Wednesday, 12 April 2023

मुळव्याध पासुन सुटका पाहिजे का?*

 *मुळव्याध पासुन सुटका पाहिजे का?*


मूळव्याध चा त्रास आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे, संडासवाटे रक्त पडणे, मुळव्याधचा त्रास होणे हे आपण घराच्या घरी १० मिनिटांत थांबू शकतो   


*१. लिंबू व सैंधव मीठ*

 १.२ लिंबू घ्या, त्याला मधून चिरा.

 १.२ त्यावर सैंधव मीठ टाखा.

 १.३ ते लिंबु चोखून चोखून .

 १.४ आंबट लागल्यास   मीठ परत -परत टाखा व लिंबू चोखून चोखून खा (लिंबु संपे पर्यंत).         

 १.५ हे एकदा जरी केलं तरी १० मिनिटात रक्त पडणे बंद होईल.

 १.६ हा उपाय १० दिवस सकाळ-संद्याकाळ जेवल्यानंतर केला तर मूळव्याध पूर्ण बरा होतो. 


*मुळा*

नावाप्रमाणे मूळव्याधीवर मुळा हा रामबाण उपाय मानला जातो. मुळा खाल्ल्याने मूळव्याध असलेल्या रुग्णाला आराम मिळतो. थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.


*सर्वसाधारण उपचार* 

मूळव्याधीवर सुद्धा त्रिदोष, व्यक्तीची प्रकृती, रोगाची तीव्रता वगैरे अनेक गोष्टींचा विचार करून नेमक्या औषधांची योजना करावी लागते, तरीही यावर सर्वसाधारणतः केले जाणारे उपचार याप्रमाणे-

◼️रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन-तीन चमचे गायीचे साजूक तूप टाकून घ्यावे.


◼️मोडाच्या ठिकाणी वेदना असल्यास बेलफळाचा गर व पाठाचूर्ण मिसळून घ्यावे किंवा सुंठ व पाठाचूर्ण एकत्र करून घ्यावे.


◼️सुरण ही भाजी मूळव्याधीत औषधच होय. सुरण वाफवून केलेली भाजी, फुलका, तूप व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो.


◼️रक्त पडत असल्यास घरचे ताजे लोणी व नागकेशर हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे.


◼️मोडाच्या ठिकाणी आग होत असल्यास दूर्वांच्या रसात भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी ठेवावी.


◼️मोड सुजला असून दुखत असल्यास गोवरीच्या विस्तवावर तूप टाकून त्याची धुरी घ्यावी किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची धुरी घ्यावी.


◼️कफज मूळव्याध असून मोडाला खाज येत असल्यास जेवणापूर्वी तसेच जेवणानंतर सुंठ व ओव्याची पूड टाकून ताक प्यावे.


◼️मोडाच्या ठिकाणी वेदना व आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा गर ठेवावा.


◼️तीळ वाटून गरम करून शेकल्यास मोडाच्या ठिकाणची वेदना कमी व्हायला मदत होते.


◼️व्याधीवर शस्त्रकर्म किंवा क्षारकर्म केले तरी मुळातल्या मंद अग्नीवर योग्य उपचार करून मूळव्याधीवर खरे उपचार करणे व पथ्य पाळणे आवश्यक असते; अन्यथा पुन्हा त्रास उद्भवू शकतो.


मूळव्याध असो किंवा फिशर, भगंदर असो, एक तर या सर्व रोगांचा त्रास फार भयानक असतो. शिवाय संकोचापायी यांचे वेळेवर योग्य निदान केले जात नाही, परिणामतः उपचारही मिळत नाहीत. त्रास फारच असह्य झाला तर पटकन गुण यावा म्हणून शस्त्रकर्माकडे झुकण्याचा कल वाढतो. क्वचित एखाद्या व्यक्तीमध्ये शस्त्रकर्म, क्षारसूत्र वगैरे उपचारांची आवश्यकता असली तरी केवळ बाह्योपचार रोगाला बरे करण्यास असमर्थ असतात याचेही भान ठेवायला हवे. मंद अग्नी, अपचनाची प्रवृत्ती आणि आतड्यांमधला कोरडेपणा, उष्णता हे सर्व बरे केल्याशिवाय या त्रासापासून कायमची सुटका होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे या प्रकारचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून पहिल्यापासूनच आहार-आचरणात काळजी घ्यायला हवी. तरीही त्रास झालाच तर वेळेवर योग्य उपचार घेऊन तो मुळापासून बरा करण्यावर भर द्यायला हवा.


*पथ्याच्या गोष्टी* 

तांदूळ, गहू, यव, ज्वारी, दुधी, पडवळ, तोंडली, सुरण, परवर, आंबट चुका, घोसाळी, मूग, तूर, लोणी, तूप, ताक, आले, सुंठ, मनुका, आवळा.


*अपथ्याच्या गोष्टी* 

नाचणी, मका, उडीद, वाल, पावटा, चवळी, शेंगदाणे, रताळे, तळलेले तिखट पदार्थ, शेंगदाणे, लोणची, पापड वगैरेंचा अतिरिक्त वापर.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


 *⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा*



बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना सुरु सामाजिक न्याय विभागाचा खुलासा

 सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत,

बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना सुरु

सामाजिक न्याय विभागाचा खुलासा

 

            मुंबईदि. 11 : सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत. सर्व योजना सुरु आहेत. बार्टीच्या प्रशिक्षणाच्या व इतर सुरु असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीतअसा खुलासा सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी केला आहे.

            अलिकडे काही प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने प्रमुख मुद्द्यांचा तपशील व त्याबाबतची वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे :

अधिछात्रवृत्ती देण्याची मागणी बाबत

            ‘बार्टीकडे असलेल्या निधीची तरतूद व उपलब्धता लक्षात घेता बार्टीच्या नियामक मंडळाने प्रतिवर्षी २०० विद्यार्थी संख्या निश्चित केल्यानुसार बार्टी मार्फत देण्यात येणा-या अधिछात्रवृत्तीकरिता प्राप्त अर्जापैकी बार्टीच्या धोरणाप्रमाणे 200 विद्यार्थाची गुणवत्तेच्या आधारावर अधिछात्रवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहेव बार्टीमार्फत लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या धोरणांप्रमाणे बार्टीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतले जातात. महासंचालक हे बार्टीचे प्रशासकीय प्रमुख असून बार्टीच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहेत. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्वच योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहेव कोणतीही योजना बंद करण्यात आलेली नाही.

प्रशिक्षण संस्थांची निवड बाबत

                 बार्टीच्या माध्यमातून सध्या आयबीपीएसबँकिंग व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देणा-या 30 संस्थांचा करार कालावधी संपुष्टात आलेला असून कोविडच्या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया न राबवता एक वर्ष मुदतवाढ देण्याचा तत्कालिन परिस्थितीत सन २०२१ मध्ये निर्णय घेण्यात आला होता. शासनाच्या मार्गदर्शक धोरणाप्रमाणे रूपये 10 लक्ष पेक्षा अधिक रकमेच्या खर्चांच्या योजनांसाठी ई निविदा प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. सध्या सुरू असलेले प्रशिक्षण हे 46 संस्थांमार्फत राबवावयाचे झाल्यास पुढील पाच वर्षात रूपये एक हजार कोटी पेक्षा अधिकचा खर्च येणार असल्याने ई निविदा प्रक्रिया राबविल्याशिवाय प्रशिक्षण संस्थाची निवड करणे शासनाच्या मार्गदर्शक धोरणाच्या विपरीत होणार आहे. पारदर्शक पद्धतीने प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची निवडगुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण व विद्यार्थी हित याबाबीचा विचार करुन बार्टीचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम अधिक खंबीरप्रभावीपणे राबविण्याचे निश्चित केले आहे.

शासकीय वसतिगृहातील भोजन ठेकेदार यांच्या विरुद्ध कार्यवाही

            भोजन ठेका पुरवठादार यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत होती. मात्रराज्यात काही ठिकाणी त्या संदर्भात भोजनाचा दर्जावेळेवर भोजन उपलब्ध करुन न देणे अशा स्वरुपाच्या तक्रारी असल्याने व त्याची विभागाने स्थानिक स्तरावर तपासणी केली असता त्यात तथ्य आढळून आल्याने काही भोजन ठेका पुरवठादारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. दोषी ठेकेदारांचा समावेश काळ्या यादीत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना दर्जेदार सकस आहार मिळावा म्हणून नव्याने स्पर्धात्मक पद्धतीने राज्यस्तरावर भोजन ठेका देण्याची टेंडर प्रक्रिया करण्यात येत आहे.

            सामाजिक न्याय विभागाने समाजातील सर्व वंचित घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेतराज्यातील सर्व क्षेत्रिय अधिकारी यांच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण योजनांची प्रभावी व यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे व येणाऱ्या काळात देखील तितक्याच गतिमान पद्धतीने व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सामाजिकआर्थिकशैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी सामाजिक न्याय विभाग सदैव कार्यरत असून कायम प्रयत्नशील आहे.

****

जिवन गाणे

 🙏🌹🌹🙏

*हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळते.*


*💐🙏🏻💐

शुभ सकाळ

💐🙏🏻💐*🌹🌹🙏


*मनात भरून आलेलं आभाळ मोकळं व्हायला कधी कधी, आपल्या माणसाने केलेली साधी विचारपूस पण पुरेशी असते..!!* 


*"आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा......!* 

*साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत रहा…...*

*अशक्य ही शक्य होईल.

 *सुप्रभात*

🙏🌹🌹🙏

 पैशांची गरज भासली तर ते

 व्याजानेही मिळतात पण,

 माणसाची साथ व्याजाने

 मिळण्याची सुविधा अजुन

 तरी सुरु झालेली नाही. 

  म्हणून नाती जपा.

आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात

 पण, न बोलवता दु:खात जे सामील होतात

 तेच खरे आपले असतात.....!!!?💐

 *आपल्या कानावर जे काही येतं व "ऐकतो" त्यावर केव्हाही त्वरित "विश्वास" ठेवुनये, कारण "खोटे" हे "सत्याच्या" तुलनेत फार वेगाने "पसरत" असतं..!!!*


              🙏🙏 * 🙏🙏

Tuesday, 11 April 2023

दिलखुलास’ कार्यक्रमात सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक

 दिलखुलास’ कार्यक्रमात सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक


डॉ. विनायक सावर्डेकर यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘उष्माघात : खबरदारी आणि उपाययोजना’ या विषयावर सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर बुधवार दि. 12 एप्रिल आणि गुरुवार दि. 13 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.


            जागतिक हवामान बदलामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना सर्वांना सामोरे जावे लागत आहे. त्यातील नव्याने निर्माण झालेली आपत्ती म्हणजे उष्ण लहरींचे वाढते प्रमाण होय. त्याअनुषंगाने उष्माघात म्हणजे काय, यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी तसेच उष्माघात झाल्यास कोणते उपचार घ्यावेत अशा महत्वपूर्ण विषयावर डॉ. विनायक सावर्डेकर यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.



0000


मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व गृह विभागानेसंयुक्त कारवाई वाढवावी

 मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व गृह विभागानेसंयुक्त कारवाई वाढवावी


- मंत्री शंभूराज देसाई.

            मुंबई, दि. 11 : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती व बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी कारवाई करण्यात येते. अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी गृह व उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईचा आढावा दर तीन महिन्याला घेणार असून या संयुक्त कारवाई वाढवण्याचा सूचना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.


            आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अवैध मद्य विक्रीवरील कारवाई व उपाययोजना याबाबत आढावा घेण्यात आला.


             मंत्री श्री. देसाई म्हणाले की, अवैध मद्य विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुध्द हद्दपारी, एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत सक्त कारवाई करण्यात यावी. सर्व बाबी तपासून बनावट मद्यनिर्मिती आणि अवैध दारूविक्री यांवर आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग यंत्रणा आगामी काळात विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती होत असेल तेथील अधिकाऱ्यास याबाबत जबाबदार धरण्याबरोबरच कायद्याचा जरब बसविणारी कारवाई करण्याचे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.


            या बैठकीस गृह व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी उपस्थित होते.

भवताल

 मुलांच्या आग्रहास्तव भंडारदरा  !

 

मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत निसर्गाचा अनोखा अनुभव दण्यासाठी भवताल  निसर्ग जागर यांनी भंडारदरा नेचर कॅम्प आयोजित केलापहिली बॅच लगेचच फुल्ल झालीउरलेल्या मुलांना सहभागी करून घेण्यासाठी जोडूनच बॅच  जाहीर करत आहोत.

 

विशेष आकर्षण:

• जलाशयाजवळ तंबूमध्ये मुक्काम

• सर्वोच्च कळसुबाई शिखरावर ट्रेक

• जगप्रसिद्ध सांधण घळीचा अनुभव

• खडकाची रहस्यं  त्याच्या गोष्टी

• प्रसिद्ध अमृतेश्वर मंदिराला भेट

• वनस्पती-मुंग्या-मधमाशांच्या गोष्टी

• आदिवासी जीवनाची खरी ओळख

• निसर्गाशी जोडणारे अनेक उपक्रम...

 

एक्साइटिंग नेचर कॅम्प @भंडारदरा (बॅच )

निसर्ग आविष्कारांची अनुभूती देणारा कॅम्प

 

 ते १० मे २०२३

(१० वर्षांपुढील मुलामुलींसाठी४० सहभागी)

 

माहिती  नावनोंदणीसाठी:

https://bhavatal.com/Ecocamp/Bhandardara2

 

मार्गदर्शन:

• श्रीअभिजित घोरपडे

(पर्यावरण  भूविज्ञान अभ्यासक)

• डॉमहेश गायकवाड

(निसर्ग  वन्यजीव अभ्यासक)

 

संपर्कासाठी:

९५४५३५०८६२ / ९९२२०६३६२१९९२२४१४८२२


--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com



2020 आणि सन 2021 मधील विविध सांस्कृतिक पुरस्कार प्रदान

 सन 2020 आणि सन 2021 मधील विविध सांस्कृतिक पुरस्कार प्रदान

मराठी नाटकांना अल्पदरात नाट्यगृह उपलब्ध करुन देणार


— सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 10 : आपल्या कलेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार करत असतात. आगामी काळात महाराष्ट्र आर्थिक क्षेत्राबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातही आघाडीवर कसा राहील यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत नाट्यगृहे मराठी नाटकांसाठी अल्प दरात उपलब्ध करुन देण्यात येतील, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्य सांस्कृतिक पुरस्कार सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील कलांगण येथे प्रदान करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपिस्थत होते. सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंतांना आज सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरुप 1 लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यभरात सध्या ८३ नाट्यगृहे असून २२ नाट्यगृहे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे येतात. उर्वरित ५२ नाट्यगृहांचे नूतनीकरण यासह राज्य शासनाच्या रवींद्र नाट्य मंदिराचे नूतनीकरण याला प्राधान्य देण्यात येणार आहे.


            लवकरच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एक पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. या पोर्टलवर कलाकारांची माहिती उपलब्ध होणार आहे.


            सांस्कृतिक पुरस्कार प्रदान समारंभावेळी ‘उत्सव महासंस्कृती’चा हा नृत्य, नाट्य, भक्ती, संगीत आणि रंजन करणाऱ्या कलांचे सादरीकरण असणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. श्रीधर फडके, सावनी रवींद्र, भजनसम्राट ओमप्रकाश, कृष्णा मुसळे, कार्तिकी गायकवाड, संपदा माने, संदेश उमप, संपदा दाते, संतोष साळुंखे, संघपाल तायडे, शिल्पी सैनी या कलाकरांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले होते.


प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे पुढीलप्रमाणे :


            नाटक या क्षेत्रासाठी सन 2020 करिता कुमार सोहोनी आणि सन 2021 करिता गंगाराम गवाणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंठ संगीत या क्षेत्रासाठी सन 2020 करिता पंडितकुमार सुरुशे आणि सन 2021 करिता कल्याणजी गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. उपशास्त्रीय संगीत या क्षेत्रासाठी सन 2020 करिता शौनक अभिषेकी आणि सन 2021 करिता देवकी पंडित यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी चित्रपटासाठी सन 2020 करिता मधु कांबीकर आणि सन 2021 करिता वसंत इंगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. किर्तनया क्षेत्रासाठी सन 2020 करिता ज्ञानेश्वर वाबळे आणि सन 2021 करिता गुरुबाबा औसेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाहिरी या क्षेत्रासाठी सन 2020 करिता शाहीर अवधूत विभूते आणि सन 2021 करिता कैलासवासी शाहीर कै. कृष्णकांत जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


            नृत्य या क्षेत्रासाठी सन 2020 करिता शुभदा वराडकर आणि सन 2021 करिता जयश्री राजगोपालन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलादान या क्षेत्रासाठी सन 2020 करिता अन्वर कुरेशी आणि सन 2021 करिता देवेंद्र दोडके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाद्यसंगीत या क्षेत्रासाठी सन 2020 साठी सुभाष खरोटे आणि सन 2020-21 करिता ओमकार गुलवडी यांना प्रदान करण्यात आला. तमाशा या क्षेत्रासाठी सन 2020 करिता शिवाजी थोरात आणि सन 2021 करिता सुरेश काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोककला या क्षेत्रासाठी सन 2020 करिता सरला नांदुलेकर आणि सन 2021 करिता कमलबाई शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदिवासी गिरीजनया क्षेत्रासाठी सन 2020 करिता मोहन मेश्राम आणि सन 2021 करिता गणपत मसगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


--

Featured post

Lakshvedhi