Friday, 14 April 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त

माहिती व जनसंपर्क’ तर्फे अनोखी मानवंदना

माहितीपटचित्रपट आणि मुलाखतीचे महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन उद्या प्रसारण

 

            मुंबईदि. १३: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त शुक्रवारदि. १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित दोन माहितीपटांसहचित्रपट आणि मुलाखतीचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी १३२ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती दिनानिमित्त राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सकाळी ११ वाजता महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण आणि दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण तसेच सायंकाळी ६ वाजता बाबासाहेब आंबेडकर’ माहितीपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे.

            त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचे प्राडॉ. मृदुल निळे यांची घेण्यात आलेली विशेष मुलाखत सायं. ७.३० वा. जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमामधून प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या दिलखुलास’ कार्यक्रमात १४१५ आणि १७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होणार आहे.

            महापुरुष डॉ. आंबेडकर’, ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण ट्विटर या समाजमाध्यमावर होणार आहे. तसेच महापुरुष डॉ. आंबेडकर’ आणि बाबासाहेब आंबेडकर’ हे माहितीपट फेसबुकवर वरील वेळेत पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे यु ट्यूब चॅनलवरील कम्युनिटी या टॅबमध्येही ते पाहण्यासाठी उपलब्ध असतील.

            याबरोबरच जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे थेट प्रसारण ट्विटरफेसबुक आणि यू ट्यूब या माध्यमांवरून करण्यात येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.*

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाविषयी..

            महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटात डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेचलाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. हा माहितीपट १७ मिनिटे कालावधीचा आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

            या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे, तर जी.जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहेतर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाविषयी...

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाची निर्मिती सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयभारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयमहाराष्ट्र शासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.

            स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्रीभारतीय संविधानाचे शिल्पकारमहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिकासंघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहायला हवा.

            या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी, तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखलेमृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवालाअरूण साधूदया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले आहे. सल्लागार श्याम बेनेगल आहेतचित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्यासंगीत अमर हल्दीपूरफोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाविषयी...

            भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने एन.एस. थापा यांनी १९८१ मध्ये बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

 

दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रा. डॉ. मृदुल निळे यांची मुलाखत

            महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. मृदुल निळे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया ॲपवर शुक्रवार दि. १४शनिवार दि. १५ आणि सोमवार दि. १७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होईल.

            तसेच जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात शुक्रवारदि. १४ एप्रिल २०२३ रोजी सायं. ७.३० वाजता महासंचालनालयाच्या ट्विटरफेसबुक आणि यु ट्यूब या समाजमाध्यमांवरुन ही मुलाखत पाहता येणार आहे. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे राजकीयसामाजिकशैक्षणिक व आर्थिक विचार आणि योगदान’ या विषयावर सविस्तर माहिती प्रा. निळे यांनी दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतून दिली आहे. ही मुलाखत प्रा. भोसले यांनी घेतली आहे.

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi