Wednesday, 19 April 2023

फक्त 3 लवंग 3 मिनिटात कसलीही रांजणवाडी बरी : डोळ्यांची सूज, उपाय !

 फक्त 3 लवंग 3 मिनिटात कसलीही रांजणवाडी बरी : डोळ्यांची सूज,  उपाय !

 फक्त 3 लवंग 3 मिनिटात कसलीही रांजणवाडी बरी : डोळ्यांची सूज, जळजळ   उपाय !.

👇

खूप जणांना रांजणवाडी होत असते. खरंतर डोळ्यांचा कोणता आजार दुर्लक्षित करू नये. म्हणून रांजणवडी या विषयावर घरगुती उपाय आज सांगणार आहे. अत्यंत साधा सोपा घरातील एक वस्तू वापरून आपल्याला उपाय करायचा आहे.


 या उपायासाठी आपल्याला लवंग लागणार आहे लवंग आपल्या घरामध्ये असतेच. तुमची रांजणवडी अगदी काही क्षणांमध्ये बरी होईल इतकी शक्ती या घरगुती उपायांमध्ये आहे. घरगुती उपाय आपण समजून घेणारच आहोत पण तत्पूर्वी रांजणवाडी येण्याची कारण काय आहेत ते आपण पाहिले.


प्रतिकारशक्ती कमी होणे अयोग्य आहार-विहार यामुळे शरीरात विषारी तत्व चाटतात जर टाकाऊ पदार्थ बाहेर पडले नाही तर शरीराची प्रतिकार शक्ती आपोआप कमी होत असते. यामुळेसुद्धा रांजणवाडी येते पापण्यांच्या केसांच्या मुळाशी जीवाणूंचा संसर्ग झाला तर रांजणवाडी येत असते तर यावर आपण घरगुती उपाय पाहणार आहोत.


 आपण एक कप पाणी उकळायला ठेवणार आहोत. पाणी उकळून झाल्यानंतर कोमट होऊ द्यायचे आहे. या या कोमट पाण्याने तीन ते चार लवंगा उगाळून घ्यायचे आहेत. आपल्याला उगाळून त्याचा लेप तयार करायचा आहे. आपल्याला दिवसातून दोन वेळा या रांजणवाडी वर लावायचे आहे रांजणवाडी ची सूज वेदना जळजळ होणे या सर्व समस्या त्वरित कमी होणार आहेत. काही क्षणातच सर्व समस्या कमी होती आणि हे तुम्हाला निश्चितच जाणवेल


लवंगामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि हा जो रोग किंवा आजार आहे तो जीवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे होत असतो आणि म्हणून जिवाणू विरोधात लढण्यासाठी लवंग निश्चितच मदत करत असते.


दुसरा महत्वाचा उपाय तुम्ही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला तीन ते चार पेरूची पाने घ्यायची व्यवस्थित मिठाच्या पाण्याने धुऊन घ्या व्यवस्थित परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवा आणि मग त्याला कोरडी करा. एक कप गरम पाणी करा आणि हे पाणी कोमट होऊ द्या. त्या पाण्यामध्ये ही पेरू चे पान  बुडवायचे आणि ते पान तुमच्या डोळ्यावर ठेवायचा आहे.


थोडं गार झाल्यानंतर नंतर ते पान डोळ्यावरून काढून टाका आणि दुसरे पान घ्या ते कोमट पाण्यामध्ये बुडवा आणि ते पुन्हा आपल्या डोळ्यावरती ठेवा असे एक एक पान भिजवून डोळ्यावरती ठेवा असे दहा मिनिटं आळीपाळीने पेरुची पाणी कोमट पाण्यात बुडवून डोळ्यावर ती ठेवा अकराव्या मिनिटाला तुमच्या डोळ्यावर आलेली सूज जाईल तसेच खाज वेदना आणि जळजळ थांबणार आहे रांजणवाडी डोळ्याला होणारा त्रास पूर्णपणे थांबणार आहे यामुळे रांजणवाडी ची समस्या बंद होईल.


 हे घरगुती उपाय करा परंतु त्याबरोबरच पिष्टमय पदार्थ साखरेचे पदार्थ मांसाहारी चरबीयुक्त पदार्थ मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच कॉफी चहा अतिरिक्त प्रमाणात मीठ हे रांजणवाडी असताना असे पदार्थ वर्ज्य करा.


तुम्हाला नेहमी नेहमी रांजणवाडी येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही कवचफळे धान्य भाज्या व फळे यांचा समावेश आपल्या आहारामध्ये निश्चित करा. त्याच बरोबर डोळ्यांचे व्यायाम करत राहा. डोळ्यांवर ताण कमी होण्यासाठी  व्यायाम करा. शरीराची स्वच्छता योग्य आहार आणि डोळ्यांचे व्यायाम करा आपला आरोग्य सुधारा. या गोष्टींचे पालन केले तर रांजणवाडी कधीच. तुम्हाला होणार नाही..


..

आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे...



*⭕️

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बार्टी, टीआरटीआय, महाज्योतीच्या धर्तीवर

 मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बार्टी, टीआरटीआय, महाज्योतीच्या धर्तीवर


सारथीमार्फत शैक्षणिक सवलती, सुविधांसाठी सर्वंकष समान धोरण आणणार


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. १८ : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय,महाज्योतीच्या धर्तीवरच सारथीमार्फत सवलती आणि सुविधा देण्यासाठी सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे झाली.


            यावेळी ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम (सा. उ. वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर, आमदार भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा पूर्व परीक्षा) प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या यापूर्वी 250 होती ती वाढवून आता 750 करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रतिमाह 8 हजार रुपये 8 महिन्यांसाठी देण्यात येत आहे.


            केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) पूर्व परीक्षा प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 250 वरून 500 करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे शिकवणी शुल्क (ट्युशन फी) दीड ते दोन लाख रुपये भरण्यात येत आहे. तसेच त्यांना निर्वाह भत्ता म्हणून प्रतिमहिना 13 हजार रुपये 10 महिन्यांसाठी देण्यात येते. बार्टीच्या धर्तीवर पीएचडी फेलोशीप संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.


            मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी वसतिगृहाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर प्रभावी बाजू मांडण्यासाठी अनुभवी व ज्येष्ठ वकिलांच्या नियुक्तीकरिता टास्क फोर्स समिती गठित करण्यात येत आहे.


            मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही त्याच्याकरिता स्वाधार योजना सुरू करण्यात येत आहे या विद्यार्थ्यांना प्रतिमहा 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कौशल्य विकास विभाग व अन्य विभागामार्फत मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण बीज भांडवल व अन्य सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


            वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत स्वयंरोजगारासाठी कोणत्याही व्यवसायाकरिता 20 मे 2022 पूर्वी पात्रता प्रमाणपत्र धारकांना बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील 15 लाखांच्या मर्यादेत व्याज परतावा जास्तीत जास्त 5 वर्षाकरिता 12 टक्के अथवा साडे चार लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा देण्यात येत आहे. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सहकारी/नागरी बँकांच्या पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


००००

विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जून पासून तरविदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जून पासून तरविदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 18 : विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील असेही त्यांनी सांगितले.

            शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत श्री.केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते.

            मंत्री श्री.केसरकर म्हणालेशाळेत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत यावर्षी देखील मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे. शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा 26 एप्रिल पासून आणि दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राचा नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यातही राबविला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. यावर्षीपासून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्याबूट आणि सॉक्स हे शासनातर्फे दिले जाणार आहेत. पुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर टिपण (नोटस्) काढण्यासाठी आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईलअसा विश्वास श्री.केसरकर यांनी व्यक्त केला.

            येत्या वर्षापासून शाळांमध्ये 'आजी आजोबा दिवससाजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील अघोषित व घोषित विनाअनुदानित शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा तसेच त्रुटीपूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांना नैसर्गिक तुकड्यांना सरसकट 20 टक्के अनुदानासाठी पात्र घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. शिक्षक व सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली असून शिष्यवृत्तीच्या रकमेत देखील मोठी वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

            मंत्री श्री.केसरकर म्हणालेविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शाळांमध्ये इंटरॅक्टीव्ह टीव्ही लावले जाणार आहेत. आदर्श शाळांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी होणार नाहीत हे खरे नसून पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नयेअसे आवाहन त्यांनी केले.

00000

शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजा विषयी सविस्तर माहीती पहा.....*

 *शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजा विषयी सविस्तर माहीती पहा.....*


*कॅल्शिअम कशात असतं?*

शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर.

*कमतरतेमुळे काय होतं?*

हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे.

*कार्य काय असतं?*

शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.


*लोह कशात असतं?*

खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी.

*कमतरतेमुळे काय होतं?*

शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.

*कार्य काय असतं?*

शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असते.


*सोडिअम कशात असतं?*

मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं.

*कमतरतेमुळे काय होतं?*

रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.

*कार्य काय असतं?*

शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.


*आयोडिन कशात असतं?*

शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.

*कमतरतेमुळे काय होतं?*

थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.

*कार्य काय असतं?*

शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.


*पोटॅशिअम कशात असतं?* सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.)

*कमतरतेमुळे काय होतं?*

अ‍‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.

*कार्य काय असतं?*

शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.


*फॉस्फरस कशात असतं?*

दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.

*कमतरतेमुळे काय होतं?*

ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.

*कार्य काय असतं?*

मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.


*सिलिकॉन कशात असतं?*

गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,

*कमतरतेमुळे काय होतं?*

कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.

*कार्य काय असतं?*

जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.


*मॅग्नेशिअम कशात असतं?* बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.

*कमतरतेमुळे काय होतं?*

उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.

*कार्य काय असतं?*

पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.


*सल्फर कशात असतं?*

दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.

*कमतरतेमुळे काय होतं?*

प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.

*कार्य काय असतं?*

इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.


*क्लोरिन कशात असतं?*

पाणी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.

*कमतरतेमुळे काय होतं?*

अ‍‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍‍ॅलर्जी.

*कार्य काय असतं?*

सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.


*खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे...*

*फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.


*डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.


*काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.


*दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.


*फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.


*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

Tuesday, 18 April 2023

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यापन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यापन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. १८ : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या पन्नास टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

            जिल्हा कार्यालय मुंबई व उपनगर अंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजना या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात.  सदर योजनेअंतर्गत्‍ कर्ज प्रस्ताव सादर करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

            १८ वर्षावरील व वार्षिक उत्पन्न ३ लाखापर्यंत उत्पन्न असलेले नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ५० टक्के अनुदान योजनेअंतर्गतप्रकल्प मर्यादा ५० हजारापर्यंत असणे गरजेचे आहे. प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार पर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरीत रक्कम बँकेमार्फत देण्यात येते.

             तसेचबीज भांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार ते ५ लाखापर्यंत असणे गरजेचे आहे. प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के दर साल दर शेकडा व्याजदराने देण्यात येते. तरबँकेचे कर्ज ७५ टक्के देण्यात येते. नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हफ्त्यानुसार ३ ते ५ वर्षाच्या आत करावी लागते. अर्जदारास ५ टक्के स्वत:चा सहभाग भरणे गरजेचे असणार आहे.

            इच्छुकांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित गृहनिर्माण भवनकलानगरमुंबई उपनगरबांद्रा पूर्वमुंबई -५१ या ठिकाणी अर्ज सादर करावेत.

नव भारत साक्षरता कार्यक्रम’ या अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणही द्यावे

 नव भारत साक्षरता कार्यक्रम’ या अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणही द्यावे

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 18 राज्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमा’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभाग आणि स्वयंसेवकाचे सहकार्य घ्यावे. त्याचप्रमाणे निरक्षरांना साक्षर करण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणही द्यावेअसे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

            केंद्र शासन पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम’ हा 2023 ते 2027 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाच्या सदस्यांसमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलउच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीशालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरेमाहिती महासंचालक जयश्री भोजशालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझीशालेय शिक्षण संचालक (योजना) महेश पालकरशालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावीसंचालक (माध्यमिक) कृष्णकुमार पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. केसरकर यांनी या योजनेची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित विभागांच्या जबाबदारीचा आढावा घेतला. ते म्हणाले कीशालेय शिक्षण, उच्च शिक्षणआदिवासी विकाससामाजिक न्यायमहिला व बालविकासआरोग्यग्रामविकास आदी विभागांतर्गत विद्यार्थीशिक्षकअंगणवाडी सेविकाआशा कार्यकर्ती यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग घ्यावा. हा कार्यक्रम केवळ शिक्षणापुरता मर्यादित न राहता लाभार्थींना साक्षर झाल्यानंतर व्यावसायिक शिक्षण देण्यात यावे. यासाठी कौशल्य विकास विभागाचे सहकार्य घ्यावे. निरक्षरांना साक्षर करणे हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने यात सक्रीय सहभाग घेण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करावे. शिक्षकांसाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर स्पर्धा आयोजित करावी. गावपातळीवर मदत होण्यासाठी कंपन्यांच्या सीएसआर निधीचे सहकार्य घ्यावे. यापूर्वी अशा मोहिमेमध्ये सहभाग घेतलेल्यांचे अनुभव विचारात घ्यावेत. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना श्रेणी अथवा प्रमाणपत्र द्यावे, असेही त्यांनी सूचविले.

            विद्यार्थ्यांना समाजाशी जोडले जाणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून साक्षरतेचे काम द्यावे, असे प्रधान सचिव श्री.रस्तोगी यांनी सुचविले. तरमहाविद्यालयांनी गाव दत्तक घेतले, तर ही योजना प्रभावीपणे राबविता येईलअसे माहिती महासंचालक श्रीमती भोज यांनी सांगितले.

            शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नव भारत साक्षता कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. या योजनेसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येईलतसेच निरक्षरांचे सर्वेक्षण करून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सर्व प्रक्रिया पार पाडल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे स्वरुप

            राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील शिफारशींनुसार व संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार 2030 पर्यंत सर्व तरूण आणि प्रौढपुरूष आणि स्त्रिया अशा सर्वांनी 100 टक्के साक्षरता आणि संख्याज्ञान संपादन करणे हा योजनेचा मूळ हेतू आहे. राज्यात शिक्षण संचालनालय (योजना) तसेच महाराष्ट्र राज्य नव भारत साक्षरता परिषदेमार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

                       

            या कार्यक्रमाअंतर्गत 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील शिकाऊ व्यक्तींमध्ये आर्थिक साक्षरताकायदेविषयक साक्षरताडिजिटल साक्षरताआपत्ती व्यवस्थापन कौशल्यआरोग्याची काळजी व जागरूकताबालसंगोपन आणि शिक्षणकुटुंब कल्याण आदी महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे कलाविज्ञानतंत्रज्ञानसंस्कृतीक्रीडामनोरंजन तसेच स्थानिकांना स्वारस्य असलेल्या विषयांचे निरंतर शिक्षण देण्यात येणार आहे.

            या योजनेमध्ये ‘प्रौढ शिक्षण’ ऐवजी सर्वांसाठी शिक्षण’ ही संज्ञा वापरली जाणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी शाळा हे एकक असणार आहे. यासाठी लाभार्थी आणि स्वयंसेवी शिक्षक यांचे सर्वेक्षण शाळांकडून केले जाईल. शासकीय/ अनुदानित/ खाजगी शाळांमधील शिक्षकांव्यतिरिक्त शिक्षक पदाचे शिक्षण घेणारे/ उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थीपंचायत राज संस्थाअंगणवाडी सेविकाआशा कार्यकर्त्या तसेच एनवायकेएसएनएसएसएनसीसी यांचा देखील स्वयंसेवक म्हणून सहभाग असेल. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानमहत्त्वपूर्ण जीवन कौशल्येव्यावसायिक कौशल्य विकासमूलभूत शिक्षण आणि निरंतर शिक्षण हे या योजनेचे पाच घटक आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या निधीसाठी केंद्राचा हिस्सा 60 आणि राज्याचा हिस्सा 40 टक्के असणार आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/


 

सर्वगुण संपन्न मेथी,

 *मेथी*


भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये  मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.डाळ,पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येेतात.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.जाणून घेऊयात मेथीच्या सेवनाचे आरोग्यावर काय चांगले परिणाम होतात.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/K5QdAp4Y8J7GrjUFVxAuu3

आहारात मेथीचा समावेश जरुर करा-


मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते-


काही संशोधनात असे आढळून आले आहे की मेथीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.मेथीमध्ये असलेल्या स्टेरॉईडल सेपोनिन्समुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईड चे शोषण टाळले जाते.


ह्रदयविकाराचा धोका कमी होतो-


मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या घटकामुळे ह्रदयाचे आरोग्य नियंत्रित राहते.त्याचप्रमाणे मेथीमध्ये असलेल्या पोटॅशियमुळे सोडीयमच्या कार्यावर नियंत्रित राहते ज्यामुळे हुदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतात.


रक्तातील साखर नियंत्रित राहते-


मधूमेहींनी मेथाचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते.तसेच मेथीमधील अमिनो असिड या घटकामुळे इन्शूलीनच्या निर्मितीस देखील चालना मिळते. जाणून घ्या ‘हळदी’ने ठेवा रक्तातील साखर नियंत्रणात !


पचनप्रक्रिया सुलभ होते-


मेथीमध्ये फायबर व अन्टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात व पचनास मदत होते.कधीकधी अपचन अथवा पोटदुखी असल्यास मेथीचा चहा घेतल्यास आराम मिळतो.सकाळी उठल्यावर मेथीचा उकळलेला अर्क घेतल्यास बद्धकोष्ठतेमध्ये देखील फायदा होतो.


छातीत जळजळ होत असल्यास आराम मिळतो-


छातीत जळजळ होत असल्यास रोजच्या आहारात एक चमचा मेथी दाण्याचा समावेश करा.यासाठी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवा व नंतर स्वयंपाकामध्ये वापरा. नक्की वाचा ‘पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी  !


वजन कमी करण्यासाठी मेथीचा चांगला उपयोग होतो-


वजन कमी करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले मेथीचे दाणे सकाळी उपाशी पोटी चाऊन खा.मेथीमध्ये असलेल्या नैसर्गिक फायबरमुळे ते दाणे पोटात फुगतात भूक कमी लागते.ज्यामुळे सहाजिकच तुम्हाला वजन कमी करण्याचे ध्येय लवकर गाठता येते. जाणून घ्या वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना


ताप व घसा खवखवणे यावर गुणकारी-


ताप असल्यास मेथी एक चमचा लिंबू व मधासोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो.तसेच खोकला व घसा खवखवत असल्यास त्यावर देखील मेथी गुणकारी आहे.


स्तनपान करणा-या महिलांमध्ये दुधाचे प्रमाण वाढते-


मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन या घटकामुळे आईच्या दूधाच्या प्रमाणात वाढ होते.त्यामुळे स्तनपान करणा-या महिलांना मेथी खाण्याचा सल्ला देण्यात येतो.


बाळाचा जन्म सुलभ होतो-


मेथीच्या सेवनामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी गर्भाशयाच्या आकुंचन व प्रसरणाला मदत होते.त्यामुळे प्रसव वेदना कमी होतात.मात्र अधिक प्रमाणात मेथी सेवन केल्यास गर्भपात होण्याचा धोका असल्यामुळे गर्भवती महीलांनी मेथीचे सेवन करताना सावध रहावे.


महिलांच्या मासिक पाळीमधील समस्या कमी होतात-


मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन,आयसॉफ्लॅवेन्स,अॅस्टोजिन या घटकांमुळे मासिक पाळीमध्ये आराम मिळतो.त्याचप्रमाणे मेथीमधील या घटकांमुळे मॅनोपॉजमध्ये होणा-या मूड बदलणे व उष्णतेच्या समस्येमध्ये देखील आराम मिळतो.मासिक पाळीच्या काळामध्ये तसेच गरोदर व स्तनपान करणा-या महिलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होते.आहारात मेथीच्या भाजीचा वापर केल्याने शरीराला पुरेसे लोह मिळते.मात्र या भाजीतील लोहाचे शरीरात शोषण होण्यासाठी त्यामध्ये टोमॅटो व बटाट्याचा वापर देखील करा.


कोलन कॅन्सर टाळता येतो-


मेथीमधील फायबर या घटकांमुळे अन्नातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.त्यामुळे कोलन कॅन्सर टाळण्यास मदत होते.


त्वचेचा दाह अथवा चट्टे कमी होतात-


मेथीमधील विटामिन-सी या अॅन्टीऑक्सिडंटमुळे त्वचा भाजणे,गळू अथवा इसबामध्ये होणारा त्वचेचा दाह कमी होतो.तसेच जखमा लवकर भरुन निघतात.यासाठी भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांची पेस्ट जखमेवर लाऊन त्यावर स्वच्छ कापडाची पट्टी बांधा.


त्वचा विकार कमी होतात-


चेह-यावरील ब्लॅकहेड्स,पिम्पल्स,सुरकुत्या कमी करण्यासाठी मेथीचा फेसपॅक लावल्यास चांगला फायदा होतो.यासाठी मेथीचे दाणे उकळलेल्या पाण्याने चेहरा धुवा अथवा ताज्या मेथीच्या पानांची पेस्ट वीस मिनिटे चेह-यावर लावा व नंतर चेहरा स्वच्छ धुवा.


केसांच्या समस्या कमी होतात-


मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.केस गळत असल्यास अथवा पातळ असल्यास दररोज तुमच्या कोकनट ऑईलमध्ये मथी दाणे रात्रभर भिजत ठेवा व नंतर केसांना त्याचा हलक्या हाताने मसाज करा.मेथींमुळे केसांमधील कोंडा देखील कमी होतो.



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi