Wednesday, 19 April 2023

उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून नागरिकांनी खबरदारी घ्यावी

 उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून नागरिकांनी खबरदारी घ्यावी


                                             - डॉ. विनायक सावर्डेकर


            मुंबई, दि. 19 : राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन सेंट जॉर्ज रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात केले आहे. 


            जगभरात वातावरणात अनेक बदल होत असून, अचानक येणारी वादळे, पाऊस आणि उन्हाळ्यात उष्णतेची लाट वाढत आहेत. वातावरणीय बदल अलिकडच्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता वाढलेली दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत असून त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम पहावयास मिळत आहे. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी नागरिकांमध्ये कशाप्रकारे जनजागृती करण्यात येत आहे आणि उष्माघात होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, अशा विविध महत्वपूर्ण विषयांवरील माहिती डॉ. विनायक सावर्डेकर यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 20 एप्रिल 2023 सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी घेतली आहे.


            महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हा कार्यक्रम पाहता येईल.


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे

मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबईदि. 19 : शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असूनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.

            या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरसहकारइतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईपर्यटनकौशल्य विकास व उद्योजकतामहिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विधानसभा सदस्य  आणि मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तवसामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिकमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज यांची उपस्थिती होती.

            राज्यभरातील सामान्य नागरिक त्यांची निवेदने व टपाल घेऊन मंत्रालयात येत असताततसेच क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांद्वारे टपाल प्राप्त होत असते. त्याचा जलद गतीने बटवारा होऊन पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या विभागांकडे ते टपाल पोहोचण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ई-खाते एनआयसी ( NIC) मार्फत तयार करण्यात आले आहे. याद्वारे संबंधित विभागाकडे पाठविलेल्या टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार असूनत्या टपालाचा पुढील प्रवासही वेळोवेळी कळू शकणार आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेचएकाच ठिकाणी सर्व विभागाचे टपाल स्वीकारण्यात येणार असल्यानेप्रशासकीय गतिमानतेस मदत होणार आहे.

            नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातूनच कार्यवाही होणार आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशेपुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाहीअसे टपाल याठिकाणी समक्ष स्वीकारले जाणार आहे.

००००

त्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचेमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचेमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

            मुंबई, दि. 19 : शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.


            या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विधानसभा सदस्य आणि मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज यांची उपस्थिती होती.


            राज्यभरातील सामान्य नागरिक त्यांची निवेदने व टपाल घेऊन मंत्रालयात येत असतात, तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांद्वारे टपाल प्राप्त होत असते. त्याचा जलद गतीने बटवारा होऊन पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या विभागांकडे ते टपाल पोहोचण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ई-खाते एनआयसी ( NIC) मार्फत तयार करण्यात आले आहे. याद्वारे संबंधित विभागाकडे पाठविलेल्या टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार असून, त्या टपालाचा पुढील प्रवासही वेळोवेळी कळू शकणार आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच, एकाच ठिकाणी सर्व विभागाचे टपाल स्वीकारण्यात येणार असल्याने, प्रशासकीय गतिमानतेस मदत होणार आहे.


            नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातूनच कार्यवाही होणार आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशे, पुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाही, असे टपाल याठिकाणी समक्ष स्वीकारले जाणार आहे.


००००



भारतीय पत्र परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप

 भारतीय पत्र परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप.

            मुंबई, दि. १८ : भारतीय पत्र परिषदेच्या (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया) अध्यक्ष न्या. रंजना प्रकाश देसाई यांच्‍या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. या समितीने माध्यम स्वातंत्र्य आणि पत्रकारिता मूल्यांच्या उल्लंघनासंबंधी ३६ प्रकरणांची सुनावणी घेतली. १४ प्रकरणांमध्ये समितीने शिफारशी केल्या असून उर्वरित प्रकरणे राखून ठेवली आहेत, अशी माहिती भारतीय पत्र परिषदेने दिली आ

हे.


 


!

फक्त 3 लवंग 3 मिनिटात कसलीही रांजणवाडी बरी : डोळ्यांची सूज, उपाय !

 फक्त 3 लवंग 3 मिनिटात कसलीही रांजणवाडी बरी : डोळ्यांची सूज,  उपाय !

 फक्त 3 लवंग 3 मिनिटात कसलीही रांजणवाडी बरी : डोळ्यांची सूज, जळजळ   उपाय !.

👇

खूप जणांना रांजणवाडी होत असते. खरंतर डोळ्यांचा कोणता आजार दुर्लक्षित करू नये. म्हणून रांजणवडी या विषयावर घरगुती उपाय आज सांगणार आहे. अत्यंत साधा सोपा घरातील एक वस्तू वापरून आपल्याला उपाय करायचा आहे.


 या उपायासाठी आपल्याला लवंग लागणार आहे लवंग आपल्या घरामध्ये असतेच. तुमची रांजणवडी अगदी काही क्षणांमध्ये बरी होईल इतकी शक्ती या घरगुती उपायांमध्ये आहे. घरगुती उपाय आपण समजून घेणारच आहोत पण तत्पूर्वी रांजणवाडी येण्याची कारण काय आहेत ते आपण पाहिले.


प्रतिकारशक्ती कमी होणे अयोग्य आहार-विहार यामुळे शरीरात विषारी तत्व चाटतात जर टाकाऊ पदार्थ बाहेर पडले नाही तर शरीराची प्रतिकार शक्ती आपोआप कमी होत असते. यामुळेसुद्धा रांजणवाडी येते पापण्यांच्या केसांच्या मुळाशी जीवाणूंचा संसर्ग झाला तर रांजणवाडी येत असते तर यावर आपण घरगुती उपाय पाहणार आहोत.


 आपण एक कप पाणी उकळायला ठेवणार आहोत. पाणी उकळून झाल्यानंतर कोमट होऊ द्यायचे आहे. या या कोमट पाण्याने तीन ते चार लवंगा उगाळून घ्यायचे आहेत. आपल्याला उगाळून त्याचा लेप तयार करायचा आहे. आपल्याला दिवसातून दोन वेळा या रांजणवाडी वर लावायचे आहे रांजणवाडी ची सूज वेदना जळजळ होणे या सर्व समस्या त्वरित कमी होणार आहेत. काही क्षणातच सर्व समस्या कमी होती आणि हे तुम्हाला निश्चितच जाणवेल


लवंगामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि हा जो रोग किंवा आजार आहे तो जीवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे होत असतो आणि म्हणून जिवाणू विरोधात लढण्यासाठी लवंग निश्चितच मदत करत असते.


दुसरा महत्वाचा उपाय तुम्ही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला तीन ते चार पेरूची पाने घ्यायची व्यवस्थित मिठाच्या पाण्याने धुऊन घ्या व्यवस्थित परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवा आणि मग त्याला कोरडी करा. एक कप गरम पाणी करा आणि हे पाणी कोमट होऊ द्या. त्या पाण्यामध्ये ही पेरू चे पान  बुडवायचे आणि ते पान तुमच्या डोळ्यावर ठेवायचा आहे.


थोडं गार झाल्यानंतर नंतर ते पान डोळ्यावरून काढून टाका आणि दुसरे पान घ्या ते कोमट पाण्यामध्ये बुडवा आणि ते पुन्हा आपल्या डोळ्यावरती ठेवा असे एक एक पान भिजवून डोळ्यावरती ठेवा असे दहा मिनिटं आळीपाळीने पेरुची पाणी कोमट पाण्यात बुडवून डोळ्यावर ती ठेवा अकराव्या मिनिटाला तुमच्या डोळ्यावर आलेली सूज जाईल तसेच खाज वेदना आणि जळजळ थांबणार आहे रांजणवाडी डोळ्याला होणारा त्रास पूर्णपणे थांबणार आहे यामुळे रांजणवाडी ची समस्या बंद होईल.


 हे घरगुती उपाय करा परंतु त्याबरोबरच पिष्टमय पदार्थ साखरेचे पदार्थ मांसाहारी चरबीयुक्त पदार्थ मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच कॉफी चहा अतिरिक्त प्रमाणात मीठ हे रांजणवाडी असताना असे पदार्थ वर्ज्य करा.


तुम्हाला नेहमी नेहमी रांजणवाडी येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही कवचफळे धान्य भाज्या व फळे यांचा समावेश आपल्या आहारामध्ये निश्चित करा. त्याच बरोबर डोळ्यांचे व्यायाम करत राहा. डोळ्यांवर ताण कमी होण्यासाठी  व्यायाम करा. शरीराची स्वच्छता योग्य आहार आणि डोळ्यांचे व्यायाम करा आपला आरोग्य सुधारा. या गोष्टींचे पालन केले तर रांजणवाडी कधीच. तुम्हाला होणार नाही..


..

आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे...



*⭕️

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बार्टी, टीआरटीआय, महाज्योतीच्या धर्तीवर

 मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बार्टी, टीआरटीआय, महाज्योतीच्या धर्तीवर


सारथीमार्फत शैक्षणिक सवलती, सुविधांसाठी सर्वंकष समान धोरण आणणार


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. १८ : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय,महाज्योतीच्या धर्तीवरच सारथीमार्फत सवलती आणि सुविधा देण्यासाठी सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे झाली.


            यावेळी ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम (सा. उ. वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर, आमदार भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा पूर्व परीक्षा) प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या यापूर्वी 250 होती ती वाढवून आता 750 करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रतिमाह 8 हजार रुपये 8 महिन्यांसाठी देण्यात येत आहे.


            केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) पूर्व परीक्षा प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 250 वरून 500 करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे शिकवणी शुल्क (ट्युशन फी) दीड ते दोन लाख रुपये भरण्यात येत आहे. तसेच त्यांना निर्वाह भत्ता म्हणून प्रतिमहिना 13 हजार रुपये 10 महिन्यांसाठी देण्यात येते. बार्टीच्या धर्तीवर पीएचडी फेलोशीप संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.


            मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी वसतिगृहाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर प्रभावी बाजू मांडण्यासाठी अनुभवी व ज्येष्ठ वकिलांच्या नियुक्तीकरिता टास्क फोर्स समिती गठित करण्यात येत आहे.


            मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही त्याच्याकरिता स्वाधार योजना सुरू करण्यात येत आहे या विद्यार्थ्यांना प्रतिमहा 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कौशल्य विकास विभाग व अन्य विभागामार्फत मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण बीज भांडवल व अन्य सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


            वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत स्वयंरोजगारासाठी कोणत्याही व्यवसायाकरिता 20 मे 2022 पूर्वी पात्रता प्रमाणपत्र धारकांना बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील 15 लाखांच्या मर्यादेत व्याज परतावा जास्तीत जास्त 5 वर्षाकरिता 12 टक्के अथवा साडे चार लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा देण्यात येत आहे. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सहकारी/नागरी बँकांच्या पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


००००

Featured post

Lakshvedhi