Friday, 21 April 2023

सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन


 


            मुंबई दि. 21 : सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहायक वसतिगृह अधिक्षिका पद भरावयाचे आहे. इच्छुक महिलांनी सांताक्रुझ येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


            सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलीना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई येथे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय सहा. वसतिगृह अधिक्षिका म्हणून नेमणूक करावयाची आहे. (पद संख्या - 01) या पदासाठी अर्जदार ही युध्द विधवा किंवा सैन्य सेवेत मुत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक/आजी सैनिक यांची पत्नी असावी (युध्द विधवेस/विधवेस प्राधान्य) तसेच, त्यांचे शिक्षण - दहावी उत्तीर्ण असाव. एम एस सी आय टी पास व टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. यासाठी वयोमर्यादा - 30 ते ५० असावी. मानधन रू. २३,२८३/- दरमहा असून, यासाठीची मुलाखत २५ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्जासोबत युद्ध विधवा/ विधवा/ माजी सैनिक/ आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात.


            अधिक माहितीसाठी ०२२-३५०८ ३७१७, ७९३३३५, २२७९३३३५. या क्रमांकावर किंवा ईमेल zswo_mumbaiupnagar@maharashtra.gov.in संकेतस्थळावर भेट द्यावी.


०००


 

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या समन्वयाने ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करू

 लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या समन्वयाने ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करू


          - महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. २१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात १६७२ तक्रारी आज दाखल झाल्या असून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या समन्वयाने महिलांनी मांडलेल्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.


        परेल येथील मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण वॉर्ड येथे आयेाजित ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महानगपालिकेचे जी दक्षिण वॉर्ड चे संतोष धोंडे यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


          मंत्री श्री.लोढा म्हणाले, ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात १६७२ तक्रारी दाखल झाल्या असून आज प्रत्यक्ष हजर असलेल्या १६२ अर्जदार महिलांच्या समस्यांचे निराकरण केले जावे यासाठी कार्यवाहीचे आदेश लगेचच सर्व यंत्रणांना दिले आहेत. स्थानिक प्रशासनाने पुढील तीन महिन्याच्या कालावधीत उर्वरित १५१० तक्रारी निपटारा करण्याचे आदेश मंत्री श्री.लोढा यांनी दिले.


       यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जी दक्षिण वॉर्ड येथे बँका, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


            सी वॉर्ड येथे २५ एप्रिल रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकणार आहे.


०००

सुपर मॅक्स कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आराखडा सादर करावा

 सुपर मॅक्स कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आराखडा सादर करावा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि.21 : “कामगारांच्या उपजीविकेचे साधन असलेली ठाणे येथील सुपर मॅक्स कंपनी सुरूळीतपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आराखडा आठवडाभरात सादर करावा,” असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.


            सुपर मॅक्स कंपनीच्या कामगारांच्या प्रश्नांबाबतची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देशित केले. बैठकीस कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, आमदार सचिन अहिर, माजी आमदार किरण पावसकर, विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, कामगार विभागाचे सहसचिव श.मा.साठे, कामगार आयुक्त सतीश देशमुख, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, कामगारांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्या, उद्योग वाढवण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासोबतच सुरू असलेल्या कंपन्यांमध्ये कार्यरत कामगारांना नियमित वेतन व काम मिळाले पाहिजे, यासाठी शासन आग्रही आहे. त्यामुळे सुपर मॅक्स कंपनी व्यवस्थापनाने पूर्ववत सुरू करावी, कंपनी व्यवस्थापन कामगार हिताला प्राधान्य देत असेल तर व्यवस्थापनाला कंपनी पूर्ववत सुरु करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य शासनस्तरावरून उपलब्ध करून देण्यात येईल. कामगारांचे थकीत वेतन वितरित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाच्या गोठवलेल्या बॅंक खात्यांतील ठेवींबाबत विभागाने संबंधितांकडे पाठपुरावा करावा. कामगारांचा रोजगार कायम रहावा यासाठी कामगार संघटना आणि संबंधित यंत्रणा व्यवस्थापनास सहकार्य करण्यास तयार असल्याच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थपनाने कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव एका आठवड्यात सादर करावा आणि कंपनी सुरू करण्याची भूमिका घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी संबंधितांना दिले.

रामकृष्ण मिशन मुंबईच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन

 रामकृष्ण मिशन मुंबईच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन


मुंबई रामकृष्ण मिशनचे आरोग्यसेवा, आदिवासी विकास कार्य कौतुकास्पद


- राज्यपाल रमेश बैस


विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांना रामकृष्ण मिशन सोबत काम करण्याची सूचना


            मुंबई, दि. 21 : भुकेल्याला अन्न देतो, तो खरा धर्म असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते. विवेकानंदांचे हे स्वप्न साकार करायचे असल्यास काम करण्याच्या वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला कौशल्य शिक्षण मिळाले पाहिजे. शासन व विद्यापीठे युवकांना कौशल्य शिक्षण देत असताना रामकृष्ण मिशन सारख्या संस्थांनी नीतिमूल्यांच्या माध्यमातून युवकांचे चारित्र्य घडविण्याचे कार्य करावे. या दृष्टीने राज्यातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांनी रामकृष्ण मिशन सोबत काम करावे अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली.


            रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन मुंबई शाखेच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 21) रंगशारदा सभागृह, वांद्रे येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.


            यावेळी रामकृष्ण मिशन, बेलूर मठ येथील उपाध्यक्ष स्वामी गौतमानंद, महासचिव स्वामी सुवीरानंद, मुंबई मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद, नरेन्द्रपूर केंद्राचे प्रमुख स्वामी सर्वलोकानंद, व्यवस्थापन समितीचे सदस्य राकेश पुरी तसेच देशविदेशातील रामकृष्ण मिशन शाखांचे प्रमुख उपस्थित होते. 


            देशातील युवा पिढी मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या अतिवापरात गुरफटत आहे, याबद्दल चिंता व्यक्त करताना व्यापक विचारांची युवा पिढी घडविण्यासाठी शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना साहस उपक्रम, क्रीडा प्रकार, शैक्षणिक सहली, ऐतिहासिक वारसा स्थळांना भेटी, दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद तसेच इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळांना भेटी देण्यास प्रवृत्त केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.


            रामकृष्ण मिशन मुंबईने खार येथील अद्ययावत हॉस्पिटलच्या तसेच पालघर जिल्यातील साकवार येथे आदिवासी बांधवांसाठी ग्राम विकास व कल्याण केंद्राच्या माध्यमातून मोठे कार्य उभे केले आहे असे सांगून राज्यपालांनी मुंबई रामकृष्ण मिशनला कौतुकाची थाप दिली.     


            स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पटलावर आले त्यावेळी भारत गरिबी, अंधश्रद्धा, उपासमार व अंधश्रद्धा या दुष्टचक्रात सापडला होता. शिकागो येथील आपल्या ओजस्वी भाषणातून स्वामीजींनी देश विदेशातील लोकांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असे राज्यपालांनी सांगितले.


विवेकानंद स्मारक शिला निर्मितीत खारीचा वाटा


            रायपूर येथे ज्या ठिकाणी रामकृष्ण मठाचे स्वामी आत्मानंद यांनी जन्म घेतला त्याच भूमित आपला जन्म झाला. रायपूर येथील रामकृष्ण आश्रमात आपण जात असू आणि 'विवेक ज्योती' मासिकाचे अनेक अंक आपण जमा केले होते अशी आठवण राज्यपालांनी यावेळी सांगितली.


            कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक शिलेच्या निर्मितीसाठी आपण आठवडी बाजारात उभे राहून लोकांकडून एक-एक रुपयाची देणगी गोळा केली होती तसेच स्मारकाचे निर्माते एकनाथ रानडे यांच्या वाहनाचे सारथ्य केले होते अशी आठवण राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितली. 


            रामकृष्ण मिशन, बेलूर मठ येथून आलेले वरिष्ठ उपाध्यक्ष स्वामी गौतमानंद यांनी मनुष्य सेवा हीच सच्ची ईशसेवा असल्याच्या विवेकानंद यांच्या शिकवणीचे स्मरण दिले. मनुष्याने मुक्ती मिळविण्यासोबतच जगाचे हित करणे हा रामकृष्ण मिशनचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. 


            मुंबई रामकृष्ण मिशन शताब्दी साजरी करीत असताना रामकृष्ण मिशन संस्था आपल्या स्थापनेचे १२५ वे वर्ष साजरे करीत आहे. मिशनची १२५ वर्षांचे सेवाभावी कार्य हा देशातील मैलाचा दगड असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले असल्याचे बेलूर मठ येथील रामकृष्ण मिशनचे महासचिव सुविरानंद यांनी सांगितले.


            मुंबई रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष सत्यदेवानंद यांनी प्रास्ताविक केले तर व्यवस्थापन समितीचे सदस्य राकेश पुरी यांनी आभार प्रदर्शन केले. 


0000


Maharashtra Governor launches Centenary Celebrations of Mumbai Branch of Ramakrishna Mission


      Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the Centenary Celebrations of the Mumbai Branch of Ramakrishna Math and Ramakrishna Mission at a programme held at Rang Sharda Auditorium in Mumbai on Friday (21 April). The Mumbai Centre was established in 1923.


      Congratulating the Mumbai Branch of Ramakrishna Mission for its century of service to humanity through its Hospital at Khar and the Rural Health and Welfare Centre at Sakwar in Palghar district, the Governor called upon the universities in the State to work in close collaboration with the Ramakrishna Mission to shape the character of youths.


      Stating that Vivekananda gave primacy to feeding the hungry, the Governor expressed the need for providing skill development to the youthful population of the nation.


      Vice President of Ramakrishna Mission Belur Math Swami Gautamananda, General Secretary Suvirananda, President of Ramakrishna Mission Mumbai Satyadevananda, Head of Narendrapur Centre Sarvalokananda, Member of Managing Committee of Ramakrishna Mission Rakesh Puri and monks from various Ramakrishna Missions from India and abroad were present.


हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी सकारात्मक कार्यवाही करा

 हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी सकारात्मक कार्यवाही करा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि.21: “हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी,” असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले. जिल्ह्याला पाणी मिळणे महत्त्वाचे असून त्या दिशेने प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.


            हिंगोली जिल्हा अनुशेष निर्मूलनाबाबत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजी माने, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यावेळी उपस्थिती होती.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत असणारे विविध प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे आवश्यक आहेत. यासंदर्भात ज्या तांत्रिक बाबी पूर्ण करणे अपेक्षित आहेत, त्यांची पूर्तता करावी. हिंगोली जिल्ह्यास पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे.


            बंधारे बांधण्यासाठी मापदंड शिथिल करावेत, उच्च पातळीचे बंधारे बांधण्यास तत्वतः मंजूरी द्यावी, साफळी धरणाचे शिल्लक पाणी हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनासाठी मिळावे आदी बाबी आमदार श्री.बांगर आणि श्री. माने यांनी म्हणणे मांडल्या. त्यावर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले की, तांत्रिक बाबीसंदर्भात जलसंपदा विभाग निर्णय घेईल. बंधाऱ्यांचे बॅरेजस मध्ये रुपांतर करण्याचे धोरणही लवकरच निश्चित करण्यात येत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.


0000

राज्यस्तरीय ( ऑनलाईन ) "मूल्य शिक्षण व बालसंस्कार वर्ग"*

 *खुशखबर..! खुशखबर..! खुशखबर..!*

=========================

*मराठी देवदूत एज्युकेशन अकॅडमी, पुणे*

संपूर्ण महाराष्ट्रातील समस्त बालमित्रांसाठी घेऊन येत आहे..


*राज्यस्तरीय ( ऑनलाईन ) "मूल्य शिक्षण व बालसंस्कार वर्ग"*


*वयोगट :* वय 6 वर्षे ते 16 वर्षे ( इयत्ता 1 ली ते 11 वी )


*वर्गातील समाविष्ट गोष्टी :*

1. सुविचार, बोधकथा, संस्कारकथा तसेच इतर वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून नैतिक मूल्यशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास

2. अनेक थोर आणि महान व्यक्तींची ओळख व त्यांच्या जीवनचरित्रांचा अभ्यास

3. चांगल्या, प्रभावी व संपूर्ण जीवनासाठीच अत्यंत उपयुक्त सवयींबाबत मार्गदर्शन

4. लहान मुलांचे मोबाईलचे व्यसन, वर्तणूक समस्या किंवा इतर कोणत्याही समस्या सोडविण्यासंदर्भात योग्य व प्रभावी मार्गदर्शन

5. वैयक्तिक आरोग्य मार्गदर्शन

6. करिअर निवड मार्गदर्शन


*वर्गाची रूपरेषा :*

➡️ रोज 1 तास

➡️ प्रत्येक महिन्यात 20 दिवस ( मंगळवार ते शनिवार )

➡️ प्रत्येक दिवसाचे रेकॉर्डिंग उपलब्ध 


*भव्य शुभारंभ :*

"महाराष्ट्र दिन" : सोमवार - दिनांक 1 मे, 2023 पासून

🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️


*वर्गाची फी :*

₹ 1000/- फक्त

( 2023-24 या संपूर्ण शैक्षणिक वर्षाकरिता )


*अधिक माहितीसाठी व या वर्गाकरिता आपल्या पाल्याची नाव नोंदणी करण्यासाठी आम्हाला त्वरित संपर्क करावा..*

किंवा खालील गुगल फॉर्म लिंक ओपन करून आपले नाव, पाल्याचे नाव, वय, मोबाईल नंबर इत्यादी बेसिक माहिती भरल्यास, आमचे प्रतिनिधी आपल्याला संपर्क करतील :

👇👇👇👇👇👇👇👇


https://tinyurl.com/yp23dxyf


👆👆👆👆👆👆👆👆

*सूचना :*

वरील गुगल फॉर्म लिंक हायलाईट होत नसल्यास,

*हा मेसेज याच किंवा इतर कोणत्याही नंबर / ग्रुपवर त्या मेसेज मध्ये ही लिंक हायलाईट होईल. तिथून आपण लिंक ओपन करू शकता.*


=========================

*अधिक माहितीसाठी संपर्क :*

मराठी देवदूत एज्युकेशन अकॅडमी, पुणे

*CALL / WHATSAPP :*

*7038987501*

*9763168157*

महिलांसाठीच्या योजनांची माहिती देणाऱ्या फिरत्यावाहनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 महिलांसाठीच्या योजनांची माहिती देणाऱ्या फिरत्यावाहनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


 


             मुंबई, दि. 21 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) उपक्रमांतर्गत महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या फिरत्या वाहनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. यावेळी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव उपस्थित होते.


              दि.१९ एप्रिल पासून ते ३१ मे पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबईत ‘सरकार आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू असलेल्या महापालिका वॉर्डमध्ये फिरणार असून, या वाहनावरच्या एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.


*****

Featured post

Lakshvedhi