Thursday, 20 April 2023

पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्याशासनाची प्राथमिकता

 पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्याशासनाची प्राथमिकता

                                 - सहकार मंत्री अतुल सावे.

               मुंबई, दि. 20 : “राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजना राज्य शासनाने प्रस्तावित केली आहे,” अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.


            मंत्रालयात नुकतीच याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रस्तावित स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश अबीटकर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय परमाने, सहकार आघाडीचे दीपक पटवर्धन, पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            सहकार मंत्री श्री.सावे म्हणाले की, राज्यातील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधीमुळे हे शक्य होणार आहे. डीआयसीजीसीच्या धर्तीवर नागरी सहकारी बँकांतील ठेवींना ज्याप्रमाणे संरक्षण आहे त्याच पध्दतीने राज्यातील पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण शक्य होईल. पतसंस्थांच्या बाबतचा विश्वास वाढेल आणि सहकारातुन समृध्दी हे ध्येय गाठता येईल.


            या बैठकीत पतसंस्थांच्या प्रतिनिधीनी मांडलेल्या सूचना व हरकती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सूचनांचा सकारात्मक विचार करून सर्वसमावेशक योजना तयार करण्यात येईल, असे सांगून आणखी काही सूचना असतील तर लेखी कळवावे, असे आवाहनही सहकार मंत्री श्री. सावे यांनी यावेळी केले.


0000

सरकार आपल्या दारी’ उपक्रमातदाखल तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी

 सरकार आपल्या दारी’ उपक्रमातदाखल तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा.

             मुंबई, दि. १९ : ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रमात १५०० तक्रारी आज दाखल झाल्या असून २०० अर्जदार महिलांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये मांडल्या. स्थानिक प्रशासनाने १५०० तक्रारी पडताळून घेऊन यावर तातडीने कार्यवाही करावी, ज्या महिलांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांना रोजगार मार्गदर्शन करावे तसेच निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ देता येवू शकतो ही माहिती द्यावी अशा सूचना महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या.


            ग्रँट रोड येथील मुंबई महापालिकेच्या ‘डी वॉर्ड’ मध्ये सरकार आपल्या दारी उपक्रमांतर्गत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते.


       यावेळी मुंबई महानगपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशिष शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा गोरे, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त डॉ.अभिनव देशमुख, मुंबई महापालिके च्या उपायुक्त डॉ संगीता हसणाळे,डी वॉर्डचे सहायक आयुक्त शरद उघडे यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


          मंत्री श्री.लोढा म्हणाले,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे "सशक्त नारी-समृद्ध भारत" हे स्वप्न साकार करण्यासाठी महिला बालविकास विभागांतर्गत ‘सरकार आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. आलेल्या तक्रार अर्जावर १५ दिवसात सर्व विभागांनी कार्यवाही करावी.पावसाळ्यापूर्वी मुंबई उपनगर परिसरामधील स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्व कामे करावी. म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महानगरपालिका आणि म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती पर कार्यशाळा आयोजित करणार असून अनेक ठिकाणी अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी गस्त करणे गरजेचे आहे जेणेकरून महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे शक्य होईल.


          वाहतूक समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शाळेतील प्रवेश, आरोग्य सुविधा, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यावर कारवाई करावी, कचरा पेटीची व्यवस्था, ड्रेनेजची पाइप लाईन फुटली आहे अशा तक्रारी वर प्रत्येक स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करावी. काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना मुंबई महानगर पालिकेकडून वेळेत पाणी मिळत नाही. आजूबाजूला असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था मोटार लावतात अशा गृहनिर्माण संस्थांवर कारवाई करावी.


सरकार आपल्या दारी अभिनव उपक्रम : अनुराधा गोरे


            महिलांना आपल्या समस्या मांडण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम असून तो मुंबई शहर आणि उपनगर मध्ये सर्वत्र राबवावा असे मत सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले.


            यावेळी २५० महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ‘डी वॉर्ड’ येथे बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे 20 स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉलही लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


३१ मे २०२३ पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार


            महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि एकात्मिक बालविकास योजना आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने 'सरकार आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार राबविण्यात येत आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम दि.१९ एप्रिल पासून ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते ५.३० या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.


****

कामगारांच्या नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय - कामगार मंत्री सुरेश खाडे

 कामगारांच्या नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय

- कामगार मंत्री सुरेश खाडे


 


            मुंबई, दि. १९ : कामगार संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामगारांना न्याय देण्यासाठी नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. असंघटीत कामगारांची नोंदणी आणि विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी तातडीने कार्यवाही करणार असल्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.


            सह्याद्री अतिथीगृह येथे २५ कामगार संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रतिनिधींमार्फत कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानपरिषद सदस्य भाई जगताप, सचिन अहिर, प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, आयुक्त सतीश देशमुख, कामगार नेते नरेंद्र पाटील, राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांच्यासह अधिकारी आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


            सफाई कामगार, आरोग्य खात्याचे कामगार, माथाडी कामगार, घरकामगार, विडी कामगार, विक्रेते,


 रिक्षाचालक, यंत्रकामगार, ऊसतोड कामगार, स्थलांतरित कामगार, कंत्राटी कामगार यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी कामगारांच्या समस्या मांडल्या.


            मंत्री श्री. खाडे म्हणाले, कामगार विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शासन कार्यरत आहे. उद्योग सुरू राहीले तर कामगार जगेल, यासाठी कामगार केंद्रस्थानी ठेवून कामगारांच्या कल्याणासाठी निर्णय घेण्यात आले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.


            कामगार विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून, पुढील कार्यवाहीस गती देण्यात येत आहे. कामगारांसाठी क्षेत्रानुसार नवीन किमान वेतन तातडीने जाहीर करण्यात येईल. कामगार कल्याण मंडळाच्या अर्धवेळ कामगारांना नियमानुसार पगारात वाढ करण्यात येणार आहे. सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना महानगरपालिका आणि शासनात नियुक्त करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करून निर्णय घेणार तसेच त्यांच्या पगार वाढीसंदर्भात तातडीने निर्णय घेणार, असे मंत्री श्री. खाडे यांनी सांगितले.


            असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी तालुका स्तरावर नोंदणी कार्यालय उभारण्यात येणार असून, या केंद्राअंतर्गत कामगारांना इतर सुविधाही पुरविण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारण्यात येणार आहे. कामगार सुरक्षा विमा महामंडळ, कामगार कल्याण मंडळ, बॉयलर वर्कशॉप सुरू करण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना, बालकामगार प्रथा रोखण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. यापुढेही त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्राने ४४ कायदे रद्द करून ४ संहितेत रूपांतर केले आहे. त्याबाबत चर्चा करून कामगारांच्या हिताचा मसुदा तयार करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. खाडे यांनी सांगितले. याचबरोबर सर्व संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामगारांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


००००

आरोग्य संदेश -नागिण

 नागिण... उपाय✍️

१) कडुलिंबाचि पाने गरम पाण्यात टाकून आंघोळ करावि.

२) रक्तदोषांतक घ्यावे

३) रात्रि झोपतांना  नाकपुडित १-२ थेंब मोहरिचे तेल घालणे.

४) कँलेंडुला किंवा कँथाँरिसचे मलम जखमेवर लावणे.

५) जळजळ बंद होण्यासाठि शतघौत घ्रुत लावणे. अथवा कैलास जीवन लावणे.

६)  मंजिष्ठादि काढा ३ चमचे  ३ चमचे पाण्यात घेणे.

७)  गंधक रसायन १ गोळि आणि वातगजांकुश १  गोळि गरम पाण्यात आग आग होत असल्यास.

८) त्रिफळा चूर्ण गरम पाण्यात रात्रि.

९) वातविद्धवंस १-१ गोळि मधा बरोबर तिव्र कळा येत असल्यास

१०) गेरू लावल्यास ही फरक पडतो..


 वैद्य. गजानन.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



_*(

काम करणाऱ्या महिलांसाठी मोठ्या शहरांमध्ये वसतिगृहे बांधण्याची

 काम करणाऱ्या महिलांसाठी मोठ्या शहरांमध्ये वसतिगृहे बांधण्याची

राज्यपालांची उद्योग समूहांना सूचना

आगामी काळात वीस हजार गावांचे संपूर्ण परिवर्तन करणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबई, दि. १९ : नोकरीस्वयंरोजगार व उद्योगांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा या दृष्टीने मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे बांधण्यात यावीत, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. या कार्यात कॉर्पोरेट्स व उद्योग संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले.    

            राज्यपाल बैस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.१९) 'नवभारतवृत्तपत्र समूहातर्फे देण्यात येणारे 'कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कारराजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

            कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरनवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरीहिंदुजा रिन्युअल्सचे अध्यक्ष शोम हिंदुजायुवराज ढमाले, समूहाचे अध्यक्ष युवराज ढमाले व उद्योग जगतातील प्रतिनिधी उपस्थित होते.

            राज्यपाल म्हणाले, सर्व शहरांमध्येगर्दीच्या भागांमध्ये आणि विशेषतः रेल्वे स्थानकांवर महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृहे बांधावीसार्वजनिक ठिकाणी व कार्यालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प बांधावे तसेच प्रत्येक व्यावसायिक व उद्योग समूहांमध्ये युवकांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याच्या संधी निर्माण कराव्यात, अशाही सूचना राज्यपालांनी यावेळी उद्योग जगताला केल्या.

            कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाइतकेच वैयक्तिक सामाजिक दायित्व देखील महत्वाचे असल्याचे सांगताना राज्यपालांनी रायपूर येथे एका भाजी विक्रेत्या महिलेने तेथील जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातलगांसाठी स्वखर्चाने निवाऱ्याची व्यवस्था केल्याचे सांगितले.

            मुंबई शहरातील जेजे रुग्णालयजेजे स्कुल ऑफ आर्टगेट वे ऑफ इंडियामाहीम कॉजवे यांच्या निर्मितीमध्ये देखील दानशूर लोकांनी योगदान दिल्याचे सांगून राज्यपालांनी आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट यांच्या दातृत्वाचे स्मरण केले.        

राज्यातील वीस हजार गावांचे संपूर्ण परिवर्तन करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            आपण मुख्यमंत्री असताना कॉर्पोरेट्सच्या मदतीने राज्यातील एक हजार गावांचे आदर्श गाव म्हणून परिवर्तन केले असल्याचे सांगून आगामी काळात राज्यातील २० हजार गावांचे सर्वंकष परिवर्तन करण्याचा शासन विचार करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या कार्यात कॉर्पोरेट व उद्योग समूहांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

            जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावे पाण्याच्या  बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचे सांगून सीएसआर अंतर्गत कोणतेही उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी शासन कॉर्पोरेट्स व उद्योग समूहांना निश्चितपणे मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

            नवभारत वृत्तपत्र स्थापनेच्या ९० व्या वर्षात पदार्पण करीत असल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते यावेळी नवभारत वृत्तपत्राच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. तसेच एका कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  निमिष माहेश्वरी यांनी प्रास्ताविक केले.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदित्य बिर्ला शिक्षण न्यासाच्या अध्यक्ष डॉ नीरजा बिर्लागोदरेज उद्योग समूहाचे अध्यक्ष नादिर गोदरेजबजाज फाउंडेशनचे अपूर्व बजाजरायन समूहाच्या अध्यक्ष ग्रेस पिंटोश्रेया घोडावतरुबी हॉल क्लिनिकचे परवेझ ग्रांटवाडिया हॉस्पिटलच्या मिनी बोधनवाला यांसह ५५ उद्योगशिक्षण व व्यवसाय प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले. 

0000

 

Governor Bais calls for creating hostels for working women in city

Will transform 20,000 villages under Village Transformation Scheme: Devendra Fadnavis

 

            Mumbai, 19th April : Maharashtra Governor Ramesh Bais today called upon corporates and business organisations to create more hostels for working women in big cities to increase the participation of women in the workforce. The Governor also stressed the need for creating more toilets for women in public places and railway stations and building ramps for differently abled persons.

            The Governor was speaking at the presentation of the Navabharat Group's CSR Awards 2023 at Raj Bhavan Mumbai on Wed (19 April).

            Speaking on the occasion, Deputy Chief Minister Devendra Fadnavis expressed the resolve of his government to transform 20,000 villages in the State by reviving the Village Social Transformation Scheme.

            Speaker of Maharashtra Legislative Assembly Rahul Narvekar, Chairman of Hinduja Renewables Shom Hinduja,  CMD of Navabharat Group Nimish Maheshwari and Chairman of Yuvraj Dhamale Corp Yuvraj Dhamale were present.

            The Navabharat CSR Awards were presented to Dr Neerja Birla, Founder and Chairperson of Aditya Birla Education Trust, Nadir Godrej, Chairman, Godrej Industries, Grace Pinto of Ryan Group, Apoorv Bajaj, Trustee, Bajaj Foundation, Purvez Grant of Ruby Hall Clinic, Rajesh Rathi, Satyanarayan Nuval, Shreya Ghodawat, Siddhesh Sharma, Dr Sanjay Patil and others.

            The Governor launched the logo of the Navabharat Group on the occasion of the group stepping into its 90th year of publication.

0000


३१ मे २०२३ पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार

 ३१ मे २०२३ पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार


            महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि एकात्मिक बालविकास योजना आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने 'सरकार आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार राबविण्यात येत आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम दि.१९ एप्रिल पासून ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते ५.३० या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.


***

आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये क्षयरोग निदानासाठी ट्रूनॅट मशिन

 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये क्षयरोग निदानासाठी ट्रूनॅट मशिन


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण


 


            मुंबई, दि. १९ : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.


            मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या कार्यक्रमात मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आरोग्य विभागाचे सचिव नविन सोना, आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते.


            इंडियन ऑईलच्या माध्यमातून सीएसआर निधीतून हे १०० ट्रूनॅट मशिन आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याद्वारे क्षयरोग निदान लवकरात लवकर करण्यासाठी या मशिनचा उपयोग होते. राज्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या मोहिमेसाठी या मशिनमुळे मोठे बळ मिळाल्याचे सांगत राज्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.


            राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, नागपूर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पालघर, अमरावती, गोंदिया, यवतमाळ, रायगड, पुणे, अहमदनगर, नांदेड या जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात या मशिनच्या माध्यमातून क्षयरोग निदानासाठी वापर करण्यात येणार आहे. यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक अर्निबन घोष, महाव्यवस्थापक गौतम दत्ता आदी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


००००

Featured post

Lakshvedhi