशीच इतर छोट्या घटकांची गरज असतेत्यांच संतुलन साधल गेलं की झोप ही येतेच.कारण हे घटक सेरिटोनीक हार्मोनचा स्तर वाढवून गाढ झोप आणतात. अनेक जण हे घटक न विचारात घेता अनेक उपाययोजना सांगत बसतात .

घरगुती उपाययोजना


१)सुर्यफुलाच बीज,खसखस,५० ग्रँम प्रत्येकी आणि आक्रोड शंभर ग्रँम एकत्र करून चुर्ण कराव ते दूधात एक चमचा दूध व किंचीत जायफळ उगाळून मिक्स करुन प्या झोप येते.

२)ब्राम्हीचुर्ण व अश्वगंधा चुर्ण एकत्र करून ही झोप येते.

३)झोपण्यापूर्वी केळ, जायफळ,दूध एकत्र करून घ्या झोप येईल.

४)डोके,तळवे,यांच माँलीश करा.

५)गाईच्या तुपाचे थेंब नाकात टाका शांतपणे झोप येईल.


*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*


_*(

तुळस... एक महौषधि....🌿..👇*

 *🌿तुळस... एक महौषधि....🌿..👇*



.https://chat.whatsapp.com/F59rIS69C1LJUWbtWQF07I



## भारतिय समाजांत,, तुळशिला मानाचे, पूजनिय, धार्मिक स्थान आहे. समुद्रमंथनातून जेव्हा अम्रुत निघाले, तेव्हा त्याचे काहि थेंब जमिनिवर पडले. त्यापासून * तुळस* या वनस्पतिचा जन्म झाला असे म्हणतात.

... प्रत्येकाच्या अंगणात, गँलरित, अगदि..,, डालडा,, च्या डब्यात काअसेना, पण तुळस हि विराजमान असतेच.

🌿.. नित्यनेमाने तीचि पूजा केलि जाते. सांजवेळि तिच्यापुढे दिवा लावल्या जातो....,, नैव्येद्द्यावर तुळस ठेवल्याशिवाय तो परिपूर्ण समजल्या जात नाही.

........ म्हणूनच मग म्हटल्या जाते..,, हलवाईच्या घरावर तुळशिपत्र,,.. पंढरपुरच्या विठोबाच्या गळ्यात तुळशिचि माळ घातल्या जाते पूजेच्या वेळेस.. तुळस ही लक्ष्मिचे रूप मानले जाते...


..

## तेव्हा अश्या या बहुगुणि वनस्पतिचे औषधि गुण म्हणून देखिल, आयुर्वेदात मोलाचे महत्व आहे.🌿 

.... तुळस हि कफनाशक, पाचक,आहे. सर्दि, पडसे, कफ, खोकला, दमा, यावर तुळशिचा काढा अत्यंत गुणकारि आहे., तुळशिचि पाने व आले व गूळ पाण्यात उकळून हा काढा घेतल्या जातो..## तुळशीचि पाने जेवल्यानंतर खाल्यास पचन चांगले होते.

🌿.... तुळशिचा काढा, रस, कायम प्राशन केल्यास..,, मूत्रपिंडाचि क्षमता वाढते. रक्तातिल कोलेस्ट्रोल कमि होते.. कोलायटिस, अंग दुखणे, मेदव्रूद्धि, डोकेदुखि यांवर.. * तुळस* गुणकारि आहे... उचकि लागल्यास तुळस खावि.... स्मरणशक्ति वाढते. तुळशीच्या मंजि- या म्हणजे तुळशिचि फूले, त्यात पाणि, दूध, व साखर घालून पिल्यास युरिन स्वच्छ होते..

  .. 🌿.. तुळशीचे पाच प्रकार आहेत..१) क्रूष्ण तुळस २) दहिद्र तुळस, ३) राम तुळस, ४) बाबि तुळस, ५) तुकाशा मीय तुळस....# अर्धांगवायू, व संधिवातात तुळशिच्या पानांच्या काढ्याचा वाफारा घेतला जातो...

..... निद्रानाशावर काळ्या तुळशिच्या पानांचा काढा घेतात.

...## तुळशिच्या पानात कर्करोग, ह्रदयरोग, किडनिचे विकार आणि त्वचारोग बरे करण्याचि अपूर्व शक्ति आहे.

...।🌿.. उष्णतेच्या विकारांत तुळशिचे बी पाण्यात भिजत घालून त्याचि खिर घेतात. तुळशिचि पाने दह्यात घालून खाल्यास शरिरातिल अतिरिक्त मेद, चरबि, झडते.

...## पांढरे कोड, गजकर्ण, दाद, खरूज, नायटा, घामोळ्या, इसब, या सर्व त्वचाविकारांवर तुळस गुणकारि आहे.... तुळशिच्या झाडासमोर दिर्घश्वसन केल्यास फुफूत्साचे आजार बरे होतात....

..🌿... परदेशात देखिल ,, बेसिल,, म्हणून तुळस वेगवेगळ्या पदार्थांत वापरल्या जाते... तीव्र ताप असेल तर याचा काढा घ्यावा... चंदन, व तुळस एकत्रित करून तो लेप मस्तकावर द्यावा... डोकेदुखि थांबते.... तुळशिच्या पानांचि पावडर करून मोहरिच्या तेलात मिसळवून त्याने दात घासल्यास,, सर्व प्रकारचे दंतरोग बरे होतात..

..## हिरड्या मजबूत होतात... मध व तुळशिचि पाने चावून खावित.... सुगंधामुळे मनप्रसन्न राहते.

..## तुळस सौंदर्यवर्धक आहे. पिंपल , मुरूमे , पुरळ बरे होतात.. तिच्या पानांचा वाटुन लेप लावावा.... डागदेखिल राहत नाही.. त्वचा टवटवित राहते. व चमकदार होते..

...... तुळशित असलेले,, ,, इगेनाँल द्रव्य,, मधूमेहावर

 नियंत्रण ठेवते... तुळशिच्या पानांचा रस १० ते २५ मि. लि. घ्यावा..



🌿 शरिरातिल रोग प्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी मदत होते.. थकवा दूर करते... लहान बाळांच्या आंघोळिच्या पाण्यात तुळस टाकावि... कारण ती जंतूनाशक आहे. विविध संक्रमणापासून वाचवते... ,, अँटि बँक्टेरिअल,, आहे.. म्हणूनच चंद्र व सूर्य ग्रहणाच्या वेळि, आजहि अनेक घरांत, अन्नात, व पाण्यात तुळस घालून ठेवतात.

... ## तुळस घरांत असल्यास हवा शुद्ध होते.

... मौखिक स्वास्थ..* दातांच्या वेदना, मुख दुर्गंधि, चव नसणे, तोंड येणे, अल्सर, सूज हे सर्व त्रास दूर होतात तुळशिच्या सेवनाने..

.. ##.. तुळशितिल कँम्फेन, किनोल, युग्नोल, कार्वकोल, व मिथाईल, चार्वाकोल या औषधिय घटकांमूळे डोकेदुखी जाते...

.... 🌿 डोळ्यांकरताः। डोळ्यांत संक्रमण झाल्यास, तुळशिच्या पानाने डोळे धुवावेत... डोळ्यांचि सूज, डोळे जळजळणे, यांवर तुळशिच्या तेलाचे २,३ , थेंब डोळ्यात घालावे... जठरांत दुखणे, डांग्या खोकला, काँलरा, हात- पाय, दुखणे यांवर वेदना शामक आहे..

....... ## पचनसंस्थेचे कफ दोष वाढल्याने पोट जड होते. सुस्ति वाढते. तोंडाला चव नसते. अश्या वेळि तुळशिचि पाने, व आले यांचा चवीपूर्ति साखर घालून केलेला चहा घोट घोट घ्यावा..

...🌿 तुळशिचि कार्ये चरकसंहितेत सांगितलि आहेय..

 ##.. हिक्का कास विषश्वास- पाश्र्वशूल।। निनाशनः।।

         पित्ताक्रुतकफवातहघ्नः सुरसः पूतिगंधहा।।🌿..

##.. उचकि लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे. यांवर ती उत्तम काम करते..

......। तुळशिच्या लाकडापासून जपमाळ करतात. ती गळ्यात घातल्यास , कंठाचे आजार, गालगुंड, थायराँईड हे आजार नियंत्रित राहतात..

.. 🌿 अशि ही.. ,, धार्मिक व औषधियुक्त वनस्पति प्रत्येकाच्या अंगणात पाहिजेच....🌿..


आयुर्वेदअभ्यासक.....सुनितासहस्रबुद्धे....



सफेद पदार्थ -वजन कमी करण्यासाठी 'या' तीन पांढऱ्या पदार्थांपासून दूर रहा.*

 *वजन कमी करण्यासाठी 'या' तीन पांढऱ्या पदार्थांपासून दूर रहा.* 


आपल्यापैकी अनेकांना वजन कमी करण फार कठीण काम वाटतं. कारण वजन कमी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतील याची अनेकांना कल्पनाही करावीशी वाटत नाही.


अनेकजण तर या भीतीनेच वजन कमी करत नाहीत. वजन कमी करण्यासाठी बहुतेकदा जंक फूड बंद करायला सांगतात. वजन वाढू नये म्हणून, लोक प्रथम कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करतात. तर अनेक लोक लहान चुकांमुळे वजन वाढवतात आणि नंतर ते कमी करू शकत नाहीत.


जर तुम्हाला वजनाची काळजी वाटत असेल, तर पांढऱ्या पदार्थांपासून तुम्ही अंतर ठेवलं पाहिजे. कारण या पांढऱ्या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. सर्वच पांढऱ्या खाद्यपदार्थांवर प्रक्रिया केली जात नाही. पण, काही पदार्थ आहेत की जे टाळल्याने तुमचं वजन झपाट्याने कमी होईल.


*1. व्हाईट ब्रेड* :


वजन कमी करण्यासाठी, तुम्ही सर्वात आधी व्हाईट ब्रेड सोडणं आवश्यक आहे. कारण हा ब्रेड वजन वाढवण्याचे काम करतो. तुम्ही अनेकदा चहाबरोबर ब्रेड खाता. नाश्त्यात ब्रेडबरोबर जाम खा. यामुळे तुमचे पोट भरू शकते, पण वजनही वेगाने वाढू शकते. संशोधनात असं दिसून आलंय की व्हाईट ब्रेडचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते.


*2. व्हाईट साखर :* 


प्रक्रिया केलेली व्हाईट साखर टाळल्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहू शकते. व्हाईट साखर वजन वाढवण्याचे काम करते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. जेव्हा लोक वजन कमी करण्याचा विचार करतात तेव्हा सर्वात आधी गोड पदार्थ बंद करण्याचा सल्ला देतात. विशेषत: साखरेशी संबंधित पदार्थ. व्हाईट साखरेचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढण्याचा धोका असतो. खराब कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोकाही वाढतो. जर तुम्हाला साखर खायची असेल तर तुम्ही ब्राऊन शुगर खाऊ शकता. पांढऱ्या प्रक्रिया केलेल्या साखरेऐवजी तुम्ही साखर कँडी वापरू शकता.


*3. व्हाईट राईस :


व्हाईट ब्रेड आणि साखरेप्रमाणेच व्हाईट राईसदेखील खाद्यपदार्थांच्या श्रेणीत येतो. बरेच लोक व्हाईट राईस खातात. व्हाईट राईस हा वाईट आहार नसला तरी कॅलरी आणि कर्बोदकांशिवाय त्यात विशेष पोषण नसते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi