Saturday, 22 April 2023

अक्षय तृतीया* (आखा तीज)_ का महत्व और आज के दिन की कुछ महत्वपूर्ण जानकारियाँ :

 _*अक्षय तृतीया* (आखा तीज)_ का 

महत्व और आज के दिन की कुछ महत्वपूर्ण जानकारियाँ :


🔅 ब्रह्माजी के पुत्र *अक्षय कुमार* का अवतरण।

🔅 *माँ अन्नपूर्णा* का जन्म।

🔅 *चिरंजीवी महर्षी परशुराम* का जन्म हुआ था इसीलिए आज *परशुराम जन्मोत्सव* भी है।

🔅 *कुबेर* को खजाना मिला था।

🔅 *माँ गंगा* का धरती अवतरण हुआ था।

🔅 सूर्य भगवान ने पांडवों को *अक्षय पात्र* दिया।

🕉 महाभारत का *युद्ध समाप्त* हुआ था।

🕉 वेदव्यास जी ने *महाकाव्य महाभारत की रचना* गणेश जी के माध्यम से *प्रारम्भ की थी।*

🕉 प्रथम तीर्थंकर *आदिनाथ ऋषभदेवजी भगवान* के 13 महीने का कठिन उपवास का *पारणा इक्षु (गन्ने) के रस से किया* था।

🕉 प्रसिद्ध धाम *श्री बद्री नारायण धाम* के कपाट खोले जाते है।

🕉 बृंदावन के बाँके बिहारी मंदिर में *श्री कृष्ण चरण के दर्शन* होते है।

🕉 *जगन्नाथ भगवान* के सभी *रथों को बनाना प्रारम्भ* किया जाता है।

🕉 आदि शंकराचार्य ने *कनकधारा स्तोत्र* की रचना की थी।


🕉 *अक्षय* का मतलब है जिसका कभी क्षय (नाश) न हो!!


🕉 *अक्षय तृतीया अपने आप में स्वयं सिद्ध मुहूर्त है कोई भी शुभ कार्य किया जा सकता है...!*


🙏आप की जय हो ।।

खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध

 खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध


-कृषि आयुक्त सुनील चव्हाण


 


            पुणे, दि. २१: येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालाप्रमाणे खतांचा समतोल वापर करावा,असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.


            सध्या राज्यात ५ लाख ३३ हजार मे.टन युरीया, २ लाख १५ हजार मे.टन डिएपी, २९ हजार मे.टन पोटॅश, ८ लाख ३९ हजार मे.टन संयुक्त खते आणि ५ लाख १५ हजार मे.टन सुपर फॉस्फेट असे एकुण २१ लाख ३१ हजार मे.टन खतांचा साठा उपलब्ध आहे.


            यावर्षी १ एप्रिल २०२३ रोजी हा खत साठा राज्याच्या खरीप हंगामातील गरजेच्या जवळपास ५० टक्के आहे. त्याच बरोबर खरीप हंगामात राज्याला ४३ लाख १३ हजार मे.टन आणखी खत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी मृगाचा पाऊस पडल्यानंतरच वाढते. त्यामुळे खतांचे नियोजन एप्रिल पासून सुरु करण्यात आले असून राज्यात मुबलक प्रमाणात खत उपलब्ध राहील यासाठी कृषी विभाग दक्ष आहे.असेही कृषि आयुक्तांनी सांगितले आहे.


            शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला माती तपासणी अहवालाप्रमाणे खताची मात्रा देणे आवश्यक आहे. प्रमाणापेक्षा अधिक खत दिले तर आपला खर्च तर वाढतोच परंतु सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकांना भासून उत्पादन घटते तर आवश्यक ते खत न मिळाल्यासही उत्पादन आणि गुणवत्ता घसरते. रासायनिक खतांसोबत कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खत (बायोफर्टिलायझर्स), नॅनो युरिया यांचाही आवश्यकतेप्रमाणे वापर करणे आवश्यक आहे.


शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषिक अँप


            कृषी विभागाने कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मदतीने ‘कृषिक ॲप’ तयार केले आहे. या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी माती तपासणी अहवालाच्या अनुसार प्रत्येक पिकासाठी वेगवेगळया खतांची मात्रा आणि त्यासाठी लागणारी किंमत समजण्यास मदत होते. या ॲप मधून आपल्या तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रात कोण-कोणती खते उपलब्ध आहेत याचीही माहिती मिळते. त्यामुळे खत खरेदी करणे सोपे होते. या कृषिक ॲपचा वापर शेतक-यांनी करणे आवश्यक आहे.


केंद्र सरकारने पीएम प्रणाम ही योजना सुरु केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी खतांचा वापर मृद तपासणी प्रमाणे केल्यामुळे एकूण खतांच्या अनुदानाच्या रकमेमध्ये बचत होणार आहे. हे वाचलेले अनुदान केंद्र सरकारकडून राज्याच्या कृषी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे, असेही कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी कळविले आहे.


00

शिवराय मुर्ती स्थापना महाड

 



राज्यपालांच्या हस्ते बोरिवली येथे संरक्षण प्रदर्शनाचे उदघाटन

 राज्यपालांच्या हस्ते बोरिवली येथे संरक्षण प्रदर्शनाचे उदघाटन

अग्निवीर' होऊन देशसेवा करण्यासाठी युवकांना प्रेरित करावे"


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 22 : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागविली पाहिजे व त्यासाठी 'अग्निवीर' होऊन देशसेवा करण्यासाठी त्यांना प्रेरित केले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.


            बोरिवली मुंबई येथील कोरा केंद्र मैदानावर सुरु झालेल्या दोन दिवसांच्या संरक्षण प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते आज संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.


            'अथर्व फाउंडेशन' या संस्थेने सैन्य दलांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये भारताची संरक्षण सिद्धता दाखविणारी युद्धसामुग्री व उपकरणे ठेवण्यात आली आहेत.


            नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपान येथे एका फॅक्टरीला भेट दिली होती, त्यावेळी तेथील कामगार एक क्षण देखील वाया न दवडता आपले काम करण्यात मग्न असल्याचे त्यांनी पाहिले. आपल्या देशातील युवाशक्तीमध्ये देशभक्तीची भावना जागविली तर वेळ व्यर्थ न घालवता ते देशासाठी कार्य करतील व देश प्रगतीपथावर जाईल, असे राज्यपालांनी सांगितले.


            सैन्य दल देशाची शान असून त्यांच्यामुळेच देश निरंतर प्रगतीपथावर अग्रेसर होत आहेत. अनेक वर्षे संरक्षण सामग्री आयात करणारा भारत आज संरक्षण सामग्रीबाबत आत्मनिर्भर आणि निर्यातदार देश झाला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.


            देशाला शिस्तीची गरज आहे, असे नमूद करून, आपले घर, परिसर, कार्यस्थळ स्वच्छ ठेवणे तसेच वीज व पाण्याची नासाडी थांबवणे ही देखील देशसेवाच असल्याचे राज्यपालांनी सांगितले.


            बॅरिस्टर नाथ पै यांच्या संसदेतील भाषणाचा उल्लेख करून जात, पंथ याचा वृथाअभिमान घेणारी संकुचित मानसिकता सोडून आपण प्रथम भारतीय आहोत हा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.


            भव्य संरक्षण प्रदर्शन आयोजित करून युवकांना युद्धकथा कथन, जवानांच्या साहस कथा तसेच तज्ज्ञ लष्करी अधिकाऱ्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून सैन्य दलांमध्ये भरती होण्यास प्रेरित करीत असल्याबद्दल राज्यपालांनी अथर्व फाउंडेशनचे कौतुक केले.


            सुरुवातीला राज्यपालांनी प्रदर्शनाची पाहणी केली. राज्यपालांच्या हस्ते यावेळी हुतात्मा जवानांच्या मुलींना लॅपटॉप भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


            संरक्षण प्रदर्शन उदघाटन सोहळ्याला खासदार गोपाल शेट्टी, अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, प्रदर्शनाचे निमंत्रक कर्नल (नि.) सुधीर राजे, सैन्य दलातील अधिकारी व नागरिक उपस्थित होते.


0000


 


Maharashtra Governor inaugurates Defence Exhibition in Mumbai


Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated a 2- day 'Defence


            Exhibition' at Kora Kendra Ground - 2 at Borivali in Mumbai on Sat (22 April). The Governor witnessed the Exhibition and presented laptops to the daughters of Martyrs from the Armed Forces on the occasion.


            The Exhibition has been organized by the 'Atharva Foundation' in association with the Armed Forces, with a view to showcase India's cutting edge defence system and promote the spirit of patriotism among the youth.


            Member of Parliament Gopal Shetty, Chairman of Atharva Foundation and MLA Sunil Rane, Convenor of the Exhibition Col Sudhir Raje (Retd.), serving and retired officers and jawans of the Armed Fo

rces and citizens were present.


0000


सक्षम-2023 चे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 24 एप्रिल रोजी होणार उद्घाटन

 सक्षम-2023 चे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 24 एप्रिल रोजी होणार उद्घाटन


 


            मुंबई, दि.22 : नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर करावा यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-2023) आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे.


            या कार्यक्रमात इंधन बचतीवर जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. दिनांक 24 एप्रिल ते 8 मे 2023 या कालावधीत ऊर्जा संरक्षण नेट झीरोकडे च्या दिशेने या टॅग लाईन सह संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-2023 ) चे आयोजन केले आहे. सक्षम-2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) यांच्यामार्फत विविध 1000 पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. इंधन आणि तेल संवर्धनासाठी शिक्षक आणि शालेय विद्यार्थी यांचा उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन तेल उद्योगाचे समन्वयक संतोष निवेंदकर यांनी केले आहे.


0000



 

ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु

 ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु.

               मुंबई, दि.२२ : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती व मदत देण्यात येत आहे.


            राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याची ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्याद्वारे चालविण्यात येत आहे. ही हेल्पलाईन टोल फ्री स्वरुपात असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व ज्येष्ठ व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार प्रदान करीत आहे. तसेच बेघर वृद्ध व्यक्तीस मदत म्हणून वृद्धाश्रमांमध्ये निवारा देण्यात येत आहे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटूंबियांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतच्या प्रतिसाद प्रणालीने (रिस्पॉन्स सिस्टम) राज्यात संबंधित क्षेत्रात काम सुरु केले आहे.


            या हेल्पलाइनच्या सेवा देशभरात वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व वयोवृद्धांना ही सेवा उपलब्ध करण्यासाठी जनसेवा फाऊंडेशनच्या जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधींनी सर्व जिल्ह्यात काम सुरू केले आहे. जिल्ह्यांमध्ये एल्डर लाईन क्रमांक १४५६७ च्या सेवा वाढविण्यासंदर्भात या राष्ट्रीय हेल्पलाईनच्या कार्यकारिणी सदस्यांना प्रशासनाने सहकार्य करुन हेल्पलाईनची माहिती व जनजागृती करण्याबाबत राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे.


हेल्पलाईनवर मिळणाऱ्या सेवा


            ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता, निदान, उपचार, निवारा / वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक ईत्यादीची माहिती दिली जाते.


            वैयक्तिक आणि कौटुंबिक दोन्ही स्तरावरील कायदे विषयक प्रकरणी, मालमत्ता, शेजारी इ. विवाद निराकरण, आर्थिक, निवृत्तीवेतन, शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाते.


            चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ. विषयी जीवन व्यवस्थापनाबाबत भावनिक समर्थन दिले जाते.


            बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध, ज्येष्ठ व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर मदत केली जाते

ठाणे-पालघर रायगड जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदर्श ठरेल

 ठाणे-पालघर  रायगड जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदर्श ठरेल

                                                  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि.22 :-ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्हयातील गोरगरीबांना फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांचे जीव वाचवले जाणार आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यात आदर्श ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्यमहिला व बाल अणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या 900 खाटांच्या नुतन इमारत बांधकामाच्या भुमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

            यावेळी केंद्रिय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटीलसार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंतसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणखासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार निरंजन डावखरेरमेश पाटीलसंजय केळकररविंद्र फाटकसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोनाठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेठाणे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवारसा.बां. प्रा. विभाग कोकणचे मुख्य अभियंता शरद राजभोजठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भुमिपूजन व रीमोटव्दारे कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ऐतिहासिक दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले कीधर्मवीर आनंद दिघे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे एक वेगळे नाते जोडले गेले होते. दिघे साहेबांच्या काळात जिल्हा रुग्णालयात विविध ठिकाणांहून आलेल्या रुग्णाबद्दल दिघे साहेबांना माहिती मिळताचआलेल्या प्रत्येक रुग्णाची दिघे साहेब स्वत: प्रत्यक्ष येऊन विचारपूस करत असत. त्यांना काही अडचणी असल्या तर ते त्याचवेळी त्या अडचणींचे निरासन करत. त्यामुळे या रुग्णालयाचे नुतनीकरण करणेअत्याधुनिक करण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. कोराना काळात या रुग्णालयाने महत्वाची भुमिका बजावली आहे. या रुग्णालयामुळे कोरोना महामारीत लाखो लोकांचे जीव वाचले आहेत.

             सर्व अडचणींवर मात करुन अत्याधुनिक सेवासुविधा असलेले रुग्णालय ठाणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. या नवीन इमारतीच्या बांधकामाचे काम पाहणाऱ्या मे. हर्ष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी विहित मुदतीच्या आत दर्जेदार इमारत तयार करुन देण्याच्या सुचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

            पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे असे सांगून सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले. रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर ती इमारत जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिल्यानंतर जनतेने रुग्णालयाची काळजी घेणे आवश्यक आहे. ९०० खाटांच्या अत्याधुनिक सेवा सुविधा असलेल्या रुग्णालयाचे लोकार्पण होण्याआधीच रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन दिल्यास रुग्णालय संपूर्ण ताकदीने सुरु होईल. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक बाबी आतापासूनच पूर्ण कराव्याअशा सुचना श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की18 महिन्यात पूर्ण होणाऱ्या रुग्णालयाच्या बांधकामाचे मी स्वत: माझ्या स्तरावर मॉनिटरिंग करणार आहे. या बांधकामाचा प्रत्येक महिन्याचा आढावा मी घेणार आहे. हे रुग्णालय भारतात प्रथम क्रमांकचे रुग्णालय होईल. मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात आरोग्याच्या विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरु नयेकाळजी घ्यावी आणि सर्दी खोकल्या सारख्या आजारांचा लगेच उपचार करावाअशा सुचनाही डॉ. तानाजी सावंत यांनी यावेळी दिल्या.

            सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना यांनी प्रास्ताविक भाषण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील चित्रफीतीव्दारे नवीन इमारतीची माहिती देण्यात आली.

            यावेळी कडक उन्हात राहून वाहतुक व्यवस्था सांभळणाऱ्या पोलीसांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी आभार मानले.

अशी असेल नवीन इमारतया असतील सुविधा

            नवीन बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ 6 लाख 81 हजार 397.40 स्वे.फुट आहे. मुख्य इमारत (Block-A) यामध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालय बेसमेंट 2 + बेसमेंट 1 + तळ मजला + 10 मजले एअर रुग्णवाहिकांचा समावेश आहे. यात एक परिचारीका प्रशिक्षण केंद्र इमारत आहे. ही इमारत 10 मजली असून यामध्ये बैठक कक्ष300 प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण वर्गतळमजल्यावर भोजनकक्ष इ. सुविधाउपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर वसतीगृहाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुख्य इमारतीच्या मागील बाजूस वाहनतळतळ मजला + 6 मजले क्षमतेचा असून इमारतीच्या छतावर सौरउर्जातंत्र बसविण्यात येणार आहे. रुग्णालयाची नवीन इमारत (Block-A) व नर्सिंग प्रशिक्षण केंद्र          ( Block-B) या दोन्ही इमारतींना सातव्या मजल्यावर पूलाव्दारे जोडण्यात आले आहे. इमारतीमध्ये 14 उद्वाहन11 आधुनिक आय.सी.यु. (एकूण 117 खाटा)15 ओ.टी.इ. सर्व अद्ययावत सोई-सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयात सौर उर्जेद्वारे निर्माण केलेल्या वीजेचा वापर करण्यात येणार आहे. 200 खाटांच्या सुपरस्पेशालीटी विभागामध्ये कार्डीओलॉजीन्युरोलॉजीऑनकॉलॉजी आणि नेफ्रॉलॉजी या प्रमाणे अत्याधुनिक साधनसामुग्रीसह सुविधा उपलब्ध होणार आहेत. 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयामध्ये गेरियाटीक वॉर्डमेडिकल वॉर्डसर्जिकल वॉर्डइएनटीसहऑर्थोपेडीक वॉर्डट्रामा केअर युनिटइन्टेन्सिव्ह केअर युनिटआयसोलेशन वॉर्डबर्न वॉर्डआय वॉर्ड व शस्त्रक्रियागृहटीबी आणि चेस्ट वॉर्डएसएनसीयु वॉर्डएनआरसी वॉर्डसायकॅट्रिक वॉर्डप्रिंझनर वॉर्डहिमॅटॉलॉजी वॉर्ड याप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

            200 खाटांच्या महिला व बाल रुग्णालयामध्ये प्रसुतीपूर्व/प्रसुतीपश्चात/प्रसुती कक्ष तसेच इक्लॅम्पशिया कक्षतसेच प्रसुती वॉर्ड व बालरुग्ण वॉर्ड सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज अशा रुग्णालयात ब्रेनहार्टकिडनी सर्जरीअत्याधुनिक डायलिसीसकार्डियाक न्युक्लिअर मेडिसीनरेडिओथेरपीकेमोथेरपीअत्याधुनिक प्रयोगशाळा इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. गंभीर आजाराच्या रुग्णांना मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. मातामृत्यु दर कमी करण्यासाठी आधुनिक आय.सी.यु. व नवजात बालकांसाठी आधुनिक एन.आय.सी.यु. उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर अद्ययावत एमआरआयसी.टी. स्कॅनएक्स-रेलॅब सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन पीएसए प्लांटलिक्वीड ऑक्सीजन प्लांटजंबो ऑक्सिजन सिलेंडरऑक्सिजन सेंट्रल लाईन इ. सुविधा उपलब्ध होणार आहेत व त्याचा वापर भविष्यात करण्यात येईल. ठाणे जिल्हा रुग्णालय हे ठाणे जिल्हयातील एकमेव मोठे शासकीय रुग्णालय असून लगतचे पालघर व रायगड जिल्हयातील रुग्ण येथे उपचारार्थ येत असतात. याठिकाणी सुपरस्पेशालीटी रुग्णालय झाल्यास ठाणेपालघररायगड येथील गोरगरीबगरजूआदिवासी रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुंबई येथे स्थलांतरीत करावे लागणार नाही.

0000


Featured post

Lakshvedhi