Friday, 14 April 2023

सागरी प्रदुषणाबाबत जनजागृतीसाठठी ‘महास्व‍ीम 2023’ चा शुभारंभ

 सागरी प्रदुषणाबाबत जनजागृतीसाठठी ‘महास्व‍ीम 2023’ चा शुभारंभ


 


            मुंबई, दि. 13 : सागरी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी देशातील सर्वात मोठे सागरी साहसी जलतरण अभियान ‘महास्व‍ीम 2023’ चे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक (व्ही.आय.पी. सुरक्षा) कृष्णप्रकाश यांच्या हस्ते आज मुंबई येथे हिरवा झेंडा दाखवून केले. या अभियानांतर्गत गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी हा 16 किलोमीटरपर्यंतचा प्रवास देशभरातील जलतरणपटू पोहून पूर्ण करणार आहेत.


            सागरी प्रदूषणाबाबत जनजागृती करणे, हा अभियानचा उद्देश आहे. जे. डी. स्पोर्ट यूथ फाऊंडेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्वीमिंग, पोर्ट ट्रस्ट सामाजिक जनजागृती संस्था, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.


            यावेळी बोलताना कृष्णप्रकाश म्हणाले की, भारतातील सर्वात मोठ्या जलतरण मोहिमेचा शुभारंभ गेट वे ऑफ इंडिया येथून होत आहे. सागरी प्रदूषण थांबविण्याचा संदेश या मोहिमेतून देशभर पोहोचणार आहे. त्यांनी सर्व जलतरणपटूंना ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


             आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जयंत दुबळे यांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील 34 किलोमीटरचा इंग्लिश खाडी 14 तास 39 मिनिटांत पोहून पार केल्याचा विक्रम केला आहे. त्यांच्यासह या अभियानात देशभरातून 75 जलतरणपटूंनी सहभाग घेतला आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या जलतरणपटूंना श्री. दुबळे मार्गदर्शन करणार आहेत.


            यावेळी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे आदेश तितरमारे, मुंबई पोर्टचे उपसंरक्षक भाभूस चंद, सामाजिक जनजागृती संस्थेचे अनिल मोरे, मेहुल शहा, संस्थेचे पदाधिकारी तसेच जलतरणपटू यावेळी उपस्थित होते.

राज्यातील १२७६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन

 राज्यातील १२७६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

            मुंबईदि. १३ : राज्य शासनाने अर्धवेळ पदावरील ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन (रूपांतरण) करण्याचा निर्णय घेतला असून याचा लाभ १२७६ अर्धवेळ ग्रंथपालांना होईलअशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व अर्धवेळ ग्रंथपालांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले.

            राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्याची बाब अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. नवीन आकृतीबंधानुसार अर्धवेळ ग्रंथपाल पद हे मृत संवर्ग करण्यात आले असून या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवा ज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

00000

शेळी-मेंढी समूह प्रकल्प, मेंढी - शेळी विकास महामंडळाच्या

 शेळी-मेंढी समूह प्रकल्प, मेंढी - शेळी विकास महामंडळाच्या

नव्या प्रक्षेत्राचा नगर जिल्ह्यात १ मे रोजी शुभारंभ

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावची निवड

- राधाकृष्ण विखे पाटील

 

            मुंबईदि. १३ : महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेळीपालनास महत्वाचे स्थान आहे .राज्यातील शेळी पालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून फायदेशीर ठरलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे शेळी-मेंढी समूह प्रकल्प व पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे नवीन प्रक्षेत्र १ मे रोजी शुभारंभ होणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची आढावा बैठक घेण्यात आली.

            मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेराज्यामध्ये समूह विकासामधून शेळी मेंढी पालन व्यवसायास गती देवून शेळी मेंढी पालन संबंधीत नवीन उद्योजक निर्माण करणे. शेतकऱ्यांचे समूह तयार करून त्या माध्यमातून त्यांना शेळी मेंढी पालन व्यवसायाकरिता प्रवृत्त करून त्यांचे या व्यवसायाबाबतचे कौशल्य विकसित करणे व त्यांच्यामध्ये स्वयंरोजगार निर्मिती होऊन त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचाविण्यास यामुळे मदत होणार आहे.या भागातील शेळी मेंढी पालकांना सतत निर्माण होणारा शेळया व मेंढ्याच्या विपणन व्यवस्थेचा प्रश्नही सुटणार आहे.

            या प्रकल्पाअंतर्गत शेळ्या- मेंढ्या पासून मिळणाऱ्या विविध पदार्थ व उपपदार्थ यांचे प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन उद्योजक निर्माण होवून रोजगार निर्मिती सुद्धा होईल.

 जिल्ह्यामध्ये शेळी उद्योगाच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य करता येईलअसेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

            यावेळी बैठकीत अहमदनगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकारी विकास महासंघाचे सादरीकरण करण्यात आले.

            या बैठकीस प्रधान सचिव जगदीशप्रसाद गुप्तानाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेअहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठपुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

बाटली बंद पाणी, आरोग्यास हा नी


 

मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री

 मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई उपनगरांतील


 वाहतूक सुधारणा प्रकल्पांचे लोकार्पण


            मुंबई, दि. १३:- मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री होणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपूलाचा तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.


नवी मुंबई ते ठाणे प्रवास सिग्नल फ्री


            मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील १.२३ किमी लांबीच्या दोन पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नल मुक्त होऊन पूर्व द्रुतगती महामार्गावरील नवी मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होऊन नवीमुंबई वरून येणारी वाहने आता विनाव्यत्यय ठाण्याच्या दिशेने प्रवास करतील. सांताक्रुझ चेंबूर जोड रस्ता आणि पूर्वद्रुतगतीमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरांतील तसेच नवीमुंबई वरून मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे घाटकोपर येथील छेडा नगर जंक्शनवर मोठ्याप्रमाणात वाहतूकोंडी होत असे. ही वाहतूकोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. त्या अंतर्गत एकूण तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी २२३.८५ कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्याला जोडणाऱ्या उड्डाणपूल हा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच आज लोकार्पण करण्यात आलेल्या उड्डाणपूला करिता ८६.३३ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.


पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गाची जोडणी आणखी गतिमान


            सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या भागातील कुर्ला ते वाकोला, रझाक जंक्शन पर्यंत ३.०३ किमी लांबीचा उन्नत मार्गाचे लोकार्पण करून आज तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उन्नत मार्गाच्या दोन मार्गीकांचे तसेच एमटीएनएल आर्मचे लोकार्पण केले होते. बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विद्यमान सांताक्रूझ चेंबूर रस्त्याद्वारे (एससीएलआर) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडण्यासाठी एमएमआरडीए राज्य शासनाच्या सहकार्याने सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करत आहे. त्यानुसार पहिल्या भागात ५.९ किमी चा उन्नत मार्ग असणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत बिकेसीच्या सभोवतालचे रस्ते विकसित करण्यात येत आहेत, तसेच ते पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडले जात आहेत, त्यामुळे मुंबईचे व्यवसाय केंद्र असलेल्या बीकेसी भागात होणारी वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल. तसेच दोन्ही द्रुतगतीमहामार्गांना एकमेकांशी जोडणाऱ्या या सिग्नल विरहित डबल डेक्कर उन्नतमार्गामुळे वाहतुकीच्या वेळेत जवळपास ४५ मिनिटांची बचत होईल.


            मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागांची जलद जोडणी करण्याच्या दृष्टीने प्राधिकरण कार्यतत्परने सर्व प्रकल्पांचे लोकार्पण करत आहे. घाटकोपर येथील छेडानगर हे पूर्व द्रुतगती महामार्गावरील एक प्रमुख जंक्शन आहे. मानखुर्द घाटकोपर लिंक रोड पूर्ण झाल्यावर पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन येथे नवी मुंबई वरून येणाऱ्या वाहनांमुळे मोठ्याप्रमाणात वाहतूकोंडी होत होती. तसेच ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या प्रवाशांना सिग्नल वर बराच वेळ थांबावं लागत असे. आज उद्घाटन झालेल्या या उड्डाणपुलामुळे आता ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता विनाव्यत्यय आणि सिग्नल विरहित होणार आहे. तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कापडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. ज्याच्यामुळे आता मुंबईच्या पूर्व व पश्चिम भागाची जोडणी सुकर झाली आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री एस. व्ही.आर श्रीनिवास यांनी दिली.


000

तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट,

 तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट,

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

-सचिव सुमंत भांगे

 

            मुंबई ,दि.१३: राज्यातील तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट असून त्यासाठी लोकाभिमुख प्रशासन राबवून योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव  सुमंत भांगे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यात "सामाजिक न्याय पर्व" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज दि १३ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री.भांगे यांनी राज्यातील समाज कल्याण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला त्याप्रसंगी बोलत होते.

            समाजाप्रती चांगलं  कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या  पाठीशी शासन खंबीर आहे. येणाऱ्या काळात "खात्याची ओळख", "रयतेचा दरबार" यासारखे  अभिनव उपक्रम राज्यातील जनतेसाठी विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी श्री भांगे यांनी सांगितले. तसेच विभागात अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त असलेली पदे लक्षात घेता लवकरात लवकर भरती प्रक्रिया होण्यासाठी विभागाच्या आकृतीबंधास शासन मान्यता घेणेबाबतचे निर्देश त्यांनी समाज कल्याण आयुक्त यांना यावेळी दिलेत.

            यावेळी  राज्याचे समाज कल्याण आयुक्तडॉ. प्रशांत नारनवरे यांनी सामाजिक न्याय पर्वा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुण्याचे सुनिल वारेसहसचिव दिनेश डिंगळेलीडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभियेसामाजिक न्याय विभागअंतर्गत विविध महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालकआयुक्तालयातील सर्व उपायुक्तसर्व प्रादेशिक उपायुक्त उपायुक्तसर्व सहाय्यक आयुक्तसर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद उपस्थित होते. राज्यात राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांचा लेखाजोखा यावेळी क्षेत्रिय अधिकारी यांनी सादर केला.

००००


 

वृत्त क्र. 1274

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासन,

लोककल्याणकारी विचारांवर वाटचाल

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जयंतीच्या पूर्वसंध्येला दिल्या जनतेला शुभेच्छा

 

            मुंबईदि. १३:- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासनलोककल्याणकारी विचारांना आदर्श मानून  वाटचाल करत राहू. यातून राज्याच्या विकासाचा मार्ग आणखी प्रशस्त करूअशी ग्वाही देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.

            शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे कीभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या बळावर आज आपला देश जगात एक सशक्त लोकशाही म्हणून उभा आहे. यामुळे आपला देश आणि महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य म्हणून काम करत आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या वंचितांच्या कल्याणाचासमानतेचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून काम करत आहोत. समाजातील सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध संस्था काम करत आहेत. या विभागाच्या योजनांकरिता भरीव निधीची तरतूद देखील  केली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुशासनाचे आणि कल्याणकारी राज्याचे समाधान नागरिकांना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून बाबासाहेबांच्या विचाराने आम्ही वाटचाल करत राहूयाची ग्वाही देखील देतो.

00000


 

वृत्त क्र. 1273

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागर करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. १३ : स्वातंत्र्यसमताबंधुता या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारांचा जागर हीच त्यांना खरी आदरांजली आहेअशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करीत राज्यातील जनतेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतातनवभारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अमूल्य आहे. राज्य घटनेचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजेहा त्यांचा दृष्टीकोन ठेवूनच राज्य सरकार काम करत आहे. बाबासाहेबांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालणे हीच त्यांना आदरांजली ठरेलतसा संकल्प या जयंतीदिनी आपण करूअसे आवाहनही त्यांनी केले आहे.

००००

अभिवादन महामानवाला

 



Featured post

Lakshvedhi