Friday, 14 April 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त

माहिती व जनसंपर्क’ तर्फे अनोखी मानवंदना

माहितीपटचित्रपट आणि मुलाखतीचे महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन उद्या प्रसारण

 

            मुंबईदि. १३: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त शुक्रवारदि. १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित दोन माहितीपटांसहचित्रपट आणि मुलाखतीचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी १३२ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती दिनानिमित्त राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सकाळी ११ वाजता महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण आणि दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण तसेच सायंकाळी ६ वाजता बाबासाहेब आंबेडकर’ माहितीपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे.

            त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचे प्राडॉ. मृदुल निळे यांची घेण्यात आलेली विशेष मुलाखत सायं. ७.३० वा. जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमामधून प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या दिलखुलास’ कार्यक्रमात १४१५ आणि १७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होणार आहे.

            महापुरुष डॉ. आंबेडकर’, ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण ट्विटर या समाजमाध्यमावर होणार आहे. तसेच महापुरुष डॉ. आंबेडकर’ आणि बाबासाहेब आंबेडकर’ हे माहितीपट फेसबुकवर वरील वेळेत पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे यु ट्यूब चॅनलवरील कम्युनिटी या टॅबमध्येही ते पाहण्यासाठी उपलब्ध असतील.

            याबरोबरच जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे थेट प्रसारण ट्विटरफेसबुक आणि यू ट्यूब या माध्यमांवरून करण्यात येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.*

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाविषयी..

            महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटात डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेचलाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. हा माहितीपट १७ मिनिटे कालावधीचा आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

            या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे, तर जी.जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहेतर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाविषयी...

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाची निर्मिती सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयभारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयमहाराष्ट्र शासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.

            स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्रीभारतीय संविधानाचे शिल्पकारमहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिकासंघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहायला हवा.

            या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी, तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखलेमृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवालाअरूण साधूदया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले आहे. सल्लागार श्याम बेनेगल आहेतचित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्यासंगीत अमर हल्दीपूरफोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाविषयी...

            भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने एन.एस. थापा यांनी १९८१ मध्ये बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

 

दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रा. डॉ. मृदुल निळे यांची मुलाखत

            महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. मृदुल निळे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया ॲपवर शुक्रवार दि. १४शनिवार दि. १५ आणि सोमवार दि. १७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होईल.

            तसेच जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात शुक्रवारदि. १४ एप्रिल २०२३ रोजी सायं. ७.३० वाजता महासंचालनालयाच्या ट्विटरफेसबुक आणि यु ट्यूब या समाजमाध्यमांवरुन ही मुलाखत पाहता येणार आहे. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे राजकीयसामाजिकशैक्षणिक व आर्थिक विचार आणि योगदान’ या विषयावर सविस्तर माहिती प्रा. निळे यांनी दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतून दिली आहे. ही मुलाखत प्रा. भोसले यांनी घेतली आहे.

०००

विरुद्ध आहार 🙏🌹*

 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

      *🌹🙏 विरुद्ध आहार 🙏🌹*

                 


*डॉ.श्री. नितीन जाधव, संजीवन चिकित्सक. डोंबिवली.*


*विरूद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असे मला वाटते. दोन विरूद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. म्हणजे दूध आणि फळे, दूध आणि मासे, दूध आणि मीठ इ.इ. आता हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण गाडी योग्य मार्गावर वळत नाही. हाच बदललेला आहार.*


https://chat.whatsapp.com/FDRangigFj16z0fy4mLsOz


*चहातून चपाती खाणे, केळ्याची शिकरण खाणे, माश्यांचे जेवण झाले असले तरी त्यावर दुधाचे आईस्क्रीम खाणे. याला संयोग विरूद्ध म्हणतात.* 


*दुधाबरोबर कुळीथ, वरी, वाल, मटकी, गुळ, दही, चिंच, जांभूळ किंवा कोणताही आंबट पदार्थ खाऊ नये. लसूण, मुळा, पालेभाज्या पण दुधाबरोबर खाऊ नयेत.*


*तांदुळ आणि मुगाच्या खिचडीत दूध घालून घेऊ नये.*


*दह्याबरोबर गरम पदार्थ, फणस, ताडगोळा, दूध, तेल, केळे, मासे, मांस चिकन, किंवा गुळ खाऊ नये.*


*निरनिराळ्या प्राण्यांचे मांस एकत्र शिजवून खाऊ नये. (मुळात मांसाहार करूच नये)*


*उडदाच्या डाळीबरोबर मुळा खाऊ नये, फणसाचे गरे खाल्यावर विडा खाऊ नये, पालक तीळाच्या तेलात तळून खाल्ल्यास जुलाब होतात. जलचर प्राण्यांचे मांस खाताना भात, मोड आलेली कडधान्ये, उडीद अथवा तीळ यासोबत खाऊ नये. असे बरेच दिवस केल्यास दृष्टीदोष, ऐकू न येणे, कंप सुटणे, उच्चार स्पष्ट न होणे, मानसिक अस्वास्थ्यता क्वचित मृत्यु देखील येतो. असे चरकाचार्यांनी आपल्या ग्रंथात सव्वीसाव्या अध्यायातील श्लोक 87 ते 106 मधे म्हटले आहे. आम्ही वैद्य मंडळी त्याचा अभ्यास करून अनुभव घेत आहोत.*


*केवळ एवढेच नाही तर, आणखीन ही काही विरूद्ध बघायला मिळतात.*


*जे पदार्थ गरम करू नयेत, ते करणे याला पाक विरूद्ध म्हणतात. जसे दही. मध. आज पंजाबी ग्रेव्हीमधे दही घालून शिजवले जाते. गरम सॅण्डवीच वर अॅण्टीऑक्सीडन्ट म्हणून मध लावतात. हे चुक आहे.*


*कोकणात गहू, सफरचंद, द्राक्षे खाणे हे देशविरूद्ध आहे.*


*हिवाळ्यात थंड आणि उन्हाळ्यात उष्ण पदार्थ खाणे, रात्री दही खाणे. हे काल विरूद्ध आहे.*


*पचनशक्ती म्हणजे अग्नि कमी असताना पचायला जड असे, श्रीखंड, पुरणपोळी असे पदार्थ खाणे, हे अग्निविरूद्ध आहे.*


*पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने तिखट, आंबट, खारट पदार्थ खाल्ले की त्रास होणारच. हे प्रकृतीविरूद्ध आहे.*


*एखाद्या व्यक्तीला विशिष्ट पदार्थ खाल्ला की असात्म्यता निर्माण होते, यालाच अॅलर्जी असे म्हणतात. अंडी खाल्ली की पितांब येणे, आंबोळी खाल्ली की पोटात दुखणे, जुलाब होणे, हे सात्म्यविरूद्ध आहे.*


*दूध आणि मासे दोन्ही पदार्थ गुणांनी कफ वर्धकच असल्यामुळे शरीरात गेल्यावर कफ वाढणारच. हे दोषजवृद्धी विरूद्ध आहे.*


*कल्हई न केलेल्या तांबे किंवा पितळीच्या भांड्यात आंबट पदार्थ ठेवल्यास, तवंग किंवा निळसर रंग येतो, चव बदलते, किंवा अॅल्युमिनीयम, हिंडालियमच्या भांड्यात जेवण करणे, हे पात्र विरूद्ध झाले.*


*गरम आणि गार पदार्थ एकाच वेळी घेणे, जसे गरमागरम जेवणासोबत थंडगार पाणी पिणे हे वीर्य विरूद्ध आहे. (वीर्य म्हणजे केवळ शुक्र नव्हे. तर पदार्थातली शक्ती असा होतो. )*


*शू किंवा शी होत असताना ती रोखून धरून जेवणे हे क्रमविरूद्ध आहे.*


*कच्चे किंवा जळलेले, किंवा अर्धवट शिजवलेले अन्नपदार्थ खाणे, शिळे अन्न परत परत गरम करून खाणे, तेच पाणी किंवा चहा वारंवार तापवून घेणे, हे पाक विरूद्ध आहे.*


*मध तूप तेल प्राण्यांची चरबी समप्रमाणात घेऊ नये. तूप आणि मध एका प्रमाणात एकत्र करून घेऊ नये. याला प्रमाणविरूद्ध म्हणतात.*


*आवडत नसलेले पदार्थ खाल्ले की ते मनाविरुद्ध होतात.*


*विरूद्ध म्हणजे विषवत. पाॅयझन नव्हे. या विरूद्ध आहारामुळे टाॅक्सीन्स तयार होतात, जी शरीराला हितकारक नसतात.  एकदा खाऊन त्रास होईलच असे नाही, पण पंधरा दिवस महिनाभर जर यातील विरूद्ध पोटात जात राहीले तर परिणाम दिसून येतात.*


*त्वचेचे रोग, कोड, पुटकुळ्या येणे, रक्ताल्पता, रक्तस्राव होण्याची प्रवृत्ती वाढणे, तोंडाचे आजार, अपचन, पोटदुखी सारखे पोटाचे विकार, जुलाब, अम्लपित्त, जेवणानंतर लगेचच दोन नंबरला धावावे लागणे, सूज, अशक्तपणा, वजन कमी होणे, आळस, रागीटपणा वाढणे, मानसिक असंतुलन इ  अवस्थांमधे विरूद्ध आहार हे कारण असू शकते.*


*एखाद्या माणसाची पचनशक्ती चांगली असल्यास तो विषही पचवू शकतो, पण ही शक्ती कमी पडल्यास त्याला रोग होण्याचा संभव असतो.*


*हल्ली आधुनिक वैद्यकीय शास्त्रामधे अनेक रोगांची कारणेच सापडत नाही. अशा जीर्ण रोगात या विरूद्ध आहाराचा विचार केल्यास उपचारांना योग्य दिशा नक्कीच मिळते.*


*निरोगी रहाण्याचा राजमार्ग हा आहारातूनच जात असल्याने, आणि बदललेला आहार जर आपल्याला विरूद्ध मार्गावर घेऊन जात असेल तर विरूद्ध म्हणजे अगदी एकशे ऐशी अंशात विरूद्ध यावे लागले तरी चालेल, पण मागे फिरावे आणि योग्य मार्गाचा अवलंब करावा. इथे अहंकार नको, आखीर जिंदगी का सवाल है !*


*डॉ.श्री. नितीन जाधव.संजीवन चिकित्सक. डोंबिवली.*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(कॉपी पेस्ट)*

*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*

*join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर  Join Me असा what's up मेसेज करा* 

किंवा लिंकला टच करा व join व्हा


https://chat.whatsapp.com/FDRangigFj16z0fy4mLsOz

Antox T आणिAntox D चा फक्त एकच महिन्यातील जबरदस्त रिझल्ट*

 आर. डी. पाटील रा. म्हालसवडे ता. करवीर यांचा  


*Antox T आणिAntox D चा फक्त एकच महिन्यातील जबरदस्त रिझल्ट*


*ही व्यक्ती दोन वर्ष घरातून बाहेर आली नव्हती कारण*

👇👇👇👇👇

1.थकवा अशक्त पता होता

2.अन्न पचनक्रिया होत नव्हती 

3.जेवन व्यवस्थित जात नव्हते उल्टीहोत होती 

4. Allopathic अनेक प्रकारच्या भयानक दररोज 7 ते 8 गोळ्या चालू होत्या


👉👉👉 *वरील सर्व त्रास 100% पूर्ण बरे झाले व 💊💊Allopathic सर्व गोळ्या बंद केल्या तसेच घरचे समाधानी आहेत*


यांची शुगर ही कमी झाली व शुगर मुळे होणारे त्रास पूर्ण थांबले.


🏆 *राज्यस्तरीय मधुमेहमुक्तीदूत व व्यसनमुक्तीदूत पुरस्कार प्राप्त - रशिद नायकवडी*

*संपर्क - 7875481853*

हाडांची झीज भरून काढण्यासाठी साधा उपाय --*

 *हाडांची झीज भरून काढण्यासाठी साधा उपाय --*

*या मुळे म्हातारा सुद्धा तरुणासारखा पळू लागेल…*


तुम्हाला आयुष्यात हाडांना कधी फॅकचर होऊ नये असे वाटत असेल, तुमची हाडे पोलादा सारखी मजबूत व्हावीत असे वाटत असेल, किंवा पूर्वी तुमचे कधीही हाड मोडलेले असेल, हाडांमध्ये फॅकचर झालेले असेल तर त्याचा खूप त्रास होतो.

वयानुसार तुमची हाडे खूप ठिसूळ झालेली असतील, तुमच्या सांध्यांमध्ये हाडांचे घर्षण होऊन तुमची हाडे कमजोर झालेली असतील आणि त्यामुळे डॉक्टरने तुम्हाला सांध्यांचे ऑपरेशन करायला सांगितले असेल, तर या पैकी किंवा हाडांसंबंधीत कोणत्याही समस्या तुम्हाला असेल, हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता तुम्हाला असेल, तर फक्त सात दिवस आजच हा उपाय  करा.  एक ग्लास दुधामध्ये किंवा एक कप दुधामध्ये घ्या.

हा उपाय केल्याने तुमच्या हाडांमध्ये असलेली पोकळी पूर्ण पणे भरून येईल. हाडांमध्ये क्रॅक झालेले असेल हाडांमध्ये फॅकचर झालेले असेल तर ते पूर्ण पणे भरून येतील. झालेली हाडांची झीज पूर्ण पणे भरून येईल.


https://chat.whatsapp.com/FDRangigFj16z0fy4mLsOz


आयुष्यामध्ये तुम्हाला कॅल्शियमची गोळी घ्यावी लागणार नाही इतका हा जबरदस्त हाडे मजबूत करणारा, हाडांची झीज भरून काढणारा अतिशय सोपा साधा उपाय आहे.

मित्रांनो हे औषध तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज रित्या उपलब्ध होईल. याने हाडांची वाढ सुद्धा चांगली होते आणि जर तुमचे वय कमी असेल, मुलांची उंची वाढत नसेल तर उंची वाढवण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत चांगला उपाय आहे.

हाडांच्या कोणत्याही समस्येसाठी आणि महिलांच्यासाठी हा उपाय वरदान आहे. वयस्कर लोकांमध्ये कॅल्शियमची कमतरता भरपूर प्रमाणात असते. त्यांची हाडे खूप ठिसूळ झालेली असतात, अशा लोकांसाठी तर हा उपाय खूप फायदेशीर आहे.

या उपाया साठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास किंवा एक कप दूध. हे एक ग्लास दूध चांगल्या रीतीने उकळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यात एक चमचा बडीशेप टाकायची आहे.

मित्रांनो जी मोठी बडीसोप असते ती दूध उकळताना आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. दूध उकळून चांगल्या रीतीने गाळून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये अत्यंत महत्वाचा हा जो घटक आहे तो टाकायचा आहे.

तो घटक म्हणजे डिंक. मित्रांनो डिंक किराणा दुकान मध्ये तुम्हाला सहज रित्या मिळेल.  डिंकाचे बारीक चूर्ण करून घ्या आणि एक छोटा चमचा  डिंकाचे चुर्ण  हे गरम दुधामध्ये टाका.


दूध थंड होई पर्यंत ढवळायचे आहे थंड होई पर्यंत ढवळून घेतल्या नंतर याला तुम्ही उपाशी पोटी घ्या किंवा रात्री झोपण्याच्या आधी घ्या.

फक्त सात दिवस तुम्हाला न चुकता सतत हा उपाय करायचा आहे.  एक तर सकाळी करा किंवा रात्री झोपण्यापूर्वी करा.

रोज कॅल्शियमची गोळी घ्यावीच लागते अश्या व्यक्तींनी हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे. बडीशोप हे तुमच्या शरीरात कॅल्शियम चे पोषण करते.

डिंकामध्ये इतर सोर्सेस पेक्षा चार पटीने क्यालशियम जास्त असते आणि डिंक हा थोडासा चिकट असतो त्यामुळे तुमच्या हाडाला चांगली मजबुती येते.

या उपायामुळे तुमच्या सांध्यामधील हाडांची झीज भरून येते. तुम्ही हे कyरून बघा. तुमच्या कॅल्शियमच्या गोळ्या पूर्ण पणे बंद होतील.


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺

विदर्भ-मराठवाड्यात पशुवैद्यकीय सेवा उपलब्धतेबाबत अहवाल सादर करावा

 विदर्भ-मराठवाड्यात पशुवैद्यकीय सेवा उपलब्धतेबाबत अहवाल सादर करावा


पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश


        मुंबई दि. १३ :विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाअंतर्गत दुग्ध उत्पादन व्यवसाय वाढविण्यासाठी शेळी-मेंढी गट वाटप योजना राबविण्यात येणार आहे. दुग्ध उत्पादन व्यवसाय वाढविण्यासाठी चांगल्या प्रतीचे शेळी-मेंढी असणे आवश्यक असून, विदर्भ-मराठवाड्यात पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.


        मंत्रालयात विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, मराठवाडा व विदर्भ दुग्ध विकास प्रकल्प (VMDDP) विदर्भ व मराठवाड्यातील ११ जिल्ह्यात राबविण्यात येत असून, यासाठी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याबाबत अहवाल सादर करावा. व्हीएमडीडीपी अंतर्गत खरेदी उपक्रम वाढविण्यासाठी दुध उत्पादन कंपनीची स्थापना करण्याबाबत सकारात्मक विचार करणार. दुधाची उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय दूग्ध विकास बोर्ड व सहयोगी संस्थांद्वारे कृत्रिमरेतनाची सेवा शेतकऱ्यांना संतुलित पशु खाद्य सल्ला व मार्गदर्शन सेवा, गुणवत्तापूर्ण पशुखाद्य व पशुखाद्य पुरके पुरवठा, ॲनिमल इंडक्शन याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना व पूर्वतयारीचा अहवाल सादर करण्यात यावा. तसेच गावपातळीवर पशुवैद्यकीय सेवा पोहोचविल्यास उत्पादकता वाढण्यास मदत होईल. राज्य सरकारच्या सहकार्याने दुग्ध विकास बोर्ड व अन्य संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करुन मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता येणार असल्याचेही मंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.


        राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यासाठी क्षेत्र निश्चित करावे असेही मंत्री श्री.विखे पाटील यानी सांगितले. या बैठकीस विभागाचे सचिव प्रधान सचिव जे.पी गुप्ता, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


००००

देशाला आदर्श ठरेल अशी गोवंश प्रजनन नियमावली तयार करावी

 देशाला आदर्श ठरेल अशी गोवंश प्रजनन नियमावली तयार करावी


आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मेपर्यंत हरकती मागवा


- पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील


            मुंबई, दि. १३ :- गाय, म्हैस यांचे दूध वाढण्यासाठी आणि उच्च गुणवत्तेचे प्रजनन योग्य नर तयार करण्यासाठी गोवंश प्रजनन नियमावली राज्य शासन तयार करीत आहे. मात्र पशुपालक, गोपालकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मे २०२३ पर्यंत हरकती मागविण्याची सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी केली. शिवाय हरकतीनंतर देशाला आदर्श ठरेल, अशी गोवंश प्रजनन नियमावली तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


            मंत्रालयात गोवंश प्रजनन नियमावलीसंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री श्री. विखे - पाटील बोलत होते. बैठकीला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, दुग्ध विकास आयुक्त डॉ. श्रीकांत शिरपूरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, सहसचिव माणिक गुट्टू यांच्यासह गोशाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, राज्यात गोवंश प्रजननाबाबत पशुपालकांमध्ये जागृती नाही. योग्य आणि उच्च गुणवत्तेच्या प्रजननयोग्य नराचे गोठवलेले वीर्य विशिष्ट प्रदेशाच्या आवश्यकतेनुसार सुनिश्चित करून पुरवठा करावा लागतो. यासाठी राज्यात गोवंश प्रजनन (पैदास) नियमावली आवश्यक आहे. याची माहिती सर्वसामान्य पशुपालकांना होण्यासाठी प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. भारतीय वंशाच्या गोवंश (बोवाइन यामध्ये गाय, म्हैस यांचा समावेश) प्रजातींचे संवर्धन करणे गरजेचे बनले आहे. यामुळे दुग्धवर्गीय जनावरे गाय, म्हैस यांचे दूध उत्पादन वाढवणे पशुपालकाला फायदेशीर होणार आहे.


            पशुपालक, गोशाळा मालकांना या नियमावलीची माहिती होण्यासाठी किंवा नियमावलीमध्ये काही सुधारणा सूचविण्यासाठी दुग्ध व पशुसंवर्धन विभागाने येत्या मंगळवारपर्यंत कच्चा गोवंश प्रजननचा कायदा (नियमावली) तयार करावा. यासाठी इतर राज्यातील कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करून अंतिम करून २० एप्रिल २०२३ रोजी प्रसिद्ध करावा. त्यानंतर ५ मे २०२३ पर्यंत या नियमावलीबाबत हरकती मागविण्याच्या सूचना मंत्री श्री. विखे-पाटील यांनी केल्या.


            राज्यात म्हैस आणि गायी यांच्या नर वीर्याच्या केंद्राची निर्मिती करणे, त्याची साठवणूक करणे आणि उच्च प्रतीच्या वीर्यासाठी या नियमावलीद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. राज्यात वीर्य केंद्रांची स्थापना करून त्याद्वारे उत्पादन करणे, प्रक्रिया करणे, साठवणूक, विक्री आणि वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यासाठी तपासणी प्रयोगशाळा उभी करण्यात येणार आहे.

दापचेरी दुग्ध प्रकल्पाच्या जमिनीची 15 मेपर्यंत मोजणी पूर्ण करा

 दापचेरी दुग्ध प्रकल्पाच्या जमिनीची 15 मेपर्यंत मोजणी पूर्ण करा


पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश


 


            मुंबई, दि. 13 : दापचेरी (जि.पालघर) येथे दुग्ध प्रकल्पाच्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याने दुग्ध व्यवसाय विकास, महसूल, भूमि अभिलेखच्या संबंधित अधिकाऱ्यांनी १५ मे २०२३ पर्यंत संपूर्ण जमिनीचा सर्व्हे करून मोजणी करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित दुग्ध व्यवसाय विकास आढावा बैठकीत मंत्री श्री. विखे-पाटील बोलत होते.


            मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, दापेचरीमध्ये मुंबईतील तबेले आणून येथे स्वतंत्र दुग्ध प्रकल्प करण्याचा शासनाचा विचार होता. यासाठी सुमारे ६६१५ एकर जमिनीचे भूसंपादन झाले होते. याठिकाणी तबेलेही करण्यात आले होते. एक स्वतंत्र धरणही बांधण्यात आले होते. मात्र त्या जागेचा वापर कधी झाला नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी. जादा मनुष्यबळाची आवश्यकता भासल्यास देण्यात येईल. याठिकाणच्या दिशा, नकाशा ठरविण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणे अत्यंत महत्वाचे असल्याने यासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमून काम करावे.


            तबेल्याव्यतिरिक्त अतिक्रमित जागा, आरे दूध डेअरी परिसरातील अतिक्रमण, झोपड्या हटविण्यासाठी अतिक्रमण आणि पोलीस पथकाची नेमणूक करण्याच्या सूचनाही श्री. विखे-पाटील यांनी दिल्या. 


            दापचेरी येथील प्रकल्पाच्या ठिकाणी २५० कंट्रोल मार्क केले असून ३० एप्रिलपर्यंत ड्रोन सर्व्हे पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


            बैठकीला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, दुग्ध विकास आयुक्त डॉ. श्रीकांत शिरपूरकर, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ आदी उपस्थित होते.


००००

Featured post

Lakshvedhi