Monday, 10 April 2023

 शासकीय काम वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी

मंत्रालय मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र

- अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक

            मुंबई, दि. 10 : मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येत आहे. शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई-ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असूनशासनाचा कारभार हा लवकरच  कागद विरहित (Paperless) करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या  अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिली.

            मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरीकांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे टपाल स्वीकारण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत अपर मुख्य सचिव श्रीमती सौनिक बोलत होत्या. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज आणि अधिकारी उपस्थित होते.

            श्रीमती सौनिक म्हणाल्या की,  सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये प्राप्त होणाऱ्या टपालांवर तत्काळ कार्यवाही व्हावी व वेळेचा अपव्यव टाळण्यासाठी लवकरच टपाल केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई- ऑफिसच्या माध्यमातून पाठविण्यासाठी  ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

            मंत्रालयात फक्त टपाल देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांद्वारे प्राप्त होणारे टपाल स्वीकारण्यासाठी कार्यालयीन वेळेत मंत्रालयाच्या मध्यवर्ती टपाल केंद्रात टपाल स्वीकृतीसाठी विभाग व कार्यालय निहाय  व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येईलयाकरिता मध्यवर्ती टपाल केंद्रातील विभागांकरिता स्वतंत्र ई-खाते एनआयसी ( NIC) मार्फत तयार करण्यात येणार आहे.

            नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून कामकाज करणे अपरिहार्य आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशेपुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाहीअसे टपाल समक्ष स्विकारले जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आपले सरकार वेबपोर्टल  होणार लोकाभिमुख

             'आपले सरकारवेब पोर्टलच्या माध्यमातून 511 सेवा पैकी ३८७ सेवा नागरिकांना दिल्या जातात. शासनाच्या जास्तीत जास्त सेवा लोकाभिमुख करण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये 124  सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर  नागरिकांना आपले अर्ज दाखल केल्यापासून सेवा  सहज मिळाव्यात यासाठी  मोबाईल ॲप देखील सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे.


ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचे कामवर्षभरात पूर्ण करणार

 ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचे कामवर्षभरात पूर्ण करणार


— मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार


 


      मुंबई, दि. 10 : मुंबईत भाऊचा धक्का आणि ससून डॉक प्रमुख मच्छिमार बंदरे आहेत. येत्या वर्षभरात ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            ससून डॉक विकासासंदर्भातील बैठक आज सह्याद्री अतिथिगृह येथे मत्स्य व्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मच्छिमारांच्या सुविधांसाठी मिरकरवाडा, भाऊचा धक्का आणि ससून डॉक हे तीन बंदरे विकसित करण्यात येत आहेत. मत्स्य उत्पादन, विक्रीसाठी मच्छीमार बांधवांना हक्काच्या बाजारपेठेसाठी पालघर जिल्ह्यातील साटपाटी येथे सर्व सुविधायुक्त आदर्श मच्छी बाजारपेठ उभारली जाणार आहे. ससून डॉकचे आधुनिकीकरण करुन सर्व वितरण सुविधा वर्षभरात उपलब्ध करण्यात येतील.


            ससून डॉक प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ 5.39 हेक्टर असून याबाबत सुधारीत विकास आराखडा तयार करण्यात आला असून याअंतर्गत वेगवेगळी 31 प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. ससून डॉक येथे आता 1 हजार 669 कार्यरत नौका, तर 11 हजार 838 मच्छिमार असून या सर्वांना सोयीसुविधा मिळतील याकडे लक्ष देण्यात येणार अल्स्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.


            ससून डॉक येथे नवीन मत्स्य लिलाव आणि मत्स्य हाताळणी केंद्र, जाळी विणकाम गृह, ॲप्रोच रोड तसेच रस्ते काँक्रीट आच्छादनासह रस्त्यांची सुधारणा, बर्फ कारखाना, मल:निस्सारण/ विषारी कचरा संकलन केंद्र, कचरा कुंड्या, सुरक्षा भिंत, मासळी हाताळणी यंत्रणा, हवा हाताळणी यंत्रणा, सध्या असलेल्या इमारतींचे आधुनिकीकरण, मच्छिमारांकरिता विश्रांतीगृह, महिलांकरिता विश्रांतीगृह, सुरक्षारक्षक गृह, व्हिक्टोरिया बेसिनचा गाळ उपसणे, मत्स्य बंदरावर सीसीटीव्ही निगराणी, प्रसाधनगृहांचे नूतनीकरण, रेडिओ कम्युनिकेशन टॉवर साहित्यांसहित, विद्युत पुरवठा व वितरण व्यवस्था, पाणीपुरवठा जळवाहिनी, पंप हाऊस, भूमीगत पाण्याची टाकी, शुध्द पाणी आणि इंधन पुरवठा, अग्निशमन उपकरणे, जेट्टीचे सक्षमीकरण, स्लीप वे अशी कामे करण्यात येणार आहेत.


००००


वर्षा आंधळे/विसंअ/

दिलखुलास' कार्यक्रमात

 दिलखुलास' कार्यक्रमात

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले मार्गदर्शन


मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष


 


            मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या भाषणातून केलेले मार्गदर्शन प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 11 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.


            राज्यात मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष सर्वत्र साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने शासनस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील बंदाघाट येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून मराठवाड्यातील जनतेचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग याबद्दल माहिती देत आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केलेले हे मार्गदर्शन ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.


000

चना, उडीद डाळींचा साठासंकेतस्थळावर अद्ययावत करावा

 , चना, उडीद डाळींचा साठासंकेतस्थळावर अद्ययावत करावा


- शिधावाटप नियंत्रक कान्हुराज बगाटे


            मुंबई, दि. 10 : राज्यातील तूर, चना व उडीद या डाळींचा संबंधित आस्थापनांकडे असलेला साठा fcainfoweb.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून आठवड्यातून किमान एकदा (दर शुक्रवारी) अपलोड करावा, अशा सूचना कान्हूराज बगाटे, नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिल्या आहेत.


            तूर, चना व उडीद या डाळींच्या साठ्याच्या अनुषंगाने साठ्याचे प्रकटीकरण, निरीक्षण आणि पडताळणीबाबत केंद्र सरकारने 29 मार्च 2023 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित आस्थापनेने त्यांच्याकडील तूर, चना व उडीद या डाळींचा साठा आठवड्यातून किमान एकदा ग्राहक व्यवहार विभागाच्या fcainfoweb.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अपलोड करावा. तसेच तूर, चना व उडीद या डाळींची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअन्वये कडक कारवाई करण्यात येईल, असेही श्री. बगाटे यांनी म्हटले आहे.


                                         

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या

 अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या

पिकांचे पंचनामे तत्काळ करुन अहवाल सादर करावा

शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी, मदतीबाबत मंत्रिमंडळात लवकरच निर्णय

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

 

            नाशिकदि. 10 (विमाका वृत्तसेवा) : बागलाण तालुक्यातील बिजोटेआखतवाडेनिताणे या गावामध्ये बिगरमोसमी पाऊसवादळी वारा व गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तत्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून मंत्रिमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइलअशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी देवून यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.

            बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाडभुयाणेनिताणेआखतवाडेबिजोटेगोराणेआनंदपूरद्यानेउतराणेतर सटाणाशेमळीअजमोर - सौंदाणेचौगावकर्हे,ब्राह्मणगावलखमापूरआराईधांद्री आदी गावांत शनिवारी 8 एप्रिल,2023 रोजी बिगरमोसमी पाऊसवादळी वाराविजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदागहूहरभराआंबाभाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बिजोटेआखतवाडेनिताणे आदी गावांतील नुकसानाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसेबागलाणचे आमदार दिलीप बोरसेजिल्हाधिकारी गंगाथरन् डी.मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळेबागलाणचे प्रांत बबन काकडेतहसीलदार जितेंद्र इंगळेगटविकास अधिकारी पी.एस.कोल्हेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणेनितानेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.

            नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठीग्रामसेवककृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावीअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी  निताणेआखतवाडेबिजोटे येथील कांदाडाळिंबपपई व इतर पिकांच्या  झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

00000


शाळा सुटली पाटी फुटली

 *शाळा सुटली पाटी फुटली* असे आम्ही लहानपणी शाळा सुटताना मोठ्याने आनंदाने ओरडत घराकडे पळायचो . मात्र हे *कुंदा बोकील* यांनी गायलेलं साल १९६० मधिल छान गाणं आहे ते माहीतच नव्हतं. आज अचानक हा *खजिना* सापडला ... ऐका लहानपण आठवेल.


आमचाही एक जमाना होता*

 *आमचाही एक जमाना होता*  

बालवाडी हा प्रकार नव्हता ,पुढे 6 वर्षा नंतर स्वतः च शाळेत जावे लागत असे , सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,

मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी

 भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.

     🤪  

    पास / नापास हेच 

आम्हाला कळत होतं...

*%* चा आणि आमचा

 संबंध कधीच नव्हता.


😛


       शिकवणी लावली,

 हे सांगायला लाज वाटायची....

 कारण *"ढ"* असं 

हीणवलं जायचं...


🤣🤣🤣


       पुस्तकामध्ये झाडाची 

पानं आणि मोरपिस ठेवून 

आम्ही हुशार होऊ शकतो, 

असा आमचा दृढ विश्वास 

होता...


☺️☺️


       कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.


😁


       दरवर्षी जेव्हा नव्या

इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि 

वह्यांना कव्हर्स घालणे, 

हा आमच्या जीवनातला

एक वार्षिक उत्सव 

असायचा...


🤗


 वर्ष सम्पल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे.


🤪


       आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.   


😞


कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून,आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो

हे आता आठवतही नाही...


🥸😎


सरांचा शाळेत मार खाताना 

आणि पायांचे अंगठे धरुन 

उभं राहताना,कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा

 *'ईगो'* कधीही आडवा 

येत नव्हता, खरं तर 

आम्हाला 'ईगो' काय 

असतो हेच माहीत 

नव्हतं...


🧐😝


       मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती.

मारणारा आणि मार खाणारा

दोघेही खुष असायचे. 

मार खाणारा यासाठी की,

 'चला, कालच्यापेक्षा तरी 

आज कमी धोपटला गेलो 

म्हणून आणि मारणारा

आज पुन्हा हात धुवून 

घ्यायला मिळाले म्हणून......


😜


बिनचपला ,बुटांचे कोणत्याही चेंडू आणी लाकडी बॅट ने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट

खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.


😁


आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही.

आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे.सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो.

दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काही

अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही.


😁


       आम्ही आमच्या

आईवडिलांना कधी सांगूच

शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला


*आय लव यू'* 


म्हणणं माहीतच नव्हतं...


😌


       आज आम्ही असंख्य 

टक्के टोमणे खात, संघर्ष 

करत दुनियेचा एक हिस्सा

झालोय. काहींना जे हवं 

होतं, ते त्यांनी मिळवलंय

तर काही 'काय माहीत....?'

शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले आणि स्कूल बाहेरच्या त्या हापपॅन्ट वाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र,

कुठे हरवलेत ते...!


😇


       आम्ही जगात कुठेही 

असू पण हे सत्य आहे की, 

आम्ही वास्तव दुनियेत 

जगलो, आणि वास्तवात 

वाढलो........


🙃


कपड्यांना सुरकुत्या पडू 

न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं 

आम्हाला कधी जमलंच 

नाही.भाकरी आणि कालवना शिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.


आपल्या नशिबाला 

चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत.


जे जीवन आम्ही 

जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार 

नाही.,,,,,,,,


😌


आम्ही चांगले असू

किंवा वाईट, पण आमचाही 

एक *'जमाना'* होता.....

Featured post

Lakshvedhi